AddThis code

Thursday, March 28, 2019

आपल्या वाणी, आचरण व स्मित हास्याने सगळीकडे आंनद पसरवणारे आंनद गुरू

*आपल्या वाणी, आचरण व स्मित हास्याने सगळीकडे आंनद पसरवणारे आंनद गुरू*
*आचार्य आनंद ऋषीजी महाराज* यांचा आज स्मृती दिन
आनंद ऋषीजी , आंनद बाबा असेही त्यांना म्हटले जाते
  साधारणतः साधू म्हटले की आजच्या काळात आपल्या डोळ्यासमोर कुणीतरी तथाकथित *चमत्कारी पुरुष* किंवा *आपल्या धर्माचा आक्रस्ताळेपणाने प्रचार करणारी 'कट्टर' व्यक्ती* उभी राहते. आनंद ऋषींचे वेगळेपण येथेच आहे. त्यांनी चमत्कार आणि भोंदूपणाऐवजी आपल्या  *प्रवचनांतून आणि आचरणातून समाजसुधारणा, माणसांना जवळ आणण्याचा, सांप्रदायिकता कट्टर वाद कमी करण्याचा तळमळीने प्रयत्न* केला. ते जरी जैन धर्माचे आचार्य असले तरी त्यांनी आपली दृष्टी केवळ जैन धर्मापुरतीच संकुचित न ठेवता संपूर्ण समाजाला व्यापेल अशी विशाल ठेवली. आपल्या शिकवणुकीतूनही त्यांनी *प्रेम, सहिष्णुता, शांतता, अहिंसा, अनेकांतवाद* यांसारख्या मूल्यांचा प्रसार केला. त्यांच्या प्रेरणेतून उभे राहिलेले शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रातले प्रचंड कार्यही सर्व मानव जातीसाठी होते आणि आहे. त्यात जाती-धर्मावरून भेदभाव नव्हता. त्यामुळेच की काय, त्यांना मानणारे केवळ जैन धर्मीयच नव्हेत तर सर्वच जाती-धर्मांतील लाखो लोक आजही आहेत. त्यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या दर्शनार्थ आनंदधामवर जमणारे हजारो सर्वसामान्य लोक याची साक्ष देतात. उदार दृष्टिकोन अंगीकारणारे आनंद ऋषी हे खऱ्या अर्थाने राष्ट्रसंत होते. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी त्यांचा *राष्ट्रसंत* म्हणून केलेला गौरव हा योग्यच होता.(संदर्भ-सन्मित्र गणेश भंडारी)
त्यांच्या प्रवचनात जैन शास्रसोबतच संत तुकारामांचे अभंग, कबीर दोहे, गांधीजींचे प्रसंग, कुराण आणि वेगवेगळ्या धर्मग्रंथातील व वर्तमानातील संदर्भ ही असत.
आजच त्यांनी लिहलेला एक प्रसंग वाचनात आला.
गांधीजीं आफ्रिकेतील तुरुंगात असतांना त्यांच्यासाठी  एक गुन्हेगारी प्रवृत्तीचा क्रृर सेवक ठेवण्यात आला.(गांधीजी कुणी गुन्हेगार नसून एक राजकीय कैदी आणि तेथील पददलितांचे नेते होते त्यामुळे प्रोटोकॉल नुसार ते ठेवणे आवश्यक असावे). हा क्रूर सेवक गांधीजींशी अतिशय उद्धटपणे वागत असे पण गांधीजींनी त्याबद्दल कधीच तक्रार केली नाही. एकदा त्याला विषारी विंचू चावला आणि तो वेदनेने तडफडू लागला गांधीजींनी त्याच्या त्या भागाला चाकूने काप देऊन तोंडाने ते विष घेऊन थूकुन दिले आणि तिथे औषधी वनस्पतीचा लेप देऊन एक पट्टी बांधली काही क्षणात च त्याला आराम मिळाला त्या क्षणापासूनच तो त्यांचा नम्र सेवक आणि मित्र झाला. आंनदऋषीजी म्हणतात हे खरे पांडित्य आहे ज्यात विरोधी विषाला ही अमृतात परिवर्तन करण्याची शक्ती आहे
संत कबिरांनीही म्हटले आहे
*पोथी पढ़ि पढ़ि जग मुआ, पंडित भया न कोय,*
*ढाई आखर प्रेम का, पढ़े सो पंडित होय।*
(संदर्भ-आंनद प्रवचन -अष्टम भाग, पृष्ठ क्रं. १०९)
आज जेव्हा आपल्यासोबत काही वाईट घडते कोणी वाईट वागते तर आपण लगेच त्यांच्याप्रति वाईट होण्याऐवजी त्यांच्याप्रति वैरभाव ठेवण्याऐवजी हे चांगले गुण आचरणात आणून नम्रतेने व क्षमाशीलतेने ते वातावरण व नातेसंबंध चांगले करू शकतो.
एक प्रसंग आठवतो आचार्य असल्यामुळे त्यांना एक उंची पाट बसायला असे तर त्या पाटावर कधी लहान मुलेही बसत आजू बाजूचा श्रावक वर्ग त्यांना उठवे पण आंनदऋषीजीं बसू द्या म्हणत.
आयुष्याच्या शेवटपर्यँत ते काही ना काही नवीन ज्ञान घेत होते, ७० च्या आसपास वय असताना एक मौलवी त्यांना फारसी आणि उर्दू शिकवायला आले होते तेव्हा आनंदऋषीजींनी त्यांना स्वतःच्या पाटावर बसवून स्वतः जमिनीवर बसले काही जणांनी स्वतः त्या मौलवींनी पण यावर आक्षेप घेतला पण ते म्हणाले कि मी आता विद्यार्थी आहे' मग दोघेही जमिनीवर बसून एकमेकांकडून शिकू लागले.
साधू ची लक्षणे संत तुकारांमनी सांगितली आहेत ती त्यांच्यामध्ये दिसत होती
जे का रंजले गांजले । त्यासि म्हणे जो आपले ।। १।।
तोची साधू ओळखावा ।। देव तेथे चि जाणावा ।।धृ.।।
#मृदू_सबाह_नवनीत । तैसे सज्जनाचे चित्त ।। २।।
ज्यासि अंपगिता नाही । त्यासि घरी जो हृदयी ।। ३।।
दया करणे जे पुत्रासी । ते चि दासा आणि दासी ।। ४।।
तुका म्हणे सांगू किती । तो चि भगवंताची मूर्ती ।। ५।।
कबीर म्हणतात
साधु ऐसा चाहिए, जैसा सूप सुभाय,
सार-सार को गहि रहै, थोथा देई उड़ाय।
आंनदऋषीजीं म्हणत असत कि
"मै बडा हो गया तो क्या दुसरो का अपमान करू? दुसरो को तुच्छ समझु? मुझे अधिकार मिला है अधिकार किसीको अपमानित करणे के लिये या किसी को छोटा बताने के लिये नही है| किसी को भी अपमानित करणे का हक हमे नही है कोई भले ही तुम्हे भलाबुरा कहे इससे फर्क क्या पडता है?"
आदर्श ऋषींजीची पुस्तके आणि कार्य खूप मोठे आहे, नगर मध्ये गोरगरिबांना कमी खर्चात चांगल्या आरोग्य सेवा मिळाव्यात या दृष्टीने आचार्य आंनद ऋषी हॉस्पिटल उभारले गेले त्यात त्यांच्या प्रेरणे चा सिंहाचा वाटा आहे.सध्याच्या कट्टर आणि प्रचारकी वातावरणात संयत आणि मुद्देसूद मांडणी करणारे रविषकुमार हे त्यांचेही आवडते पत्रकार आहेत हे विशेष
आज जेव्हा वेगवेगळ्या धर्मातील काही साधूंकडून सामजिक धार्मिक तेढ निर्माण करणारी द्वेषपूर्ण भडक भाषणे ऐकायला मिळतात, तेव्हा आंनद गुरूंची आठवण प्रकर्षाने होते.
प्रत्येक धर्मात 2 प्रकारची मूल्ये असतात एक ओळख मूल्ये आणि दुसरी म्हणजे नैतिक मूल्ये
ओळख मूल्ये जसे कि टोपी, टिळा.. इ
नैतिक मूल्ये जसे कि सत्य, अहिंसा, समता, बंधुभाव ..ई.
वेगवेगळ्या धर्मातील या नैतिक मूल्यांचा मला जीवनात प्रचंड फायदा झाला.मी 4-5 वर्षाचा असतांना एका शिबिरात पुनीत ऋषीजी म्हणून एका साधूंनी एक शपथ दिली कि आयुष्यात दारू, सिगरेट, गुटखा, मावा असे काही ग्रहण करायचे नाही ते मी अजून ही पाळत आहे, ऑफिस आणी अनेक ठिकाणच्या पार्टी मध्ये असे प्रसंग आले पण मी त्यापासून लांबच राहिलो.
असो प्रत्येक धर्मात असे अनेक चांगले संत असतात पण काही भडक लोकांमुळे आपल्यासमोर त्या-त्या धर्माचे वेगळेच चित्र उभे राहते.त्यामुळे असे चांगले साधू संत शोधायला हवेत.संत कबीर, मदर टेरेसा, संत तुकाराम अशी अनेक उदाहरणे देता येतील
आज त्यांच्या स्मृतिदिनी त्यांनी सांगितलेली सहिष्णुता, सत्य, प्रेम, अहिंसा, बंधुभाव, कुणाचा द्वेष न करणे, नम्रता, मानवता, क्षमा, त्याग ही मूल्ये कसोशीने अंगी बाणवण्याचा प्रयत्न करूया! आपले कुटुंब, समाज, देश आणि हे जग अधिक निर्मळ बनवूया
संकेत मुनोत

