सोलापूर मधील कै. कमळे शिक्षण संस्था आणि शेकडो शिक्षकांसमोर व्याख्यानाचा अविस्मरणीय क्षण.२८-जाने-२०१९
अस म्हणतात एक शिक्षक हजारो विद्यार्थी घडवतात आणि अश्या प्राचार्य आणि शिक्षकांसमोर बोलणे मला अवघड वाटत होते पण जवळपस 1ते 1.5 तास बोललो यांच्यासमोर कसे शक्य झाले मलाही नाही समजले.

मला माझे डी फार्मसी चे द्वितीय वर्षाचे शिक्षण घेतांनाची एक घटना आठवते शिक्षक दिवस होता आणि आम्हा काही विद्यार्थ्यांना lecture घेण्यास सांगितले होते, तेव्हा वर्गातील हुशार विद्यार्थ्यांमध्ये गणला जायचो त्यामुळे म्हटलं काय अवघड आहे आणि घेतला एक विषय शिकवायला , समोर दोन्ही वर्गाचे विद्यार्थी आणि शिक्षक, प्रिंसिपल इ. बसलेले 5 मिनिटे बोललो असेल तोच घाम फुटला तोंडातून शब्दच फुटेना शेवटी धन्यवाद म्हणून वर्गाबाहेर पडलो वर्गात हशा पिकला होता काही शिक्षकांनी धीर दिला पण त्यांनतर कधी अस बोलू शकेल असे वाटले नव्हते.
सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळ, कमळे शिक्षण संस्था ही गेल्या अनेक वर्षापासून सामाजीक व शैक्षणिक क्षेत्रात मोठे कार्य करत आहे. मंद्रुप च्या जवळपास च्या गावातील शेतकरी व अनेक गोर गरीब घरातील विद्यार्थिनींना दहावी पर्यँत शिक्षण झाले कि शिक्षण थांबवावे लागे ज्यांना शक्य असेल अश्याच काही विद्यार्थ्यांना पुण्यात व इतर ठिकाणी पुढचे शिक्षण घ्यायला जायला मिळे त्यामुळे यांना शिक्षणाला मुकावे लागे त्यामुळे अश्या हजारो विद्यार्थ्यांना घडवण्यात या शिक्षणसंस्थेचे योगदान मोठे आहे
गांधी विचार प्रबोधन शिबीर दरवर्षी या संस्थेत दरवर्षी आयोजीत केले जाते. मागील वीस वर्षात या व्याख्यानमालेत न्या.चंद्रशेखर धर्माधिकारी, राम शेवाळकर, राम पुनियानी, कमल ठकार, यदुनाथ थत्ते, नरेंद्र दाभोलकर, भाई वैद्य, गोविंदभाई श्रॉफ, पन्नालाल सुराणा, सुभेदार पेठकर, श्रीमंत कोकाटे , यशवंत सुमंत, बाबा आढाव , असीम सरोदे, उमाकांत चनशेट्टी, प्रा. संजय ठिगळे, सौ. मंजिरी निंबकर डॉ. वसंतराव जुगळे , अरुण खोरे अश्या अनेक मान्यवरांनी विचार मांडलेले आहेत.अशा मान्यवरांनी व्याख्यान दिलेल्या व्यासपीठावर मला परवा 28 जानेवारी रोजी गांधींविचारांची अपरिहार्यता या विषयावर ' यावर्षीच्या व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प गुंफण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब होती. पहिले पुष्प पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ उमराणी सर तर तिसरे पुष्प डॉ विवेक सावंत सर यांनी गुंफले.

**** समिती आणि *** व्याख्यानमालेचे संयोजक या सर्वांचा मी खूप आभारी आहे.
सोलापूर मध्ये मला घ्यायला आलेले प्रा. धनशेट्टी सर, तर वेळोवेळी फोन लावून सर्व व्यवस्था पाहणारे प्रा. मोरे सर होते. सर्वांनी जसे प्रेमाने स्वागत केले अनुभव ह्रद्यस्पर्शी होता. समितीचे माजी अध्यक्ष आणि संगमेशवर कॉलेजचे माजी प्राचार्य श्री. नरेश बडनोरे सरआणि सर्वांचा मी ऋणी आहे.
संस्थापक कै. दीनानाथ शि. कमळे गुरुजी ( माजी राज्यमंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ) हे म. गांधी, जयप्रकाश नारायण, विनोबा भावे, साने गुरुजी यांच्या विचारांचे निस्सीम भक्त होते, कार्यक्रमाचे उद्घघाटक प्रा उमराणी सर , अध्यक्ष मा कोळीसो सर,प्रमुख पाहुणे शिक्षणाधिकारी सूर्यकांत पाटील साहेब इ उपस्थित होते

