राजगुरुनगर एस टी स्टँड वर पुणे जाण्यासाठी एक तास थांबलो पण एस टी महा मंडळाची लाल, पांढरी गाडी आणि शिवशाही अश्या ८ गाड्या गेल्या पण सगळ्या फूल . लोक उभे राहून जात होते शेवटी या गाडीत चढलो आणि उभे राहूनच प्रवास सुरू केला...
यात आजोबा एका सीटवर विनंती करून कसे तरी बाजूला बसलेले दिसले . इकडे हा चिमुकला आणि त्याची आई मागे उभे होते. हा चिमुकला बसमध्ये इकडे तिकडे करताना आजोबांना स्पर्श करतो. आजोबा त्याला बसायला जवळ घेऊ लागतात.
चिमुकल्याची आई म्हणते "अहो तुम्हालाच जागा नाही त्याला कुठे बसवणार? " त्या चिमुकल्याला सांगते की "त्यांना त्रास देऊ नको." आजोबा स्वतः एवढ्याश्या जागेत बसलेले असताना त्याला जवळ घेऊन बसतात . तो चिमुकला त्यांच्या काठीशी खेळतो , ती खालीही पाडतो. ते पुन्हा उचलतात पुन्हा खाली पाडतो. आई रागावते पण आजोबा आणि चिमुकला दोघे एकमेकांच्या कडे बघून हसतात आणि खेळतात..
मागे बसलेला एक प्रवासी उठतो आणि त्याच्या आईला ताई तुम्ही बसा म्हणतो. चिमुकल्याची आई ती जागा आजोबांना देते अणि उभी राहते.
पुढे जाऊन थोड्या वेळाने अजून काही प्रवासी उतरतात आणि सर्वांना जागा मिळते.
फोटोत आजोबा आणि चिमुकल्याच्या चेहऱ्यावरची smile बघा.....

तर असा मस्त प्रवास....
कुठे तरी वाचले होते एस टी चा प्रवास मनोरंजन हमखास...
ते प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले...
संकेत मुनोत
8668975178
Comment, Share ,Follow and Subscribe.
No comments:
Post a Comment