Author: Bhagat Singh
Title: Different views of new leaders (Naye netaon ke alag alag vicar)
First Published: in Kirti July 1928.
Creative Ideas, Myths and Facts, Experiences, interviews of Great People
Youth Activist, Writer, Avid Reader, Traveler, Researcher, Political Analyzer, Financial and Health and Life Insurance Adviser, TV Panelist
शहाण्याने कोर्टाचीे पायरी चढू नये म्हणतात तसा मी कोर्ट, पोलीस आणि दवाखाना यांच्यापासून चार हात दूरच असतो.
नियमित व्यायाम केला तर दवाखान्याची गरज नाही, वाहतुकीचे नियम पाळले ट्रॅफिक पोलिसांशी संबंध येत नाही. पण कधी कधी काही प्रसंग टाळता येत नाहीत.
पुण्यात कुठल्या कार्यक्रमाला जायचे म्हटले तर बऱ्याचदा पार्किंग शोधायलाच 10-15 मिनिट जातात पण हे जर नाही केले तर नो पार्किंग मधून कधी गाडी उचलून नेतील याचा भरोसा नाही म्हणून तेवढी काळजी घ्यावीच लागते.
असाच काही दिवसांपूर्वी शिवाजीनगर चौकातून संचेती हॉस्पिटल रस्त्याकडे जात होतो गाडी डावीकडे वळवली तेव्हा ट्रॅफिक पोलिसांनी अडवले. मनात म्हटल कारण काय? डोक्यावर हेल्मेट होते, हेड लाईट, नंबर प्लेट सर्व तर बरोबर होते मग काय कारण असेल बरं? त्यांनी माझ्याकडून चालक परवाना (Driving Licence) घेतला आणि २०० रु ची पावती करायला सांगितले. म्हटल ‘काका चुकल काय पण माझ?’ तेव्हा कळले कि दुभाजकाच्या डाव्या बाजूने जाण्याऐवजी मी उजव्या बाजूने गाडी घेतली होती जेथून डावीकडे वळायला परवानगी नव्हती. त्यांना म्हटले "बोर्ड तरी लावायला हवा होता याबद्दल" , मग म्हटले "जाऊ द्या ना काका एवढ्या वेळेस" पण २०० रु ची पावती करा आणि मगच licence देतो अस त्यांनी बजावलेे. काय करणार?
खिशात हात घातला तर ६० रु निघाले. Debit Card होते पण नोटबंदीचा काळ होता. ६० रु दिले आणि म्हटले जाऊ द्या एवढेच आहेत पण तरीही त्यांनी licence काही दिले नाही. शेवटी sack मध्ये काही आहे का शोधू लागलो त्यात माझेच गांधीजीचे एक पुस्तक होते कुणाला तरी कुरिअर ने पाठवायचे होते ते दिले आणि पुस्तकाची माहिती दिली. त्यानंतर काय झाले काय माहित पण त्यांनी licence आणि ६० रु दोन्ही परत दिले. पुस्तक त्यांच्याकडेच ठेवले आणि जा म्हणाले. "पुस्तक कसे वाटले त्याचा अभिप्राय नक्की द्या असे 2-3दा त्यांना सांगून मी निघालो. "गांधी मजबुरी नाही मजबुती का नाम" याचा प्रत्यय आला.पण मन अस्वस्थ होते "का सोडले बरं?"
दुसर्या दिवशी पुन्हा माहिती घेऊ म्हणून तेथे गेलो तर ज्यांना पुस्तक दिले ते पोलीस तिथे नव्हते दुसरे होते त्यांच्याकडून दंड कसा असतो आणि इतर नियम काय असतात या गोष्टींबाबातीत माहिती घेऊ लागलो. "पोलीस काहीतरी कारण काढून पावती न करता पैसे उकळतात"असा एक समज अनेक लोकांमध्ये आहे याबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले कि पोलीस कधीच पैसे मागत नाहीत प्रत्यक्ष्य डेमो तुम्हीच बघा त्यानंतर मात्र जे झाले ते आश्चर्यकारक होते
सिग्नल तोडणार्या दोघांची गाडी अडवली आणि मला जवळ बोलवून निरीक्षण करायला सांगितले. दोघांना २००-२०० रु ची पावती करायला सांगितले. क्रमाने ५० रु आणि नंतर १०० रु देण्याचा प्रयत्न त्यातील एकाने केला शेवटी पोलिसांनी शेवटपर्यंत नकार दिल्याने बर्याच वेळाने त्याने २०० रु ची पावती केली दुसर्याने तर शेवटपर्यंत दिलेच नाहीत.
