काही दिवसांच्या पूर्वी प्रतिभाताई गवळी यांच्या कडून त्यांच्या मुलगी सुप्रिया च्या या लग्नाबाबत निमंत्रण मिळाले.
हे लग्न सत्यशोधक पद्धती ने झाले. ही विवाह पद्धत नवरी मुलीला मानसन्मान देणारी विवाह पद्धत आहे.
वैदिक लग्नात विवाह लावणारा व्यक्ती ब्राह्मणच असावा आणि तोही पुरुषच असावा अट अशी बहुतेक ठिकाणी असते, त्याला कारण म्हणजे ब्राम्हण कुळात जन्म झाला म्हणून तो पवित्र आणि श्रेष्ठ आणि इतर कनिष्ठ असे मानले जाते. महात्मा फुले यांनी याला नकार दिला आणि सत्यशोधक लग्नाची सुरुवात केली. ज्यात विवाह लावणारा व्यक्ती कुठल्याही जातीचा आणि लिंगाचा असू शकतो.
याच प्रकार ची पद्धत गांधी विवाहात पण आहे ज्यात ब्राम्हण नसतो आणि कर्मवीर भाऊराव पाटील आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांनी अशी अनेक गांधी पद्धतीची लग्ने लावली. स्त्री पुरुष समानता हा मुख्य धागा या लग्नांच्या मध्ये असतो. म्हणजे ज्या शपथ या मध्ये दिल्या जातात त्या समतेबद्दल असतात. कन्यादान वगैरे विधी नसतो कारण दान करायला मुलगी काही वस्तू नाही.
या विवाह पद्धतीच्या मंगल अष्टका महात्मा फुलेंनी लिहलेल्या मराठीमध्ये आणि सर्वांना समजतील अश्या आहेत.
आपल्या कडील बहुतेक लग्नांच्या मध्ये लोकांचा खूप मान पान ठेवावा लागतो आणि एवढे करूनही कोणी ना कोणी रुसतेच...ज्याचे टेन्शन मुलीच्या आणि मुलाच्या आई वडीलांना असते पण इथे तो प्रकार नसल्यामुळे रुसवा फुगवा नसतो.
बाकी लग्न हा 2 कुटुंब एकत्र येण्याचा आनंदोत्सव असतो , enjoyment असते ती इथेही असते. गाणी आणि इतर सर्व गोष्टी पण असतात. मी स्वतः चे लग्न करताना असे काही किंवा ते नाही पटले तर जैन लग्न सुचवून पाहणार. ती जी कोणी असेल तिला आवडले तर ठीक आहे नाही पटले तर ते ज्या पद्धतीने करतील त्यात एन्जॉय करणार...
महामानवांच्या प्रतिमा स्टेज वर ठेऊन त्यांना अभिवादन करून सुप्रिया व अनिस यांनी एकमेकांशी सत्य वर्तन करण्याची शप्पथ घेतली. ही शपथ पण त्यांना तेथील 2 महिलांनी दिली. धान्याच्या अक्षदा ऐवजी फुलांच्या अक्षदाचा वापर केला होता.
दोघांना सहजीवनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा
Comment, Share ,Follow and Subscribe.
No comments:
Post a Comment