AddThis code

Thursday, November 23, 2023

आजारी पडल्यावर कुठे admit व्हावे?



तुमचा Health Insurance ( Mediclaim) कुठल्याही कंपनीचा असला तरी admit होताना शक्यतो नेटवर्क हॉस्पिटल्सला प्राथमिकता द्या. कारण नेटवर्क हॉस्पिटल मध्ये तुम्हाला कुठलीही मोठी प्रोसेस करावी लागत नाही. फक्त पॉलिसी नंबर दिला की पुढची प्रक्रिया हॉस्पिटल आणि इन्शुरन्स कंपनी पाहून घेते. 
बहुतेक हॉस्पिटल्स मध्ये इन्शुरन्स डिपार्टमेंट असते ते insurance  कंपनीसोबत बोलतात आणि पुढची प्रक्रिया करून घेतात.
होय अगदीच emergency असेल किंवा नेटवर्क हॉस्पिटल मध्ये बेड्स च उपलब्ध नसतील तर त्यावेळी नॉन नेटवर्क हॉस्पिटल मध्ये admit होण्यास हरकत नाही. 
कॅशलेस सुविधा असल्याने आपल्याला हॉस्पिटल मध्ये  पैसे भरण्याची गरज पडत नाही.  
उदाहरणातूनच सांगतो-  मागच्याच आठवड्यात माझ्या एका क्लाएंट ला admit केले होते त्यांना 2,20,000 खर्च आला होता त्यातील 2,17,000 रुपये हॉस्पिटल ला  कंपनीने दिले. फक्त 3 हजार रुपये केस पेपर वगैरे चे लावले. आम्ही तेही हॉस्पिटल कडून discount करून घेतले. 
यात एक यादी Wellness Providers Hospitals ची पण असते ज्यात  आपण admit झालो तर कंपनीचं आपल्याला  रोज 1000-1500 रु किंवा अधिक पैसे देते.(Hospital Cash Benifit). यात कारण आपण admit झालो तर आपले काम बुडते आणि त्यादिवशी चा रोजगार बुडतो त्याबद्दल काही रक्कम ते आपल्या account मध्ये टाकतात . मागे एका मित्राला अश्या wellness provider Hospital मध्ये admit झाल्यामुळे 7 दिवसांचे 7 हजार रुपये मिळाले शिवाय हॉस्पिटलचे  बिलही जे १३ लाख होते ते  त्याला भरावे लागले नाही.
केस पेपर, Hand gloves आणि इतर काही गोष्टी ज्या पूर्वी non consumables पकडुन कव्हर होत नव्हत्या त्याही आज काही पॉलिसी मध्ये कव्हर होतात. शिवाय OPD  वगैरे cover होत नव्हते तेही काही पॉलिसी मध्ये cover होते. 

आरोग्य विमा ( Health Insurance) ही अन्न-वस्त्र-निवारा यांच्या एवढीच अत्यावश्यक गोष्ट आहे आणि जर तो नसेल तर आपले दिवाळे निघू शकते आणि पूर्ण कुटुंबाची आणि आपल्या सगळ्स्वया स्वप्नांची वाताहात होऊ शकते.

पण अनेक जण हे घेताना काळजीपूर्वक निवड करत नाहीत उगीच घ्यायचा म्हणून online जाहिरातीला बळी पडून किंवा कुणा मित्रा नातेवाईकांच्या pressure ला बळी पडून   घ्यायचा म्हणून घेतात पण तो घेताना सर्व गोष्टी व्यवस्थित समजून घ्यायला हव्यात. आणि तोही गुगल किंवा youtube वर नव्हे. 
ज्या गोष्टीत सेवेची गरज असते त्या कधीही online sites वरून घेऊ नयेत. उदाहरण सांगतो मध्यंतरी मला डाव्या ओठाच्या किनार्यावर ulcer झाला होता. मी काय झाले म्हणून google वर serach केले तर ते पार  cancer etc सांगू लागले . मग डॉक्टर मित्राला call केला तर त्याने लगेच उपाय केला . हेच तुम्ही online policy  घेतना होऊ शकते   त्यामुळे याबद्दल कॉल किंवा मेसेज करा आणि वेळ घेऊन सगळ्या गोष्टी व्यवस्थित जाणून घ्या . 

