AddThis code

Saturday, June 24, 2023

अन्नपूर्णा मासिकाच्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेले माझे भाषण.. धर्म, धार्मिकता आणि धर्मांधता






अन्नपूर्णा संस्थेचे काम पाहून मला खूप आनंद झाला. मुख्य आनंद या गोष्टीचा कि गांधीजींच्या प्रत्त्येक आंदोलनात आणि रचनात्मक कामात दिसायची तशी महिलांची मोठी संख्या इथे दिसते आहे.शिवाय अन्नपूर्णा ही संस्था ही रचनात्मक कामाचे आदर्श उदाहरण आहे.
आजचा विषय मला दिला तो म्हणजे धर्म, धार्मिकता, धर्मांधता आणि गांधीविचार माणसाला माणसाशी जोडतो तो धर्म तर माणसापासून माणसाला तोडते ती धर्मांधता .
आज धर्मांध लोकांचा आवाज मोठा झाल्याने सगळीकडे धर्माची चुकीची प्रतिमा उभी राहिली आहे. आज बहुतेक धर्मामध्ये त्या धर्माचे चांगले तत्वज्ञान सोडून कर्मकांड जास्त वाढले आहे.कर्मकांड हे धर्मच्या १०% च असायला हवे पण आज कर्मकांड ९०% आणि १० % तत्वज्ञान असे सुरु आहे.यासोबतच आज moral values पेक्षा identification values ला जास्त महत्व दिले जाते . टिकली , कुंकू, टिळा , टोपी यांच्या सारख्या identification values वर जास्त भर दिला जात आहे तर धर्मात असलेले बंधुभाव , प्रेम सारख्या moral values ला महत्व दिले जाते नाही .आपल्या देशात अनेक महामानव आणि सुधारक झाले ज्यांनी सत्य आणि परखड विचार मांडले पण बहुसंख्यांक लोकांचा पाठिंबा न मिळाल्याने त्यांचे विचार मोठ्या प्रमाणात अमलात येऊ शकले नाही . पण महात्मा गांधींना जनतेचा मोठा पाठिंबा मिळाल्याने ते मोठा बदल घडवू शकले. म्हणजे महात्मा गांधींच्या मागे जेवढे हिंदू, मुस्लिम आणि अन्य धार्मिक लोक होते त्याच्या १० % सुद्धा त्या काळात स्वतःला धर्मरक्षक म्हणवणाऱ्या हिंदू महासभा , राष्ट्रीय स्वयंसेवक संघ , मुस्लिम लीग सारख्या धर्मांध संघटनांच्या मागे नव्हते. विशेष म्हणजे महात्मा गांधींना आदर्श मानणारे त्यांच्या विचारांवर चालणारे अनेक मोठे साधू , धर्मगुरू वगैरे तेव्हा मोठ्या प्रमाणात होते जे त्यांच्या अनुयायांना पण उदारमतवादी निर्भय भूमिका घ्यायला सांगत. आचार्य विनोबा भावे मौलाना आझाद , स्वामी रामानंद तीर्थ , राष्ट्रसंत गाडगे बाबा , जैन साध्वी उज्वलकवरजी, राष्ट्रसंत गाडगे बाबा अशी असंख्य नावे आपणास यासंदर्भात दिसतील.
पण आज याच्या उलटे घडत आहे बहुतेक धर्मामध्ये मूर्ख संकुचित लोकांनी स्वतःला त्या धर्माचा साधू म्हणवत द्वेष पसरवणे सुरु केल्याने त्या धर्माचे , समाजाचे आणि देशाचे मोठे नुकसान होत आहे. कालीचरण , सूर्यसागर आणि वेगवेगळ्या धर्मातील अश्याच प्रकारचे ढोंगी साधू साध्वी धमाच्या नावावर समाजात फूट पाडत आहेत. पण याला उत्तर म्हणजे ते चुकीचे म्हणजे धर्मच चुकीचा आणि ते पाळणारे सगळे लोक मूर्ख असा काढता कामा नये .उलट धर्मची उदारमतवादी बाजू समोर आणणे अश्यावेळी जास्त महत्वाचे आहे.
महात्मा गांधींमुळे धर्मात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्या आणि लोक बदलले. राजकारण , समाजकारण, धर्मकारण यामध्ये पूर्वी फक्त उच्चभ्रू आणि उच्चवर्णीयांचे वर्चस्व होते.गांधींनी ते बदलून सर्व जाती जमातींना यात नेतृत्व दिले विशेष म्हणजे जे उच्चवर्णीय होते तेही मोठ्या प्रमाणात गांधीजींच्या सोबत होते आणि स्वतःचे अधिकार सोडून ते ज्या कामाला ही दर्जाचे काम तेव्हा म्हटले जाई असे गांधींमुळे करु लागले यामुळे गोडसे सारखे काही ठराविक लोक भडकले ज्यांना त्यांचे जातिय वर्चस्व कायम ठेवायचे होते आणि त्यांनी गांधींच्या हत्येचे प्रयत्न सुरु केले. २५ जून १९३४ मध्ये पुणे येथे गांधींवर पहिला हल्ला झाला जेव्हा त्यांच्या कारवर बॉम्ब फेकण्यात आला पण नेमकी गांधीजी मागच्या गाडीत बसलेले असल्याने पुढे बसलेला ब्रिटिश अधिकारी जखमी झाला . त्यानंतर १९४२,१९४४ मध्ये दहशतवादी गोडसेने त्यांच्यावर ४ हल्ले केले या ५ ही हल्ल्याच्या वेळेस फाळणी , ५५ कोटी वगैरे काहीही प्रश्न नव्हते तर हल्ल्याचे एकमेव कारण होते ते गांधींनी चालवलेल्या धर्मसुधारणा आणि त्यांना मिळणारा मोठा जन प्रतिसादआता कोण कोणते बदल घडले ते पाहू. पहिला बदल म्हणजे महिला- या काळात महिला वर्गावर घुंगट, पडदा आणि अनेक परंपरा लादून त्यांना चूल आणि मूल एवढ्यापुरतेच मर्यादित ठेवले जायचे. गांधींनी त्यांना निर्भयपणे रस्त्यावर उतरून आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यायला लावला शिवाय चरख्यातून हजारो महिलांना रोजगारही दिला .