एक आज्जी मिळाली
माझी आज्जी(आईची आई) लेकरू लेकरू खूप म्हणायची, लाड करायची, कधी गेलो गावाकडे कि चिक्की कर, बर्फी कर वगैरे करायची
मी काही लिहले कि ते आंनदाने वाचायची, दर शुक्रवारी माझ्याकडून वैभव लक्ष्मी माते ची कथा वाचून घ्यायची, एकदा शाळेत आज्जी वर निबंध लिहायला सांगितलेला मी तो लिहला आणि जेव्हा तो तिला आईने दाखवला तेव्हा खूप रडलेली.पण जास्त दिवस तीचा सहवास मिळाला नाही, मी आठवीत असतांनाच गेली.
पण 82 वर्षाच्या प्रेरणादायी आज्जी -संजीवनी डॊशी परवा मिळाल्या.whatsapp समूहातच ओळख झालेली पण प्रत्यक्ष असे आपुलकी चे बंध तयार होतील असे वाटले नव्हते..
माझ्या प्रत्येक लेखाला प्रतिक्रिया देणारी व चांगले विचार, Women empowerment, Knowing Gandhism, understanding Jainism या सर्व समूहात सक्रिय असणारी ही प्रचंड ऊर्जदायी महिला
संजीवनी आज्जींशी ही तशी दुसरी भेट, पहिली भेट दोन महिन्यापुर्वी पुण्यात त्यांच्या नातवाच्या लग्नाच्या रिसेप्शन समारंभात झाली , तेव्हाही त्यांनी खूप आनंदाने स्वागत केले होते व भरभरून बोलल्या. माझ्या सोबतच्या मित्राला त्या म्हणाल्या कि मी लेखावरून ओळखते कि हा संकेत चा आहे म्हणून, त्यांनी मला काही पुस्तके देण्याची इच्छा व्यक्त केली आणि ती योग्य हातात द्यायची आहेत असे सांगून पुण्यातील मुलाच्या घरी काही दिवस असल्याने तेथे येऊन ती घेण्याचे सांगितले पण तेव्हा काही तेथे माझे जाणे झाले नाही, बारामती ला घरी याच अश्या आवर्जून त्या म्हणाल्या होत्या म्हणून जेव्हा फलटण मधील इंजिनीरिंग कॉलेज मध्ये व्याख्यानाला गेलो तेव्हा आज्जींच्या घरी गेलो.
त्यांना खूप आंनद झाला , आल्यावर जेवूनच जा, हे घ्या ते घ्या म्हणू लागल्या , त्यांच्या मुलाला सुंनबाईंना पूर्वीच त्यांनी सांगितलेले होते मग त्यांनी स्वतः अनुवादीत केलेली आणि काही त्यांच्या वडिलांनी लिहलेली अशी अमूल्य पुस्तके भेट दिली.तेथे त्यांचे पती, मुलगा, सूनबाई आणि नातू यांची भेट झाली, सगळे खूप छान बोलले.
संजीवनी आज्जी या वयात ही प्रचंड ऊर्जादायी आहेत, रोज सकाळी 6 पूर्वी उठतात, देवपूजा करतात, मंदिरात जातात , वाचन करतात, लेखन करतात, इयत्ता 9वीत असतांना त्यांनी सुर्यास्तानंतर काही खायचे नाही हा नियम घेतला तो त्या अजून ही पाळतात, त्यांच्या चांगल्या आरोग्याचे हेच गुपित असावे
काही दिवसांपूर्वी त्यांना शिवाजी कोण होता हे pdf पुस्तक पाठवले ते पण त्यांनी पूर्ण वाचून प्रतिक्रिया दिली.
त्यांनी त्यांच्या मुलांबद्दल सांगितले एक मुलगा डॉक्टर, एक औषध Distributer आणि एक Industrialist आहे, त्यांचा एक नातू नेदरलँडला रोबोटिक्स शिकत आहे, एक सी ए चे शिक्षण घेत आहे आणि इतर नातू असेच काही करत आहेत.
त्यात लहान मुलाबद्दल जे औषधांचा distributer म्हणजे चांगले व्यावसायिक आहेत त्यांच्याबद्दल बोलतांना त्यांच्या डोळ्यात आत्ताही पाणी आले कि त्याला अजून शिकायचे होते पण त्यावेळी नेमकी परिस्थिती खालावली आणि त्याला शिक्षण थांबवून व्यवसाय सांभाळावा लागला. त्यांच्या घरातील सर्वांशी छान गप्पा झाल्या.
सगळे लोक फक्त आर्थिक दृष्ट्या च नव्हे तर संस्कार, ज्ञान आणि मनाने ही खूप श्रीमंत आहेत.
मला बस स्टॉप वर सोडताना अजय सर म्हणाले कि तुम्ही आईशी नियमित बोलत जा तुमच्यामुळे तिचे आयुष्य वाढते
हे शब्द माझ्यासाठी खूप मोलाचे होते.
देण्यासारखे माझ्याकडे काहीच नव्हते पण या सर्वांची प्रचंड ऊर्जा आणि एक आज्जी मात्र मिळाली.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2310109335706771&id=100001231821936
No comments:
Post a Comment