म्हणजे मी  तर policy  देण्यापूर्वी आणि दिल्यानंतरही एक-दीड तास त्यातील महत्वाच्या गोष्टी समजवण्याचे सेशन घेतो शिवाय ज्यांना गरज नाही त्यांना नाही सुद्धा सांगतो.म्हणजे  4 वर्षापूर्वीची गोष्ट माझे एक डॉक्टर मित्र त्यांच्या वडिलांचा आरोग्य विमा माझ्याकडुन घेणार होते वय 72 असल्याने premium पण मोठा म्हणजे  75 हजार वगैरे येत होता चांगल्या पॉलिसी साठी . तेच मला एक धार्मिक स्कीम कमी खर्चात होती ती माहित होती याबाबत मी त्यांना माझ्याकडुन आरोग्य विमा न घेता तिथून घ्यायला सांगितले. काही जण म्हणाले की clients असे सोडायचे नाहीत  वगैरे पण मी सांगितले की मी कुठल्याही ग्राहकाला काही देताना स्वतःला त्यांच्या जागी ठेवून पाहतो  माझ्या वडिलांसाठी जे करेन तेच त्यांच्यासाठी. आज 4 वर्षानंतर त्या मित्राने मला त्यांच्या कुटुंबाचे आर्थिक नियोजन करण्याची सेवेची संधी दिली ज्यात त्यांनी दोघांचा  Retirement and Pension चे  palnning करून घेतले.  
तर यानिमित्त  सांगायचे हेच होते की यात प्रामाणिकता खूप महत्वाची. 

इन्शुरन्स बाबत एक गोष्ट कायम लक्षात ठेवा . हे फ्रिज, वॉशिंग मशीन, मोबाईल यांच्या सारखे नाही की आज नाही उद्या घेईल पुढच्या महिन्यात घेईल. जेव्हा लक्षात येईल तेव्हा लगेच हे घ्यायला हवे. आपण 1.5 लाख चा I phone घेतला तर त्याला स्क्रीनगार्ड लावताना पुढच्या महिन्यात वगैरे म्हणतो का? नाही ना कारण आपल्याला माहीत असते की फुटला तर लाखो खर्च येईल तर हे शरीर तर कोट्यवधी रुपयांचे आहे. कोरोना मध्ये लंग transplant चेच 55 लाख रुपये घेत होते इतर अवयवांचे किती त्याचा विचार करा. त्यामुळे हे अवयव चांगले असतानाच आपण health insurance काढायला हवा. 

आत्तापर्यंत सामाजिक विषयांवर लिहित होतो पण आर्थिक नियोजन यावर आता अधिक लिहिणार आहे कारण एखाद्याचे आर्थिक नियोजन करून देणे हेही अधिक सामजिक कार्यच आहे .आणि यात प्रामाणिक सल्लागाराची मोठी कमतरता आहे. 

अधिक माहिती साठी कॉल करा, सल्ला विनामुल्य आहे. 
आपली याबाबत भारतभर  सेवा देत आहोत. 

संकेत मुनोत
Financial planner and Insurance Advisor
Honest Advise best service 
8668975178

Comment, Share ,Follow and Subscribe.

Thursday, November 16, 2023

दीपावली स्नेहभेट सोहळ्यासाठी पिंपरी चिंचवड मधून प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रण

दीपावली स्नेहभेट सोहळ्यासाठी काल पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रण मिळाले. दिवाळी फराळ, नाश्ता आणि त्यानंतर 2 प्रमुख अतिथी चे मार्गदर्शन असा कार्यक्रम होता.
निवृत्त न्यायाधीश बी जी कोळसे पाटील यांना बऱ्याच दिवसापासून भेटायची इच्छा होती पण असे सोबत व्यासपीठ शेयर करता येईल असे वाटले नव्हते.

आशिया खंडातील सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका असे PCMC ( Pimpri chinchwad Municipal corporation ) बद्दल ऐकून आहे. इकडचे रस्ते आणि इतर अनेक गोष्टी अनुकरण करण्यासारख्या आहेत. 
पिंपरी चिंचवड शहराशी माझे जवळचे नाते आहे. तसे माझं बालपण वगैरे सगळे पुण्यात गेले असले तरी माझे बी फार्मसी इथे निगडीत झाले त्यानंतर  तळवडे IT park आणि pune IT park मध्ये जी नोकरी केली तेही याच हद्दीत येतात आणि माझ्या LIC चे हेड ऑफिस पण PCMC मध्येच येते. सध्या PF वरील name correction निमित्त ज्या PF office मध्ये हेलपाटे मारावे लागले तेही आकुर्डी म्हणजे PCMC मध्येच होते. यापूर्वी बी आर माडगूळकर काकांनी मोरवाडी जेष्ठ नागरिक संघातर्फे  2021 आणि 2022 मध्ये 2 व्याख्याने घेतली आणि हे तिसरे.
कामगार नेते आणि पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष कैलास कदम यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मा. नरेंद्र बनसोडे यांच्यामुळे हे शक्य झाले. पुण्यातील Knowing Gandhi Global Friends च्या बहुतेक सर्व उपक्रमांना ते वेळोवेळी उपस्थित राहून चांगले योगदान देत असतात. 

