महात्मा गांधींचे हे वैशिष्ट्य होते कि प्रत्येक धर्मातील चांगले शुद्ध चरित्राचे धर्मगुरू त्यांच्याशी जुळलेले होते . ते आचार्य विनोबा भावे , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज , परमपूज्य साध्वीजी उज्वलकुंवरजी महाराज , राष्ट्रसंत गाडगे बाबा , मौलाना आणि असे अनेक साधू साध्वी आणि संत .
संकेत मुनोत
#Randomthoughts
Creative Ideas, Myths and Facts, Experiences, interviews of Great People
AddThis code
Tuesday, November 29, 2022
वेगवेगळ्या धर्मगुरूंशी संवाद साधून धर्म समजून घेत महात्मा गांधींबद्दल मते जाणून घेताना आलेले काही अनुभव
आम्ही महिन्यात किमान २ दिवस काढून वेगवेगळ्या धर्मगुरूना भेटतो. त्यात सुरवातीला श्रध्देने त्यांच्याकडून त्यांचे धार्मिक विचार समजून घेतो. त्यानंतर महात्मा गांधी यांचा विषय काढून "त्याबद्दल आपल्याला काय वाटते?" हे विचारतो. त्यात ते जेव्हा व्यक्त होतात त्यात त्यांच्या पर्यंत कुठले विचार पोहोचले हे लक्षात येते. यातील बहुतेक ठिकाणी आम्हाला त्यांच्याबद्दलच्या अफवा पोहोचल्याचे लक्षात आले आणि जेव्हा आम्ही त्यांच्याशी याबाबत संवाद साधून सत्य सांगण्याचा प्रयत्न केला तर त्यातील काहीनी आमचे ऐकून घेत पुढे संवादही साधला.
यात आम्हाला असेही काही साधू साध्वी भेटले जे स्वतः गांधीवादी होते आणि ठामपणे भूमिका घेत होते. जे समाजात विष पसरवतात त्यांना ते विरोध करत होते पण आपल्या कुठल्या चळवळीशी कुठेच जुळले नव्हते. ते म्हणाले की आमच्याकडे स्वतः ला गांधीवादी म्हणवणारे राजकीय पक्षाचे लोकही येतात पण ते त्यांच्या निवडणुकीच्या वेळेस आमच्या जाहीर सभेत मत मागायला किंवा आमच्या एखाद्या कार्यक्रमात त्यांच्या एखाद्या नेत्याला घेऊन दर्शनाला येतात आणि जातात. पण अशी चर्चा करायला असा संवाद साधायला त्यांच्यातील कोणी कधी येत नाही. तेच संघातील लोक नियमितपणें येतात. सगळ्यात सुरवातीला महात्मा गांधी बद्दल द्वेष पेरतात नंतर हळू हळू नेहरू बद्दल मग मुस्लिम ,ख्रिस्चन आणि इतर धर्मियांच्या बद्दल द्वेष पेरणे सारख्या गोष्टी केल्या जातात. या सततच्या मार्यामुळे आमच्यातील बरेचसे साधू त्यांच्या प्रवचनात तश्या गोष्टी मांडतात. पण तुम्ही करताय तसे घडले तर काही प्रमाणात का होईना इकडचे लोकही संवादातून बदलू शकतील. आणि समजा त्यातील अनेक लोक बदलले नाही तरी त्यांना एवढे जरी माहित पडले की असे कोणीतरी आहे तर ते पुढच्या वेळी महात्मा गांधींच्या विरुद्ध प्रक्षोभक वक्तव्ये करताना थोडी काळजी घेतील.