Tuesday, March 26, 2019

एक आज्जी मिळाली

एक आज्जी मिळाली
माझी आज्जी(आईची आई)  लेकरू लेकरू खूप म्हणायची, लाड करायची, कधी गेलो गावाकडे कि चिक्की कर, बर्फी कर वगैरे करायची
मी काही लिहले कि ते आंनदाने वाचायची, दर शुक्रवारी माझ्याकडून वैभव लक्ष्मी माते ची कथा वाचून घ्यायची, एकदा शाळेत आज्जी वर निबंध लिहायला सांगितलेला मी तो लिहला आणि जेव्हा तो तिला आईने दाखवला तेव्हा खूप रडलेली.पण जास्त दिवस तीचा सहवास मिळाला नाही, मी आठवीत असतांनाच गेली.

पण 82 वर्षाच्या प्रेरणादायी  आज्जी -संजीवनी डॊशी परवा मिळाल्या.whatsapp समूहातच ओळख झालेली पण प्रत्यक्ष असे आपुलकी चे बंध तयार होतील असे वाटले नव्हते..
माझ्या प्रत्येक लेखाला प्रतिक्रिया देणारी व चांगले विचार, Women empowerment, Knowing Gandhism,  understanding Jainism या सर्व समूहात सक्रिय असणारी ही प्रचंड ऊर्जदायी महिला

संजीवनी आज्जींशी ही तशी दुसरी भेट, पहिली भेट दोन महिन्यापुर्वी पुण्यात त्यांच्या नातवाच्या लग्नाच्या रिसेप्शन समारंभात झाली , तेव्हाही त्यांनी खूप आनंदाने स्वागत केले होते व भरभरून बोलल्या. माझ्या सोबतच्या मित्राला त्या म्हणाल्या कि मी लेखावरून ओळखते कि हा संकेत चा आहे म्हणून, त्यांनी मला काही पुस्तके देण्याची इच्छा व्यक्त केली आणि ती योग्य हातात द्यायची आहेत असे सांगून पुण्यातील मुलाच्या घरी काही दिवस असल्याने तेथे येऊन ती घेण्याचे सांगितले पण तेव्हा काही तेथे माझे जाणे झाले नाही, बारामती ला घरी याच अश्या आवर्जून त्या म्हणाल्या होत्या म्हणून जेव्हा फलटण मधील इंजिनीरिंग कॉलेज मध्ये व्याख्यानाला गेलो तेव्हा आज्जींच्या घरी गेलो.
त्यांना खूप आंनद झाला , आल्यावर जेवूनच जा, हे घ्या ते घ्या म्हणू लागल्या , त्यांच्या मुलाला सुंनबाईंना पूर्वीच त्यांनी सांगितलेले होते मग त्यांनी स्वतः अनुवादीत केलेली आणि काही त्यांच्या वडिलांनी लिहलेली अशी अमूल्य पुस्तके भेट दिली.तेथे त्यांचे पती, मुलगा, सूनबाई आणि नातू यांची भेट झाली, सगळे खूप छान बोलले.

संजीवनी आज्जी या वयात ही प्रचंड ऊर्जादायी आहेत, रोज सकाळी 6 पूर्वी उठतात, देवपूजा करतात, मंदिरात जातात , वाचन करतात, लेखन करतात, इयत्ता 9वीत असतांना त्यांनी सुर्यास्तानंतर काही खायचे नाही हा नियम घेतला तो त्या अजून ही पाळतात, त्यांच्या चांगल्या आरोग्याचे हेच गुपित असावे

काही दिवसांपूर्वी त्यांना शिवाजी कोण होता हे pdf पुस्तक पाठवले ते पण त्यांनी पूर्ण वाचून प्रतिक्रिया दिली.