ट्रॅफिक चे नियम व इतर अनेक बाबतीतील सत्य अधिक जाणून घेण्यासाठी मग पुणे शहराचे मुख्य पोलीस निरीक्षक शंकरराव डामसे यांची भेट घेतली.. त्यांना अनेक प्रश्न विचारले पोलिसांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सणवार आदीच्या सुट्टीबाबत विचारले असता ते म्हणाले कि "आम्हाला स्वतःला जरी सण साजरे करता येत नसले तरी लोक जे सण साजरे करतात त्यातच आमचा सन्मान आहे".हेल्मेट न घातल्यामुळे आज काल कुणाला पकडत नाही याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले कि पोलीसही शेवटी माणूसच आहे.समोरच्या ३० गाड्यांपैकी ३-४ जन च हेल्मेट घालत असतील तर पोलीस कुणा-कुणाला पकडणार ?
या चर्चेतून हा निष्कर्ष निघाला कि पोलीस तर आपल्या संरक्षणासाठी त्यांचे सणवार, घर परिवार आदी सोडून रात्रंदिवस झटत असतात आपण त्याची जाण ठेवायला हवी.त्यांच्या असण्यामुळेच आपण वेळेवर सुरक्षितपणे आपल्या ठिकाणी जाऊ शकतो
, अपघात होत नाहीत बऱ्याच गोष्टी सुलभ होतात हे लक्षात घ्यायला हवे
याच बाबतचे काही अनुभव मला ही आले
वर्षभरापूर्वी अॉफिसमधुन घरी येत होतो.
पुणे मुंबई हायवेवर पिंपरी वरुन खडकीकडे जात असताना आमच्या कारच्या(company cab) थोडस पुढे भरदाव जाणारी एक बाईक स्लिप झाली बाईकवरील युवकाचे डोके दुभाजकाला जोरात धडकले ,बर्याच लांबपर्यंत तो गाडीसह फरपटत गेला आणि पडला. त्याच्या शेजारुन जाणार्या छोट्या टेंपोचालकाने प्रसंगवधान राखुन ईशारा करुन मागुन येणार्या गाड्यांना थांबवले 1-2 जणाांनी आपली गाडी थांबवुन त्या तरुणाला ऊचलुन बाजुला नेले त्याला किरकोळ मुका मार लागला होता हेल्मेटमुळे डोक्याला कुठलीही दुखापत झाली नव्हती हेल्मेट नसते तर काय झाले असते कुणास ठाऊक??
दोन वर्षांपूर्वी (नोव्हेंबर 2014)माझ्या Cousinचा(आत्येभाऊ)अपघात झाला होता तो पौडरोड सिग्नलवर थांबला होता आणि समोरुन येणार्या एका भरदाव कारने त्याला ऊडवले व कारचालक फरार झाली जवळ असणार्या काही लोकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेले डोक्याला गंभीर जखम झाली होती 3दिवस तो ICU मध्ये होता आणि नंतर महिनाभर दवाखान्यातच.यात त्याची काहीही चुकी नव्हती तरीही त्याला हे सर्व सहन करावे लागले.यानंतर त्यानेही सांगितले कि हेल्मेट असते तर एवढी जखम झाली नसती.
असाच माझ्या एका जवळच्या नातेवाईकाचाही शिक्रापुरजवळ अपघात झाला.शिक्रापुरहुन पुण्याकडे कारने येत असताना एक व्यक्ती अचानक गाडीसमोर आल्याने चालकाने त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी गाडी दुसरीकडे वळवली तेव्हा ती समोर थांबलेल्या कंटेनरला धडकली आणि थांबली तसे ते डायरेक्ट पुढे ढकलले गेले आणि त्यांच्या डोक्याला आणि हनुवटीला, जबड्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. ड्राइवरने सीट बेल्ट लावल्यामुळे त्याला जास्त काही झाले नाही.
