AddThis code

Friday, December 30, 2022

आर्वी , वर्धा येथील व्याख्यान आणि त्याला आलेल्या प्रतिक्रिया

*#राष्ट्रसंत #तुकडोजी महाराज* आणि अनेक महामानवांनी जेथे मोठे काम केले होते त्या विदर्भातील *#आर्वी, वर्धा* येथे *'#महात्मा #गांधी यांची प्रासंगिकता'* या विषयावर *प्रमुख वक्ता*🎙️ म्हणून विचार मांडण्याची मला संधी मिळाली. 
यात आश्चर्याची बाब ही वाटली की माझ्या व्याख्यानानंतर सूत्रसंचालक म्हणाले की *"वक्ते पुण्याचे असून पुणेरी भाषेत न बोलता विदर्भाच्या भाषेत बोलले





."😊* मी काही तसे ठरवून विदर्भाकडील भाषेत बोललो नाही पण तिकडचे लोक जास्त परिचयाचे झाल्यामुळे किंवा कुठल्या तरी कारणामुळे माझी भाषा थोडीशी विदर्भातील झालीं असावी. कारण पुण्यात ही मला एकाने *"तुम्ही विदर्भातील का?"* असे विचारले😅

ज्या विदर्भाने देशाला *राष्ट्रसंत तुकडोजी महाराज , राष्ट्रसंत गाडगे बाबा* सारखे संत दिले तिथेच आज *कालीचरण महाराज* सारखे *देशभर द्वेष पसरविणारे गुंड निर्माण होत आहेत*😡  त्यामुळे तेथेही आता या प्रबोधनाची खूप गरज आहे.

असो व्याख्यानानंतर घेतलेल्या *श्रोत्यांच्या प्रतिक्रिया* ऊर्जा देणाऱ्या होत्या. एक शिक्षक म्हणाले की *"मी आत्ता पर्यंत गांधींना अहिंसेला चुकीचे समजत होतो आणि त्याबद्दल काहीही वाचणे टाळत होतो. पण आपल्या व्याख्यानातून त्यांच्याबद्दल चे गैरसमज दूर झाले. आता गांधी नव्याने वाचणार आहे."* विशेष म्हणजे त्यांचे एक विद्यार्थीही तेथे उपस्थित होते त्यांनीही हेच सांगितले . ज्यांचा निबंध स्पर्धेत क्रमांक आला त्या शोभाजींनी *"मी स्वतः गांधी विचार आचरणात आणनार असून माझ्या 8 वर्षाच्या मुलाला ही त्या मार्गावर नेणार आहे "* असे सांगितले. अजूनही बऱ्याच प्रतिक्रिया आल्या. 
*खरतर गांधीजींना जाऊन 75 वर्ष झाले पण तरी आजही त्यांची बदनामी करणारे विविध चित्रपट काढले जातात 📺🎥आणि त्यांच्या विरुद्ध खोटे भडक साहित्य📰📲 प्रसारित केले जाते ते यासाठी की लोकांनी त्या बदनामीला भुलून जाऊन गांधीना #मजबूरी समजून वाचुच नये.*
 *लोकांनी गांधी वाचले तर ते पुन्हा जागे होऊन जाती धर्माच्या कट्ट्ररतेच्या बाहेर येतील आणि प्रश्न विचारतील, खऱ्या हक्कांसाठी आंदोलने करतील. मजबुती का नाम गांधी समजून स्वतः ही मजबूत होतील.* ❤️❤️

👹👺 *विवेक बिंद्रा, गुंड #कालीचरण, कंगना राणावत, वामन मेश्राम, पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ आणि यांच्या सारख्या अनेक व्यक्ती आपापल्या क्षेत्रात गांधीजींबद्दल सतत काही ना काही खोटे साहित्य तयार करून नियमित प्रसारित करत असतात त्याचे कारणही हेच.*

 महात्मा गांधी यांची हत्या त्याच सनातन्यांनी  केली *ज्यांनी ज्ञानेश्वर, तुकाराम, महात्मा फुले यांना त्रास दिला.* गांधी हत्येचे कारण होते *त्यांनी समतेसाठी केलेले कार्य*. पूर्वी राजकारणात *ठराविक वर्गाचे वर्चस्व होते ते गांधीजींनी संपवले आणि सामान्य माणसाला राजकारणाच्या मुख्य प्रवाहात स्थान दिले.त्यामुळे ज्यांचे जातीय वर्चस्व गांधींनी संपवले त्या वर्गातील प्रतिनिधी गोडसे याने गांधींची हत्या केली* 