त्यांनी त्यांच्या मुलांबद्दल सांगितले एक मुलगा डॉक्टर, एक औषध Distributer आणि एक Industrialist आहे, त्यांचा एक नातू  नेदरलँडला रोबोटिक्स शिकत आहे, एक सी ए चे शिक्षण घेत आहे आणि इतर नातू असेच काही करत आहेत.
त्यात लहान मुलाबद्दल जे औषधांचा distributer म्हणजे चांगले व्यावसायिक आहेत त्यांच्याबद्दल बोलतांना त्यांच्या डोळ्यात आत्ताही पाणी आले कि त्याला अजून शिकायचे होते पण त्यावेळी नेमकी परिस्थिती खालावली आणि त्याला शिक्षण थांबवून व्यवसाय सांभाळावा लागला. त्यांच्या घरातील सर्वांशी छान गप्पा झाल्या.
सगळे लोक फक्त आर्थिक दृष्ट्या च नव्हे तर संस्कार, ज्ञान आणि मनाने ही खूप श्रीमंत आहेत.
मला बस स्टॉप वर सोडताना अजय सर म्हणाले कि तुम्ही आईशी नियमित बोलत जा तुमच्यामुळे तिचे आयुष्य वाढते
हे शब्द माझ्यासाठी खूप मोलाचे होते.
देण्यासारखे माझ्याकडे काहीच नव्हते पण या सर्वांची प्रचंड ऊर्जा  आणि एक आज्जी मात्र मिळाली.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2310109335706771&id=100001231821936

Saturday, March 23, 2019

जालना येथील महाविद्यालयात युवांशी संवाद आणि अनेक प्रेरणादायी भेटी

08फेब्रुवारी रोजी जालना येथील जे ई एस महाविद्यालयात युवांशी छान संवाद साधता आला, 3-4 दिवसीय शिबिरानिमित्त महाराष्ट्रभरातील वेगवेगळ्या कॉलेजेसमधून युवा वर्ग येथे आला होता.
मला आमच्या NSS कॅम्प ची आठवण झाली
आजचे युवाच उद्याचा देश घडवणार आहेत त्यामुळे त्यांच्यापर्यत हे प्रेमाचे, समतेचे, बंधुतेचे विचार पोहोचणे अधिक आवश्यक आहे असे मला वाटते.
यानिमित्त पुणे-जालना प्रवासात भुजंग बोबडे सरांची पहिली ग्रेट भेट झाली, ट्रक क्लीनर ते इतिहास संशोधक हा थरारक प्रवास जाणून घेता आला, एरवी फोन होत असतात पण हा मनुष्य एवढा मोठा असेल याची कल्पना नव्हती. जगातील सगळ्यात मोठे असलेले गांधी रिसर्च फौंडेशन, जळगाव या संग्रहालयाचे ते मुख्य आहेत आणि वेगवेगळ्या सरकारी व इतर संघटनांमध्ये पदाधिकारी आहेत, त्यांची जगातील 8 भाषांमध्ये आत्तपर्यत अनेक पुस्तके आलेली आहेत, विशेष म्हणजे आत्ता आलेल्या एका शिल्पकलेवरील पुस्तकाची किंमत 30 हजार रुपये आणि त्याची पहिली आवृत्ती ही लगेच संपली.पण अगदी साधा गांधी प्रत्यक्षात जगणारा मनुष्य आहे हा, खादी कपडे तर घालतातच पण स्वतःचे केस ही स्वतःच कापतात..
नंतर भेट झाली ती डॉ यशवंत सोनूने सरांची,ते अनेक वर्षापासून चिकाटी व जिद्दीने ते इथे गांधी अध्यासन केंद्र चालवत आहेत. २००४ ते २०१९ या पंधरा वर्षाच्या कालखंडात 15 राज्यस्तरीय गांधी विचार अभ्यास शिबिराचे आयोजन त्यांनी केले आणि अजून बरेच मोठे कार्य करत आहेत.माझी न त्यांची ओळख व्हाट्सअप्प आणि फेसबुक वरचीच पण तिथे गेल्यावर सरांशी आपुलकीचे नाते तयार झाले.प्रा. डॉ महावीर सदावर्ते यांचे पण चांगले सहकार्य लाभले.
कॉलेज चे प्राचार्य काबरा सर यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारता आल्या त्यांनी महाविद्यालय कसे स्थपन झाले ते सांगितले.
भारताचे पहिले पंतप्रधान  पंडित जवाहरलाल नेहरू दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचारासाठी 1957 साली जालना शहरात आले असताना जालनेकरांनी त्यांच्या सन्मानार्थ रुपये  21211 एवढा निधी उभा केला व त्यांना भेट दिला, पंडितजींनी हा गौरव निधी जालनेकरांना परत केला आणि या निधीतून शहरात एक उच्च शिक्षण घेण्यासाठी महाविद्यालय सुरू केले जावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यातून जालना एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली. आज कनिष्ठ महाविद्यालय एमसीवीसी बायोफोकल, वरिष्ठ महाविद्यालय कला, वाणिज्य व विज्ञान आणि पदवीत्तर महाविद्यालयांमध्ये भौतिक शास्त्र, वनस्पतिशास्त्र, रसायनशास्त्र ,एम .कॉम .,एम . ए. अर्थशास्त्र तसेच अनेक विषयात संशोधनाची सुविधा उपलब्ध आहे दरवर्षी जवळपास चार ते साडेचार हजार विद्यार्थी या महाविद्यालयात प्रवेश घेत असतात.
त्यांनतर तेथे असणारे पुरोगामी चळवळीतील मित्र आणि शिक्षक संजय लकडे या रुबाबदार व्यक्तिमत्वाशी सरांशी थोडी चर्चा करता आली.
निघतांना अमरावतीत धर्मेंद्रभाई शी अर्धा तासाची धावती भेट झाली, आसाम मधील ज्या ठिकाणी अशांतता आहे दंगलीं घडतात अश्या अनेक ठिकाणी धर्मेंद्र भाई  शांतता नंदवण्यासाठी कार्य करत आहेत, म्हणजे काही प्रांत तर असाही असतो कि जिथे पोलीस व इतर लोक ही जायला घाबरतात, अश्या ठिकाणी ही धर्मेंद्र भाई  जीवाची पर्वा न करता गांधीजी प्रमाणे निर्भीडपणे प्रवेश करतात आणि तेथे  गांधींविचारानी शांतता प्रस्थस्पित करतात.लघुउद्योगच्या माध्यमातून त्यांनी तेथे हजारो महिलांना रोजगार मिळवून दिला आहे.
दुपारी chemistry च्या प्रा. बाफना सरांसोबत गणेश भुवन मध्ये जाऊन प.पु. खद्दरधारी गणेशलालजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेता आले व तेथील शांत व प्रसन्न जागेचा अनुभव घेता आला, तेथील पदाधिकाऱ्यांना ही भेटता आले ज्यांनी तेथे छान स्वागत केले, दर महिन्याला हजारो लोक या ठिकाणी दर्शनाला येतात.
आपल्याला एक गोष्ट माहित नसेल कि गणेशलालजी महाराज ही खादीबद्दल खूप आग्रही होते स्वतः तर खादी घालतच पण ते जिथे जात तिथे त्यांच्या प्रवेशपूर्वी खादीचे दालन कि गाडी येत असे आणि बहुतेक दर्शनार्थी ही खादीतच असत असे सुगन बरंठ काकांनी सांगितल्याचे आठवते.
राष्ट्रीय युवा संगटनचे माजी संयोजक मनोज जी ठाकरे आणि रजर्नीताई पाटील यांच्याकडून ही प्रेरणादायी गीते ऐकता आली व वेगवेगळ्या गोष्टींवर संवाद साधता आला.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये तसेच शालेय विद्यार्थी आणि समाजातील नागरिक यांच्यामध्ये महात्मा गांधींचे सत्य आहे चे विचार पोहोचावे या उद्देशाने हे  महात्मा गांधी अध्ययन केंद्र कार्य करत आहे.
करण्यात आले .
मला इथे बोलण्याची संधी मिळणे माझे मोठे भाग्यच म्हणावे लागेल
आजपर्यंत येथे कुमार प्रशांतजी, डॉ. यशवंत सुमंत ,मेधाताई पाटकर, अमरनाथ भाई, दिल्ली येथील डॉ. सच्चिदानंद ,adv असीम सरोदे, विश्वंभर चौधरी ,लवनमजी विश्वजीत रॉय ,सोपान जोशी, डॉ. श्रीराम जाधव, शोभा शिरोडकर , रमेश ओझा, गंगाप्रसाद अग्रवाल, विजयअण्णा बोराडे,  अल्लाउद्दीन शेख, वसुधा सरदार, विजय दिवाण, अरुण ठाकूर, संजय मंगला गोपाळ, समीर शिपूरकर, नरेंद्र लांजेवार सुभाष शर्मा, प्रांजल दीक्षित ,किशोर बेडकीहाळ अर्जुन डांगळे हरिभाऊ ,प्रशांत नागोसे, मनोज ठाकरे, यामिनी गजपुरे , बाळासाहेब सरोदे , लक्ष्मण विवेकानंद विजय जावंधिया, , भूजंग बोबडे एड. राज कुलकर्णी संजय मंगला गोपाळ, प्रेरणा देसाई आदी अनेक मान्यवरांनी या शिबिरात मार्गदर्शन केले आहे
.शिबिराचे वैशिष्ट्य हे सांगता येईल की दररोज सकाळी पाच ते रात्री दहा या मध्ये सर्वधर्म प्रार्थना, प्रकृती प्रार्थना सुबह का सच,  गीत ,वर्ग बौद्धिक स्वतः गटचर्चा ,खेळ ,चावडी असे अनेक उपक्रम होत असतात.
मागच्या तीन वर्षापासून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या योजना बंद झाले असल्याकारणाने हे केंद्र संस्थेच्या मदतीवर सुरू आहे .यावर्षी शासन स्तरावर तील गांधी 150 निमित्ताने अनेक उपक्रम घेतले जात असताना या केंद्राच्या अनुदान बंद होणे हे दुःखद आहे. सरकारला याप्रति जाब विचारायला हवा कि बाहेर प्रत्येक देशात जाऊन सोयीसाठी गांधींचे नाव घेता आणि स्वतःच्या देशात गांधींविचारांच्या प्रसाराला असे थांबवता असे दुटप्पी धोरण का घेता?
जालना मधील हा अनुभव ऊर्जदायी आणि अविस्मरणीय होता
या सगळ्यांकडे पाहून सहज एक गीत आठवले
मन सुद्ध तुझं गोष्ट हाये पृथिविमोलाची
तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची… पर्वा बी कुनाची
लिहताना काही चुकले असल्यास कुणाचे नाव राहिले असल्यास क्षमस्व
संकेत मुनोत
8087446346