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सुरू करण्यात आलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी सर्वांशी छान संवाद झाला. 
यात एक गोष्ट मोठी ही झाली की प्रेक्षकांच्या मध्ये सन्मित्र चैतन्य सावळे पण बसले होते. ते पूर्वी कट्टर भक्त , गांधीविरोधक आणि हिंसेचे समर्थक होते. पण माझा लोकमत मधील लेख वाचून ते बदलले आणि आज ते खूप चांगल्या प्रकारे facts मांडत असतात मी तर म्हणेल ते माझ्या पेक्षाही ते अधिक सक्रिय असतात. 
गांधी, बोस आणि भगतसिंग यांचे मार्ग जरी वेगवेगळे असले तरी ध्येय एकच होते स्वातंत्र्य आणि तेही सर्व समावेशक स्वातंत्र्य. तिघांनी हिंदुराष्ट्र, इस्लामिक राष्ट्र किंवा अश्या प्रकारच्या धर्मावर आधारित कल्पनेला तीव्र विरोध केला. आज देश जात, धर्म, वर्ग यात वाटला जात असताना गांधी विचारच आहे जो सर्वांना भेद विसरून एकत्र आणू शकतो.

माझ्या व्याख्यानाच्या शेवटी नेहमीप्रमाणे इथेही सर्वांकडून पंचसूत्रीचा संकल्प घेतला. 
1. कुठले व्यसन करणार नाही
2. कुणाला नात्यात फसवणार नाही
3.जात, धर्म, वर्ग,रंग , लिंग, उंची यावरून भेदभाव करणार नाही.
4.हिंसक दंगलीत सहभागी होणार नाही 
5.सत्यता पडताळल्या शिवाय कुठलाही मेसेज पुढे सांगणार नाही फॉरवर्ड करणार नाही अशी शपथ शेवटी सर्वांना दिली. 

यात शेवटी हे पण सांगितले की फक्त छान छान म्हणून चालत नाही तर आपण एकमेकांना नोकरी, व्यवसाय ई. मध्ये मदत ही केली पाहिजे. कारण चळवळीत कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला पण कुटुंब असते आणि आपण त्याला व्यवसाय नोकरी याबाबत मदत केली तर तो किंवा ती ते काम अधिक जोमाने करू शकेल. याबाबत संघाकडून गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. माझा मित्र निलेश शिंगे याचा एक मित्र सॉफ्टवेअर इंजिनीयर होता त्याने मध्यंतरी ब्रेक घेऊन 3 वर्षे संघ प्रचारक झाला तर त्याच्या अर्थार्जनाची पूर्ण जबाबदारी संघाने घेतलीच शिवाय जेव्हा त्याला 3 वर्षानंतर पुन्हा स्वतःचे फील्ड जॉईन करायचे होते तर ओळखीतून IT कंपनीत चांगल्या पदावर नोकरी ही लावून दिली. अजून एक उदाहरण व्यवसायाचे. आमच्या एका समविचारी संघटने च्या मीटिंग ला 2 तरुण मित्र यायचे जे घरातील वस्तू repair करण्याचे काम करायचे. त्यांना तिथे व्यवसाय मिळू शकला नाही पण काही महिन्यांनी तिकडे जॉईन झाले आणि त्यांना तिथे महिन्याला किमान 15-20 घरातील कार्य मिळाले. गांधींनी पण मुख्य गोष्ट हीच केली होती खादी आणि वेगवेगळे ग्रामोद्योग यातून त्यांनी देशातील लाखो लोकांच्या रोजगाराची सोय केली होती. तर आपण पूर्ण वेळ जरी यात येऊ शकला नाहीत तरी चालेल पण जे यात पुढे होऊन कार्य करत आहेत त्यांना या प्रकारे सेवेची संधी द्या. लोक पूर्वी ब्रिटिशांच्या कडून कापड घ्यायचे ते बंद करून ते आपल्या स्वातंत्र्य सैनिकांकडून खादी घेऊ लागले त्यामुळे ते अधिक जोमाने काम करू शकले. आज खादी नसली तरी इतर सेवा आहेत त्यात त्यांना प्राथमिकता द्या. उदाहरणार्थ आपल्या पैकी कुणाला स्टेशनरी ची गरज तर *** या कार्यकर्त्याला प्राथमिकता द्या. आपले किंवा आपल्या मित्र परिवारातील कोणाचेही आर्थिक नियोजन करण्यासाठी , पॉलिसी काढण्यासाठी मला सेवेची संधी द्या आपली सेवा देशभर आहे. Child education plan, जीवनसाथी प्लॅन, कन्यादान, पेन्शन किंवा retirement plan, health insurance, life insurance, term insurance याबाबत कुठलेही कार्य असल्यास मला आपल्या सेवेची संधी द्या. आपले नाव माझ्या client च्या यादीत add होणे ही माझ्यासाठी मोठी संधी असेल. प्रामाणिक सल्ला आणि उत्तम सेवा हे आपले मुख्य वैशिष्ट्य आहे. 