या संस्थेचे ६ हायस्कूल, ४ कनिष्ठ महाविद्यालय,३ विद्यार्थी वसतिगृह व १ वरीष्ठ महाविद्यालय आहे
शैक्षणिक प्रबोधन शिबिराची परंपरा कमळे गुरुजी यांनी सुरु केली आहे.ज्याचा उद्देश संस्थेतील शिक्षक फक्त शिक्षक न राहता तो वैचारिक बनला पाहिजे, शेती, आरोग्य व शिक्षण या क्षेत्रात पारंगत असला पाहिजे. शेती व शिक्षणातील बदलते संदर्भ लक्षात घेऊन त्याचा अभ्यास करुन प्रगती केली पाहिजे. असा आहे.त्याचबरोबर कै. कमळे गुरुजी यांच्या पत्नी कै. निर्मलाताई कमळे ( राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार प्राप्त ) यांच्या नावे या शिबिरात शिक्षण, व्यवसाय व संसार इ. मध्ये उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या महिलेस दरवर्षी आदर्श पुरस्कार दिला जातो. यावर्षी तो डॉ नभा काकडे यांना दिला गेला

सन्मित्र विक्रम पाटील याने मागे लिहले होते
युनेस्को ने २००८ साली जगातील अशा निवडक १०० व्यक्तींची यादी जाहीर केली, ज्यांनी 'शिक्षण' ह्या विषयावर आपल्या मूलभूत विचारांनी ठसा उमटवला आहे. 'थिंकर्स ऑन एज्युकेशन' म्हणून ही यादी प्रसिद्ध आहे. ह्या यादी मध्ये एक नाव आहे - मोहनदास करमचंद गांधी. सर्वसाधारणपणे भारताच्या स्वातंत्र्यलढयापलीकडे गांधी हे नाव ऐकायची बहुतेकांना सवय नसते. पण गांधी ह्या माणसाला जोखण्यासाठीची एक सोपी पद्धत अशी आहे, की ज्या कुठल्या क्षेत्रात तुम्हाला रस असेल, त्या क्षेत्रातील तुम्ही ज्या व्यक्तीला मानता, अशा व्यक्तीकडे जा. उदा. तुम्हाला विज्ञानात रस असेल, तर तुमच्या आवडत्या शिक्षकाकडे जा.
त्यांना विचारा की तुम्ही विज्ञानामध्ये कोणत्या हयात संशोधकाला मानता. मग त्या संशोधकाला संपर्क करून विचारा की ते कोणाला मानतात, असे करत करत तुम्ही कदाचित आइन्स्टाईन पर्यंत पोचाल. आणि आइन्स्टाईन चे गांधी बद्दलचे शब्द काय होते ते तुमच्या हातातील मोबाईल फोन वरून लगेच गूगल करून पहा. हेच पत्रकारिता, पर्यावरण, राजकारण, अर्थशास्त्र किंवा अन्य बऱ्याच क्षेत्रांना लागू पडेल. तूर्तास फक्त 'शिक्षण' ह्या विषयावर बोलू.
कोणताही शिक्षणतज्ज्ञ त्याचे शिक्षणविषयक विचार मांडत असताना ज्या पद्धतीचा समाज त्याला अपेक्षित असतो, तसा समाज बनण्यासाठीचे साधन म्हणून शिक्षणाकडे पाहतो. किंबहुना त्याची राजकीय विचारसरणी ही त्याच्या शिक्षणविषयक विचारांमध्ये प्रतिबिंबित होत असते. अगदी जर तो अराजकीय असेल, तरीही ते त्याच्या शिक्षणविषयक विचारांमध्ये दिसते. गांधींना तर जसा समाज अपेक्षित होता, तसे ते स्वतः जगून पहात होते. अविरत सत्यशोधन करणे, कुठल्याही कामाची लाज न बाळगता सर्व पद्धतीची कामं, ज्यात श्रमापासून बुद्धीच्या कामांपर्यंत सर्व कामे येत होती, ती जाती-पातीचा विचार न करता करणे, सदैव निर्भय राहणे, निर्भयता कधीही उद्धटपणाकडे सरकू न देणे आणि नम्रता कधीही घाबरट पणाकडे सरकू न देणे, सदैव प्रेमाचा अंगीकार करणे, मुक्तपणा आणि शिस्त ह्यांचा अचूक सुवर्णमध्य साधणे ही गांधींच्या व्यक्तिमत्वाची प्रमुख वैशिष्ट्ये होती. तुमचा द्वेष करणार्या व्यक्तीलाही चूक न ठरवता त्याच्या तशा वर्तणुकी मागची कारणे शोधणे ह्यातूनच त्यांची सत्याग्रह, प्रेम, अहिंसा ही हत्यारे तयार झाली होती. त्यांच्या बाबतीत जीवन आणि शिक्षण असे आयुष्याचे दोन तुकडे त्यांनी पाडले नव्हते. परिणामी त्यांच्या शिक्षणविषयक विचारांमध्ये जेव्हा शिक्षणाचे माध्यम कोणते असावे ह्या प्रश्नाचा समाचार घेण्याचा प्रश्न येतो तेव्हा साहजिकच जीवनात बोलली जाणारी भाषा आणि शिक्षणाची भाषा वेगवेगळी असणे हे त्यांच्या मते खऱ्या शिक्षणाचे द्योतकच नव्हते.