मी #अमरावती येथे येत असल्याचे समजल्यावर गुंजनताई गोळे यांचा फोन आला. त्यांनी त्याच दिवशी नागपूरला जाण्याऐवजी त्यांच्या साईनगर येथील निवासस्थानी राहून दुसऱ्या दिवशी जाण्याचे सुचवले. त्यामुळे तिथे राहून दुसऱ्या दिवशी पहाटे 5.30 वाजता तेथून नागपूरला ट्रेनने निघालो.
गुंजनताईशी संध्याकाळी भेट झाली. आम्ही अनेकदा फोनवर बोललो होतो. त्या पुण्यात आल्यावर भेटायचेही ठरले होते पण भेट कधी झाली नाही. आमच्या दोघांची ओळख झाली ती शेतीतज्ञ आणि जेष्ठ गांधीवादी मनोहर खकें काकांमुळे.
२०११ साली अमरावतीच्या राजकमल चौकात एक मनोरुग्ण गरोदर स्त्री अतिशय वाईट परिस्थीती मध्ये गुंजनताई गोळे यांना दिसून आली. मनोरुग्ण असूनही कुणाच्या तरी वासनेला ती शिकार झाली एव्हढी विकृत मानसिकता आपल्या आसपास आहे हा विचार त्यांना असह्य करून गेला. त्या महिलेला तेथून दवाखाण्यात नेऊन तिच्या डिलिव्हरी पर्यत सर्व जबाबदारी गुंजनताईने पार पाडली. त्यावेळी अनेक अडचणींना त्यांना समोर जावे लागले. तेव्हाच मनाशी एक गोष्ट पक्की केली कि अश्या घटना फक्त बघून, हळहळ व्यक्त करून नाही चालणार तर एक नैतिक, सामाजिक जबाबदारी म्हणून स्ततःपासून सुरूवात करून कृतीतून बदल घडवायचा. तब्बल एक दशकापूर्वी घडलेल्या या प्रसंगापासून घेतलेले सेवाव्रत आजपर्यंत निरंतर सुरू आहे. शेकडो निराधार, गरजू महिला, वंचित, HIV बाधीत अनाथ, मुले/मुली, बेवारस वृध्द यांच्या पुनर्वसनाचे शाश्वत कार्य आजवर करण्यात आले तेही कुठलीही सरकारी मदत नसताना. हे सर्व सेवाकार्य अधिक व्यापक स्वरूपात करण्यासाठी वुमन्स फाऊंडेशन, अमरावती या संस्थेची २०१५ साली स्थापना करण्यात आली.
अनाथ HIV बाधित मुले व मुली यांच्यासाठी गोकुळ आश्रम हा निवासी प्रकल्प सुरू करून त्यांना शैक्षणिक, वैद्यकीय, रोजगार, लग्न, इत्यादी सर्व प्रकारे मदत करून पुनर्वसन करणे हे यामार्फत सुरू आहे.
अनेक नवजात बाळांना स्वतःचे दुध पाजून 'दुध दान चळवळ' सुरू करून स्तनदा मातांना मार्गदर्शन व सहकार्य त्या करतात
शहरातील बेवारस मृतदेहांचा स्वखर्चातून अंतिमविधी करतात
कुमारी मातांच्या मनोबल वाढीसाठी कार्य तसेच त्यांना वैद्यकिय व कायदेशीर सर्व बाबींमध्ये मदत करून पुनर्वसन करण्याचे कार्य त्या करतात
तर अश्या गुंजन ताईंना आपणही कार्यात हातभार लावुया..
संकेत मुनोत
( फोटो - रुक्मिणी वल्लभ या रेस्टॉरंट मधला . गुंजनताई येथे जेवणास घेऊन गेल्या आणि तेथे सोल्याची भाजी, भाकरी, पुरणपोळी असे मस्त जेवण केले. )
अमरावती - गाठी भेटी
#अवलिया_माणसे
No comments:
Post a Comment