काही काही अनुभव वाचतांना तर माझ्या डोळ्यात पाणी आले *'गांधीजींच्या तत्वांचा मी माझ्या प्रत्यक्ष आयुष्यात केलेला उपयोग*
*How I used Gandhian Principles in my life*
_Experiences_
"मी शाळेत अध्यापनाचे काम करतो. शाळेत शिकवत असताना अनेक मार्गाने आपल्याला ञासाला सामोरे जावेलागते. माझ्या बाबतीत पण तसेच घडले.. आमचे मुख्याध्यापक शाळेत काम नीट करत नसत, वेळेवर येत नसत. मग मी आणि सहकारी मिञांनी त्यांच्याशी उशिरा का येत असे भांडत बसण्यापेक्षा असहकार तत्त्व अवलंबले. त्यांच्याशी काहीच बोलायचो नाहीत. आपले काम करून सरळ वर्गावर जायचे. त्यांच्या लक्षात त्यांची चूक आली. तिथून पुढे ते मिळून मिसळून राहू लागले. त्यामुळे शाळेत छान वातावरण निर्माण झाले. "
-Mayur Dumane
"मी सुरुवातीच्या जीवनात ,तरुणपणी शिक्षक म्हणून नोकरीला होतो. तसेच बोर्डिंग सुपरिटेंडेंट म्हणूनही काम पहात होतो. एकदा गावात जत्रेनिमित्त 'तमाशा ' आलेला होता. बोर्डिंगची मुले अभ्यास सोडून विनापरवानगी गुपचूपपणे तमाशाला गेलीत. हे जेंव्हा मला कळले तेंव्हा मला खूपच राग आला. मुलांनी बेशिस्त वर्तन केले म्हणून जेवण बंद ची शिक्षा करायचे ठरवले. मुले परतलीत. मी शिक्षा सांगितली . मुले हिरमुसली. कोणी काही बोलले नाही. निमूटपणे अभ्यासाला बसली. त्यातील काही मोठी मुले नेहमीप्रमाणे माझ्यासाठी जेवणाचे ताट घेऊन आले. मी शांतपणे नाकारले.मुले जेवणार नाहीत तर मी कसा जेवणार ? मी ही कडक वागलो होतोच. पण उघडपणे काहीच बोललो नाही.रात्र गेली.मुले स्वतःहून जवळ आलीत.म्हणालीत ," चूक झाली." मुले शिस्त पाळू लागली ,अभ्यास करु लागली .त्यांचे माझे सूर जुळले."
- Prabhakar Nikum
"ही बँकींग क्षेत्रातील एक घटना आहे. माझ्या दुकानातील खाते एका राष्ट्रीयीकृत बँकेत होते. एक चेक जमा होण्यासाठी विनाकारण वेळ लागत होता. वारंवार हेलपाटे घालूनही यश येत नव्हते. शेवटी मी हेडअॉफीस ला पत्रव्यवहार केला आणि ही दिरंगाई कळविली. तुरंत याची नोंद घेऊन कार्यवाही करण्यात आली. मात्र त्यांनी मला अजून एक व्यक्तीगत कंप्लेंट सदर अॉफीसर वर करण्यासाठी सांगितले. मी तो पत्रव्यवहार त्याच अॉफीसर ला दाखवत विनंती केली की आपण रास्तपणे कामे केली तर कुणालाही काहीही त्रास होणार नाही. उलटपक्षी तुमच्या बद्दल लोकांना आदर वाटेल. तो मनुष्य खजील होऊन अस्वस्थ झाला. काही वर्षांनी त्याच व्यक्तीने निवृत्ती समारंभात (सेंडअॉफ) वेळी ही घटना त्याच्या आयुष्यात कलाटणी देणार्या घटनांपैकी एक असल्याचे सांगितले व हा एक मोठा टरनिंग पॉईंट असल्याचा उल्लेख केला. समोरच्या माणसात नैतिकता जागृत केली की तो एक उत्तम मनुष्य होतो ही महात्मांची शिकवण प्रत्यक्षात आली. "
- Sandeep Pitaliya
"मला माझे मित्र माझ्या शारीरिक व्यंगावर हसत असत पण मी त्याच्यावर किधीही प्रतिसाद दिला नाही त्यामुळे त्यानाच त्यावर वाईट वाटले व ते मला चिडविणे थांबले व मी समाजातील इतर लोकांसाठी मदत करू लागलो."