यावेळी डॉ. Mukhtar Mulla सर खास भेटण्यास आले होते .सन्मित्र दाहर मुजावर आणि मुख्तार सरांशी बराच वेळ छान गप्पा झाल्या. 
याप्रसंगी माजी महापौर कविचंद भाट, जेष्ठ महिला नेत्या श्यामला सोनवणे, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, भरत वाल्हेकर, उपाध्यक्ष सोमनाथ शेळके, छायावती देसले, अर्चना राऊत, अबुबकर लांडगे, काँग्रेस सेवा दलाचे शहराध्यक्ष वीरेंद्र गायकवाड, चिंचवड ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष माऊली मलशेट्टी, भोसरी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष विठ्ठल शिंदे, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष स्वप्निल बनसोडे, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉक्टर मनीषा गरुड, कौशल्य विकास विभागाचे अध्यक्ष रवी नांगरे, स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष विशाल सरोदे, सुप्रिया पोहरे, ग्राहक विभागाचे अध्यक्ष जेवियर अँथनी, इस्माईल संगम, भास्कर नारखेडे, उमेश बनसोडे, योगेश बहिरट, सुधीर गायकवाड, रवी कांबळे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 
मित्रांनो द्वेष करणे सोप्पे असले तरी प्रेम करणे healthy आहे त्यामुळे प्रेम पसरवत राहूया. 
माना की अंधेरा घना है पर दिया जलाना कहा मना है?

 संकेत मुनोत
8668975178

Comment, Share ,Follow and Subscribe.
























Saturday, September 30, 2023

डॉ. Prasannakumar Bamb आणि त्यांचा मुलगा Oshin Bamb , आर्वी , वर्धा यांची घरी सदिच्छा भेट

काल सन्मित्र डॉ. Prasannakumar Bamb आणि त्यांचा मुलगा Oshin Bamb , आर्वी , वर्धा यांनी घरी सदिच्छा भेट दिली. Oshin ने माझे कुठले तरी व्याख्यान ऑनलाईन ऐकले तेव्हा त्याच्याशी ओळख झाली त्यानंतर त्याने त्याच्या वडिलांना पण त्यात जोडले 
 2 वर्षापूर्वी मला नागपूर आणि यवतमाळ येथून व्याख्यान देण्यास निमंत्रण मिळाले तेव्हा डॉ. प्रसन्नकुमार मला खास त्यांच्या घरी घेऊन गेले आणि त्यांनी आर्वी, कोंढणपुर , पवनार आश्रम आणि विविध गोष्टी दाखवल्या. मागच्या वर्षी सुद्धा पुन्हा आर्वी येथे व्याख्यानास गेलो तर तेव्हा ही आयोजक दुसरे असले तरी ते आग्रहाने त्यांच्या घरी घेऊन गेले. आणि त्यांच्या घरी खूप छान पाहुणचार केला. 

