AddThis code

Friday, August 25, 2023

बॅरिस्टर वीरचंद गांधी यांनि विश्वधर्म परिषदेत सांगितलेला अकबर बद्दलचा प्रेरणादायी प्रसंग

पोर्तुगिजांनी एकदा मुस्लिमांचे एक जहाज लुटले. जहाजावरच्या सर्वांना कैद केले. जहाजावर कुराणाच्याही प्रती होत्या त्या जप्त केल्या. किना-याला लागल्यावर पोर्तुगिजांनी कुराणाच्या प्रती कुत्र्यांच्या गळ्यात बांधून त्यांना पिटाळले. नंतर पोर्तुगीजांचे जहाज अकबर च्या सैन्याने पकडले. अकबरापर्यंत ही वार्ता गेली. त्याची आई संतापली. ती अकबराला म्हणाली. "तू बायबलची अशीच विटंबना कर!"
अकबर म्हणाला, "आई, कुराण श्रेष्ठच आहे. पण बायबलही त्याच्या जागेवर तेवढेच श्रेष्ठ आहे. बायबलची विटंबना करून मी त्या पोर्तुगिजांच्या अधम पातळीवर उतरू शकत नाही."
ही सम्राट अकबराबद्दल ची घटना *वीरचंद गांधीं* यांनी विश्व धर्म संसदेत सांगितली होती.
मागच्या वर्षी बॅरिस्टर वीरचंद गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने *इतिहास संशोधक संजय सोनवणी* सरांची मुलाखत घेतली त्यात त्यांनी सांगितलेली ही कथा आज पुन्हा आठवली.
(मुलाखतीची लिंक कमेंट मध्ये)
शिकागोला १८९३ साली ज्या धर्मपरिषदेत स्वामी विवेकानंद गेले होते त्याच धर्मपरिषदेत जैन धर्माचे तत्वज्ञान सांगायला जे अधिकृत रित्या उपस्थित होते, स्वामी विवेकानंदांच्या भाषणाप्रमाणेच ज्या गाजलेल्या भाषणामुळे अमेरिकेत अनेक व्यक्ती जैन धर्मात प्रविष्ट झाल्या, ज्यांचे अनेक भाषांवर प्रभुत्व होते, जे जागतीक धर्मांवर अधिकृतपने सातत्याने लिहित व भाषणे देत राहिले ते वीरचंद गांधी.
शिकागो परिषद आपल्याला स्वामी विवेकानंदांमुळेच माहित आहे. त्यांची जेवढी प्रसिद्धी भारतात केली गेली तेवढी वीरचंद गांधीं यांची केली गेली नाही. खेदाची गोष्ट म्हणजे बहुतेक जैन लोकांना ही ते माहीत नाहीत. वीरचंद गांधी यांच्या भाषणाने अमेरिकन तत्वज्ञांना प्रचंड प्रभावित केले होते हे आपल्याला माहित असले पाहिजे.
त्यांना अजून दोन वर्ष अमेरिकेतच थांबवून ठेवले गेले व त्यांच्या भाषणांवर केवळ लेख नव्हेत तर पुस्तकेही लिहिली गेली. त्यांची स्मारके ही अमेरिकन लोकांनी बांधली आहेत.
अमेरिकेतील त्यांच्या अन्यत्र झालेल्या व्याख्यानांमुळे अनेक अमेरिकन जैन धर्माच्या अभ्यासाकडे वळाले. भगवान महावीरांचा अहिंसावाद आजच्या जगाच्या शांततामय सौहार्दासाठी कसा उपयुक्त आहे हे त्यांनी अमेरिकेत दिलेल्या ५३५ व्याख्यानांतून सांगितले. त्यांचे चाहते हर्बर्ट वॉरेन यांनी जैन धर्म तर स्विकारलाच पण वीरचंद गांधींच्या भाषणांचे संकलन करून त्याचे पुस्तकही प्रकाशित केले.