Saturday, March 9, 2019

कोकणमधील अविस्मरणीय आठवणी- ०५-०५-२०१८

गोपुरी आश्रम, वागोदे , कणकवली येथे श्रमसंस्कार छावणीचे सुंदर आयोजन मनीषा पाटील मॅडम, राजेंद्र मुंबरकर सर आणि त्यांच्या टीमने केले होते. तेथे पहिल्या दिवशी 5 मे रोजी  'गांधी विचार आणि लोकशाही' यासंदर्भात शिबिरार्थींशी संवाद साधन्याची संधी मिळाली. त्याच दिवशी जयवंत मठकर काका, ठाकूर काका यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.माझ्यानंतर पुढील दिवसांच्या सत्रात मा. लक्ष्मीकांत देशमुख सर, जतीन देसाई सर आणि संजय आवटे सर असे अनेक मान्यवर या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार होते. युयुत्स आर्ते, संदीप निंबाळकर, विजयालक्ष्मी चंडक, हरिहर वाटवे आणि अनेक मान्यवारांशी येथे भेट झाली.

कोकण गांधी-
गांधी काय माणूस होता राव ?अनिल अवचट सरांनी एका ठिकाणी लिहलय, गांधीजींच्या एकेका वाक्याने अनेकांनी त्यांची त्यांची आधीची जीवनं फेकून देऊन पूर्णपणं वेगळा रस्ता धरला आहे. कसा होत असेल हा बदल? अप्पा पटवर्धन हे असेच विलक्षण व्यक्तित्व. त्यांचं ‘माझी जीवनयात्रा’ हे आत्मचरित्र वाचलं आणि चकित झालो. तुरुंगात त्यांनी भंगीकाम पाहिलं. स्वत: करायची तयारी दाखवली; पण तुरुंगाधिकाऱ्यानं परवानगी दिली नाही. कुडाळमध्ये परत आल्यावर बादली- खराटा घेऊन सक्काळी भंग्यांमध्ये (आता आपण त्यांना मेहतर म्हणतो) मिसळले. पुढं त्यांनी अनेक प्रयोग केले. चराचे संडास, सोपा संडास… इ. आज बिंदेश्वरी पाठकांनी भारतभर बांधलेली सुलभ शौचालये हा अप्पांचा सोपा संडासचीच जवळची आवृत्ती. नाशिकजवळ गंगापूरला भाऊ नावरेकरांनी हेच काम पुढं चालू ठेवलं. आता त्यांची मुलं काम करीत आहेत. त्यांनी बायोगॅसचा सुटसुटीत प्लँट तयार केला आहे आणि जागोजाग जाऊन तो ते करून देतात. तोडणकर गुरुजीही असेच संडास या समस्येला वाहिलेले. संडास ही काय प्रतिष्ठितपणं उच्चारायची गोष्ट झाली? त्याकडं डोळेझाक करीतच आपण ती समस्या आणखी वाढवून ठेवली आहे. खेड्यापाड्यात स्त्रियांनी पहाटे किंवा रात्री उशिरा गटानं जाऊन बाहेर रस्त्याकडेला बसावं आणि गाडीचा प्रकाश पडला की उभं रहावं… किती लाजिरवाणी अवस्था. शेतं गावाला खेटायला आली आणि अशा जागा नष्ट झाल्या. शहरात त्यापेक्षा वाईट अवस्था. मागे पंचगंगा या कोल्हापूरच्या नदीची पाहणी केली होती. गावातलं बहुतेक सर्व ड्रेनेज कुठल्याही प्रक्रियेशिवाय पंचगंगेत सोडलेलं. पुढची गावं तेच पाणी पितात. आज बहुतेक सगळ्या नद्यांची गटारं करून टाकलीत आम्ही. मैला हे उत्तम खत देतं, स्वयंपाकाला इंधन देतं. ते न घेता त्याची महाभयानक समस्या करून बसलोय. गांधींची थट्टा करू शकता; पण मग या समस्याही सोडवून दाखवाव्यात.