डॉ. प्रसन्नकुमार हे पशू वैद्यकीय चिकित्सक अधिकारी होते. त्यांनी सरकारी नोकरी असूनही Retirement च्या 5 वर्षापूर्वीच VRS घेतली. ते गांधी विनोबा या दोन्ही वर कार्य करत आहेत. "याला जीवन ऐसे नाव", "मनाचिये द्वारी उभा क्षणभरी", "गौलाऊ विदर्भाचे गौरव" अशी त्यांची 3 पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

विविध विषयांवर त्यांनी लेख लिहले असून विदर्भात विविध ठिकाणी त्यांची संत साहित्य आणि समाजप्रबोधनपर व्याख्याने आयोजित झाली आहेत. 

ग्रामीण भागातील महिलांच्यासाठी त्यांनी 20 पेक्षा जास्त बचत गट काढले आहेत. अनेक गोशाला आणि पांजरपोळ मध्ये ते मोफत सेवा देतात.
त्यांचे वडील हे पहूर दाभा , यवतमाळ येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या फॉरवर्ड ब्लॉक पार्टी चे काम करायचे आणि जवळपास 10 वर्षे सरपंच होते. जांबुवंतराव धोटे सारख्या नेत्यांशी त्यांचे मैत्रीचे नाते होते.
ओशिन डेक्कन कॉलेज , पुणे येथे archeology मध्ये PHD करत आहे.Oshin पण अनेक सामजिक चळवळीत सक्रिय असून पुणे विद्यापीठ , फर्ग्युसन कॉलेज मध्ये visiting faculty आहे. तो आत्तापर्यंत बहुतेक सर्व परीक्षांत मेरिट मध्ये आला असून CET NET qualified आहे. 
डॉ. प्रसन्न कुमार बंब माझे Financial plannning चे client ही आहेत.
त्यांना माझे काम आवडते आणि फोन केल्यावर पण दरवेळी आपको टाईम है ना? माफ किजिये मैने आपका इतना समय लिया वगैरे ते खूप विनम्रतेने म्हणतात हे त्यांचे मोठेपण आहे. 
Oshin ने भेटीत एक महत्वाची गोष्ट सांगितली. सम्राट अशोकाचे एवढ्या मोठ्या राष्ट्राचा सम्राट  आणि बौद्ध धर्माचा अनुयायी आणि प्रसारक असूनही त्याने कधी हे राष्ट्र बौद्ध राष्ट्र व्हावे वगैरे म्हटले नाही. उलट त्याने शिलालेखात सर्वांचा आदर करण्यात यावा असे लिहले आहे.
असो अशी प्रेमळ माणसे भेटली की हृदयातील प्रेम अधिक वृध्दींगत होते.❤️ प्रेम पसरवत राहूया
संकेत मुनोत


Comment, Share ,Follow and Subscribe.

Actor , Director शार्दुल सराफ ग्रेट भेट

लेखक, दिग्दर्शक , अभिनेते असलेले मित्र शार्दुल सराफ यांच्याशी परवा भेट झाली.खर तर ते स्पेशल भेटण्यास आले त्याबद्दल त्यांचे आभार.  आमची ही पहिलीच भेट होती ज्यात जवळपास 4-5 तास मस्त चर्चा झाली. 

 खर भेटण्यापुर्वी ते एवढे काही करतात हे माहीत नव्हते. समविचारी मित्र आहेत एवढेच माहीत होते. एकमेकांचे लेख वाचणे वगैरे गोष्टी होत्याच पण यात अजून विशेष म्हणजे 2 वर्षापूर्वी ते माझ्यासाठी लग्नाचे स्थळ सुद्धा शोधत होते...😊

असो त्यानिमित्त त्यांचा थोडक्यात परिचय पाहूया

प्रायोगिक पातळीवर रात्रंदिन आम्हां, जनक ह्या पारितोषिक विजेत्या नाटकांचे ते लेखक - दिग्दर्शक आहेत

वळू, गाभरीचा पाऊस, सलाम, होम स्वीट होम ह्या चित्रपटांचे प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम केलं आहे

कमला, दुर्वा, पसंत आहे मुलगी, लव्ह लग्न लोच्या, अंजली, जीव माझा गुंतला, शाब्बास सूनबाई अशा मालिकांचे लेखक आहेत

तर आमिर खान ह्यांच्या पाणी फाऊंडेशन च्या ' तुफान आलंया ' ह्या कार्यक्रमाचे ते लेखक - दिग्दर्शक आहेत. 

आमची ओळख गांधी विचारांच्या मुळे... शार्दुल पण पूर्वी गांधीजींची चेष्टा उडवायचे पण गांधीजींची आत्मकथा वाचली आणि त्यातून नवीन दृष्टी त्याला मिळाली असे ते म्हणाले...