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर विद्यापीठ व गोंडवाना विद्यापीठ मराठी परिषदेचे अध्यक्ष प्रा. डॉक्टर गणेश मोहोड होते. माजी आमदार अमर काळे, विदर्भ मतदार चे संपादक राजू गोरडे, प्रहार सोशल फोरमचे संस्थापक बाळा जगताप हे प्रमुख अतिथी होते. 

याप्रसंगी वैष्णव जन तो... या सुमधुर गीताने  कवी व संगीतकार हरीश तांबोळी यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक प्रा. संजय वानखडे सरांनी केले. माझा तेथे परिचय आदरणीय डॉक्टर प्रसन्नकुमार बंब सरांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. दर्शन चामभारे यांनी केले तर आभार प्रा. राजेश सोळंकी यांनी मानले.

*सर्वांचे खूप खूप आभार* 
*#प्रेम प्रसार करत राहूया ❤️❤️❤️*

संकेत मुनोत

Sunday, December 25, 2022

डॉक्टरांशी गांधी विचारांवर संवाद

*पुण्यातील अनेक  डॉक्टरांच्या पर्यंत  गांधीविचार* पोहोचवण्याची काल संधी मिळाली. 👩🏻‍⚕👨🏼‍⚕🥼🏥❤️❤️

माझे *Knowing Gandhi Doctors* मधील मित्र *डॉ देवेंद्र संचेती (कॅन्टोन्मेंट विधानसभा अध्यक्ष )* यांनी मला *राष्ट्रवादी डॉक्टर सेल* च्या *“वॉक अँड टॉक “ सोबत “थिंक टॅंक“* या उपक्रमात डॉक्टरांशी गांधीजी वर *संवाद*🎙️ साधण्यासाठी बोलवले होते. 








सध्या देशात *जात, धर्म आणि वेगवेगळ्या गोष्टींचे कट्टर गट निर्माण होऊन द्वेष वाढत* आहे. जो तो आमचा महामानव आणि आमची जात कशी श्रेष्ठ याची स्पर्धा करत आहे. यातून *संघर्ष* होऊन *देश तुटण्याची* शक्यता निर्माण झाली आहे. याला उपाय म्हणजे *पूर्ण देशाला प्रेमाने जोडणारे स्वतः च्या पाठीमागे कुठलीही जात, धर्म नसणारे महात्मा गांधीचे विचार पुन्हा मना मनात पोहोचवणे.❤️❤️* 
पण वेगवेगळ्या समाज माध्यमातून एवढा *द्वेष त्यांच्याबद्दल पसरवला जातो* की *सत्य समोर येतच नाही*.त्यामुळे *ते गैरसमज दूर करत त्यांचे विचार आज समाजात प्रेम आणि संवाद वाढवण्यासाठी कसे आवश्यक आहेत* हे मी मांडले. यात *माझे आवडते म्हणजे प्रश्र्नोत्तरांचे सत्र ही छान झाले , खूप चांगले प्रश्न* आले. कार्यक्रमाच्या समारोपात *सर्वांना  पंचसूत्रीची शपथ घेतली आणि शेवटी सर्वांना महात्मा गांधीजींची पुस्तके आणि जयहिंद पत्रके देऊन  चळवळ जॉईन करण्याचे आवाहन केले.* 

यात *डॉ सुनील जगताप प्रदेशाध्यक्ष रा. डॉ. सेल महाराष्ट्र राज्य, डॉ शशिकांत कदम पुणे शहराध्यक्ष रा. डॉ. सेल, डॉ राहुल सूर्यवंशी , डॉ राजेश साठे , डॉ हेमंत तुसे, डॉ राजश्री पोखरण ,डॉ रणजीत निकम, डॉ अनुपमा गायकवाड, डॉ देवेंद्र  संचेती, डॉ संगीता माने,  डॉ फैज मणियार, डॉ धनंजय देशमुख, डॉ विजयसिंह पाटील, डॉ ज्योती देवरे, डॉ सारिका परदेशी, डॉ मृणाल जमदाडे श्रीमती कमल ननावरे* आदी उपस्थित होते. 👩🏻‍⚕