गोपुरी आश्रमाची स्थापना कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांनी ५,मे,१९४८ साली कणकवली जवळील वागदे या गावात केली. स्वातंत्र्याची चाहूल लागल्यांतर महात्मा गांधी यांनी आपल्या सहकार्यांना ग्रामीण भागात जाऊन मरनासन्न झालेली खेडी पु:नर्निर्माण करण्याचा आदेश दिला. गांधीजींच्या कार्यकर्त्यांनी हा आदेश शिरसावंध्य मानून गावाकडची वाट धरली.
     महादेवभाई देसाई यांच्या निधनानंतर अप्पा पटवर्धन यांनी आपले स्वीय सहाय्यक व्हावे अशी गांधीजीनी इच्छा व्यक्त केली होती. परंतु अप्पा पटवर्धन गांधीजीना म्हणाले की मला माझ्या गावाकडे जाऊन सेवा करायची आहे. “बापू मी काय करू?” गांधीजी म्हणाले की “तू हातात झाडू घे!” आणि ग्रामीण भागात सफाईचे काम कर. त्याप्रमाने अप्पासाहेबांनी पूर्वीच्या दक्षिण रत्नागिरी म्हणजे आत्ताच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात साधारण १९३५ पासून कामाला सुरवात केली.

 मालवण तालुक्यातील आंबेरी गावात प्रथम युरीनल तयार करून अप्पांनी नागरिकांना युरीन पासून हिरा खत तयार करायचे शिक्षण दिले. त्यानंतर कुडाळ तालुक्यातील कामळेवीर गावात जत्रेत नागरिकांनी केलेली अस्वच्छता नागरिकाना दाखऊन स्वच्छतेची जाणीव करून दिली. त्या अगोदर अप्पासाहेब पटवर्धन रत्नागिरी येथील तुरंगात राज कैदी असताना संडास सफाईसाठी त्यांनी उपोषण केले होते. का? तर हे काम केवळ अस्पृशाना करावे लागत होते. ही वाईट प्रथा त्याना बदलायची होती. अर्थात महात्मा गांधीजींची त्याना परवानगी होती.

  अशा प्रकारे अप्पासाहेबांच्या कामाला सुरवात झाली. अप्पासाहेबांनी दापोली, रत्नागिरी,लांजा आणि कणकवली येथे संर्व समाज्याच्या गरीब मुलांसाठी वसतीगृहे सुरु करून गरिबांच्या मुलांच्या शिक्षणाची सुद्धा मुहुर्थमेढ रोवली.

   हे काम सुरु असताना त्यांच्या समोर ग्रामीण भागातील दारिद्र्य समस्या सातत्याने येत होती. कोकणातील तरुण रोजगारासाठी मुंबई शहरात जात होता. ग्रामीण अर्थाव्यवस्था म्हातारी माणसे आणि महिला यांच्यावर अवलंबून होती. ही परीस्थिती बदलने गरजेचे आहे असे त्यांचे मन त्याना सातत्याने सांगत होते.

   यातून गोपुरीचा उगम झाला. ५, मे,१९४८ साली गोपुरी आश्रमाची स्थापना केली. भरड आणि नापीक जमिनीत नंदनवन फुलवले. गोशाळा, मृतजवरांचे शवच्छेदन,शेतीचे वेगवेगळे प्रयोग, शौचालयाची वेगवेगळी मॉडेल्स विकसित केली,कोकणात उस व ज्वारीची  लागवड होऊ शकते हे सिद्ध केले. मसाल्याच्या पिकांची लागवड कोकणात होऊ शकते हा पहिला प्रयोग अप्पासाहेबानी गोपुरीत केला त्यानंतर कोकण कृषी विद्यापीठाने त्यावर संशोन केले . महाराष्ट्रातला पहिला गोबर गॅस अप्पासाहेबानी १९५३ साली गोपुरीत  विकसित केला. अप्पासाहेब तंत्रज्ञानाचे शिक्षण घेतलेले नव्हते परंतु त्याना तांत्रिक दृष्टी होती.गांधीजीनी मांडलेले ग्रामीण परिवर्तनाचे प्रयोग अप्पासाहेबांनी गोपुरी आश्रमाच्या माध्यमातून यशस्वी करून दाखवले.

व्याख्यानाचा कार्यक्रम संपल्यांनंतर दुसऱ्या दिवशी मालवण मध्ये गेलो

 तेथे 3 दिवस राहिलो कोकण पाहण्यासारखे आहे

तारकर्ली बीच मध्ये सगळे वॉटर गेम्स अप्रतिम आहेत, चिवला बीच, रॉक गार्डन, गणेश मंदिर, (स्कुबा डायविंग, पॅरा सीलिंग आणि अनेक वॉटर गेम्स इ.) सर्व खूप सुंदर आहेत.मालवण मधील रॉक गार्डन मध्ये संध्याकाळचे फिरायला खूप छान वाटते. तेथील सनसेट पॉईंट बघण्यासारखा आहे, पण शाकाहारी असल्यास जेवण मिळणे थोडे अवघड जाते.

येथील चिवला बीचवर प्रेयसीची कल्पना करून तेव्हाच सहज सुचलेली कविता

त्या जोरात येणाऱ्या #लाटा..
आणि अंगावर येणारा #काटा.....

त्यातून होणारा #फेस
आणि तिचे उडणारे सुंदर #केस..

अनुभवून तो मंद मंद #वारा
अंगावर येतो #शहारा...

तिथे रचून शिंपल्यांची #रास
जुळवूया राणी आपले #श्वास...

माझिया मनाला एवढीच #आस
कधीच संपू नये हा आपला #सहवास..