चे शिक्षणविषयक विचार हे पूर्णतः विद्यार्थी-केंद्री होते. 'स्वराज' म्हणजे इंग्रजांना पळवून लावणे असा अर्थ त्यांना अपेक्षित नव्हता तर एका सर्वसाधारण व्यक्तीचं स्वतःवर असणारं 'राज ' हे त्यांना अपेक्षित होतं. हेच एका विद्यार्थ्याचं स्वतः वर असणारं 'राज' त्यांना शिक्षणात ही अपेक्षित होतं. आजकालच्या ७५ % कम्पल्सरी अटेन्डन्स च्या गुलामिला तोंड देणाऱ्या सर्व तरुणाई ने गांधींचे मुक्तिदाई शिक्षणविषयक विचार जरूर वाचून पहावेत.
गांधींच्या शिक्षणविषयक विचारांमध्ये सर्वात प्रमुख मुद्दा म्हणजे उत्पादक कामातून शिक्षण. आजकाल कार्यानुभव किवा एस. यू. पी. डब्ल्यू. च्या नावाखाली हातांनी करावयाची सर्व कामे ही एक्स्ट्रा करिक्युलर झाली आहेत. स्वयंपाक करणे हे शिक्षणात एक्स्ट्रा म्हणून अंतर्भूत करणे हे आजकाल क्रांतिकारी वाटून त्याची वाहवा होऊ शकेल. मात्र गांधींची नयी तालीम असं विचारेल की हे एक्स्ट्रा कसं काय झालं? हेच तर शिक्षण आहे. ह्यातूनच तर मुलं केमिस्ट्री, फिजिक्स च्या मूलभूत संकल्पना शिकतील. पुढे जाऊन ते भले ही क्वांटम फिजिक्स शिकोत, मात्र विज्ञानाच्या मूलभूत संकल्पना कृतीतून शिकल्याने क्वांटम फिजिक्स च्या जटील संकल्पनांची भिंत डोक्यात उभी करत असताना त्या भिंतींच्या विटा मजबूत असतील. आणि मोठेपणी एखादं मूल वैज्ञानिक जरी बनलं तरी स्वयंपाक करणे, साफसफाई करणे, गळणारा नळ दुरुस्त करणे, ह्यांसारख्या दैनंदिन गरजेच्या कामांसाठी हा वैज्ञानिक विनाकारण परावलंबी बनण्याची नामुष्की ओढवलेला नसेल. तसेच त्याला ह्या कामांची लाज ही वाटणार नाही. उत्पादक काम हे गांधींच्या मते ज्ञान, मूल्य आणि कौशल्य आत्मसात करण्याचा स्रोत आहे. स्वतंत्र भारताची शिक्षणव्यवस्था कशी असावी यासंदर्भात वर्धा येथे भरलेल्या सभेत १९३० साली गांधींनी आपले शिक्षणविषयक विचार मांडले. सभेने त्यावर अनेक चर्चा करून ते मान्य हि केले. मात्र स्वातंत्र्यानंतर आलेल्या सरकारने आपल्याच नेत्याचे हे विचार कधीही अमलात आणले नाहीत. आज गांधीं चा द्वेष करणाऱ्या विचारधारांमधील ही अनेक जण नयी तालीम च योग्य शिक्षणपद्धती असल्याचे उघडपणे किंवा खाजगीत मान्य करतात. कोण काय म्हणतंय ह्या पेक्षा आपण स्वतंत्र बुद्धीने सत्यशोधन करणे व पटत असेल ते स्वीकारणे हे उत्तम. हेच गांधींना ही अपेक्षित असेल.

प्रा नरेश बडनोरे सर यांचेयकडून खूप काही शिकण्यास मिळाले गांधींविचारांचा मोठा वारसा ते आचरणात आणत आहेत.त्यांच्याशी एक घरचे आपुलकीचे नाते तयार झाले आहे.
येतांना MKCL चे मुख्य डॉ विवेक सावंत सरांच्या गाडीत गप्पा मारत आलो त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यास मिळाल्या जसे कि आम्ही येतांना कांचन हॉटेल मध्ये जेवलो तेव्हा पाहिले कि सरांनी घरून डबा आणला होता , एवढा मोठा माणूस पण कुठेच ego वा attitude वगैरे नाही त्यांच्यासोबतच्या भेटीचा एक ग्रेट भेट विथ विवेक सावंत हा लेख लवकरच लिहण्याचा प्रयत्न करेन
अश्या आदर्श संस्था ठिकठिकाणी स्थापन व्हायला हव्यात..
यामुळे खुप सारी नवी ऊर्जा मिळाली
- संकेत मुनोत

No comments:
Post a Comment