(खरतर नागपूर ते पुणे तिकीट confirm न झाल्याने ट्रेन मध्ये सीट खाली झोपून प्रवास करावा लागला. ज्यात तेथील थंडी मुळे सर्दी खोकला वगैरे झाले होते पण या सर्व डॉक्टर्स सोबत सकाळी सकाळी चालल्याने सर्दी निघून गेली😊. )

संकेत मुनोत
8668975178

Thursday, December 22, 2022

शेकडो अनाथ मुलांची आई गुंजनताई गोळे

मी #अमरावती येथे येत असल्याचे समजल्यावर गुंजनताई गोळे यांचा फोन आला. त्यांनी त्याच दिवशी नागपूरला जाण्याऐवजी त्यांच्या साईनगर येथील निवासस्थानी राहून दुसऱ्या दिवशी जाण्याचे सुचवले. त्यामुळे तिथे राहून दुसऱ्या दिवशी पहाटे 5.30 वाजता तेथून नागपूरला ट्रेनने निघालो.
गुंजनताईशी संध्याकाळी भेट झाली. आम्ही अनेकदा फोनवर बोललो होतो. त्या पुण्यात आल्यावर भेटायचेही ठरले होते पण भेट कधी झाली नाही. आमच्या दोघांची ओळख झाली ती शेतीतज्ञ आणि जेष्ठ गांधीवादी मनोहर खकें काकांमुळे.  

२०११ साली अमरावतीच्या राजकमल चौकात एक मनोरुग्ण गरोदर स्त्री अतिशय वाईट परिस्थीती मध्ये गुंजनताई गोळे यांना दिसून आली. मनोरुग्ण असूनही कुणाच्या तरी वासनेला ती शिकार झाली एव्हढी विकृत मानसिकता आपल्या आसपास आहे हा विचार त्यांना असह्य करून गेला. त्या महिलेला तेथून दवाखाण्यात नेऊन तिच्या डिलिव्हरी पर्यत सर्व जबाबदारी गुंजनताईने पार पाडली. त्यावेळी अनेक अडचणींना त्यांना समोर जावे लागले. तेव्हाच मनाशी एक गोष्ट पक्की केली कि अश्या घटना फक्त बघून, हळहळ व्यक्त करून नाही चालणार तर एक नैतिक, सामाजिक जबाबदारी म्हणून स्ततःपासून सुरूवात करून कृतीतून बदल घडवायचा. तब्बल एक दशकापूर्वी घडलेल्या या प्रसंगापासून घेतलेले सेवाव्रत आजपर्यंत निरंतर सुरू आहे. शेकडो निराधार, गरजू महिला, वंचित, HIV बाधीत अनाथ, मुले/मुली, बेवारस वृध्द यांच्या पुनर्वसनाचे शाश्वत कार्य आजवर करण्यात आले तेही कुठलीही सरकारी मदत नसताना. हे सर्व सेवाकार्य अधिक व्यापक स्वरूपात करण्यासाठी वुमन्स फाऊंडेशन, अमरावती या संस्थेची २०१५ साली स्थापना करण्यात आली.

अनाथ HIV बाधित मुले व मुली यांच्यासाठी गोकुळ आश्रम हा निवासी प्रकल्प सुरू करून त्यांना शैक्षणिक, वैद्यकीय, रोजगार, लग्न, इत्यादी सर्व प्रकारे मदत करून पुनर्वसन करणे हे यामार्फत सुरू आहे.

 अनेक नवजात बाळांना स्वतःचे दुध पाजून 'दुध दान चळवळ' सुरू करून स्तनदा मातांना मार्गदर्शन व सहकार्य त्या करतात

शहरातील बेवारस मृतदेहांचा स्वखर्चातून अंतिमविधी करतात 

कुमारी मातांच्या मनोबल वाढीसाठी कार्य तसेच त्यांना वैद्यकिय व कायदेशीर सर्व बाबींमध्ये मदत करून पुनर्वसन करण्याचे कार्य त्या करतात

तर अश्या गुंजन ताईंना आपणही कार्यात हातभार लावुया..