म्हणजे आम्हाला काही ठिकाणीं असे साधू-साध्वी पण भेटले जे एकदम याच्या विरूद्ध होते . एक जैन साध्वी तर डायरेक्ट बोलल्या की त्या गोडसेला मानतात त्याने गांधीहत्या करून चांगले काम केले. या साध्वीना हे तुम्हाला कुठे समजले असे विचारले तर त्यांनी पुष्पेद्र कुलश्रेष्ठ, विवेक बिंद्रा आणि अश्याच काही महाभागांचे व्हिडिओज पाहिल्याचे सांगितले . म्हणजे विशेष कार्यक्रमही त्यासाठी आयोजित जर्ण्यात येतात ज्यात असे व्हिडिओस दाखवण्यात येतात .मी त्यांना चर्चेसाठी वेळ मागितला पण त्यांनी नकार दिला पण ही चर्चा सुरू असताना तिथे एक कपड्याचे व्यापारी त्यांचे दर्शन करायला आले होते. त्यांनी आमची चर्चा ऐकून माझ्याशी नंतर बसून संवाद केला. महात्मा गांधी बद्दल सुरवातीला प्रश्न विचारले. त्यानंतर मुस्लिम लोकसंख्या आणि इतर अनेक प्रश्न विचारले त्याची उत्तरे त्यांना पटली.आता ते समूहात आहेत आणि ठामपणे भूमिका घेतात इकडचे मेसेज त्यांच्या समूहात पाठवतात. यामुळे त्यांना Troll ही केले जाते, काही समूहातून काढलेही गेले पण ते तरी ठामपणे भूमिका घेतात. गांधी समजल्याचा हा परिणाम म्हणता येईल.
एका साध्वीजींनी आम्हाला महात्मा गांधींच्या गोष्टींची हिंदीत पाठवायला सांगितल्या, या गोष्टी ते त्या प्रवचनात मांडतील असे त्यांनी सांगितले. त्या जर असे मांडू लागल्या तर खूपच चांगले होईल त्यांचे हजारो लाखो भक्त ते ऐकतील.
म्हणजे ही प्रोसेस तशी खूप स्लो आहे आणि अपयशच बहुतेक ठिकाणी मिळते पण हे निरंतर करत राहिले पाहिजे असे माझे मत आहे.
चळवळीतील काही मित्रांना सुरवातीला सोबत घेऊन गेलो तर त्यांना तिथे वाट बघणे आणि इतर धार्मिक गोष्टी पटल्या नाहीत ज्यामुळे ते नंतर आले नाहीत.
प्रत्येक धर्मात अनेक चांगल्या गोष्टी आहेत त्यांच्या आधारे लोकांना जोडून घेत संवाद साधत राहिले तर प्रबोधन करणे अधिक सोपे जाते. महात्मा गांधी होते तेव्हा ही बहुतेक धार्मिक माणसे त्यांच्या मागे होती आज त्यातले बरेच कट्टरतेकडे गेले यात त्यांना समजत नाही म्हणून ते तिकडे गेले असे म्हणत त्यांना मूर्ख ठरवण्याऐवजी आपण त्यांच्याशी संवाद करण्यात कुठे कमी पडलो ते शोधून त्यावर काम करायला हवे असे वाटते.

Monday, November 28, 2022
मला समजलेले महात्मा फुले - 28 Nov 2016
मला माहित आहे फेसबुक whatsapp सारख्या ठिकाणी मोठा लेख कुणी वाचणार नाही तरी कमीत कमी शब्दात मांडायचा प्रयत्न करत आहे
आज जिथे *मोठं-मोठी भाषणे झाडणे , स्वतःच्या चुका लपवण्यासाठी भाषणातून रडणे, लाखोंचे कोट घालणे, स्वतःची पदवी खोटी सांगून लाखोंचा पेन वापरणे, जाहिराती करणे,अभिनय करणे वगैरे फॅशन होत चालली आहे* तेव्हा महात्मा फुलेंची आठवण प्रकर्षाने होते
त्यांना काय कमी त्रास झाला असेल ?