 गांधीविचार अजून प्रभावी पद्धतीने लोकांच्या पर्यंत कसे पोहोचवता येतील याबाबत थोडे नियोजन ही या भेटीत केले.

 शार्दुल ने आरे तुरे बोलायला सांगितले ते पण अजून बोलू शकलो नाही पण प्रयत्न  सुरू आहेत.

संकेत मुनोत


Comment, Share ,Follow and Subscribe.

Sunday, September 24, 2023

गांधी जन्मले तेव्हा शून्य होते आणि गेले तेव्हाही शून्य होते..

आत्ता कोणी तरी गणितात महापुरुषांच्या बद्दल बोलत होते त्यावरून  सहज सुचले...
महात्मा गांधी हे जन्मले तेव्हा #शून्य होते ... ...आणि गेले तेव्हा आणि त्यापूर्वी अनेक दशके शून्यच होते...कुठले मंत्रीपद नाही, कुठली संपत्ती नाही की इतर काही नाही ...

पण ज्याला ते जुळले गेले त्यांचे त्यांनी त्या-त्या व्यक्तीच्या क्षमतेनुसार त्यातून  दशक, , शतक, सहस्त्र आणि बरेच काही घडवले...

अगदी तो चांगला विरोधक असला तर त्याचेही त्यांनी शतक केले ..( स्वतःच्या निवडून आलेल्या लोकांना राजीनामे द्यायला लावून त्यांनी विरोधकातील लोकांना ते पद द्यायला लागले)

ते मौलाना आझाद असो, सरदार पटेल असो , विनोबा असो किंवा या देशातील लाखो सत्याग्रही असो ..सर्वच या शून्याशी जुळून त्यांच्यातून शतक, सहस्त्र, लक्ष झाले...  

पण ज्यांना लोकांना एककात ठेवून फक्त स्वतःलाच दशक, शतक करायचे होते, त्या विषमतावादी लोकांचे गांधीजीमुळे धाबे दणाणले..इतर सगळेच दशक , शतक झाले तर आम्ही कोणाला गुलाम करणार ?..मग असे लोक गांधींना पराभूत करण्यासाठी त्यांना  विभागण्याचे प्रयत्न करू लागले पण या शुन्याला भागच जात नाही म्हणून निराश झाले..
मग शेवटी त्यांनी या शून्यालाच संपवले पण ते हे विसरले की तोपर्यंत हा शून्य विचारांतून , कृतीतून हजारो ठिकाणी पोहोचला होता...त्याला जोडण्यासाठी लोकांना आता फक्त त्याच्या देहाची गरज नव्हती ...

त्या शून्याशी कधी आफ्रिकेत मंडेलानी स्वतः ला जोडून घेऊन वर्णभेदाचा लढा दिला. अमेरिकेत मार्टिन ल्युथर किंग ते बराक ओबामा ने घेतला तर पाकिस्तानात मलाला आणि असंख्य जणांनी या शुन्याशी जोडून घेऊन  त्यांचे दशक, लक्ष केले...
त्यामुळेच आईनस्टाईन सारखा शास्त्रज्ञ अश्याच शून्याने जगाचे भले होणार असल्याचे गणित मांडतो 

तर जो या शून्याचा नीट अभ्यास करतो, समजून घेतो, आचरणात आणतो तो त्याला जोडले होऊन त्यातून दशक, शतक, सहस्त्र...वगैरे बनवतो...


..
आजही या शून्याचा स्वार्थी लोकांना त्रास होतो.  मग तो संपवता येत नाही म्हणून ते त्या शून्याला बदनाम करतात जेणेकरून लोकांनी शून्याला जोडलेच जाऊ नये...
भारतपूरते त्यांचे प्रयत्न काही भागात यशस्वीही होतात पण परदेशात गेल्यावर त्यांनाही  स्वतःला शून्याचा अनुयायीच सांगावे लागते...
.आपणच ठरवायचे त्या शून्याला जोडून आपले दशक, शतक, सहस्त्र..वगैरे  करायचे की की चुकीच्या गोष्टी ऐकून त्याला  भागून स्वतःचे नुकसान करायचे...

संकेत मुनोत 
( फोटो - शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांच्या घरातला त्यांच्या घरात दोनच फोटो होते एक गांधीजींचा आणि दुसरा...)

Comment, Share ,Follow and Subscribe.