हेल्मेट किंवा सिट बेल्ट अतिशय महत्वाचे आहेत.वाहतुकीचे नियम आपल्याच चांगल्यासाठी आहेत ते पाळायलाच हवेत.
एका जवळच्या मित्राला मी हेल्मेटचे महत्व सांगत होतो तर त्याने प्रतिऊत्तरात "नशिबात व्हायचे असेल तर ते कधीही होईल तु हेल्मेट घातल काय किंवा नाही काय ?तरीही वाद प्रतिवाद करुन मी हेल्मेटचे महत्व त्याला पटवून दिलेच.
आपण एवढयाश्या मोबाईलला स्क्रीनगार्ड,कव्हर काय काय लावतो. एका निर्जिव स्क्रीनला एवढ जपतो तो खराब झाला तर दुसरा घेता येतो पण डोके ,आपले शरीर परत मिळेल का? विचार करावा
सर्व मित्रांना विनंती कि हेल्मेट आणि सीट बेल्ट अवश्य वापरावे. सोबतच गाडी चालवताना फोन वापरू नये.
तुम्हाला काही वाटत नसल तरी घरी तुमचे वाट पाहणारे असतात Cousin च्या अपघाताच्या वेळी हे मी स्वत: अनुभवल आहे तर मित्रानो शेवटी एवढेच सांगेन कि नियम पाळा सुरक्षित रहा. ज्या भ्रष्टाचाराच्या नावाने तुम्ही पोलीस किंवा सरकारी कर्मचाऱ्यांच्या नावाने खडे फोडता त्या भ्रष्टचाराला मूळ कारण तुम्हीच आहात
So Be The Change you wish see in the World
जो बदल तुम्हाला देशात किंवा जगात घडवायचा आहे त्याची सुरुवात तर स्वतःपासूनच करावी लागेल ना
कोई भी देश परफेक्ट नही होता उसे परफेक्ट बनाना पडता है आणि त्याला तसं बनवण्यासाठी प्रयत्न करूया.
संकेत मुनोत
8087446346
Youth Activist, Writer, Avid Reader, Traveler, Researcher, Political Analyzer, Financial and Health and Life Insurance Adviser, TV Panelist
Youth Activist, Writer, Avid Reader, Traveler, Researcher, Political Analyzer, Financial and Health and Life Insurance Adviser, TV Panelist
Youth Activist, Writer, Avid Reader, Traveler, Researcher, Political Analyzer, Financial and Health and Life Insurance Adviser, TV Panelist
ससून हॉस्पिटलमधील थरारक अनुभव
काल रात्री 09.00 ते पहाटे 4.00पर्यंत पुण्यातील हडपसर,खडकी,पुणे स्टेशन,भवानी पेठ, स्वारगेट अश्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन गरजू शोधून (Blanket donation )गोधडी वाटप केल्यावर पुणे रेल्वे स्टेशनवरून 'चांगले विचार'समूहाची एक टीम घरी निघतच होती कि तेवढयातअमोलचा फोन आला
ससून हॉस्पिटलमध्ये या, "एका अंध मुलाचा पाय fracture झाला आहे महानगरपालिकेजवळ आम्ही थोडे पैसे contribution करून दिले आहेत" फोन कट झाला
स्टेशनच्या पार्किंगवरून गाडी काढली, मी निलेश आणि हर्षलभैया निघतच होतो की पुन्हा समतादिदींचा फोन आला "सिरीयस केस झाली ए लवकर ये"
मनात थोडेसे धस्स झाले म्हटलं काय करायला आलतो आणि काय झाले मनात चक्र सुरु झाले रात्री अचानक कुणी गाडीच्यामध्ये तर आल नसेल ना? किंवा इतर काही झाले तर नसेल ना?एक मन हेही सांगत होते कि त्यांनी कुणाला मदतही केली असेल पण तरीही एक मन अस्वस्थ होते.