जेव्हा ते रस्त्यावरून जात असत तेव्हा लोक त्यांच्यावर कचरा फेकत, थुंकत , शिव्या देत , अंगावर शेण फेकत आणि वेगवेगळ्या प्रकारे उपद्रव देत , ज्या समाजाच्या उत्थानासाठी ते झटत होते सनातन्यांनी त्याच समाजातील माणसाला सुपारी देऊन त्यांचा खून करायला पाठवले होते या सर्वांच्या काय कमी वेदना झाल्या असतील त्यांना (तो मारेकरी स्वतःची चूक लक्षात आल्यावर बदलला आणि त्याची पुढची पिढी महात्मा फुलेंची अनुयायी बनली त्यामुळे सनातन्यांनी पुढच्या वेळी गांधीजींच्या हत्येच्या वेळी स्वजातीतील गोडसेला खून करायला पाठवले) पण एवढा त्रास होऊनही ते ना कधी रडले ना इतरांना दोष देत बसले , अविरतपणे शेवटपर्यंत परखडपणे आपले विचार मांडत सोबत कार्य करत राहिले
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1311756648875383&id=100001231821936
आपल्याकडे समाजसुधारणा, जातिव्यवस्था यावर बोलणारे अनेक बोलघेवडे समाजसुधारक होऊन गेले पण कर्ते फार कमी ,
*बाहेर मोठं मोठे तत्वज्ञान सांगायचे पण स्वतःवर आल्यावर मात्र तत्वाला तिलांजली द्यायची* असे ते प्रकार
पण महात्मा फुले तसे नव्हते
महात्मा फुले हे कर्त्या सुधारकांतील सर्वश्रेष्ठ उदाहरण होते
म्हणजे *बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले* असे ते व्यक्तिमत्व
*राष्ट्रपिता महात्मा गांधींनीही ज्याला महात्मा म्हटले असे ते महात्मा*
खालील प्रसंग पहा
त्यांचे लग्न होऊन बरीच वर्षे लोटली तरी मुल-बाळ नव्हते हे पाहून काही नातेवाईकांनी म. फुलेकडे सावित्री बाईना मुल होत नसल्याचे सांगून ज्योतीबांनी दुसरे लग्न करावे असा प्रस्ताव त्यांच्या समोर मांडला तेव्हा नातेवाईकांना ज्योतिबांनी खालील उत्तर दिले होते
*माझे दुसरे लग्न करून सावित्रीला सवत आणण्यापेक्षा सावित्रीचेच एका दुसर्या पुरुषाशी दुसरे लग्न करून मलाच सवता आणूया आणि त्याच्यापासून जे मुल होईल त्याला मी स्वतःचे नाव देवून त्याचा सांभाळ करीन. पण मी मात्र सावित्रीला सोडणार नाही किवा तिला सवतहि आणणार नाही.बघा पटते का ?"*
आणि सांगा जगातील कोणताही पुरुष असा प्रस्ताव मांडेल?
विधवा मुलींचे नाव्ह्यांनी डोक्याचे केस कापू नयेत म्हणून त्याचे शिष्य *नारायन मेघाजी लोखंडे यांच्या मार्फत त्यांनी कामगारांचा संप घडवून आणला होता.*आजकाल पगारवाढीसाठी(सातवे वेतन) संप केला जातो. पण अशा *सामाजिक प्रश्नासाठी संपाचे शस्त्र* ज्योतिबा फुलेंनी उगारले हे जगातील त्यावेळचे पहिले उदाहरण असेल
*प्राथमिक शिक्षण मोफत, सक्तीचे व सार्वत्रिक* झाले पाहिजे अशी मागणी १३० वर्षापूर्वी देशात सर्वप्रथम करणारे द्रष्टे महात्मा होते.
*विद्ये विना मती गेली। मती विना निती गेली॥*
*निती विना गती गेली। गती विना वित्त गेले।।*
*वित्त विना शुद्र खचले। एवढे अनर्थ एका अविद्येने केले॥*
*एकाच घरात एक भाऊ मुस्लिम एक ख्रिस्ती एक बौध्द असावा अशी त्यांची सर्व धर्म समभावाची व व्यक्ती स्वातंत्र्याची कल्पना होती.*
आजकाल काही जाणती विचारवंत मंडळीही दारूबंदीला विरोध करतात त्त्यांनी महात्मा गांधी,डॉ .आंबेडकर , महात्मा फुले दारुबाबत या महापुरुषांनी दारूबंदी चे समर्थन का केले होते याबाबत वाचायला हवे
महात्मा फुले याबाबत म्हणतात-
*‘थोडे दिन तरी मद्य वर्ज करा।*
*तोच पैसा भरा। ग्रंथासाठी॥’*
१८८० मध्ये त्यांनी दारु विक्रीला तीव्र विरोध केला होता.