याबद्दलचा सुरुवातीचा प्रसंग प्रेरणादायी आहे . गांधीजींची बिहार मध्ये सभा होती तेव्हा तिथे सम प्रमाणात महिला असतील तरच मी येईल असे गांधी म्हणाले आणि विशेष म्हणजे तिथे ते घडले पुढे आपल्या देशात महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला तो याचीच परिणीती होती. आपल्या पूर्वीही स्वातंत्र्य मिळालेल्या आणि लोकशाही आलेल्या अनेक देशांना मतदानाचा अधिकार नव्हता त्यासाठी त्यांना मोठा लढा द्यावा लागला.
गांधीजींनी केलेल्या लोक चळवळीमुळे तो आपल्याला स्वातंत्र्यासोबतच मिळाला. आता धर्म आणि जातीत कसे बदल घडले ते पाहू. साधे पगडीचे उदाहरण घ्या . ज्याची जेवढ्या जास्त पिळाची पगडी तेवढी त्याची जात मोठी आणि त्यावरून त्याला येता जाता नमस्कार केला जाई. महात्मा गांधींनी सगळ्यांना सामान खादी टोपी देऊन ही जात ओळखण्याची पद्धतच मिटवली. हरिजन सहभोजन उपक्रम सुरु केले . हजारो मंदिरे ज्यात आपल्याच लोकांना अस्पृश्य समजून प्रवेश नाकारला जात असे ती गांधीजींच्या आंदोलनामुळे खुली झाली . जिथे उंबरा ओलांडण्याची परवानगी नव्हती पाणी बाहेर वरतून दिले जायचे तिथे गांधींनी सांगितल्यामुळे भारतभर लोक त्यांना घरात घेऊन सोबत जेवू लागले, मी फक्त आंतरजातीय विवाहातच उपस्थित राहणार या त्यांच्या विचारामुळे हजारो आंतरजातीय विवाह लागले . गांधीजींनी स्वतःच्या मुलाचाही वाई येथे आंतरजातीय विवाह लावला होता तेव्हा ही पुण्यातील सनातनी चिडले होते आणि त्यांनी या गांधीचा काही तरी बंदोबस्त केला पाहिजे असे म्हटले होते .
पण हे सगळे करताना हे लक्षात घ्यावे लागेल कि गांधीजींनि हे बदल हळूहळू हृदयपरिवर्तनातून केले होते. आपल्यापैकी बरेच लोक जेव्हा धर्मावर टोकाची टीका करतात तेव्हा त्या धार्मिक व्यक्ती ही आपल्यापासून दूर जातात. गांधीजी आणि इतरांमध्ये फरक हा कि . इतर लोक ५ पाऊले पुढे जाऊन मागच्या माणसाला फरफटत त्यांच्या सोबत नेण्याचा प्रयत्न करतात ज्यामुळे ती माणसे हात सोडून दुसऱ्या दिशेने जातात तेच गांधीजी त्या लोकांना सोबत घेऊन एक एक पाऊल टाकतात त्यामुळे जास्त लोक त्यात सहभागी होतात. गांधीजींनी जी धार्मिक स्पेस घेतली होती ती आज आपण गमावली आहे त्यामुळे आज राम गांधीजींचा नसून तो अडवाणींचा राम बनला आहे.
आपल्या देशाचे हिंदू राष्ट्र झाले तर फक्त मुस्लिम आणि ख्रिश्चन यांना दुय्यम स्थान नाही मिळणार तर जैन, बौद्ध , शीख आणि सामान्य हिंदूंची आणि महिलांची अवस्था बिकट होईल . कारण द्वेष करणार्यांना काही तरी लक्ष्य लागते आज ते मुस्लिमाचा द्वेष करतात उद्या ते संपल्यावर ख्रिश्चन मग जैन , बौद्ध , सामान्य हिंदू आणि महिलांचा क्रमांक लागेल यापासून वाचायचे असेल तर भारताचे हिंदुराष्ट्र , मुस्लिम राष्ट्र किंवा अन्य कुठल्याही धर्मचे राष्ट्र न बनता हा महात्मा गांधींनी घडवलेले सर्वांचे राष्ट्र कसे अबाधित राहील यासाठी आग्रही राहायला हवे.आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात तर याची खूप गरज आहे कारण आज जाती , धर्म , वर्ग आणि अनेक भेदांच्या मध्ये देश तोडला जायचा प्रयत्न होत आहे.
तर चला आपापसात प्रेम आणि संवाद वाढवूया , बदलाची सुरुवात स्वतःपासून करूया
संकेत मुनोत 8668975178
email - changalevichar1@gmail.com

Comment, Share ,Follow and Subscribe.

No comments:

Post a Comment