ससूनमध्ये गेलो तेव्हा थोडासा दिलासा मिळाला
तर प्रकरण असे झाले होते
चांगले विचार समूहाची जी एक टीम समता दिदींच्या गाडीत महानगरपालिका रस्त्याजवळ कोणी गरजू दिसतंय का ते पाहण्यासाठी गेली होती तेथून वळताना त्यांना 3 तरुण दुभाजकाजवळ तिथे अस्वस्थ दिसले गाडी बरीचशी पुढे गेल्यावर समतादीदीच्या मनात थोडी शंका आली की ती मुले अंध असावीत म्हणून आणि तिने U turn घेतला.
तर खरच ते तिघेही अंध तरुण होते आणि गाडी किंवा रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न करत होते पण तिघांनाही दिसत नसल्यामुळे त्यांना रिक्षा वगैरे काही थांबवता आली नाही आणि इतर काही साधनही मिळाले नाही.अनेक गाड्या त्यांच्या जवळून गेल्या कुणालाच काही कसे वाटले नाही? का कुणी त्यांची साधी विचारपूसही केली नाही किती कठोर हृदयी झालो आहोत आपण पुणेकर?
त्यातील लक्ष्मीकांत या तरुणाचा रस्ता ओलांडताना खड्डा दिसत नसल्यामुळे त्यात उजवा पाय जाऊन शरीराचे पूर्ण वजन त्यावर पडून तो पाय वाकडा झाला होता तर इतर दोघे जण तो पाय नीट करण्याचा प्रयत्न करत होते.टीमला ते समजताच चैतन्य त्यांना रिक्षात बसवून ससून मध्ये घेऊन गेला (त्याचे मित्र त्याला मंगेशकर हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्यास सांगत होते)तिथे गेल्यावरही रिक्षावाल्या काकांनी भाडे घेतले नाही त्यांना पैश्याचा आग्रह केला असता 'माझेही माणूस म्हणून पण काहीतरी कर्तव्य आहे' असे ते म्हणाले.
सरकारी हॉस्पिटल म्हणजे लवकर कुणी बघणार नाही असे आम्हाला वाटले होते पण अनुभव वेगळाच आला.
डॉक्टरांनी तत्परता दाखवलीे आणि काही सेकंदातच त्याच्या पायाचे dislocation काढले(हाड सरळ केले) X ray चे reports येऊसतर सर्वांना काळजी होती की आता काय होईल पण Xray मध्ये सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आले आणि आमचा जीव भांड्यात पडला नंतर तेथून त्याला आंबेडकर वसतिगृहात घेऊन गेलो आणि निरोप देऊन घरी आलो.
आता आंम्हाला दिव्यदृष्टी असलेले 4 नवीन मित्र मिळाले आहेत काही वेळापूर्वीच त्यांच्यातील अमोल आणि विद्याधर यांचा फोन येऊन गेला लक्ष्मीकांतला बरे वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.वारंवार आभार मनात होता.सोबतच ससूनमध्ये फ्री उपचार झाल्याने पैसे परत घेऊन जा म्हणूनही तो सांगत होता त्याची प्रामाणिकता पाहून डोळ्यात पाणी आले.
फोटोत डाव्या बाजूला बसलेला जाड तरुण आपण बघताय तो विद्यार्थी म्हणजे लक्ष्मीकांत परब.
समतादीदी, अमोल, चैतन्य , सुप्रिया (चांगले विचार टीम) आणि लक्ष्मीकांतच्या मित्रांच्या समयसुचकतेमुळे त्याचा पाय fracture होण्यापासून वाचला.
रिक्षाचालक, सरकारी हॉस्पिटल, तेथिल कर्मचारी या सर्वांबाबतचा हा एकदम वेगळाच अनुभव होता एवढे समजले कि तुम्ही जर एक चांगले पाऊल उचलले तर अशी चांगली पाऊले उचलणारे अनेक जण तुम्हाला भेटतात
सोबतच गोधडी वाटप करतानाही असाच एक सुखद अनुभव आला
काही श्रीमंत लोकांच्या गरजा कधीच संपत नाहीत पण काहीजण असे भेटतात की ते गरजेपुरते असलं तरीही इतरांना देऊन नंतर स्वतः त्याचा उपभोग घेतात जास्तीची अपेक्षा करत नाहीत तर कोणी जास्तीच देऊ केलं तरीही नम्रपणे नकारही देतात.