संकेत मुनोत 
( फोटो - रुक्मिणी वल्लभ या रेस्टॉरंट मधला . गुंजनताई येथे जेवणास घेऊन गेल्या आणि तेथे सोल्याची भाजी, भाकरी, पुरणपोळी असे मस्त जेवण केले. )
अमरावती - गाठी भेटी
#अवलिया_माणसे

Comment, Share ,Follow and Subscribe.

Thursday, December 15, 2022

पहिल्यांदा अशी मस्त window सीट मिळाली ...स्वारी फूल खुश.. पण सोडावी लगाली...


पहिल्यांदा अशी मस्त window सीट मिळाली ...स्वारी फूल खुश..😊
यापूर्वी कधी मधली , कधी दरवाजातील आणि कधी वरच्या सीटने किंवा उभे राहून प्रवास केला होता..
 ही सीट (side lower)आणि हा डबा दोन्ही छान होते ...समोरच 2 cute चिमुकले होते. एक चिमुकला खेळत खेळत जवळ येऊन hi करत होता त्याचे गाल आणि केस एकदम cute.. च..
 गाडी सुरू व्हायला वेळ होता त्यापूर्वी एक जेष्ठ काका आले आणि त्यांनी विचारले..
"आप फैमिली के साथ हो?" 
मी - नही
ते - तो आप हमे ये सीट हमे दे सकते हो प्लीज , मुझे और मेरी वाइफ को दूसरे डब्बे में middle सीट मिली है पर wife को breathing में problem आ सकती है। नीचे की सीट मिली तो अच्छा होगा। मैं उसी डिब्बेमे रहुंगा खाली वाइफ यहां आएगी
मी चालेल म्हटले , नकार देऊ शकलो नाही पण एवढ्या लांबून ते माझ्याकडेच का आले? समजले नाही, कदाचित इतर ठिकाणी विचारत-विचारत आले असावेत. 
नंतर पुन्हा काही वेळाने बॅग ठेवायला आले आणि समोर एका सीटवाल्या तरुणाला त्यांनी विचारले की तुम्ही एकटे असाल तर तिकडे जाऊ शकता का ?माझ्या wife ला यांची सीट मिळाली आहे तर मला इथेच भेटली जवळ तर बरे होईल.त्याची मिडलच सीट होती तर तो तयार झाला. 
खिडकीची मस्त view असलेली आरामदायी सीट गेली, त्याचे थोडेसे दुःख झाले पण मला त्या काकांचे प्रेम भारी वाटले🤩🥰…. त्यांची सीट असलेल्या डब्यात आणि नंतर या डब्यात अनेक जणांना त्यांनी याबद्दल विचारले असावे नकार ही भेटला असेल पण निराश न होता विचारत राहिले...
मी अर्धा तास तिथेच बसलो , त्यांच्याशी गप्पा मारल्या...आणि मग दुसऱ्या डब्यात आलो... हा तेव्हाचा फोटो त्यांनीच काढला..
ती सीट भेटल्यावर काकांची smile भारी होती..😊

उद्या दुपारी #नागपूर मध्ये पोहचेल,.. भेटूया..❤️❤️
Comment, Share ,Follow and Subscribe.