सत्यशोधक समाजाची स्थापना करून देशाच्या खेड्यापाड्यात *शिक्षण, विज्ञाननिष्ठा, अंधश्रद्धा निर्मुलन, जाती निर्मुलन, स्त्रीपुरुष समता, धर्मचिकित्सा, संसाधनांचे फेरवाटप, आंतरजातीय विवाह, लोकजागृती आणि प्रबोधन* यासाठी ते झटले.
साहित्य किंवा लेखन
-
सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून 'दीनबंधू' हे साप्ताहिक चालविले जात असे. तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक 'अखंड' रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे.सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला.
असो
, *१८४८ मध्ये देशातील पहिली मुलींची शाळा काढणारे धोर समाजसुधारक,शिक्षणतज्ज्ञ,धर्मचिकित्सक,पहिले शिवशाहिर,नाटककार, साहित्यिक,इतिहास संशोधक ,अंधश्रद्धा विरोधक, समतानायक तथा शेतकर्यांचे कैवारी क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले* यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या विचार व कार्यकर्तृत्त्वास विनम्र अभिवादन!!!
🙏🙏🙏💐💐💐🙏🙏🙏
लिहिण्यात काही चुकले असल्यास क्षमस्व
28 Nov 2016
संकेत मुनोत
8668975178
संदर्भ-
1- महात्मा फुले चरित्र
2-दत्तात्रय जाधव यांचा लेख
3- केशवराज वाघमारे यांचा लेख
4-महात्मा फुलेंवरील पुस्तके
http://www.mahatmaphule.com/marathiBooksonMahatmaPhule.htm
5-
https://m.wikisource.org/wiki/Author:जोतीराव_गोविंदराव_फुले
6-http://www.mpscworld.com/maharashtratil-samaj-sudharak-jyotiba-phule
7-
https://hi.m.wikipedia.org/wiki/ज्योतिराव_गोविंदराव_फुले
5-http://www.mpscworld.com/maharashtratil-samaj-sudharak-jyotiba-phuleComment, Share ,Follow and Subscribe.

महात्मा फुले आणि महात्मा गांधी दोघांचा काळ वेगळा, लढा वेगवेगळा.पण तरीही दोघे जवळचे का वाटतात ?
मला महात्मा फुले आणि महात्मा गांधी हे दोन्ही खूप जवळचे वाटतात.खरतर या दोघांचा काळ वेगळा, लढा वेगवेगळा.पण तरीही दोघे जवळचे का वाटतात काय माहित..?
मला त्यांची करुणा, संवेदनशीलता, भूमिका घेणे वगैरे जास्त भावते.
दोघांचेही ह्रदय सामान्य माणसासाठी , पीडितासाठी भरून येत होते.
ज्योतिबा सावित्री
मोहनदास कस्तुरबा
दोघांनाही जोडीदाराची साथ चांगली मिळाली
दोघांनी साधा वेष परिधान केला
शेतकरी हा दोघांसाठी ही प्रिय
सनातन्यांच्या रडार वर दोघे ही होते...
महात्मा फुलेंची चळवळ वेगळ्या प्रकारे गांधींनी पुनः पुढे नेली..
महात्मा फुलेंवर जसे हल्ले झाले तसे गांधींवर ही झाले आणि त्यात त्यातील अनेक हल्लेखोरांचे अनुयायी झाले हेही साम्य
त्यात उशीरा का होईना एकाचा खून करण्यात यशस्वी झाले सनातनी..
महात्मा गांधींनी किंवा महात्मा फुलेंनी विपुल लिखाण केले पण दोघांची कृती लिखाणापेक्षा जास्त मोठी होती...
दोघांचे आणि त्यातल्या त्यात सावित्रीबाई फुले यांचे लिखाण काढले तर ते संदर्भाशिवाय मांडले तर त्यात चुका काढता येतात किंवा उणिवा काढता येतात कारण दोघेही इतरांसारखे खूप बुद्धिप्रामाण्यवादी किंवा बोलके सुधारक नव्हे तर कर्ते सुधारक होते..