भिडे पुलाजवळील नदीपात्रातील रस्त्यावरील एका पुलाखाली छोट्या मंदीर जवळील बाकड्यावर झोपलेल्या एका माणसाने (त्याच्याकडे अंगावर एकच घोगंडी होती पण खराब वाटत होती) आम्ही देऊ केलेली धोगंडी चक्क गरज नाही म्हणून नम्रपणे नाकारली. मग आम्ही त्याला अंथरायला तरी होईल ही गोधडी म्हणून विचारले पण त्यावरही त्याने माझ्याकडे आहे अंथरायला असे सांगून तीही नाकारली. असा हा कुडकुडत्या थंडीत, खुल्या आकाशाखाली, छोट्याश्या बाकड्यावर, उघड्या अंगावर घोगंडी घेऊन तो माणूस आम्हालाच जगण्याचं तत्वज्ञान सांगुन गेला.
संकेत मुनोत
Whatsapp number -8087446346
चांगले विचार युवा समूह
#चांगलेविचारसमूह #Blanketdonationdrive #सुखदअनुभव
Youth Activist, Writer, Avid Reader, Traveler, Researcher, Political Analyzer, Financial and Health and Life Insurance Adviser, TV Panelist
ग्रेट भेट विथ कलिंदीताई
एवढी प्रेरणादायी व्यक्ती आपल्या जवळपास आहे आणि आपल्याला त्यांच्याबद्दल काहीच माहित नाही किती आश्चर्य नव्हे?
खूप आश्चर्य वाटले जेव्हा मी कलिंदीताई बद्दल google वर शोधले पण एवढया महान व्यक्तीबद्दल मला जास्त काहीच सापडले नाही
वर्तमानपत्रात रोज भलत्याच लोकांची नाव वाचायला मिळतात आणि ही निस्वार्थपणे कार्य करणारी समाजोपयोगी विद्वान माणसं मात्र अनोळखीच राहतात !!!
Women are not equal to men; they are superior in many ways, and in most ways that will count in the future. It is not just a matter of culture or upbringing. It is a matter of chromosomes, genes, hormones, and nerve circuits.
अस एका biology प्रोफेसरने लिहून ठेवलय ते खोटं नव्हे अस त्यांना भेटल्यावर पुन्हा एकदा सिद्ध झाले असे वाटले
बरीच चौकशी केल्यावर मग सुगन बरंठ काकांना फोन लावला आणि माहिती घेतली तेव्हा कलिंदीताई नावाचे ते विशाल व्यक्तिमत्व माझ्यासमोर उभे राहिले
इंदौर ला तुम्ही गेलात तर तेथे सरवटे बस स्टँड अतिशय प्रसिद्ध आहे. ते कालिंदी ताई च्या वडिलांच्या नावाने उभारण्यात आले आहे. त्यांचे वडील व्ही. व्ही. सरवटे हे स्वातंत्र्य सेनानी, शिक्षण क्षेत्रातील क्रांतिकारक, गांधीजींचे अनन्य सैनिक होते. इंदौर ला बालग्राम नावाची संस्था त्यांनी स्थापन केली ,जी आजही चालु आहे. त्यांना तात्या म्हणूनच सगळे ओळखतात .
त्यामुळे कालिंदी ताईंना लहानपणा पासूनच तुकडोजी महाराजांच्या शब्दात
सांगायचे तर 'राष्ट्र धर्माचे बाळकडू' मिळालेले आहे. त्यांचे वडील मध्य भारत सरकार मध्ये मंत्री होते.
कालिंदी ताई सरवटे या एम. एस .डब्ल्यू. आहेत, 1960 मध्ये त्या विनोबाजीं कड़े आल्या . वय 85 वर्षे आहे. ही त्यांची भौतिक ओळख झाली.
कार्यकर्ता म्हणून ओळख म्हणायची तर त्या विनोबा सोबत भूदान यात्रेत 10 वर्षे राहिल्यात.
भूदान पदयात्रेतच 1964 ते 1996 पर्यन्त विनोबांच्या भाषणाचे संकलन ही त्यांनी केले, जे आज आपणास मिळते तें खरे तर कुसुमताई देशपांडे आणि कालिंदी ताई यांचीच कृपा होय. कारण बाबा तर फक्त बोलत.