Wednesday, December 14, 2022

Great Interaction with Dr. Amit Shinde, Sangamner

परवा सन्मित्र डॉ अमित शिंदे भेटण्यास आले होते. अनेक दिवसापासून भेटणे-भेटणे म्हणत होतो पण फायनली परवा भेट झाली.
डॉ.अमित स्त्रीरोगतज्ज्ञ असून संगमनेर मध्ये त्यांचे हॉस्पिटल आहे. आयुर्वेद महाविद्यालयात ते प्राध्यापकही आहेत.
फोनवर अनेकदा गप्पा व्हायच्या पण प्रत्यक्ष भेटून जास्त वेळ मनमोकळ्या गप्पा मारण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी. मागे #valentinewithGandhi कार्यक्रमात आले होते पण तेव्हा दोघेही गडबडीत होतो. काल कोल्ड कॉफी सोबत मोठी वैचारिक मेजवानी सुद्धा मिळाली.
कुरुंदकर , ओशो, गांधी आणि वेगवेगळ्या विषयावर छान विचारमंथन झाले. स्वामी विवेकानंद म्हणतात की एका विचारी माणसासोबत गप्पा मारणे म्हणजे अनेक पुस्तके वाचणे आहे त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला. लहानपणी वेळ होता आवड होती पण पुस्तक आणायची आर्थिक परिस्थिती नव्हती आता थोडी आर्थिक परिस्थिती झाली पण जबाबदाऱ्या आणि व्याप एवढे एवढ्या वाढल्या की पुस्तके आणून ही वाचायला वेळ मिळत नाही. पण मग अश्या विचारी व्यक्तीसोबत गप्पा म्हणजे खूप चांगले काम होते.
गांधी असो , ओशो असो वा अन्य कोणी आम्ही कोणाचेही भक्त नाही आणि त्यांच्यातही उणिवा होत्या यांची आम्हाला जाणीव आहे त्यामुळे खूप कमी जणांशी wavelength जुळते ती डॉ अमित शिंदेशी जुळाली. सगळेच खूप छान छान म्हणणारी गोल गोल वाटतात अमित सर तसे नाहीत विचार clear आहेत. म्हणाजे ओशो चे चांगले विचार discuss केले तसे त्यांनी मांडलेल्या अनेक
चुकीच्या गोष्टी ही आम्ही discuss केल्या.
विविध मासिकात अमित शिंदे सरांच्या कथा आणि कविता येत असतात,'पी सी ओ एस' हे त्यांचे वैद्यकीय मार्गदर्शन पर पुस्तक मागच्याच वर्षी प्रकाशित झाले आहे.
अहमदनगर मधील स्पर्धेत लोकांना भरपूर हसवणाऱ्या 'परफेक्ट बायको कशी शोधावी' याचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. या नाटकात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा मानवी नात्यांवर होणारा परिणाम आणि माणूस व यंत्र यांतील मिटत चाललेले अंतर हा आहे.विशेष बाब म्हणजे सुरवातीला प्रेक्षकांना भरपूर हसवणाऱ्या या नाटकाच्या दुसऱ्या भागात स्त्रियांना पुरातन काळापासून आत्तापर्यंत कसे यंत्र समजले जाते हे मनुस्मृती पासून अनेक ग्रंथांतील उतार्यासह सांगितले आहे.सोबत त्यांनी सध्याच्या व्यवस्थेवरही काही चिमटे काढले आहेत जसे की मुलगा जोडीदार शोधताना म्हणतो की "मला अंधभक्त पत्नी नको वगैरे"...पण याच कारणामुळे नाट्य समितीने या प्रेक्षकांची प्रचंड दाद मिळालेल्या नाटकाला एकही बक्षीस दिले नाही.
याच प्रमाणे 'मी पण नथुराम गोडसेच बोलतोय' आणि 'खेळ मांडियेला' या दोन्ही वास्तव दाखवणाऱ्या नाटकांवर ही असाच अन्याय झाला आहे.त्यांनाही प्रेक्षकांची चांगली दाद मिळून आणि कथानक चांगले असूनही एकही बक्षीस दिले गेले नाही.
कारण अर्थातच परीक्षक संघविचारी(RSS) आहेत त्यांना हे वास्तव विचार आणि सत्य कसे पचेल?परिक्षकांची फेसबुक वॉल जरी चाळून पाहिली तर कारण लगेच लक्षात येईल.
असो हे नाटक जर कोणी व्यावसायिक किंवा प्रायोगिक रंगभूमीवर करणार असेल तर त्यासाठी हवी ती सर्व मदत पुरविण्याची डॉ अमित यांची तयारी आहे. त्या नाटकातील काही भागाची लिंक कमेंट मध्ये देत आहे नक्की पहा.
#संगमनेर मधील भेटी गाठी
एक #शिंदे असेही 😉
संकेत मुनोत



Comment, Share ,Follow and Subscribe.

Tuesday, December 6, 2022

अकोला मधील उद्योजक विवेक पारसकर यांची भेट


#अकोला मधील भेटी गाठी 
माझे whatsapp वरील मित्र Ujwal bachhav हे नेहमीच माझ्या लेखांना चांगलीं प्रतिक्रिया देत असतात आणि काही गोष्टीही सुचवत असतात.  मी अकोल्यात आहे अस समजले तेव्हा त्यांनी मला त्यांचे मेहुणे विवेक पारसकर यांचा संपर्क पाठवला आणि त्यांनाही सामजिक कामात रस असून भेटण्यास सांगितलें. Subhash Gadiya सरांच्या घरी असताना  विवेकजींचा फोन आला आणि त्यांनी भेटण्यास बोलवले. 