तुझ्यासोबत जगलेला प्रत्येक #श्वास
जणुं न संपणारा प्रेमाचा #तास

अश्या श्रमसंस्कार छावण्या ठिकठिकाणी आयोजित व्हायला हव्यात, या कार्यक्रमादरम्यान माझ्या मनात थोडासा अहंभाव आल्यासारखे नंतर जाणवले, चळवळीच्या तेही गांधींविचाराच्या अभ्यासकाने असे करता कामा नये त्यामुळे त्यांनतर प्रायश्चित म्हणून वर्षभर तरी व्याख्यानापूरतेच व्यासपीठ स्वीकारायचा संकल्प केला जर दुसरे कुणी बोलत असेल आणि मी प्रमुख अतिथी वा वक्ता जरी असेल तरी श्रोत्यांमध्येच बसणार , व्यासपीठ स्वीकारणार नाही.

©संकेत मुनोत

Friday, March 8, 2019

सावित्री बाई फुले यांना 2018 मध्ये लिहलेले पत्र



#सावित्रीमाई तु मुलींनी शिकावं फक्त चूल आणि मूल एवढ्यामध्ये राहू नये म्हणून किती कष्ट घेतलेस ग.
लोकांनी तुझ्यावर शेण फेकले , शिव्या दिल्या, किती हाल अपेष्टा भोगल्या,  तरीही शेवटपर्यत हारली नाहीस.

पण तरीही कधी कधी प्रश्न पडतो मनाला

मुलगी शिकली प्रगती झाली यात तुमचे मोठे योगदान असले  पण ती खरच शिकली का ?? सज्ञान झाली का?की

 सुशिक्षित होणे,  पुरुषांच्या बरोबरीने कार्य करू लागणे, अर्थार्जन करणे एवढ्यापुरतेच मर्यादित राहिली?

माझे स्वतःचे एक वेगळे अस्तित्व आहे मला ही तुझ्या एवढेच सर्वच बाबतीत स्वातंत्र्य आहे हे म्हणायला ती कधी शिकणार ग माई?

अनेक जण तर सुशिक्षित होऊनही स्वतःच्या पोटात मुलगी आहे हे आधुनिक पद्धतीने तपासून त्या चिमुकलीचाच जीव घेऊ लागल्यात... हाच काय तो शिक्षणाचा अर्थ का माई? 

ज्या पुरुषसत्ताक प्रतिकांनी या महिलांना गुलामासारखे वागवले ती प्रतीके आज ही त्या अभिमानाने घेऊन मिरवतात माई.

बऱ्याच जण कमावत्या झाल्या पण निर्णय घेणाऱ्या कधी होणार ग माई.

आज ही 58% महिलांना त्यांचे नवरे मारतात आणि त्यातील फक्त 5-10% च त्याबद्दल बोलतात माई

अन्याय करणे जेवढा मोठा गुन्हा आहे त्यापेक्षा मोठा गुन्हा अन्याय सहन करणे आहे हे त्यांना कधी समजणार ग माई ?

तंत्रज्ञान, टीव्ही, समाजमाध्यमे आदीतुन यात सकारात्मक बदल होईल असे वाटले होते 

पण त्यातही अपवाद वगळता तिला एक सौंदर्य वस्तू म्हणूनच दाखवले जातय ग माई

आणि ज्योतिबांच्या सारखा विचारी आणि भूमिका घेणारा साथी किती जणी निवडतील ग माई? कारण शिक्षण घेतले, नोकरी-व्यवसायात उतरल्या पण अपेक्षा विचारांची नाही तर अजूनही मुलाचे उत्पन्न  संपत्ती स्वतः पेक्षा जास्त असावे हीच बहुतेक ठिकाणी आहे, त्याबद्दल वैचारिक प्रगल्भता कधी येईल माई..?

विवाहापूर्वी कुंडली जुळवणे, कुणासाठी उपवास करणे, आणि इतर अनेक अंधश्रद्धाचे ओझे त्या आजही मानगूटी वर घेऊन जगत आहेत माई|

होय मान्य यात महिलांच्या एवढीच चुक पुरुषांचीही आहे पण आमच्यातील बहुतेकांना तर हा वर्चस्व गाजवण्याचा अधिकार जन्मतःच मिळालाय ना, तो ते स्वतःहून का म्हणून सोडतील ग माई?ज्योतिबांसारखा त्याग ते थोडीच करू शकतील माई?


पण महिलांवर तर हजारो वर्षापासून हेच गुलामीचे सावज होते ग ,

तिने या बदलत्या काळात सज्ञान होऊन उलट ही बंधने फेकून द्यायला हवीत नाही का?

पण त्यांनीही याच बेड्यांच्या संरक्षणार्थ प्राणपणाने लढावे अशी प्रेरणा त्त्यांच्या मनात निर्माण करण्यात पुरुषसत्ताक शक्तींना आज ही  यश मिळताना दिसते माई..

असो आज तुझी जन्म जयंती तेव्हा मागेच सुरु केलेला संकल्प भविष्यात ही चालू ठेवेन माई

जसे की घरात असो वा बाहेर असो प्रत्येक ठिकाणी सर्व महिलांचा आदर करीन ,स्वयंपाक असो ,झाडू मारणे असो वा कोणतेही काम असो माझी बहीण किंवा आई प्रमाणे मीही करेन

माझ्या बहिणीला असो वा माझ्या होणाऱ्या जोडीदाराला माझ्याएवढेच अधिकार देण्याचा प्रयत्न करेन

हुंडा घेणार नाही वा देणार नाही

शक्य तिथे महिलांना त्यांच्या अधिकाराची हक्काची जाणीव करून देईन आणि हीच जाणीव माझ्या मित्रांमध्येही  निर्माण करण्याचा प्रयत्न करेन माई

लिहिताना काही चुकले असल्यास माफ कर माई

03 जानेवारी 2018

संकेत मुनोत

8668975178

Sunday, March 3, 2019

सोलापूर मधील कै. कमळे शिक्षण संस्था आणि शेकडो शिक्षकांसमोर व्याख्यानाचा अविस्मरणीय क्षण