वीरचंद गांधीं यांनी केवळ जैन धर्माची माहिती सांगितली नाही तर स्वामी विवेकानंद यांच्या भाषणावर आणि वैदिक धर्मावर जी टीका झाली ती खोडून काढली.
वीरचंदजींचे कार्य केवळ धर्म-तत्वज्ञानापुरते मर्यादित नव्हते. स्त्रीयांबद्दलचा त्यांचा दृष्टीकोण उदार होता. त्यांना आधुनिक शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी सोसायटी फॉर द एज्युकेशन ऑफ वुमेन इन इंडिया ही संस्थाही स्थापन केली आणि देशभर स्त्री-शिक्षणासाठी प्रयत्न केले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतही ते उतरले.
वीरचंद जसे स्वामी विवेकानंदचे मित्र होते, तसेच महात्मा गांधी यांनीही वीरचंद गांधींना ‘भावासारखे मित्र’ अशी उपमा दिली होती. अशा या भारतपुत्राचे 07 ऑगस्ट 1901 रोजी वयाच्या अवघ्या 37व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
आज देशात द्वेष प्रचंड वाढत आहे
दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश यांच्यासारख्या सामजिक कार्यकर्ता, पत्रकार, न्यायाधीश, विचारवंतांच्या हत्या करून "मेली काही कुत्री तर फरक काय पडतो"* असे अनेक समाजकंटक सामजिक माध्यमावर उघडपणे बोलत आहेत. महिलांवर अमानुष अत्याचार करणाऱ्या लोकांना सोडून देऊन मिठाई वाटली जात आहे*
कुठेही कोणी काही प्रश्न उपस्थित केला रे केला कि सरळ त्याला देशद्रोही ठरवत जा पाकिस्तान ला , जा अफगाणिस्तान ला, वगैरे म्हणत अन्न, वस्त्र, रोजगार, शिक्षण या मूळ गोष्टींकडे दुर्लक्ष केले जात आहे.
चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, बादशाह अकबर सारखे उत्तम प्रशासक याच देशात जन्मले का ? याची आज आठवण होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांकडे जेव्हा सामान्य रयत कोणाची अन्यायाबद्दल ची तक्रार घेऊन जात तेव्हा ते असे तर म्हणत नव्हते ना अरे त्या औरंगजेब किंवा इतर लोकांच्या राजांपेक्षा तर इथे बर आहे ना? नाही, ते किंवा वरील इतर राजे अस कधीच बोलत नव्हते ते वेळोवेळी शासन करत होते, रयतेच्या हिताची कामे करत होते.
सध्या जो धार्मिक, जातीय, वर्गीय द्वेष वाढतोय तो असाच वाढत राहिला तर देश राहणार नाही. त्यामुळे वीरचंद गांधी यांचे तत्वज्ञान अभ्यासण्याची आणि ते आचरणात आणण्याची आज खूप गरज आहे.
तर चला त्यांच्या जयंती निमित्त जगाकडे मैत्रीभावाने बघूया, द्वेष कमी करूया, प्रेम वाढवूया
संकेत मुनोत
२५ ऑगस्ट २०२१
चित्र- प्रतिकात्मक
Comment, Share ,Follow and Subscribe.