Monday, September 11, 2023

खासदार कुमार केतकर, अभिनेते अमोल पालेकर, जेष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांच्या सोबत व्यासपीठ शेयर करायला मिळणे माझ्यासाठी मोठी संधी होती

परवा 'भारत जोडो यात्रा' या एस. ए. जोशी लिखित पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी  विचार मांडण्याची संधी मिळाली. 
खासदार कुमार केतकर, अभिनेते अमोल पालेकर, मुलाखतकार राजू परुळेकर, नेहरुवियन प्रतिक पाटील , प्रकाशक तांदळे मॅम यांच्या सोबत व्यासपीठ शेयर करायला मिळणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. सन्मित्र भाऊसाहेब अजबे यांनी सूत्रसंचालन केले तर न्यू एरा चे आशिष शिंदे  आणि अजून काही मान्यवरांनी पण मनोगते मांडली.

 काही दिवस सामजिक क्षेत्रातून ब्रेक घेतला होता,  खासदार कुमार केतकर सरांचा १ महिन्यापूर्वीच फोन आल्यामुळे या कार्यक्रमाला आलो. पण कार्यक्रमाने नवीन ऊर्जा मिळाली.
 काही दिवसांपासून वैयक्तिक अडचणीमुळे थोडा मानसिक ताणातून जात होतो पण कार्यक्रमाला आल्यावर जेव्हा विविध तरुण येऊन भेटले आणि सेल्फी काढताना बोलले की तुमचे काम आवडते, आम्हाला त्यात जॉईन करायचे आहे वगैरे तर त्याने ताण कमी होऊन आत्मविश्वास वाढला.
सध्या देश, राज्य, गाव, घर यात द्वेष, हिंसा वाढत असताना #प्रेम वाढवण्याची सर्वाधिक गरज आहे. 
द्वेष करणे सोप्पे असते पण #प्रेम करणे healthy असते.

प्रेमाचा संदेश पसरवत राहूया ❤️❤️❤️

संकेत मुनोत
8668975178
#NewEraPublication #BharatJodoYatra

Comment, Share ,Follow and Subscribe.
