याबाबत प्रबोधनकार ठाकरे यांनीही छान मांडणी केली आहे ती आणि इतर काहींचे साहित्य कंमेंट मध्ये मांडतो..
Comment, Share ,Follow and Subscribe.

Monday, November 7, 2022
यथार्थ स्वातंत्र्य - जागर परिवर्तनाचा मध्ये प्रकाशित लेख
यथार्थ स्वातंत्र्य
आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त हे स्वातंत्र्य आपण अबाधित कसे ठेवायचे आणि भविष्यात देशाची वाटचाल अजून चांगली कशी होईल हे आपण पाहायला हवे. त्याला मुख्य कारण म्हणजे आज आपला देश पुन्हा तुटण्याच्या मार्गावर आहे
. ७५ वर्षांपूर्वी फक्त भारत देश स्वातंत्र्य नाही झाला तर त्यादरम्यान अनेक देश स्वतंत्र झाले पण भारत वगळता बहुतेक देश जास्त काळ टिकले नाहीत. अनके ठिकाणी लष्करशाही , हुकूमशाही आली तर काही ठिकाणी नागरिकांनी स्वतःच्या राष्ट्रप्रमुखालाच फाशी वगैरे दिली. यातील अनेक देश उध्वस्तही झाले. आपला देश ७५ वर्षानंतर आजही मजबूत आहे त्याला कारण आहे गांधीजींनी अनेक दशके लोकचळवळ घडवून लोकांची घडवलेली मने. समोरच्यावर हातही उचलणार नाही आणि अंगावर लाठी पडत असताना पळूनही जाणार नाही असे वागायला खूप धैर्य लागते ते होते म्हणून इतर देशांच्यासारख्या हिंसक दंगली झाल्या नाहीत .
फक्त भारतावरच नव्हे तर जगभर सूर्य मावळत नाही तिथपर्यत साम्राज्य असणारे विल्स्टन चर्चिल म्हणले होते कि यांना स्वातंत्र्य देऊ नका यांच्यात एवढे मतभेद आहेत कि काही वर्षात शेकडो तुकडे होतील.आणि त्यांचे अनेक अंशी खरे ही होते. अवघे दिड लाख ब्रिटिश आपल्या देशातील ४० कोटी लोकांवर राज्य करू शकले त्याला कारण होते इथली विषमता, भेदभाव आणि आपापसातील द्वेष. महात्मा गांधीजींच्या भारतीय राजकारणात उदय होईपर्यत स्वातंत्र्यलढा हा फक्त देशातील काही उच्चभ्रू वर्गापुरता मर्यादित होता . सामान्य माणसाला त्याचे काही देणे घेणे नव्हते. राज्य करणारे ब्रिटिश असो , पेशवे असो किंवा मुगल किंवा अन्य कोणी असो त्यांना तर गुलामीतच जगावे लागत होते . उलट काहींना ब्रिटिश त्यातल्या त्यात बरे वाटत होते कारण ते पेशव्यांसारखा जातीवरून अन्याय तर ब्रिटिश करत नव्हते आणि सतीप्रथा बंदी आणि अनेक सुधारणावादी कायदे त्यांनी पारित केले जे इथल्या सनातनी लोकांनी स्वतःच्या सत्तेत कधी होऊ दिले नसते.
महात्मा गांधींनी नेतृत्व हाती घेतल्यावर सर्वप्रथम हा जात, धर्म, वर्ग पंथ वगैरे मधला भेद मिटवला आणि लोकांना देशप्रेम आणि खादीच्या धाग्याने एकत्र आणले. पूर्वी देशात २ गट होते एक गट म्हणायचा 'आधी स्वातंत्र्य मग सुधारणा' तर दुसरा गट म्हणायचा 'आधी सुधारणा मग स्वातंत्र्य' . गांधी म्हणाले कि स्वातंत्र्य आणि सुधारणा या गोष्टी सोबत होऊ शकतात आणि ते त्यांनी करून दाखवले .