Tuesday, August 22, 2023

अजमेर , राजस्थान के राष्ट्रीय गांधीवादी स्नेहसंमेलन में संकेत मुनोत का वक्तव्य

फरवरी में अजमेर के 3 दिवसीय राष्ट्रीय गांधीवादी सम्मेलन का निमंत्रण संजय सिंह, सर, दिल्ली इन्होंने दोस्त श्रीनिवास के साथ भेजा था। देशभर से करीबन 150-200 गांधी विचार पे काम करने वाले लोग यहां आए हुए थे।
राजस्थान सरकारने गांधी विचार प्रचार प्रसार के लिए खास अहिंसा आणि शांती मंत्रालय शुरू किया है । गांधी विचार पहुंचाने के लिए बहुत अच्छे प्रोग्राम्स इसमें लिए जाते है. हर महीने में अलग- अलग जिल्हों में इस बारे मे विशेष प्रोग्राम्स लिए जाते है।
बाकी सभी राज्यों ने भी इसका अनुसरण करना चाहिए ये बहुत बढ़िया प्रोग्राम है।
जब अलग अलग लोगों ने अपने वक्तव्य रखे तब मैने भी वक्तव्य रखा , मुझे लगा नही था की लोगो को वो इतना पसंद आएगा पर कई लोगो ने मुझे मिलकर उस बारे में सराहा और नंबर लिया । तो उसके कुछ मुद्दे भी यहां रख रहा हु।
Link - https://youtu.be/daOxROKXCJY?si=iGIyYEi_-We5DUHC
1. निर्भय बनना- ज्यादा से ज्यादा क्या करेंगे वो? क्यों डरना?
2. नये तरीके अपना के गांधी विचार फैलाना जैसे की memes,short videos, reels..etc
3. सोशल मीडिया को whatsapp University, whatsapp University बोलके नाम रखने के बदले तुम इसमें से प्यार फैलाओ , वे नफरत फैला रहे है तो तुम्हे प्यार फैलाने से किसने रोका है
4. मैने ग्रुप छोड़ दिया मत बोलो उसमे भले कुछ लिखो मत पर रहो जब तुम वो छोड़ दोगे तो उन्हे तो झूठ फैलाने के लिए खुला आंगन मिल जाएगा
5. युवाओं के प्रश्न और चुनौतिया रोजगार -
आपके विरोधी लोग बाकी लोगो को भले बेरोजगार करे उनके मुख्य मुख्य लोगो को तो रोजगार देते है और वो भी अच्छा रोजगार देते है
वो नौकरी हो तो अच्छी जगह reference देते है और व्यवसाय हो तो उसको अपने लोगोसे clients देते है हम अगर ये करेंगे नही तो युवा इस में रहेगा कैसे,? मैं खुद जानता हु की मेरी नौकरी/ व्यवसाय manage करके मैं किस तरह इस में आ पा रहा हु , मन में बहुत निष्ठा है इसलिए आ पा रहा हु लेकिन और कितने साल आ पाऊंगा? और मेरे कितने युवा दोस्त इस वजह से आज movement में नही है।
6. युवाओं का और एक बड़ा प्रश्न शादी -
आज के जमाने में शादी के लिए like minded जीवनसाथी मिलना बहुत बड़ी चुनौती है।
महात्मा गांधी के पीछे कोई जाति या धर्म ना होने से बड़ी दिक्कत ये भी आती है की वो घर या कही बताए नही जाते और बहुत से लोगों की उम्र 40/50 cross हो जाती है तब कहा उन्हे महात्मा गांधी समझ आते है। मेरे अन्य दोस्तो को ये दिक्कत नही आती क्योंकि कोई सावरकर का अभ्यासक या प्रचारक होगा तो उसे उनकी जाति में से जीवनसाथी मिलने के लिए दिक्कत नही आएगी क्योंकि भले उसे उनके बारे में अभ्यास न हो पर आदर अवश्य होगा यही बात अन्य नेताओ के बारे में है। गांधी इसमें exception है तो इसके लिए हमे खुद से प्रयास करने होंगे हमे ऐसे like minded युवक युवतीयो के वधूवर परिचय संमेलन लेने चाहिए, उनका मैट्रिमोनी app बनाना चाहिए ।
7.आपको daily memes, videos , short articles चाहिए हो तो आप भी हमारे knowing Gandhi Memes, Knowing Gandhi Videos , Knowing Gandhi Small articles या अलग अलग ग्रुप से जुड़े
8. रचनात्मक कार्य करने के लिए आप हमारे Jaihind People's Movement से जुड़े और अपने अपने गांव में काम शुरू करे
9. गांधीजी बताते वक्त कभी बहुत गंभीर चेहरा ना रखे गांधीजी की तरह ही चेहरे पे सदैव मुस्कान (smile ) रखे
कार्यक्रम के उपरांत आदरणीय मंत्री सी पी जोशी जी इनके द्वारा मेरा सत्कार किया गया।
बहुत अच्छा अनुभव रहा । मैं पहली बार ही राजस्थान गया था।
देरी से लिखने के लिए माफी चाहता हु
19 अगस्त 2023
संकेत मुनोत
8668975178