विवेक सर उद्योजक असून राजकारणातही सक्रिय आहेत. त्यांनी निवडणूक ही लढवली होती.त्यांनी आमच्याकडून आम्ही नेमकी काय काम करतो ? गांधी विचार आज relevant कसे आणि अनेक गोष्टी समजून घेतल्या. Knowing Gandhism Global Friends Akola, जयहिंद लोक चळवळ यांच्यासाठी व्याख्याने आणि किंवा इतर उपक्रम घेण्यासाठी परफेक्ट स्टडी सेंटर चा हॉल नेहमी उपलब्ध असेल हे त्यांनी या चर्चेत सांगितले. सन्मित्र Amol Saraf सोबत होते. 
 (इथे असतानाच माजी मंत्री Azhar Husain सरांचा सुभाष गादिया सरांची आमच्या भेटीची पोस्ट वाचून फोन आला आणि त्यांनी त्यांच्या घरी भेट ठेवली त्यावर लवकरच लिहणार आहे.)
संकेत मुनोत 
Share ,Follow and Subscribe.

Sunday, December 4, 2022

औरंगाबाद मधील #प्रेमळ लोक - आज त्यातील #तांदळे कुटुंब पाहूया

MIT, औरंगाबाद येथे "सोशल मीडियाचा चांगला वापर कसा करावा" या विषयावरील व्याख्यानासाठी गेलो होतो तेव्हा सोशल मीडियावर जुळलेल्या पण प्रत्यक्ष कधीही न भेटलेल्या लोकांना ही भेटून येऊ म्हटले. दुसऱ्या दिवशी काहींना भेटून पुणे रिटर्न येणार होतो पण अजून एक दिवस राहावे लागले कारण खूप प्रेमळ लोक येथे भेटले.आज त्यातील #तांदळे कुटुंब पाहूया
जस आठवतय तसे तोडके मोडके लिहतो.
व्याख्यानाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी संजीवनी तांदळे मॅमचा यांचा नाश्ता करण्यास येताय ना? असा फोन आला. मी त्यांना म्हटल आपण नक्की भेटूया, पण नाश्ता नाही करू शकणार त्यासाठी क्षमस्व. कारण नाश्तासाठी सुबोध सरांकडे चाललो आहे, त्यांनी काल रात्रीच आजचे निमंत्रण दिले आहे.तर त्या हसत म्हणाल्या "तुम्ही माझ्याच घरी येत आहात, सुबोध माझा मुलगा आहे. 😄"
नाश्त्याला गेलो तर सगळ्या कुटुंबीयांशी मस्त गप्पा झाल्या.
संजीवनी तांदळे मॅम उद्योजक असून त्यांनी गेल्या 32 वर्षापासून हॉटेल व्यवसायात मोलाचे योगदान दिले आहे. एकहाती व्यवसाय सांभाळून महिलांसाठी एका नव्या व्यवसायाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली आहे. "साईकृपा लॉज" च्या रुपात अत्यंत मोकळे आणि घरगुती वातावरण टिकवले जाते. महीनों महीने घरापासून लांब राहून काम करणार्या सर्वांसाठी हे एक सुरक्षित वातावरणातील ठिकाण त्यांनी निर्माण केले आहे. हॉटेल व्यवसायातील चांगले वाईट आणि थरारक असे अनेक अनुभव यांचा खजिनाच त्यांच्या कडून ऐकायला मिळेल.
विशेष म्हणजे त्यांचा आणि Adv. फुलचंद तांदळे सरांचा 42 वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह झाला आहे ज्यासाठी त्यांनी बराच संघर्ष केला होता. त्यांच्या घरातून कडक विरोध असतांना एकमेकांना साथ देऊन, एकमेकांसाठी खंबीर उभे राहून संसार फुलवला.