-Prithviraj Chava
"महात्मा गांधींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा पुरस्कार केला, स्वतःही याच तत्त्वांनुसार जगले आणि इतरांनीही तसे करावे असे सुचवले.आजच्या या युगात गांधीजींच्या विचारांची पुन्हा नितांत गरज आहे. आपल्या भारताला सुजलाम सुफलाम आणि जागतिक महासत्ता बनवण्यासाठी एकच मार्ग आहे तो म्हणजे गांधीजींचे विचार. माझी शाळा तशी दुर्गम. जायला नीट पक्का रस्ताही नाही. निसर्गरम्य अश्या घनदाट जंगलातून नेहमी प्रवास करावा लागतो. असेच एक दिवस शाळेत पोहोचतो न पोहोचतो तोच पाहतो तर काय गावात 10-12 लोक गोळा झाले होते आणि कुणाचा तरी रडन्याचा आवाज येत होता, सहजच माझे पाय त्या दिशेने वळले माणसांची ती सहज प्रव्रुत्ति आहे मना. आणि पाहतो तर काय एका 10-12 वर्षाच्या मुलाला जो की बाहेर गावी शिकत होता त्याला एक मुलगा मारत होता आणि बाकीन्चे बघे मज्जा घेत होते. मी दोघांना थांबवले आणि कारण विचारलं तर कारणही तीतकस मोठ नव्हत. आणि समजावून सांगितल दोघेही समजले. आज आपण पाहतो की अगदी किरकोळ कारणांसाठी लोक हानामारी वर येतात आणि नको ती संकटे आपल्यावर ओढावुन घेतात. जर आपण गांधीजींनी सांगितल्या प्रमाणे सत्य अहिंसेच्या मार्गाने वागलोत तर आपला देश सुजलाम सुफलाम नक्कीच होईल."
-Jitendra Sahala
"आमचे शेजारी आमच्या जाण्या - येण्याच्या रस्त्यावर बरेच वेळा पाणी सोडणे, कचरा फेकणे अशा स्वरूपाच्या अडचणी निर्माण करून आपली मानसिकता बिघडवून मुद्दाम भांडण करण्यासाठी परिस्थिती निर्माण करावयाचे परंतु आम्ही सर्व कुटुंबीय तरीही त्यांच्याशी सलोख्याने वागायचो.एकदा त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती आजारी पडली.त्यांना रक्ताची आवश्यकता होती. मी रक्तदान करून त्यांना मदत केली. त्यांना आश्चर्य वाटले. त्या प्रसंगानंतर त्यांच्या वागण्यात बदल झाला. "
-Ananda Sakate
"एकदा असच मी रस्त्याने चालत असताना मी तो रस्ता ओलांडत होतो . आणि मागून दोन तरुण पल्सर या गाडीवरून वेगात आले होते मी मी हात करत करत रास्ता ओलांडत होतो करण तिथं सिग्नलची सोय नव्हतीच आणि त्या तरुणांना गाडीचा वेग कमी करावा लागला त्यांनी मला अरेरावी करून खूप घाण आणि खालच्या पातळीची शिवी दिली पण मला काहीच वाटलं नाही उलट मला त्यांची कीव आली. मीच उलट त्यांना स्पस्ट आणि मोठ्या आवाजात मी म्हणालो ' भावा मला मनापासून माफ कर ' ही शिवी बरिच दिवसातून ऐकली मला आमच्या लहानपणी ची अक्तहवन झाली आणि उलट माझ्या आठवणींना तू उजाळा दिला .असा मी त्याला तोल लावला होता . त्या मित्राची त्यावेळेसची प्रतिमा पाहण्यासारखी आणि पडलेली आणि अपराधी वाटत होती. "
- Ajay Nemane
_Good_ _Words_
"स्वावलंबन हे तत्व मी महात्मा गांधीजींच्या जीवनातून शिकलो माझी जी काही वैयक्तिक काम आहेत ती स्वतः करण्याचा माझा प्रयत्न राहिला आहे कोणत्याही कामाला कमी समजायचं नाही म्हणजे श्रमप्रतिष्ठा हे तत्व मी गांधीजींकडून शिकलो फरशी पुसणे झाडू मारणे स्वछतागृह धुणे यांसारखी कामे करायला मला कसलीही लाज वाटत नाही. सगळयात महत्वाची गोष्ट मी गांधीजी कडून शिकलो ती म्हणजे मी जसे बोलतो तसे आचरण करतो माझ्या उक्ती आणि कृतीत कसलाही फरक नाही. आपण मांडलेल्या विचारांवर ठाम असणं हे मी गांधीजींकडून शिकलो "
- Mayur Dumane
"I am trying to follow social rules.
cleanliness on roads & public places.
No casteism at my work place or anywhere.
Always try to practice Brotherhood & equality.
I always try to have equality for everybody.
I always insist on freedom of expression for everyone.
I always like to fight against social injustice."
