










उन्हाळ्यातही गारवा अनुभवायचा असेल तर वाई बेस्ट आहे.
तिथे माझे व्याख्यान ऐकायला सन्मित्र कृष्णा काजळे चे मित्र भावेश इंगळे आले होते जे आता माझेही मित्र आहेत. व्याख्यानाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी मला वाई मधील प्रेक्षणीय स्थळे दाखवली..
कृष्णा नदीच्या काठावर दक्षिण काशी म्हणून वाई हे विख्यात धार्मिक क्षेत्र आहे. कृष्णा नदीवर अनेक घाट व प्राचीन मंदिरे आहेत. सरदार रास्ते यांनी वर्ष 1672 मध्ये एकाच दगडातून घडविलेली ढोल्या गणपतीची भव्य मूर्ती, सिध्देश्वर मंदिर, त्यातील सिध्दनाथची संजीवन समाधी, गंगा रामेश्वर, काशी विश्वनाथ, लक्ष्मी नारायण अशी अनेक मंदिरे आहेत.
मराठी विश्वकोशाचे प्रकाशन वाई येथूनच होते.
गणपती आळीच्या घाटावर कृष्णा तीरी ढोल्या गणपती हे वाईतील सर्वात मोठे व भव्य मंदिर पेशव्यांचे सरदार गणपतराव भिकाजी रास्ते यांनी बांधले. गाभाऱ्यात गणपतीची पाषाणाची 6 फूट उंच व लांबी 7 फूट अशी बैठी मूर्ती आहे. मंदिराच्या भव्य सभागृहाला तीन्ही बाजूंनी कमानी आहेत.
कृष्णा नदी काठी असलेले मेणवली गावात पेशवाईतील एक मुत्सद्दी व राजकारणी नाना फडणवीस यांचा गढीचा वाडा आहे. कृष्णा नदीच्या काठावरील केदार घाट व मंदिर प्रेक्षणिय आहेत.
सिंगम या चित्रपटाचे शूटिंग इथेच झाले...
इथून जवळच महाबळेश्वर, पांचगणी आणि अनेक गोष्टी आहेत...
No comments:
Post a Comment