Dr. Shubhangi Tandale-Palwade या स्त्री रोग तज्ज्ञ असुन त्या पलाश maternity व IVF हॉस्पिटल येथे कार्यरत असतात. गांधीविचारांबद्दल आग्रही भूमिका हीच आज त्यांची ओळख आहे. त्यांना वाचनाची आवड होतीच पण महात्मा गांधी आंतररारष्ट्रीय विद्यापीठ सेवाग्राम, वर्धा येथे एमबीबीएस ला प्रवेश घेताना प्रवेश परीक्षेत (CET exam) एक पेपर महात्मा गांधी वर होता तेव्हा त्या वाचनाने गांधीजी बद्दल अधिक आदर निर्माण झाला. त्यांनी याबद्दल कार्य ही सुरू केले आहे. (अश्या परीक्षा ठिकठिकाणी घ्यायला हव्यात मागच्या वर्षी वर्धा येथे मित्र सुयोग त्याच्या घरी जेवणास घेऊन गेला तेव्हा माहित पडले की त्याच्या पत्नीही हीच entrance परीक्षा देतांना गांधी विचारांकडे आकर्षित झाल्या आणि आजही डॉक्टर म्हणून कार्य करताना त्या गांधी विचारांचे तत्व जपत असतात. एका सुखवस्तू व्यापारी घरात जन्म घेऊनही त्यांना जोडीदार हा इतर मुलींसारखा पैशांनी नव्हे तर मनाने श्रीमंत असलेला आणि समाजाबद्दल तळमळ असलेला हवा होता जो शोधताना खूप अडचण येत होती पण नंतर सुयोग चे स्थळ मित्राने सुचवले आणि या गांधी विचारांमुळे त्यांचे लग्न झाले त्यांची स्टोरीही लवकरच लिहणार आहे)
सुबोध तांदळे हे बांधकाम व्यावसायिक असून पुण्यात बाणेर सह औरंगाबाद येथे त्यांचे अनेक प्रकल्प सुरू आहेत. त्यांच्या पत्नी स्नेहाताई आर्किटेक्ट आहेत त्या सुद्धा घरच्या दोन्ही व्यवसायात चांगल्या सक्रिय आहेत आणि शुभांगी ताई सोबत गांधी विचाराबद्दल ही अनेक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतात.
आणि त्यांचाही आंतरजातीय विवाह दोन्ही घरच्या मान्यतेने झालेला आहे.
आई मुली पेक्षा कैक पटीने घट्ट विणलेल्या नात्याचा एक सुरेख बंध संजीवनी mam आणि स्नेहाताई यांनी निर्माण केला आहे.
यात विशेष बाब ही सुद्धा की त्यांच्या इथे जेवण बनवणारे आचारी व घरकामातील मदतनीस मुस्लिम सुद्धा आहेत ज्यावर त्यांच्या काही परिचितांनी विरोध केला पण महात्मा गांधी सारखेच निर्भयतेने तांदळे कुटुंब आपल्या तत्वावर ठाम राहिले. सर्वांचा घरातील वावर अतिशय मोकळा आहे.
त्यांच्या इथे नाश्ता एवढा फूल झाला की जेवण करण्यास पोटात जागाच राहिली नाही.
आमच्या फोटो सोबतच त्यांचे मॅनेजर दत्ता सपकाळ यांनीही फोटो काढला तेही माझे लेख वाचत असतात हे पाहून आनंद वाटला. खेड्यातील वातावरणातून येऊन गेल्या 22 वर्षापासून ते संजीवनी यांच्या मातृछत्रा खाली पत्नी व मुली सह परिवारातील सदस्य होऊन राहत आहेत. वैचारिक आणि सामाजिक कार्यात तांदळे परिवारासह उत्साहाने सहभागी होत असतात.
तेथून मला घेण्यासाठी माझे जेष्ठ मित्र माजी पोलीस अधिकारी प्रेमसागर चांद्रमोरे सर आले होते. यानिमित्त त्यांचा आणि तांदळे कुटुंबांचा परिचय आणि छान गप्पा झाल्या.
जात धर्म न बघता केवळ माणूसकी आणि प्रामाणिकपणा या तत्त्वावर सर्वांना प्रेमाने सोबत घेऊन पुढे जात असलेल्या या घराची दारे सर्वांसाठी कायम खुली आहेत.
तर महात्मा गांधी असे अनेक ठिकाणी विचारांनी जिवंत आहेत आपल्याला गरज आहे ती सर्वांना एकमेकांशी जोडण्याची..
लिहतना काही चुकले असेल तर क्षमस्व...
संकेत मुनोत
#भेटीगाठी




Comment, Share ,Follow and Subscribe.