Comment, Share ,Follow and Subscribe.

Saturday, August 5, 2023

ज्येष्ठ समाजवादी आणि गांधीवादी विचारवंत साथी शेखर सोनाळकर यांना विनम्र आदरांजली!





 ज्येष्ठ समाजवादी आणि गांधीवादी विचारवंत प्रा. शेखर सोनाळकर यांचे परवा रात्री 1.15 मिनिटांनी वयाच्या 72 व्या वर्षी दीर्घ व्यांधींशी लढताना निधन झाले.

खूपच दुःख होतंय पण काहीच करता येत नाहीये. सरांसोबत अनेकदा भेट घ्यायचे ठरवले पण राहून गेले . 20 ऑक्टोबर 2022 ला जळगाव येथे गेलो होतो तर तिथे सरांना घरी जाऊन भेटणार होतो पण गडबडीत नाही भेटू शकलो लवकर दुसऱ्या गावी जावे लागले. त्यापूर्वी काही वर्षांपूर्वी सर पुण्यात होते तेव्हा सुद्धा आमचे भेटणे चालले होते पण माझ्या नोकरीच्या व्यापात भेटू नाही शकलो. सर पुण्यात होते तेव्हा एका सोलापूर च्या निर्माण मधील Friend चा स्पेशल फोन आला होता की तू सरांना भेट आणि त्यांची सगळी माहिती व्हिडिओ रेकॉर्ड करून घे खूप चांगले document होईल पण तेही करता आले नाही. सरांच्या सोबत अधे मध्ये फोनवर बोलणे व्हायचे. जेव्हा-जेव्हा बोलणे होई खूप जिव्हाळ्याने बोलत शेखर सर.

मी वर्षभरापूर्वी दिल्लीत एका राष्ट्रीय मीटिंग साठी गेलो होतो जिथे देशातील वेगवेगळ्या राज्यातून चांगले काम करणारे मान्यवर लोक आले होते त्यात मी जाऊ शकलो ते सरांच्यामुळेच . महाराष्ट्रातून निवडक 3 नावे सरांनी त्या मीटिंग साठी सुचवली होती त्यात माझे एक नाव दिले होते सर स्वतः पण येणार होते पण त्यांचा आजार वाढल्याने  आणि डॉक्टर ने प्रवास करण्यास नाही सांगितल्याने त्यांना अचानक येणे कॅन्सल करावे लागले होते...
देशभरातील लोकांना जोडणारे , विधायक काम करणारे होते सर. निदान 100 पर्यंत तरी जगायला हवे होते अजून खूप काम झाले असते सरांकडून. 
द्वेष पासरवणारी, दंगली घडवणारी, लोकांची डोकी भडकवणारी लोक 90 च्या पुढे जगत आहेत आणि सरांच्या सारखा प्रेमळ , सत्यवादी आणि संवेदनशील मनुष्य 72 मध्येच जग सोडून जातो हे चांगले नाही. यानिमित्त माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण आपल्या आरोग्याची पण तेवढीच काळजी घ्या. 
महात्मा गांधींनी सरदार पटेल आणि विनोबा भावेंना याबद्दल विशेष सुनावले होते. महात्मा गांधी स्वतः म्हणाले होते की मी 125 वर्षे जगणार अणि कदाचित त्यांच्या इतर वाक्यांचा प्रमाणे हे वाक्य ही सत्य झाले असते पण मध्येच दहशतवादी गोडसेने त्यांची हत्या केली.

