गोपुरी आश्रम, वागोदे , कणकवली येथे श्रमसंस्कार छावणीचे सुंदर आयोजन मनीषा पाटील मॅडम, राजेंद्र मुंबरकर सर आणि त्यांच्या टीमने केले होते. तेथे पहिल्या दिवशी 5 मे रोजी 'गांधी विचार आणि लोकशाही' यासंदर्भात शिबिरार्थींशी संवाद साधन्याची संधी मिळाली. त्याच दिवशी जयवंत मठकर काका, ठाकूर काका यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.माझ्यानंतर पुढील दिवसांच्या सत्रात मा. लक्ष्मीकांत देशमुख सर, जतीन देसाई सर आणि संजय आवटे सर असे अनेक मान्यवर या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार होते. युयुत्स आर्ते, संदीप निंबाळकर, विजयालक्ष्मी चंडक, हरिहर वाटवे आणि अनेक मान्यवारांशी येथे भेट झाली.
कोकण गांधी-
गांधी काय माणूस होता राव ?अनिल अवचट सरांनी एका ठिकाणी लिहलय, गांधीजींच्या एकेका वाक्याने अनेकांनी त्यांची त्यांची आधीची जीवनं फेकून देऊन पूर्णपणं वेगळा रस्ता धरला आहे. कसा होत असेल हा बदल? अप्पा पटवर्धन हे असेच विलक्षण व्यक्तित्व. त्यांचं ‘माझी जीवनयात्रा’ हे आत्मचरित्र वाचलं आणि चकित झालो. तुरुंगात त्यांनी भंगीकाम पाहिलं. स्वत: करायची तयारी दाखवली; पण तुरुंगाधिकाऱ्यानं परवानगी दिली नाही. कुडाळमध्ये परत आल्यावर बादली- खराटा घेऊन सक्काळी भंग्यांमध्ये (आता आपण त्यांना मेहतर म्हणतो) मिसळले. पुढं त्यांनी अनेक प्रयोग केले. चराचे संडास, सोपा संडास… इ. आज बिंदेश्वरी पाठकांनी भारतभर बांधलेली सुलभ शौचालये हा अप्पांचा सोपा संडासचीच जवळची आवृत्ती. नाशिकजवळ गंगापूरला भाऊ नावरेकरांनी हेच काम पुढं चालू ठेवलं. आता त्यांची मुलं काम करीत आहेत. त्यांनी बायोगॅसचा सुटसुटीत प्लँट तयार केला आहे आणि जागोजाग जाऊन तो ते करून देतात. तोडणकर गुरुजीही असेच संडास या समस्येला वाहिलेले. संडास ही काय प्रतिष्ठितपणं उच्चारायची गोष्ट झाली? त्याकडं डोळेझाक करीतच आपण ती समस्या आणखी वाढवून ठेवली आहे. खेड्यापाड्यात स्त्रियांनी पहाटे किंवा रात्री उशिरा गटानं जाऊन बाहेर रस्त्याकडेला बसावं आणि गाडीचा प्रकाश पडला की उभं रहावं… किती लाजिरवाणी अवस्था. शेतं गावाला खेटायला आली आणि अशा जागा नष्ट झाल्या. शहरात त्यापेक्षा वाईट अवस्था. मागे पंचगंगा या कोल्हापूरच्या नदीची पाहणी केली होती. गावातलं बहुतेक सर्व ड्रेनेज कुठल्याही प्रक्रियेशिवाय पंचगंगेत सोडलेलं. पुढची गावं तेच पाणी पितात. आज बहुतेक सगळ्या नद्यांची गटारं करून टाकलीत आम्ही. मैला हे उत्तम खत देतं, स्वयंपाकाला इंधन देतं. ते न घेता त्याची महाभयानक समस्या करून बसलोय. गांधींची थट्टा करू शकता; पण मग या समस्याही सोडवून दाखवाव्यात.
गोपुरी आश्रमाची स्थापना कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांनी ५,मे,१९४८ साली कणकवली जवळील वागदे या गावात केली. स्वातंत्र्याची चाहूल लागल्यांतर महात्मा गांधी यांनी आपल्या सहकार्यांना ग्रामीण भागात जाऊन मरनासन्न झालेली खेडी पु:नर्निर्माण करण्याचा आदेश दिला. गांधीजींच्या कार्यकर्त्यांनी हा आदेश शिरसावंध्य मानून गावाकडची वाट धरली.
महादेवभाई देसाई यांच्या निधनानंतर अप्पा पटवर्धन यांनी आपले स्वीय सहाय्यक व्हावे अशी गांधीजीनी इच्छा व्यक्त केली होती. परंतु अप्पा पटवर्धन गांधीजीना म्हणाले की मला माझ्या गावाकडे जाऊन सेवा करायची आहे. “बापू मी काय करू?” गांधीजी म्हणाले की “तू हातात झाडू घे!” आणि ग्रामीण भागात सफाईचे काम कर. त्याप्रमाने अप्पासाहेबांनी पूर्वीच्या दक्षिण रत्नागिरी म्हणजे आत्ताच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात साधारण १९३५ पासून कामाला सुरवात केली.