.त्यांनी कोट्यवधी लोकांमध्ये स्वातंत्र्य मिळवण्याची प्रेरणा जागवलीच पण सोबत सुधारणावादी धोरणही जागविले. सवर्णामध्ये पश्चातापाची भावना जागी करून त्यांना आपण एक पायरी खाली उतरायला हवे हे सांगीतले तेच ज्यांना त्याकाळी अस्पृश्य म्हटले जाई त्यांच्यामध्ये त्यांनी आत्मविश्वासाची भावना निर्माण केली. याचे साधे उदाहरण घ्यायचे तर खादी टोपी घ्या पूर्वी जातीनिहाय पगड्या होत्या ज्याची जेवढी जात मोठी तेवढे पगडीत पीळ जास्त आणि त्यावरून त्याला सलाम ठोकला जाई . गांधींनी सर्वांना सारखी खादी टोपी घालून हा फरक संपवला. गांधीजींच्या उपवासामुळे शेकडो वर्षांपासून अस्पृश्यांना बंद असलेली मंदिरे खुली झाली , विहिरी एकत्र झाल्या . जिथे अस्पृश्यांना घरात प्रवेश नव्हता तिथे लोक एकत्र जेवू लागले .फक्त उच्चभ्रू वर्गापुरता मर्यदित असणारा पक्ष सर्वांचा झाला आणि गांधीजींच्या या सुधारणावादी धोरणामुळे दहशतवादी गोडसेला गांधींचा खून करावा लागला . त्याने ५५ कोटी , फाळणी वगैरे खोटी कारणे सांगितली असली तरी खरे कारण हे गांधीजींचे सुधारणावादी धोरण हेच होते .. कारण गांधीजवर १९३४,१९४२,१९४४ या काळात जवळपास ७ हल्ले झाले ज्यातून गांधी वाचले तेव्हा ना फाळणीचा विषय होता ना ५५ कोटींचा . कारण एकच होते गांधींनी बहुजनांना मुख्य प्रवाहात घेणे सोबत या कामात आचार्य विनोबा भावे , साने गुरुजी आणि अनेक विद्वान ब्राम्हण ही साथ देत होते ज्याची गोडसेच्या मनात जास्त चीड होती.
तर चर्चिल ने सांगितले ते आज खरे होऊ लागले आहे आज धर्म, जात , वर्ग , पंथ इ वरून मोठ्या प्रमाणात द्वेष पसरवला जाऊन देश हळूहळू तुटत आहे . आपल्याला जर देश पुढे न्यायचा असेल तर हा द्वेष थांबवून आपापसात प्रेम आणि संवाद वाढवायला हवा . पंडित नेहरू जेव्हा देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा देशात सुई ही तयार होत नव्हती.पण नेहरू कधी हे नाही म्हटले कि ब्रिटिशांनी १५० वर्षे घाण करून ठेवली आता मी काय करू मला अजून वेळ द्या वगैरे ? उलट त्यांनी कारखाने , प्रयोगशाळा , धरणे , वैज्ञानिक संस्था आणि अनेक गोष्टी उभारून आधुनिक भारताची निर्मिती केली. नेहरू इथे जेव्हा या गोष्टी करत होते त्याच वेळी पाकिस्तान आणि अन्य काही देशात धर्माच्या नावाखाली मोठं-मोठी धार्मिक स्थळे आणि तत्सम गोष्टींवर जोर दिला गेला. आज ते कुठे आणि आपण कुठे त्यातील प्रमुख अंतर हे धोरणातील आहे . आपल्या देशात रोजगार, शिक्षण , औद्योगिकता , आरोग्य , अर्थव्यवस्था , आरोग्य व्यवस्था इ गोष्टी मजबूत करण्याकडे भर दिला गेल्यामुळे देशातील लोक आणि देश पुढे जाऊ शकला.आज या मूळ गोष्टींकडे दुर्लक्ष करून लोकांना धर्मांधतेकडे वळवले जात आहे ते थांबायला हवे नाहीतर आपल्या देशाचेही जर्मनी , श्रीलंका इ सारखे हाल होतील धार्मिक असणे आणि धर्माध असणे यात खूप मोठा फरक आहे . गांधी , मौलाना आझाद , खान अब्दुल गफार खान ही धार्मिक माणसे ज्यांचा धर्म त्या धर्मातील सामन्यातील सामान्य माणसाचे कल्याण कास होईल ते पाहत होता तर तेच गोडसे , लादेन इ सारख्या धर्मांध लोकांचा धर्मांधपणा इतर धर्माचा द्वेष करून स्वतःच्याच धर्माचे मोठे नुकसान करतो . .