शेखर सर CA होते, CID मध्ये होते. त्यांनी CBI ला आणि अनेक संस्थांना आपल्या अभ्यासाद्वारे अनेक गुन्हे तपासण्यात मदत आणि मार्गदर्शन केले होते, ते अजून बरेच काही करत होते...त्यांचे संदर्भ पूर्ण लेख वाचणे आणि भाषण ऐकणे ही खूप मोठी वैचारिक मेजवानी असे...
माझे चुकले हे की मी निदान त्यांची ZOOM वर तरी मुलाखत घ्यायला हवी होती किंवा फोनवर त्यांना विविध प्रश्न विचारून ते रेकॉर्ड करून ठेवायला हवे होते पण मला कल्पनाच नव्हती की एवढ्या लवकर असे काही होईल. पण यापुढे काळजी घेईल. 

शेवटी एवढेच सांगेन की लोकांना हिंसेचे कौतुक करणारे खूप प्रक्षोभक बोलणारे भडक लोक आवडतात पण गांधिविचाराच्या माध्यमातून शांतपणे आपले काम करणारे लोक अधिक परिणामकारक असतात. कारण भडका उडतो आणि लगेच शांत ही होतो पण पणती अनेक दिवे प्रकाशित करत राहते. आपले काम एवढेच की या पणत्या बनुया आणि अश्या पणत्या लोकांना आदर्श म्हणून समोर आणुया.
आपलेही शेखर सरांच्या समवेत चे अनुभव कमेंट मध्ये मांडा 

Shekhar Sonalkar  सरांना भावपूर्ण आदरांजली...

संकेत मुनोत

Comment, Share ,Follow and Subscribe.

Thursday, July 27, 2023

सामाजिक सलोखा आणि संविधान हक्क या विषयावर अन्नपूर्णा परिवार च्या वार्षिक स्नेह मेळाव्यात 3000 उद्योजक महिलांशी संवाद साधण्याची संधी मिळाली

अन्नपूर्णा परिवार च्या वार्षिक स्नेह मेळाव्यात तेथील हजारो महिलांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. 

तिला संधी मिळाली तर ती त्या संधीचे सोने करते...हे यांच्याकडे बघून समजते. 
या माझ्या समोर बसलेल्या पुण्यातील वेगवेगळ्या slum वस्तीतील 3000 उद्योजक महिला आहेत ज्यांनी  उद्योग , व्यवसाय करून स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे. कोणी भाजीची गाडी, रिक्षाचालक, फळांची गाडी असे व्यवसाय या महिला करत आहेत.

'सामाजिक सलोखा आणि संविधान हक्क या विषयावर मी त्यांच्याशी संवाद साधला. पूर्वी अन्नपूर्णा परिवार च्या एका कार्यक्रमात बोललो तेवढे चांगले बोलता आले नाही पण यानिमित्त त्यांचे अधिकार , गांधीजींचे स्त्री सबलीकरण तील योगदान आणि आज भूमिका घेण्याची गरज या विषयावर बोललो. 
माझ्या व्याख्यानापूर्वी एक ट्रॉफी आणि सन्मानपत्र असा प्रतीकात्मक पुरस्कार देऊन माझा गौरव करण्यात आला हे माझ्यासाठी अनपेक्षित होते. 
यावेळी मी सर्वांना पंचसुत्री ची शपथ ही दिली. 
यावेळी  मी तेथील महिलांना हेही सांगितले की काही समाजकंटक लोक तुमच्या मुलांना धर्माच्या नावाने भडकवतील दंगली करण्यासाठी , तोडफोड करण्यासाठी त्यांना फितवतील स्वतः च्या मुलाला परदेशात पाठवून तुमच्या मुलांना भडकवतील त्यापासून सावध रहा आणि मुलांना त्यांचे शिक्षण, करीअर, आरोग्य, घर या गोष्टींच्या कडे लक्ष द्यायला लावा. 