मालवण तालुक्यातील आंबेरी गावात प्रथम युरीनल तयार करून अप्पांनी नागरिकांना युरीन पासून हिरा खत तयार करायचे शिक्षण दिले. त्यानंतर कुडाळ तालुक्यातील कामळेवीर गावात जत्रेत नागरिकांनी केलेली अस्वच्छता नागरिकाना दाखऊन स्वच्छतेची जाणीव करून दिली. त्या अगोदर अप्पासाहेब पटवर्धन रत्नागिरी येथील तुरंगात राज कैदी असताना संडास सफाईसाठी त्यांनी उपोषण केले होते. का? तर हे काम केवळ अस्पृशाना करावे लागत होते. ही वाईट प्रथा त्याना बदलायची होती. अर्थात महात्मा गांधीजींची त्याना परवानगी होती.
अशा प्रकारे अप्पासाहेबांच्या कामाला सुरवात झाली. अप्पासाहेबांनी दापोली, रत्नागिरी,लांजा आणि कणकवली येथे संर्व समाज्याच्या गरीब मुलांसाठी वसतीगृहे सुरु करून गरिबांच्या मुलांच्या शिक्षणाची सुद्धा मुहुर्थमेढ रोवली.
हे काम सुरु असताना त्यांच्या समोर ग्रामीण भागातील दारिद्र्य समस्या सातत्याने येत होती. कोकणातील तरुण रोजगारासाठी मुंबई शहरात जात होता. ग्रामीण अर्थाव्यवस्था म्हातारी माणसे आणि महिला यांच्यावर अवलंबून होती. ही परीस्थिती बदलने गरजेचे आहे असे त्यांचे मन त्याना सातत्याने सांगत होते.
यातून गोपुरीचा उगम झाला. ५, मे,१९४८ साली गोपुरी आश्रमाची स्थापना केली. भरड आणि नापीक जमिनीत नंदनवन फुलवले. गोशाळा, मृतजवरांचे शवच्छेदन,शेतीचे वेगवेगळे प्रयोग, शौचालयाची वेगवेगळी मॉडेल्स विकसित केली,कोकणात उस व ज्वारीची लागवड होऊ शकते हे सिद्ध केले. मसाल्याच्या पिकांची लागवड कोकणात होऊ शकते हा पहिला प्रयोग अप्पासाहेबानी गोपुरीत केला त्यानंतर कोकण कृषी विद्यापीठाने त्यावर संशोन केले . महाराष्ट्रातला पहिला गोबर गॅस अप्पासाहेबानी १९५३ साली गोपुरीत विकसित केला. अप्पासाहेब तंत्रज्ञानाचे शिक्षण घेतलेले नव्हते परंतु त्याना तांत्रिक दृष्टी होती.गांधीजीनी मांडलेले ग्रामीण परिवर्तनाचे प्रयोग अप्पासाहेबांनी गोपुरी आश्रमाच्या माध्यमातून यशस्वी करून दाखवले.
व्याख्यानाचा कार्यक्रम संपल्यांनंतर दुसऱ्या दिवशी मालवण मध्ये गेलो
तेथे 3 दिवस राहिलो कोकण पाहण्यासारखे आहे
तारकर्ली बीच मध्ये सगळे वॉटर गेम्स अप्रतिम आहेत, चिवला बीच, रॉक गार्डन, गणेश मंदिर, (स्कुबा डायविंग, पॅरा सीलिंग आणि अनेक वॉटर गेम्स इ.) सर्व खूप सुंदर आहेत.मालवण मधील रॉक गार्डन मध्ये संध्याकाळचे फिरायला खूप छान वाटते. तेथील सनसेट पॉईंट बघण्यासारखा आहे, पण शाकाहारी असल्यास जेवण मिळणे थोडे अवघड जाते.
येथील चिवला बीचवर प्रेयसीची कल्पना करून तेव्हाच सहज सुचलेली कविता
त्या जोरात येणाऱ्या #लाटा..
आणि अंगावर येणारा #काटा.....
त्यातून होणारा #फेस
आणि तिचे उडणारे सुंदर #केस..
अनुभवून तो मंद मंद #वारा
अंगावर येतो #शहारा...
तिथे रचून शिंपल्यांची #रास
जुळवूया राणी आपले #श्वास...
माझिया मनाला एवढीच #आस
कधीच संपू नये हा आपला #सहवास..
तुझ्यासोबत जगलेला प्रत्येक #श्वास
जणुं न संपणारा प्रेमाचा #तास
अश्या श्रमसंस्कार छावण्या ठिकठिकाणी आयोजित व्हायला हव्यात, या कार्यक्रमादरम्यान माझ्या मनात थोडासा अहंभाव आल्यासारखे नंतर जाणवले, चळवळीच्या तेही गांधींविचाराच्या अभ्यासकाने असे करता कामा नये त्यामुळे त्यांनतर प्रायश्चित म्हणून वर्षभर तरी व्याख्यानापूरतेच व्यासपीठ स्वीकारायचा संकल्प केला जर दुसरे कुणी बोलत असेल आणि मी प्रमुख अतिथी वा वक्ता जरी असेल तरी श्रोत्यांमध्येच बसणार , व्यासपीठ स्वीकारणार नाही.
©संकेत मुनोत

No comments:
Post a Comment