1969 साली बाबांनी क्षेत्र संन्यास घेतल्या पासून त्या ब्रह्म विद्या मंदीर, पवनार येथेच राहिल्या.
भगिनींना ही ब्रह्म विद्येची उपासना करता यावी हा
खरा वेद विचार, बाबांनी
ब्रह्म विद्या मंदीर रूपाने प्रत्यक्षात उतरविला.
त्या भगिनी मिळून जे अप्रतिम वैचारिक मासिक चालवितात त्याचे नांव 'मैत्री'.हे मासिक म्हणजे गांधी विचारांचे नवनीत होय. कालिंदी ताई त्या मैत्री मासिकाच्या 32 वर्षे संपादक होत्या.
विनोबा विचारमृत जे आज आपणास उपलब्ध आहे, 20 खंडात त्याच्या ही त्या एक
संपादक राहिल्या. विनोबांच्या संकलित विचार धनातूनच त्यांनी खलील पुस्तके लिहिली
1.अहिंसा की तलाश.
2. इस्लाम का पैगाम.
3. ज्ञानोबा माऊली.
4. तुका आकाशा एव्हढा.
ही पुस्तके विनोबांच्या नावानेच आहेत.
त्यांनी बाबांच्या विचारातून स्वताच्या शैलीत खालील पुस्तके लिहलीत .
1. ऐसी जीवनाची कळा
2. अभंग जीवन व्रत
3. गीतेतील परीसाच्या संगतीत.
या वरुण तुमच्या लक्षात येईल की त्या अतिशय उत्तम वाचक, उत्तम ग्रहण
शक्ती असलेल्या, चिंतक आणी लेखक ही आहेत.
विनोबा गेल्यावर ही
त्यांनी आम्हा सारख्या अनेक लोकांना विचार संस्कारांनी सिंचीत केले आहे.
भूदान यात्रेतीलकाम हे तर जमिनी वर (ग्रास रूट वर्क) काम झाले. म्हणजे त्यांनी फक्त ज्ञानदानाचे आणी संस्कारांचेच काम केले असे नव्हे तर कार्यकर्त्याचे काम ही तब्बल 10 वर्षे केलेलं आहे.
विनोबा सारख्या युगदृष्टा ऋषींचे वचन संकलन करणे हे
काम विद्वानाचे नव्हे तर तत्वज्ञानी माणसाचे आहे.
या करिता विनोबा ही
समजणे जरूरी आहे.
संतांचे वाङमय हेही ताईंचे खास चिंतन, मननाचा विषय. ही ताईंची बाह्य रुपे असली तरी त्या
अतिशय विनम्र, मितभाषी, मृदु भाषी, निरपेक्ष, निर्भय, निर्वैर आणी निरासक्त आहेत. हे मी जवळून अनुभवले आहे.
***
संकेत मुनोत
8087446346
फेसबुक लिंक- https://m.facebook.com/story.php?story_fbid=1375184292532618&id=100001231821936
संदर्भ- सुगन बरंठ काका आणि समता मुथ्था
याच सुश्री . कालिंदी ताई बरोबर एक परिसंवाद आयोजित केला आहे
विचार समजून घेण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करु या.
मित्रांसह आपले स्वागत आहे।
तारीख - 22 /01/17
वेळ - दुपारी 5 ते 7
स्थान- रावसाहेब पटवर्धन स्कूल, साने गुरुजी स्मारक सिंहगड रोड, पुणे
आपल्या आयुष्या साठी उपयोगी मार्गदर्शन आपल्याला या प्रबोधनातुन मिळणार आहे..
event ची फेसबुक लिंक-https://www.facebook.com/events/1817495821826168/?ti=cl
संपर्क - समता मुथ्था
9766051446
- निलेश
976634975
- उमेश ठाकुर
9049042048
-सतीश लोखंडे
9096725056
Youth Activist, Writer, Avid Reader, Traveler, Researcher, Political Analyzer, Financial and Health and Life Insurance Adviser, TV Panelist
Youth Activist, Writer, Avid Reader, Traveler, Researcher, Political Analyzer, Financial and Health and Life Insurance Adviser, TV Panelist