सोलापूर मधील कै. कमळे शिक्षण संस्था आणि शेकडो शिक्षकांसमोर  व्याख्यानाचा अविस्मरणीय क्षण.२८-जाने-२०१९
अस म्हणतात एक शिक्षक हजारो विद्यार्थी घडवतात आणि अश्या प्राचार्य आणि शिक्षकांसमोर बोलणे मला अवघड वाटत होते पण जवळपस 1ते 1.5 तास बोललो यांच्यासमोर कसे शक्य झाले मलाही नाही समजले.
मला माझे डी फार्मसी चे द्वितीय वर्षाचे शिक्षण घेतांनाची एक घटना आठवते शिक्षक दिवस होता आणि आम्हा काही विद्यार्थ्यांना lecture घेण्यास सांगितले होते, तेव्हा वर्गातील हुशार विद्यार्थ्यांमध्ये गणला जायचो त्यामुळे म्हटलं काय अवघड आहे आणि घेतला एक विषय शिकवायला , समोर दोन्ही वर्गाचे विद्यार्थी आणि शिक्षक, प्रिंसिपल इ. बसलेले 5 मिनिटे बोललो असेल तोच घाम फुटला तोंडातून शब्दच फुटेना शेवटी धन्यवाद म्हणून वर्गाबाहेर पडलो वर्गात हशा पिकला होता काही शिक्षकांनी धीर दिला पण त्यांनतर कधी अस बोलू शकेल असे वाटले नव्हते.
सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळ, कमळे शिक्षण संस्था ही गेल्या अनेक वर्षापासून  सामाजीक व शैक्षणिक क्षेत्रात मोठे कार्य करत आहे. मंद्रुप च्या जवळपास च्या गावातील शेतकरी व अनेक गोर गरीब घरातील विद्यार्थिनींना दहावी पर्यँत शिक्षण झाले कि शिक्षण थांबवावे लागे ज्यांना शक्य असेल अश्याच काही विद्यार्थ्यांना पुण्यात व इतर ठिकाणी पुढचे शिक्षण घ्यायला जायला मिळे त्यामुळे यांना शिक्षणाला मुकावे लागे त्यामुळे अश्या हजारो विद्यार्थ्यांना घडवण्यात या शिक्षणसंस्थेचे योगदान मोठे आहे
गांधी विचार प्रबोधन शिबीर दरवर्षी या संस्थेत दरवर्षी आयोजीत केले जाते. मागील वीस वर्षात या व्याख्यानमालेत न्या.चंद्रशेखर धर्माधिकारी, राम शेवाळकर, राम पुनियानी, कमल ठकार, यदुनाथ थत्ते, नरेंद्र दाभोलकर, भाई वैद्य, गोविंदभाई श्रॉफ, पन्नालाल सुराणा, सुभेदार पेठकर, श्रीमंत कोकाटे , यशवंत सुमंत, बाबा आढाव , असीम सरोदे, उमाकांत चनशेट्टी, प्रा. संजय ठिगळे, सौ. मंजिरी निंबकर डॉ. वसंतराव जुगळे , अरुण खोरे अश्या अनेक मान्यवरांनी विचार मांडलेले आहेत.अशा मान्यवरांनी व्याख्यान दिलेल्या व्यासपीठावर मला परवा 28 जानेवारी रोजी गांधींविचारांची अपरिहार्यता या विषयावर '  यावर्षीच्या व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प गुंफण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब होती. पहिले पुष्प पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ उमराणी सर तर तिसरे पुष्प डॉ विवेक सावंत सर यांनी गुंफले.
**** समिती आणि *** व्याख्यानमालेचे संयोजक या सर्वांचा मी खूप आभारी आहे.
सोलापूर मध्ये मला घ्यायला आलेले प्रा. धनशेट्टी सर,  तर वेळोवेळी फोन लावून सर्व व्यवस्था पाहणारे प्रा. मोरे सर होते. सर्वांनी जसे प्रेमाने स्वागत केले अनुभव ह्रद्यस्पर्शी होता. समितीचे माजी अध्यक्ष आणि संगमेशवर कॉलेजचे माजी प्राचार्य श्री. नरेश बडनोरे सरआणि सर्वांचा मी ऋणी आहे.
संस्थापक कै. दीनानाथ शि. कमळे गुरुजी ( माजी राज्यमंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ) हे म. गांधी, जयप्रकाश नारायण, विनोबा भावे, साने गुरुजी यांच्या विचारांचे निस्सीम भक्त होते, कार्यक्रमाचे उद्घघाटक प्रा उमराणी सर , अध्यक्ष मा कोळीसो सर,प्रमुख पाहुणे शिक्षणाधिकारी सूर्यकांत पाटील साहेब इ उपस्थित होते
या संस्थेचे ६ हायस्कूल, ४ कनिष्ठ महाविद्यालय,३ विद्यार्थी वसतिगृह व १ वरीष्ठ महाविद्यालय आहे
शैक्षणिक प्रबोधन शिबिराची परंपरा कमळे गुरुजी यांनी सुरु केली आहे.ज्याचा उद्देश संस्थेतील शिक्षक फक्त शिक्षक न राहता तो वैचारिक बनला पाहिजे, शेती, आरोग्य व शिक्षण या क्षेत्रात पारंगत असला पाहिजे. शेती व शिक्षणातील बदलते संदर्भ लक्षात घेऊन त्याचा अभ्यास करुन प्रगती केली पाहिजे. असा आहे.त्याचबरोबर कै. कमळे गुरुजी यांच्या पत्नी कै. निर्मलाताई कमळे ( राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार प्राप्त ) यांच्या नावे या शिबिरात शिक्षण, व्यवसाय व संसार इ. मध्ये उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या महिलेस दरवर्षी आदर्श पुरस्कार दिला जातो. यावर्षी तो डॉ नभा काकडे यांना दिला गेला
सन्मित्र विक्रम पाटील याने मागे लिहले होते
युनेस्को ने २००८ साली जगातील अशा निवडक १०० व्यक्तींची यादी जाहीर केली, ज्यांनी 'शिक्षण' ह्या विषयावर आपल्या मूलभूत विचारांनी ठसा उमटवला आहे. 'थिंकर्स ऑन एज्युकेशन' म्हणून ही यादी प्रसिद्ध आहे. ह्या यादी मध्ये एक नाव आहे - मोहनदास करमचंद गांधी. सर्वसाधारणपणे भारताच्या स्वातंत्र्यलढयापलीकडे गांधी हे नाव ऐकायची बहुतेकांना सवय नसते. पण गांधी ह्या माणसाला जोखण्यासाठीची एक सोपी पद्धत अशी आहे, की ज्या कुठल्या क्षेत्रात तुम्हाला रस असेल, त्या क्षेत्रातील तुम्ही ज्या व्यक्तीला मानता, अशा व्यक्तीकडे जा. उदा. तुम्हाला विज्ञानात रस असेल, तर तुमच्या आवडत्या शिक्षकाकडे जा.
त्यांना विचारा की तुम्ही विज्ञानामध्ये कोणत्या हयात संशोधकाला मानता. मग त्या संशोधकाला संपर्क करून विचारा की ते कोणाला मानतात, असे करत करत तुम्ही कदाचित आइन्स्टाईन पर्यंत पोचाल. आणि आइन्स्टाईन चे गांधी बद्दलचे शब्द काय होते ते तुमच्या हातातील मोबाईल फोन वरून लगेच गूगल करून पहा. हेच पत्रकारिता, पर्यावरण, राजकारण, अर्थशास्त्र किंवा अन्य बऱ्याच क्षेत्रांना लागू पडेल. तूर्तास फक्त 'शिक्षण' ह्या विषयावर बोलू.

