MIT, औरंगाबाद येथे "सोशल मीडियाचा चांगला वापर कसा करावा" या विषयावरील व्याख्यानासाठी गेलो होतो तेव्हा सोशल मीडियावर जुळलेल्या पण प्रत्यक्ष कधीही न भेटलेल्या लोकांना ही भेटून येऊ म्हटले. दुसऱ्या दिवशी काहींना भेटून पुणे रिटर्न येणार होतो पण अजून एक दिवस राहावे लागले कारण खूप प्रेमळ लोक येथे भेटले.आज त्यातील #तांदळे कुटुंब पाहूया
जस आठवतय तसे तोडके मोडके लिहतो.
व्याख्यानाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी संजीवनी तांदळे मॅमचा यांचा नाश्ता करण्यास येताय ना? असा फोन आला. मी त्यांना म्हटल आपण नक्की भेटूया, पण नाश्ता नाही करू शकणार त्यासाठी क्षमस्व. कारण नाश्तासाठी सुबोध सरांकडे चाललो आहे, त्यांनी काल रात्रीच आजचे निमंत्रण दिले आहे.तर त्या हसत म्हणाल्या "तुम्ही माझ्याच घरी येत आहात, सुबोध माझा मुलगा आहे.
"

नाश्त्याला गेलो तर सगळ्या कुटुंबीयांशी मस्त गप्पा झाल्या.
संजीवनी तांदळे मॅम उद्योजक असून त्यांनी गेल्या 32 वर्षापासून हॉटेल व्यवसायात मोलाचे योगदान दिले आहे. एकहाती व्यवसाय सांभाळून महिलांसाठी एका नव्या व्यवसायाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली आहे. "साईकृपा लॉज" च्या रुपात अत्यंत मोकळे आणि घरगुती वातावरण टिकवले जाते. महीनों महीने घरापासून लांब राहून काम करणार्या सर्वांसाठी हे एक सुरक्षित वातावरणातील ठिकाण त्यांनी निर्माण केले आहे. हॉटेल व्यवसायातील चांगले वाईट आणि थरारक असे अनेक अनुभव यांचा खजिनाच त्यांच्या कडून ऐकायला मिळेल.
विशेष म्हणजे त्यांचा आणि Adv. फुलचंद तांदळे सरांचा 42 वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह झाला आहे ज्यासाठी त्यांनी बराच संघर्ष केला होता. त्यांच्या घरातून कडक विरोध असतांना एकमेकांना साथ देऊन, एकमेकांसाठी खंबीर उभे राहून संसार फुलवला.
Dr. Shubhangi Tandale-Palwade या स्त्री रोग तज्ज्ञ असुन त्या पलाश maternity व IVF हॉस्पिटल येथे कार्यरत असतात. गांधीविचारांबद्दल आग्रही भूमिका हीच आज त्यांची ओळख आहे. त्यांना वाचनाची आवड होतीच पण महात्मा गांधी आंतररारष्ट्रीय विद्यापीठ सेवाग्राम, वर्धा येथे एमबीबीएस ला प्रवेश घेताना प्रवेश परीक्षेत (CET exam) एक पेपर महात्मा गांधी वर होता तेव्हा त्या वाचनाने गांधीजी बद्दल अधिक आदर निर्माण झाला. त्यांनी याबद्दल कार्य ही सुरू केले आहे. (अश्या परीक्षा ठिकठिकाणी घ्यायला हव्यात मागच्या वर्षी वर्धा येथे मित्र सुयोग त्याच्या घरी जेवणास घेऊन गेला तेव्हा माहित पडले की त्याच्या पत्नीही हीच entrance परीक्षा देतांना गांधी विचारांकडे आकर्षित झाल्या आणि आजही डॉक्टर म्हणून कार्य करताना त्या गांधी विचारांचे तत्व जपत असतात. एका सुखवस्तू व्यापारी घरात जन्म घेऊनही त्यांना जोडीदार हा इतर मुलींसारखा पैशांनी नव्हे तर मनाने श्रीमंत असलेला आणि समाजाबद्दल तळमळ असलेला हवा होता जो शोधताना खूप अडचण येत होती पण नंतर सुयोग चे स्थळ मित्राने सुचवले आणि या गांधी विचारांमुळे त्यांचे लग्न झाले त्यांची स्टोरीही लवकरच लिहणार आहे)
सुबोध तांदळे हे बांधकाम व्यावसायिक असून पुण्यात बाणेर सह औरंगाबाद येथे त्यांचे अनेक प्रकल्प सुरू आहेत. त्यांच्या पत्नी स्नेहाताई आर्किटेक्ट आहेत त्या सुद्धा घरच्या दोन्ही व्यवसायात चांगल्या सक्रिय आहेत आणि शुभांगी ताई सोबत गांधी विचाराबद्दल ही अनेक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतात.
आणि त्यांचाही आंतरजातीय विवाह दोन्ही घरच्या मान्यतेने झालेला आहे.
आई मुली पेक्षा कैक पटीने घट्ट विणलेल्या नात्याचा एक सुरेख बंध संजीवनी mam आणि स्नेहाताई यांनी निर्माण केला आहे.
यात विशेष बाब ही सुद्धा की त्यांच्या इथे जेवण बनवणारे आचारी व घरकामातील मदतनीस मुस्लिम सुद्धा आहेत ज्यावर त्यांच्या काही परिचितांनी विरोध केला पण महात्मा गांधी सारखेच निर्भयतेने तांदळे कुटुंब आपल्या तत्वावर ठाम राहिले. सर्वांचा घरातील वावर अतिशय मोकळा आहे.
त्यांच्या इथे नाश्ता एवढा फूल झाला की जेवण करण्यास पोटात जागाच राहिली नाही.
आमच्या फोटो सोबतच त्यांचे मॅनेजर दत्ता सपकाळ यांनीही फोटो काढला तेही माझे लेख वाचत असतात हे पाहून आनंद वाटला. खेड्यातील वातावरणातून येऊन गेल्या 22 वर्षापासून ते संजीवनी यांच्या मातृछत्रा खाली पत्नी व मुली सह परिवारातील सदस्य होऊन राहत आहेत. वैचारिक आणि सामाजिक कार्यात तांदळे परिवारासह उत्साहाने सहभागी होत असतात.
तेथून मला घेण्यासाठी माझे जेष्ठ मित्र माजी पोलीस अधिकारी प्रेमसागर चांद्रमोरे सर आले होते. यानिमित्त त्यांचा आणि तांदळे कुटुंबांचा परिचय आणि छान गप्पा झाल्या.
जात धर्म न बघता केवळ माणूसकी आणि प्रामाणिकपणा या तत्त्वावर सर्वांना प्रेमाने सोबत घेऊन पुढे जात असलेल्या या घराची दारे सर्वांसाठी कायम खुली आहेत.
तर महात्मा गांधी असे अनेक ठिकाणी विचारांनी जिवंत आहेत आपल्याला गरज आहे ती सर्वांना एकमेकांशी जोडण्याची..
लिहतना काही चुकले असेल तर क्षमस्व...
संकेत मुनोत
No comments:
Post a Comment