तर चला बदल घडवूया बदलाची सुरवात स्वतःपासून करूया
संकेत मुनोत
8668975178
changalevichar1@gmail.com
Comment, Share ,Follow and Subscribe.

Saturday, November 5, 2022
संभाजी भिडे यांचे टिकली बद्दलचे विधान हे त्यांच्या स्त्रियांना कमी लेखण्याचे एक छोटेसे उदाहरण
संभाजी भिडे यांचे कुंकू -टिकली बद्दलचे विधान हे त्यांच्या स्त्रियांना कमी लेखण्याचे एक छोटेसे उदाहरण आहे. हिंदूराष्ट्र निर्माण झाले तर असे अनेक नग तयार होतील, जे स्त्रियांनी काय करावे याबद्दल ज्ञान देतील आणि "मग तू असे असे केले तरच मी हे-हे करेन" म्हणत त्यांच्याशी व्यवहार करतील.
हे इतिहासात पण घडले आहे. राजा राम मोहन रॉय आणि सुधारकांनी जेव्हा सती प्रथेस (पतीच्या निधना नंतर त्याच्या पत्नीलाही त्याच्या चितेवर जाळण्यास) विरोध केला तर हे आमचे संस्कृती बुडवायला आणि धर्माचा अपमान करायला निघाले आहेत असे म्हटले गेले. सावित्रीबाई फुले यांनी जेव्हा मुलींना शिकवणे सुरू केले तेव्हा त्यांच्यावर याच विचारसरणीच्या लोकांनी शेण फेकले आणि प्रचंड त्रास दिला. महात्मा गांधी जेव्हा म्हणाले की महिलांनी चूल आणि मूल पुरते मर्यादित न राहता लोक चळवळ केली पाहिजे तेव्हाही त्यांना प्रचंड विरोध झाला. गांधीजींनी स्त्रीयांनी पडद्याआड राहणे , घुंघट वगैरे ला विरोध करणारे विधान केले तेव्हा सनातनी त्यांच्यावर प्रचंड चिडले होते पण त्यावेळी देशभर स्त्रियांनी या प्रथेविरुद्ध आंदोलने केली आणि त्या गोष्टी सोडल्या.
स्त्रियांनी याबद्दल वेळीच सतर्क राहिले पाहिजे. नाहीतर हे वारे वाढत राहिले तर पुढे हा काळ त्यांच्यासाठी अवघड असेल. इतिहासात याची असंख्य उदाहरणे आहेत.
महात्मा फुले यांच्यापासुन प्रेरणा घेऊन शल्य विशारद सती जाण्यास यांनी आपली लाडकी कन्या बाहुली हिला शिकवण्यास सुरुवात केली. त्यांना सनातन्यांनी जातीतून बहिष्कृत करण्याची धमकी दिली.पण डॉ.घोले यांनी कुठल्याही अडचणीला भीक घातली नाही.शेवटी काही नतद्रष्ट नातेवाईक व्यक्तिंनी काचा कुटुन घातलेला लाडू बाहुलीस खावयास दिला. ती ६-७ वर्षाची चिमुकली तो लाडू खाल्ल्यामुळे अंतर्गत रक्तस्राव होऊन मृत्युमुखी पडली. तिच्या स्मृतिप्रीत्यर्थ डॉ घोले यांनी शुक्रवार पेठ येथे बाहुली हौद बांधला.
त्यांना आवडले तर #टिकली लावतील नाही आवडले तर नाही लावणार. तेच #बुरखा #हिजाब किंवा इतर गोष्टी बद्दलही. #itsherchoice
Comment, Share ,Follow and Subscribe.
Labels:
कुंकू,
टिकली,
संभाजी भिडे,
स्त्री

Subscribe to:
Posts (Atom)