AddThis code

Wednesday, August 28, 2024

MBBS झालेल्या प्रतीक्षा यांनी Dear अहो असे म्हणत 7 पानी पत्र लिहीत नवऱ्याच्या संशयी वृत्तीला कंटाळून आत्महत्या केली

खूप मोठी गायनाकॉलॉजिस्ट व्हायचं ...असं स्वप्न बाळगून तशी वाटचाल करणाऱ्या डॉ. प्रतीक्षा गवारे यांच्यावर पतीच्या संशयी स्वभावामुळे व त्यातून होणाऱ्या छळामुळे आत्महत्या केली. 
छत्रपती संभाजी नगरमध्ये ही घटना घडली. 
प्रीतम शंकर गवारे असं आरोपीचं नाव असून तो फरार झाला आहे. 
 'डियर अहो', असं पतीला सात पानी पत्र लिहून त्यांनी आत्महत्या केली. त्यांचं हे पत्र वाचून अनेकांचे डोळे पाणावत आहेत. 
डॉ. प्रतीक्षा यांचं पत्र पुढीलप्रमाणे ...

डिअर अहो,

खूप प्रेम केलं हो तुमच्यावर, जिवापाड प्रेम केलं. स्वतःला विसरुन गेले तुमच्यासाठी. माझ्यासारख्या हसत्या, खेळत्या मुलीला त्रास देऊन मंद करुन टाकलं तुम्ही. एका स्वावंलबी, Ambitious मुलीला Dependent बनवलं तुम्ही. खूप स्वप्नं घेऊन लग्न केलं होतं तुमच्याशी की हे मला खूप जीव लावतील. काळजी करतील, करिअरमध्ये सपोर्ट करतील. आपली छोटीशी फॅमिली असेल. तुम्हाला मुलगा हवा होता, त्यासाठीच तयारी करत होते मी. गोंडस बाळ असतं आपलं तर ही वेळ तुम्ही माझ्यावर आणली नसती. तुम्ही सांगितलं म्हणून मी सगळं सोडलं मी. मित्र मैत्रिणी, नातेवाईक, आई वडिलांशी बोलल्यावर तुम्हाला राग यायचा म्हणून त्यांच्याशीही जास्त बोलत नव्हते. पण तरीही तुमचं पोट भरलं नाही. मोबाइल बदल म्हणाले, बदलला. नंबर बदल म्हणून वाद घातले, त्यासाठीही तयार झाले. तरीही तुमचे डाऊट संपले नाहीत. सतत माझ्या कॅरेक्टरवर संशय घेत आलात. पण देवाशपथ सांगते मी तुमच्याशी प्रामाणिक होते आणि राहिले. माझ्या चारित्र्यात काहीच खोट नाही.

माझ्या कर्तव्याला दिखावा करते असं म्हटलंत त्याचं वाईट वाटलं

सासू-सासऱ्यांची काळजी घेतली, कधी उलटसुलट बोलली नाही. त्यांनी पण मला जीव लावला. पण माझ्या कर्तव्याला तुम्ही दिखावा करते, असे म्हटले. मला त्याचं फार वाईट वाटलं म्हणून काल देवाला जाताना मम्मी पप्पांना कॉल केला नाही. मला पटत नव्हतं पण मी कंट्रोल केलं. तुमच्यावर मी लग्नाअगोदर पैसा खर्च केला. तरी तुम्ही त्यातले पैसे आईवडिलांना लग्नाच्या खर्चासाठी दिले म्हणून वाद घातले. तो पैसा मी माझ्या कष्टाने आणि आईवडिलांच्या साथीने कमावला. मला खूप मोठी गायनोकोलॉजिस्ट व्हायचं होतं. पण सगळं पाण्यात बुडवलं तुम्ही त्रास देऊन. शेवटी एवढंच म्हणेल, माझ्या आईवडिलांना मी नसले तरी कुणाल आहे. पण तुम्ही एकटे आहात. सासू सासऱ्यांना नीट सांभाळा. त्यांच्यावर चिडचिड करत जाऊ नका. आय लव्हू यू सो मच. बाय. यू आर अ फ्री बर्ड नाऊ.

मला विसरुन आनंदाने जगा असंही प्रतीक्षा यांनी म्हटलं आहे. 

तुम्ही गोड आहात दिसायला, गोड राहा आणि कधी थोडंसं जरी प्रेम केलं असेल माझ्यावर तर मला एक टाइट हग करुनच चितेवर ठेवा. बाकी आयुष्य मला विसरून आनंदाने जगा.

तुमचीच

प्रतीक्षा

अशी चिठ्ठी लिहून प्रतीक्षा गवारे यांनी आत्महत्या केली आणि आयुष्य संपवलं आहे. पतीचा रोजचा त्रास सहन होत नसल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे.

त्यांना सांगावेसे वाटते जे वाचायला त्या जिवंत नाहीत पण तुमच्या जवळपास अश्या मुली असतील तर त्यांना सांगा कि 

प्रतीक्षा मॅडम, 
तुम्ही चुकलात, या जगात अशी अनेक मुले आहेत त्यांना खरे प्रेम मिळत नाही. तेही भरभरून प्रेम करू इच्छितात तर मुलगा असो वा मुलगी असा पर्याय शोधू नका. त्याऐवजी असा समदुःखी जोडीदार निवडा.
जोडीदार असा निवडा जो तुमच्या पंखाना कापणार नाही तर बळ देईल. दोघेही सोबत आकाशात भरारी माराल आणि निवड चुकली  आणि समोरचा ऐकायलाच तयार नसेल तर वेगळा होण्याचे ऑप्शन आहेच आणि जगातील अनेक महान लोक सुद्धा वेगळे होऊन त्यांना नंतरचा जोडीदार चांगला मिळाला असे झाले आहे. 

संकेत मुनोत
8668975178

No comments:

Post a Comment