अन्नपूर्णा परिवार मला खूप प्रेरणादायी वाटतो. डॉ. मेधाताई पुरव सामंत  जवळपास 11 वर्षे बँकेत नोकरी करत होत्या तेव्हा त्यांच्या लक्षात आले की slum area तील गरीब लोकांना वीणा तारण कर्ज मिळत नाही आणि  बँकेतील किचकट प्रोसेस मुळे तेही तिकडे येत नाहीत आणि सावकार पिळवणूक करतो. त्यांनी 11 वर्षे करत असलेली नोकरी सोडली आणि पुण्यात 8/10 च्या छोट्याश्या ऑफिस मध्ये अन्नपूर्णा परिवार सुरू केला ज्यात सुरुवातीला झोपडपट्टीतील 9 महिलांना 1000 प्रत्येकी असे 9 हजार कर्ज दिले आणि 25 रु रोज प्रमाणे 50 दिवसात परत घेतले यातून सुरुवात झालेला हा अन्नपूर्णा परिवार आज 200 कोटीचा टर्न ओव्हर करणारा परिवार बनला आहे.
 चौकटी बाहेर जाऊन काम करणारी माणसे लोकांना वेडी वाटतात त्यांचे भविष्य सुरक्षित वाटत नाही पण याच वेड्या माणसांनी आत्तापर्यंत  इतिहास घडवला आहे हे पण आपण लक्षात घ्यायला हवे. 
अन्नपूर्णा परिवार चे विश्वस्त कॉ. सुरेश धोपेश्र्वरकर, वृषाली मगदूम, चित्रा खिंवसरा, अंजली पाटील , सुभाष वारे आणि विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. तम्मना इनामदार यांचे मुस्लिम समाजातील समज गैरसमज दूर करणारे मुसलमान हे पुस्तक ही यावेळी प्रकाशित झाले. 

(28 जानेवारी 2023 रोजी हा कार्यक्रम झाला पण इतर गडबडीत याबद्दल लिहणे राहून गेले होते आज लिहून काढले. )
संकेत मुनोत 
8668975178

Comment, Share ,Follow and Subscribe.





















