परवा सन्मित्र डॉ अमित शिंदे भेटण्यास आले होते. अनेक दिवसापासून भेटणे-भेटणे म्हणत होतो पण फायनली परवा भेट झाली.
डॉ.अमित स्त्रीरोगतज्ज्ञ असून संगमनेर मध्ये त्यांचे हॉस्पिटल आहे. आयुर्वेद महाविद्यालयात ते प्राध्यापकही आहेत.
फोनवर अनेकदा गप्पा व्हायच्या पण प्रत्यक्ष भेटून जास्त वेळ मनमोकळ्या गप्पा मारण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी. मागे #valentinewithGandhi कार्यक्रमात आले होते पण तेव्हा दोघेही गडबडीत होतो. काल कोल्ड कॉफी सोबत मोठी वैचारिक मेजवानी सुद्धा मिळाली.
कुरुंदकर , ओशो, गांधी आणि वेगवेगळ्या विषयावर छान विचारमंथन झाले. स्वामी विवेकानंद म्हणतात की एका विचारी माणसासोबत गप्पा मारणे म्हणजे अनेक पुस्तके वाचणे आहे त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला. लहानपणी वेळ होता आवड होती पण पुस्तक आणायची आर्थिक परिस्थिती नव्हती आता थोडी आर्थिक परिस्थिती झाली पण जबाबदाऱ्या आणि व्याप एवढे एवढ्या वाढल्या की पुस्तके आणून ही वाचायला वेळ मिळत नाही. पण मग अश्या विचारी व्यक्तीसोबत गप्पा म्हणजे खूप चांगले काम होते.
गांधी असो , ओशो असो वा अन्य कोणी आम्ही कोणाचेही भक्त नाही आणि त्यांच्यातही उणिवा होत्या यांची आम्हाला जाणीव आहे त्यामुळे खूप कमी जणांशी wavelength जुळते ती डॉ अमित शिंदेशी जुळाली. सगळेच खूप छान छान म्हणणारी गोल गोल वाटतात अमित सर तसे नाहीत विचार clear आहेत. म्हणाजे ओशो चे चांगले विचार discuss केले तसे त्यांनी मांडलेल्या अनेक
चुकीच्या गोष्टी ही आम्ही discuss केल्या.
विविध मासिकात अमित शिंदे सरांच्या कथा आणि कविता येत असतात,'पी सी ओ एस' हे त्यांचे वैद्यकीय मार्गदर्शन पर पुस्तक मागच्याच वर्षी प्रकाशित झाले आहे.
अहमदनगर मधील स्पर्धेत लोकांना भरपूर हसवणाऱ्या 'परफेक्ट बायको कशी शोधावी' याचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. या नाटकात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा मानवी नात्यांवर होणारा परिणाम आणि माणूस व यंत्र यांतील मिटत चाललेले अंतर हा आहे.विशेष बाब म्हणजे सुरवातीला प्रेक्षकांना भरपूर हसवणाऱ्या या नाटकाच्या दुसऱ्या भागात स्त्रियांना पुरातन काळापासून आत्तापर्यंत कसे यंत्र समजले जाते हे मनुस्मृती पासून अनेक ग्रंथांतील उतार्यासह सांगितले आहे.सोबत त्यांनी सध्याच्या व्यवस्थेवरही काही चिमटे काढले आहेत जसे की मुलगा जोडीदार शोधताना म्हणतो की "मला अंधभक्त पत्नी नको वगैरे"...पण याच कारणामुळे नाट्य समितीने या प्रेक्षकांची प्रचंड दाद मिळालेल्या नाटकाला एकही बक्षीस दिले नाही.
याच प्रमाणे 'मी पण नथुराम गोडसेच बोलतोय' आणि 'खेळ मांडियेला' या दोन्ही वास्तव दाखवणाऱ्या नाटकांवर ही असाच अन्याय झाला आहे.त्यांनाही प्रेक्षकांची चांगली दाद मिळून आणि कथानक चांगले असूनही एकही बक्षीस दिले गेले नाही.
कारण अर्थातच परीक्षक संघविचारी(RSS) आहेत त्यांना हे वास्तव विचार आणि सत्य कसे पचेल?परिक्षकांची फेसबुक वॉल जरी चाळून पाहिली तर कारण लगेच लक्षात येईल.
असो हे नाटक जर कोणी व्यावसायिक किंवा प्रायोगिक रंगभूमीवर करणार असेल तर त्यासाठी हवी ती सर्व मदत पुरविण्याची डॉ अमित यांची तयारी आहे. त्या नाटकातील काही भागाची लिंक कमेंट मध्ये देत आहे नक्की पहा.
No comments:
Post a Comment