कोणताही शिक्षणतज्ज्ञ त्याचे शिक्षणविषयक विचार मांडत असताना ज्या पद्धतीचा समाज त्याला अपेक्षित असतो, तसा समाज बनण्यासाठीचे साधन म्हणून शिक्षणाकडे पाहतो. किंबहुना त्याची राजकीय विचारसरणी ही त्याच्या शिक्षणविषयक विचारांमध्ये प्रतिबिंबित होत असते. अगदी जर तो अराजकीय असेल, तरीही ते त्याच्या शिक्षणविषयक विचारांमध्ये दिसते. गांधींना तर जसा समाज अपेक्षित होता, तसे ते स्वतः जगून पहात होते. अविरत सत्यशोधन करणे, कुठल्याही कामाची लाज न बाळगता सर्व पद्धतीची कामं, ज्यात श्रमापासून बुद्धीच्या कामांपर्यंत सर्व कामे येत होती, ती जाती-पातीचा विचार न करता करणे, सदैव निर्भय राहणे, निर्भयता कधीही उद्धटपणाकडे सरकू न देणे आणि नम्रता कधीही घाबरट पणाकडे सरकू न देणे, सदैव प्रेमाचा अंगीकार करणे, मुक्तपणा आणि शिस्त ह्यांचा अचूक सुवर्णमध्य साधणे ही गांधींच्या व्यक्तिमत्वाची प्रमुख वैशिष्ट्ये होती. तुमचा द्वेष करणार्‍या व्यक्तीलाही चूक न ठरवता त्याच्या तशा वर्तणुकी मागची कारणे शोधणे ह्यातूनच त्यांची सत्याग्रह, प्रेम, अहिंसा ही हत्यारे तयार झाली होती. त्यांच्या बाबतीत जीवन आणि शिक्षण असे आयुष्याचे दोन तुकडे त्यांनी पाडले नव्हते. परिणामी त्यांच्या शिक्षणविषयक विचारांमध्ये जेव्हा शिक्षणाचे माध्यम कोणते असावे ह्या प्रश्नाचा समाचार घेण्याचा प्रश्न येतो तेव्हा साहजिकच जीवनात बोलली जाणारी भाषा आणि शिक्षणाची भाषा वेगवेगळी असणे हे त्यांच्या मते खऱ्या शिक्षणाचे द्योतकच नव्हते.चे शिक्षणविषयक विचार हे पूर्णतः विद्यार्थी-केंद्री होते. 'स्वराज' म्हणजे इंग्रजांना पळवून लावणे असा अर्थ त्यांना अपेक्षित नव्हता तर एका सर्वसाधारण व्यक्तीचं स्वतःवर असणारं 'राज ' हे त्यांना अपेक्षित होतं. हेच एका विद्यार्थ्याचं स्वतः वर असणारं 'राज' त्यांना शिक्षणात ही अपेक्षित होतं. आजकालच्या ७५ % कम्पल्सरी अटेन्डन्स च्या गुलामिला तोंड देणाऱ्या सर्व तरुणाई ने गांधींचे मुक्तिदाई शिक्षणविषयक विचार जरूर वाचून पहावेत.
गांधींच्या शिक्षणविषयक विचारांमध्ये सर्वात प्रमुख मुद्दा म्हणजे उत्पादक कामातून शिक्षण. आजकाल कार्यानुभव किवा एस. यू. पी. डब्ल्यू. च्या नावाखाली हातांनी करावयाची सर्व कामे ही एक्स्ट्रा करिक्युलर झाली आहेत. स्वयंपाक करणे हे शिक्षणात एक्स्ट्रा म्हणून अंतर्भूत करणे हे आजकाल क्रांतिकारी वाटून त्याची वाहवा होऊ शकेल. मात्र गांधींची नयी तालीम असं विचारेल की हे एक्स्ट्रा कसं काय झालं? हेच तर शिक्षण आहे. ह्यातूनच तर मुलं केमिस्ट्री, फिजिक्स च्या मूलभूत संकल्पना शिकतील. पुढे जाऊन ते भले ही क्वांटम फिजिक्स शिकोत, मात्र विज्ञानाच्या मूलभूत संकल्पना कृतीतून शिकल्याने क्वांटम फिजिक्स च्या जटील संकल्पनांची भिंत डोक्यात उभी करत असताना त्या भिंतींच्या विटा मजबूत असतील. आणि मोठेपणी एखादं मूल वैज्ञानिक जरी बनलं तरी स्वयंपाक करणे, साफसफाई करणे, गळणारा नळ दुरुस्त करणे, ह्यांसारख्या दैनंदिन गरजेच्या कामांसाठी हा वैज्ञानिक विनाकारण परावलंबी बनण्याची नामुष्की ओढवलेला नसेल. तसेच त्याला ह्या कामांची लाज ही वाटणार नाही. उत्पादक काम हे गांधींच्या मते ज्ञान, मूल्य आणि कौशल्य आत्मसात करण्याचा स्रोत आहे. स्वतंत्र भारताची शिक्षणव्यवस्था कशी असावी यासंदर्भात वर्धा येथे भरलेल्या सभेत १९३० साली गांधींनी आपले शिक्षणविषयक विचार मांडले. सभेने त्यावर अनेक चर्चा करून ते मान्य हि केले. मात्र स्वातंत्र्यानंतर आलेल्या सरकारने आपल्याच नेत्याचे हे विचार कधीही अमलात आणले नाहीत. आज गांधीं चा द्वेष करणाऱ्या विचारधारांमधील ही अनेक जण नयी तालीम च योग्य शिक्षणपद्धती असल्याचे उघडपणे किंवा खाजगीत मान्य करतात. कोण काय म्हणतंय ह्या पेक्षा आपण स्वतंत्र बुद्धीने सत्यशोधन करणे व पटत असेल ते स्वीकारणे हे उत्तम. हेच गांधींना ही अपेक्षित असेल.
प्रा नरेश बडनोरे सर यांचेयकडून खूप काही शिकण्यास मिळाले गांधींविचारांचा मोठा वारसा ते आचरणात आणत आहेत.त्यांच्याशी एक घरचे आपुलकीचे नाते तयार झाले आहे.
येतांना MKCL चे मुख्य डॉ विवेक सावंत सरांच्या गाडीत गप्पा मारत आलो त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यास मिळाल्या जसे कि आम्ही येतांना कांचन हॉटेल मध्ये जेवलो तेव्हा पाहिले कि सरांनी घरून डबा आणला होता , एवढा मोठा माणूस पण कुठेच ego वा attitude वगैरे नाही त्यांच्यासोबतच्या भेटीचा एक ग्रेट भेट विथ विवेक सावंत हा लेख लवकरच लिहण्याचा प्रयत्न करेन
अश्या आदर्श संस्था ठिकठिकाणी स्थापन व्हायला हव्यात..
यामुळे खुप सारी नवी ऊर्जा मिळाली
- संकेत मुनोत