Sunday, July 23, 2023

दरवर्षी प्रमाणे या वर्षीही एक दिवस तरी वारी अनुभवावी उपक्रमात सहभाग

दरवर्षी प्रमाणे या वर्षीही एक दिवस तरी वारी अनुभवावी यात सहभागी झालो. हा एक सुंदर अनुभव होता. कुठलेही शस्त्र हातात नसलेली विठ्ठल रखुमाई ची मूर्ती ही अहिंसा आणि प्रेमाचे प्रतीक आहेत तर सगळे वारकरी हे त्या अहिंसेचे पुजारी.
मला वारीत सगळ्यात जास्त गोष्ट कुठली आवडते ती म्हणजे समता. कोणी मोठा नाही कोणी छोटा नाही. आम्ही ह. भ. प. श्यामसुंदर सोन्नार महाराजांच्या पाया पडलो तर तेही माऊली म्हणत आमच्या पायी पडले.
सध्या देशात ठिकठिकाणी जाती धर्मात द्वेष वाढवून दंगली घडवल्या जात आहेत. रोजगार, शिक्षण, आरोग्य, अर्थव्यवस्था हे मूळ प्रश्न बाजूला ठेवून नेत्यांच्या अंधभक्तित गुंग करून ठेवले जात आहे त्यावेळी वारी ही प्रेम आणि संवाद वाढवणारी वाटते.
पूर्वीच्या काळी वैदिक ब्राम्हण च सगळ्या गोष्टी सांगत आणि आपल्याला ते असत्य पण सत्य मानावे लागे आणि ते म्हणावे ते कर्मकांड करावे लागे. संतांनी हा मध्यस्थ नाकारत तुम्ही कुठल्याही जाती धर्मात जन्माला आलेले असाल तरी ईश्वराच्या नामस्मरणाने पुण्यप्राप्ती करू शकता अशी मांडणी केली. पण आज अश्या ठिकाणी पण हे चुकीचे लोक घुसत आहेत त्यांच्या पासून सावध राहायला हवे.
पंढरपूरला निघालेल्या आषाढी वारीमध्ये 'एक दिवस तरी वारी अनुभवावी' या उपक्रमातंर्गत प्रागतिक विचारकार्य करणाऱ्या संस्था संघटनांचे कार्यकर्ते वारकरी रविवारी सहभागी झाले होते. जवळपास पावणे दोनशे वारकरी कार्यकर्ते यात आले होते. गवळ्याची उंडवडी ते बऱ्हाणपूर या मार्गावर 10 किलोमीटर असे आम्ही चाललो. पुणे, मुंबई, सातारा, लातूर, नाशिक, ठाणे, रायगड आदी ठिकाणावरून या वारीत अधिक कार्यकर्ते वारकरी सहभागी होते.
सकाळी 6 वाजता पुण्यातून गवळ्याची उंडवडीला जाण्यासाठी पुण्यातून निघालो. 4 बसची व्यवस्था होती. रस्त्यात थांबून नास्ता, चहा घेतला. उंडवडीला नऊ वाजता पोचलो आणि चालायला सुरुवात केली.
बऱ्हाणपूर येथे मस्त बेसन, भाकरी, चटणी, बुंदी, भाताचे जेवण केले. त्यानंतर गाणी झाली. विशेष सत्कार झाले. पुस्तक प्रकाशन झाले. प्रमुखांची भाषणे झाली. आणि साडेचार वाजता पुण्याला जायला निघालो. साडेसात वाजता पुण्यात पोचलो.
या उपक्रमाचे संयोजन हभप श्यामसुंदर महाराज सोन्नर, हभप ज्ञानेश्वर महाराज बंडगर, शरद कदम, अविनाश पाटील, वर्षा देशपांडे, नागेश जाधव, नितीन वाळके, सरस्वती शिंदे, राजाभाऊ अवसक, संदीप आखाडे, सुनील स्वामी, दत्ता पाकिरे, अनुराधा नारकर, विशाल विमल, साधना शिंदे, सुभाष वारे यांनी केले होते.








डॉ. Shripal Sabnis यांचा सन्मान करण्याची संधी मिळाली

अरिहंत जागृती मंच च्या 2023 च्या निबंध स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याचे मुख्य वक्ते डॉ. Shripal Sabnis यांचा सन्मान करण्याची संधी मला मिळाली. अनेक वर्षापासून सरांच्या बद्दल ऐकत होतो एकदा मेसेज वर भेटण्या संदर्भात बोलणे पण झाले होते पण प्रत्यक्ष भेट राहून गेली होती ती आज झाली आणि जेवतांना छान गप्पा पण झाल्या.
सामाजिक कार्यातून हळूहळू ब्रेक घेण्याबद्दल मागे लिहले होते पण मग नुसते बसून करणार काय आपली energy कुठे तरी utilize करायला हवी ना? सामजिक नाही तर धार्मिक कार्यात सहभाग घेतला. जैन धर्माचे भारतीय संस्कृतीत योगदान या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली होती ज्यात मुख्य भाषण श्रीपाल सबनीस यांचे झाले जे अप्रतिम होते. कुठल्याही विषयावर सरांचा अभ्यास आणि मांडणी ऐकणे हा अप्रतिम अनुभव असतो. आत्तापर्यंत 391 पुस्तकांना त्यांनी प्रस्तावना दिली आहे.
संकेत मुनोत




Comment, Share ,Follow and Subscribe.