Thursday, September 7, 2023

75 वर्षाचे तरुण मित्र मकबूल तांबोळी सर ग्रेट भेट

आपल्या जवळपास अनेक प्रेरणादायी लोक असतात पण आपल्याला माहीत नसतात त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे माझे 75 वर्षाचे तरुण मित्र मकबूल तांबोळी सर .
काल त्यांचा 75 वा वाढदिवस साजरा झाला त्यानिमित्त हा लेख.
तरुण यासाठी की ते गप्पा मारताना त्यांच्या अनुभवा बद्दल बोलतातच पण आत्ता आमच्या पिढी समोर असलेल्या चॅलेंजेसचाही ते विचार करतात . आम्ही महिन्यातून एकदा एक तास सहज बोलतो..
ते माझे health insurance Client पण आहेत. त्यांची
स्वतःची आणि त्यांच्या जीवनसाथी शकीला मॅम यांची पॉलिसी त्यांनी माझ्याकडून काढलीच पण त्यांचा मुलगा असीम आणि मुलगी आस्मा यांनांही माझ्या कडून पॉलिसी घेण्यास सुचवले. सोबत त्यांचे एक मित्र नार्वेकर (ex Joint commissioner, Sales tax) त्यांनाही सुचवले. त्यामुळे नार्वेकर सर आणि नार्वेकर यांचे मित्र डॉ पाटील यांच्याशीही माझी छान मैत्री झाली. अर्थात नार्वेकर सरांनी आणि पाटील सरांनी पूर्वी पूर्ण गोष्टी जाणून घेतल्या , त्यानंतरही कोणी तरी त्यांना जास्त डिस्काउंट देऊ केला पण तिथे न जाता माझ्याकडुनच policy घेतली. तर मला यानिमित्त हे सांगायचे होते गांधी जसे फक्त बोलत नव्हते तर खादी आणि अन्य माध्यमातून रोजगार देऊन सक्षम ही बनवत होते ते सरांनी प्रत्यक्षात अमलात आणले .
तर यानिमित्त सरांचा परिचय पाहूया
सरांचा जन्म पुण्यात मराठमोळ्या मुस्लिम गरीब कुटुंबात, फुलवाला चौक येथे 06 Sep 1948 रोजी गणेश चतुर्थी ला झाला .आणि काल 06 sep 2023 रोजी कृष्ण जन्माष्टमी ला 75 वर्षे पूर्तता झाली. बालपणात आसपास जैन मारवाडी, गुजराती, ख्रिश्चन, मराठी , मुस्लिम, सिंधी, तेलगू, सिंधी , शीख , कानडी असा संमिश्र जाती धर्माच्या वस्तीचा भाग होता.
त्यांनी Telco मध्ये 35 वर्षे नोकरी केली आहे.
ते देवभक्त होते, तळ्यातल्या गणपतीला ते रोज जात असत त्यामुळे एक मुस्लिम मुलगा जातोय त्याचे विशेष कौतुक होत असे. 1965 पासून काही वर्ष गणेश मंडळाचे अध्यक्षही होते. त्यांच्या मनात मात्र वेगवेगळे विचार घोळवत असत. त्यांनी सावरकरांचा मानवाचा देव आणि विश्वाचा देव हा लेख वाचला आणि ते नास्तिक झाले.
मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे ते 5-6 लोकांपैकी एक असे संस्थापक सदस्य होते आणि त्यात ते कार्यरत होते. त्यामुळे त्यांचा भाई वैद्य, निळू फुले, बाबा आढाव यांच्याशी ही जवळचा संबंध आला होता.
अभिनेते निळू फुले यांच्याशी त्यांचा 1970 पासून चांगली मैत्री होती आणि निळू भाऊ यांनी मकबूल सरांचा त्यांच्या बालमित्रांमध्ये समवेश केला होता.2003 ते 2009 या कालावधी मध्ये ते निळू भाऊंच्या सोबत संबंध महाराष्ट्रभर दौऱ्यात असत. महाराष्ट्र आणि देशभर च्या दौऱ्या मध्ये भाई वैद्य यांच्या सोबत ही असत. सुधाताई वर्दे आणि खासदार संभाजीराव काकडे यांच्याशीही त्यांचे खूप जवळचे संबंध होते.मकबूल सर राष्ट्र सेवा दल चे ट्रस्टी Treasurar होते त्याच बरोबर साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक आणि हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्युट याचेही ट्रस्टी होते.
अगदी वयाच्या 6 व्या -7 व्या वर्षापासून वाचनाची गोडी लागल्यामुळे विविध विषयांवरील त्यांचे वाचन अफाट आहे. त्यांचे विचार हे सुस्पष्ट आणि balanced आहेत.
आमची ओळख फेसबुकवरच झाली. सर माझे बहुतेक लेख वाचत आणि त्यावर प्रतिक्रिया देत असत. गांधी विचारातून समाजात प्रेम आणि संवाद वाढवणे हा आम्हाला जोडणारा दुवा.
2021 मध्ये एकदा स्वतः साठी आणि कॉलनी तील लोकांच्या साठी जांभळे विकत घेण्याच्या निमित्ताने त्यांनी मला त्यांच्या पाषाण येथील घरी बोलवले तेव्हा त्यांच्याशी पहिली प्रत्यक्ष भेट झाली. (Lock down मध्ये 2 महिने बहिणीने काही काळ जांभळाचा व्यवसाय सुरू केला होता त्याबद्दल मकबूल सरांनी फेसबुक वर वाचले आणि मला बोलवले). नंतर Wednesday कट्टा निम्मित गुडलक कॅफे, FC Road येथे भेटी होत असत.
काल त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक मान्यवरांशी भेट झाली ज्यात डॉ. बाबा आढाव, डॉ कुमार सप्तर्षी ,अन्वर राजन, रत्नाकर महाजन ,प्रशांत कोठडीया , मुक्ता पुणतांबेकर, संग्राम खोपडे , सुरेश खोपडे , यशोदा वाकणकर , संदीप बर्वे , मनीषा पाटील, संतोष म्हस्के, विकास देशपांडे, चंद्रकांत शेडगे, माणिक जोगदंड, संतोष पवार, पराग गायकवाड, सुकेश पासलकर आणि अनेक मान्यवर सहभागी झाले होते.
आपणही त्यांना फोन किंवा मेसेज करून सदिच्छा नक्की द्या.
त्यांचा संपर्क Makbul Tamboli - 7020509654
हा लेख लिहिण्याचा एक हेतू हाही आहे कि चांगल्या लोकांचे असे चरित्र पुढे न आल्याने लोकांच्या समोर चुकीचे दंगली घडवणारे लोक आदर्श म्हणून उभे केले जातात .
संकेत मुनोत
8668975178

2