*पुण्यातील अनेक डॉक्टरांच्या पर्यंत गांधीविचार* पोहोचवण्याची काल संधी मिळाली. 👩🏻⚕👨🏼⚕🥼🏥❤️❤️
माझे *Knowing Gandhi Doctors* मधील मित्र *डॉ देवेंद्र संचेती (कॅन्टोन्मेंट विधानसभा अध्यक्ष )* यांनी मला *राष्ट्रवादी डॉक्टर सेल* च्या *“वॉक अँड टॉक “ सोबत “थिंक टॅंक“* या उपक्रमात डॉक्टरांशी गांधीजी वर *संवाद*🎙️ साधण्यासाठी बोलवले होते.
सध्या देशात *जात, धर्म आणि वेगवेगळ्या गोष्टींचे कट्टर गट निर्माण होऊन द्वेष वाढत* आहे. जो तो आमचा महामानव आणि आमची जात कशी श्रेष्ठ याची स्पर्धा करत आहे. यातून *संघर्ष* होऊन *देश तुटण्याची* शक्यता निर्माण झाली आहे. याला उपाय म्हणजे *पूर्ण देशाला प्रेमाने जोडणारे स्वतः च्या पाठीमागे कुठलीही जात, धर्म नसणारे महात्मा गांधीचे विचार पुन्हा मना मनात पोहोचवणे.❤️❤️*
पण वेगवेगळ्या समाज माध्यमातून एवढा *द्वेष त्यांच्याबद्दल पसरवला जातो* की *सत्य समोर येतच नाही*.त्यामुळे *ते गैरसमज दूर करत त्यांचे विचार आज समाजात प्रेम आणि संवाद वाढवण्यासाठी कसे आवश्यक आहेत* हे मी मांडले. यात *माझे आवडते म्हणजे प्रश्र्नोत्तरांचे सत्र ही छान झाले , खूप चांगले प्रश्न* आले. कार्यक्रमाच्या समारोपात *सर्वांना पंचसूत्रीची शपथ घेतली आणि शेवटी सर्वांना महात्मा गांधीजींची पुस्तके आणि जयहिंद पत्रके देऊन चळवळ जॉईन करण्याचे आवाहन केले.*
यात *डॉ सुनील जगताप प्रदेशाध्यक्ष रा. डॉ. सेल महाराष्ट्र राज्य, डॉ शशिकांत कदम पुणे शहराध्यक्ष रा. डॉ. सेल, डॉ राहुल सूर्यवंशी , डॉ राजेश साठे , डॉ हेमंत तुसे, डॉ राजश्री पोखरण ,डॉ रणजीत निकम, डॉ अनुपमा गायकवाड, डॉ देवेंद्र संचेती, डॉ संगीता माने, डॉ फैज मणियार, डॉ धनंजय देशमुख, डॉ विजयसिंह पाटील, डॉ ज्योती देवरे, डॉ सारिका परदेशी, डॉ मृणाल जमदाडे श्रीमती कमल ननावरे* आदी उपस्थित होते. 👩🏻⚕
(खरतर नागपूर ते पुणे तिकीट confirm न झाल्याने ट्रेन मध्ये सीट खाली झोपून प्रवास करावा लागला. ज्यात तेथील थंडी मुळे सर्दी खोकला वगैरे झाले होते पण या सर्व डॉक्टर्स सोबत सकाळी सकाळी चालल्याने सर्दी निघून गेली😊. )
संकेत मुनोत
8668975178



.jpg)



No comments:
Post a Comment