सदाशिव पेठेत हल्लेखोरापासून मुलीला वाचवणाऱ्या योद्धा #लेशपाल शी भेट

सदाशिव पेठेत हल्लेखोरापासून मुलीला वाचवणाऱ्या योद्धा #लेशपाल याच्याशी आज भेट आणि गप्पा झाल्या. एका खऱ्या धैर्यशील योद्ध्या ला 'एक धैर्यशील योद्धा - गांधी' पुस्तक भेट दिल्याचे समाधान मिळाले.
सदाशिव पेठ मध्ये जेव्हा प्रेमात #नकार मिळालेला युवक कोयता घेऊन युवतीच्या मागे पळत होता तेव्हा ती जिवाच्या आकांताने इकडे तिकडे पळत होती तेव्हा आसपास चे बहुतेक जण बघ्याची भूमिका घेत दुर्लक्ष करत होते तर काही जण तिने वाचण्यासाठी दुकानात घुसू नये म्हणून आपल्या दुकानाची शटर लावून घेत होते .पण लेशपाल आला आणि त्याने त्याच्या हातातून कोयता ओढून घेत तिचा जीव वाचवला. त्यात त्याच्या हाताला कोयता ही लागला पण त्याने निर्भयतेने हे काम केले. संवेदनशीलतेशिवाय हे शक्य नाही.
त्याचे सगळीकडे कौतुक होत आहे. "मी त्या ताईवर उपकार नाहीत केले, मी माझं कर्तव्य पार पाडलं. आता सगळे सत्काराला बोलवत आहेत, पण ती घटना घडली, तेव्हा रुमवर गेल्यावर मी एक-दीड तास रडत होतो. थोडा उशीर झाला असता तर तिचा मृत्यू कसा झाला, हे मला लोकांना सांगावं लागलं असतं. मी फक्त माझं कर्तव्य बजावलं. हात जोडतो, पण मला सत्काराला बोलावू नका", अशी प्रतिक्रिया लेशपाल याने काही दिवसांच्या पूर्वी न्यूज चॅनेल वर दिली होती.
महात्मा गांधी बद्दल प्रश्न विचारला असता त्यांचे विचार आणि जीवन प्रेरणादायी वाटत असल्याचे त्याने सांगितले. सध्या तू फक्त राज्याचाच नव्हे तर देशाचा हिरो बनला आहेस. पण सध्या देश वेगळ्याच संकटातून जात आहे. जात धर्म वर्ग लिंग यातील तेढ आणि त्यातून द्वेष, हिंसा आणि दंगली प्रचंड वाढल्या आहेत. Proud to be Hindu, proud to be jain, proud to be Muslim ,....etc म्हणत आमचाच धर्म सर्वश्रेष्ठ आणि इतर कनिष्ठ म्हणणाऱ्या कट्टर लोकांची संख्या वाढत आहे proud to be human म्हणण्याची आज गरज आहे.
त्यामुळे द्वेष आणि हिंसा कमी करण्यासाठी गांधीविचार कसे महत्वाचे आहेत याबद्दलही तू मांडणी करावी अशी विनंती यानिमित्ताने मी त्याला केली अणि त्याने ती मान्यही केली.
महात्मा गांधींनी म्हटले आहे की "तुमच्या समोर कुठल्या स्त्रीवर अन्याय होत असेल तर शांत बसू नका अहिंसेने प्रतिकार करा , अहिंसा झेपत नसेल तर हिंसेचा अवलंब करा पण भीतीने घरात बसू नका" हे पुस्तकातील वाक्य त्याला दाखवले.
Jaihind People's Movement - जयहिंद लोकचळवळ आणि knowing Gandhi चळवळीची ही यानिमित्ताने माहिती दिली .

महा अनिस तर्फे प्रेम आणि हिंसा या विषयावर चर्चासत्र ठेवले होते ज्यात विविध मान्यवरांनी अभ्यासपूर्ण भाषणे केली. त्यात लेशपाल ने ही आपली मनोगत व्यक्त केले.

संकेत मुनोत 

Comment, Share ,Follow and Subscribe.