- Rajendra Inamdar
"गांधीजी हे या युगातील भारतीयांना लाभलेलं एक निस्सीम रत्न आहे. मी व्यक्ति पूजक नाही तरी सुद्धा गाँधीनी आचरणात आणलेले विचार आधी केले मग लोकांनी स्वतः अंगिकारले हे मानाला खुप भावत आले आहे, गांधीजीसारखं अभ्यासु, स्वछ, सुंदर आणि निर्भय जगणे, सतत मानवतेचा परिभाष्या स्वातन्त्र्य उद्घृत करणारं जगमान्य व्यक्तिमत्व असे आपले महात्मा गांधीजी त्यांच्या हा जगमान्य प्रभाव, माझ्या सारख्या भारतियाल नक्कीच प्रेरणादायी ठरत आल्या आहेत. मला अभिमान आहे की मी गाँधीजींच्या देशात जन्माला आलो. मला खात्री आहे की गाँधीजीचे विचार तरुणाना अधिक स्वावलंबी, राष्ट्रभिमानी व नीतिमान आणि गतिशील बनवतील"
-Arun Yawalikar
"Gandhi was one of those few individuals I came across, who are fearless and polite at the same time. Earlier I used to be arrogant while fighting anyone. And the fight used to lead to hatred. When I started controlling my anger but kept fighting with politeness instead of the option not to fight, I found my opponent is becoming my friend and he joins me in our fight together against the evil things. Evil things in me as well as him and in the society too. Sometimes I used to be coward and glorified my silence as my politeness. Gandhi taught me how to be politely fearless. And fight to finish the badness in the people not to finish bad people."
- Vikas Shashwate
"मी सत्याची बाजू उचलून धरतो. मी माझे जीवन नैतिकतेने व्यतीत करण्याचा प्रयत्न करतो. मी माझा परिसर स्वच्छ ठेवतो. मी नेहमी कमजोर माणसाचा मागे उभा राहतो. मी नेहमी न्यायाची बाजू उचलून धरतो. मी नेहमी गोष्टीची सामाजिक सलोखा ठेवतो. मी माझा गरजा नियंत्रित ठेवतो. मी सादगीने जगतो."
-Parag Tamhankar
"अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे पण अहिंसक पद्धतीने पाठपुरावा करून हे तत्व कायम पाळत आलोय. विविध अडचणींमध्ये मी कायम ध्यान आणि माझी सद्सद्विवेक बुद्धी यावर भरवसा ठेऊन मार्ग काढत आलोय. रागावर नियंत्रण ठेवणे ही सर्वात कठीण गोष्ट करायला शिकलो ती गांधीजींच्या विचारसरणीचा माझ्यावर असलेल्या प्रभावामुळेच. बाकी साधी राहणी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. कुणाला न दुखावण्याचा कसोशीने प्रयास असतोच. महात्म्याला स्मरून इतकेच बोलेन की या मार्गावरून कधीही स्वतःला ढळलेले बघू शकणार नाही. धन्यवाद."
- Sudhan Kulkarni
"गांधीजींच्या तत्वांचा - सत्य , अहिंसा , सर्वधर्मसमभाव व स्वच्छता यांचा मी माझ्या जीवनात प्रत्यक्ष उपयोग करण्याचा नेहमीच प्रयत्न करतो. मला स्वच्छता ही अतिशय महत्वाची वाटते त्यानुसार मी नेहमी माझं घर, परीसर, मी ज्या ठिकाणी वावरतो ते ठिकाण नेहमी स्वच्छ ठेवतो . माझ्या पर्यावरणाची काळजी घेतो व वाढदिवसाला झाडे लावतो. मित्रांमधील भांडण शांततेत सोडवतो. स्त्रीपुरूष समानता व श्रमप्रतिष्ठा या तत्वांद्वारे स्त्रियांशी आदराने वागतो व कोणतेही काम कमी मानत नाही . प्रत्येक काम मन लावून करण्याचा प्रयत्न करतो. दैनंदिन कामात निर्माण होणार्या कचर्यातून खत, टिकाउ वस्तु तयार करतो. प्रत्येक वस्तूचा पुरेपूर वापर करतो जेणेकरून पैशाचा, नैसर्गिक संसाधनांचा अपव्यय होणार नाही."
-Vikram Rathod
"I am not practicing religious person but I respect all the religions (Sarva Dharma Samantva) unless religions are not following divisive way and untouchability (Sparshbhavana). In my personal life, I am happened to be a vegetarian (Non-Violence) but I do not enforce anyone to practice my beliefs and principles. I always stand by truth even if it is against me (Satya). I believe that all humans are equal irrespective of their religion, cast, color, gender, culture, state and country. In day to day life, whether I am working for Tribals, raising voice for human rights, fighting for Dalit issues or having my opinion on Feminism, I found Gandhi as a relevant and ideal person."
-Rohan Mutha
"Hate the Sin but not the siner. जेव्हा जेव्हा मला कुठल्याही व्यक्तीचा राग येतो तेव्हा तेव्हा या वाक्याचा मी नेहमी विचार करतो. त्यामुळे माझे मन शांत होऊन त्या व्यक्ती बद्दल माझ्या मनात कुठलेही वाईट विचार येत नाही. मी शिक्षक असल्यामुळे मला गांधीजी चे शिक्षणाबद्दल चे विचार नेहमीच मार्गदर्शन करीत असतात."
- Umesh Bhoyar
"गांधीजींचे महत्वाचे तत्व म्हणजे सत्य।या तत्वा नुसार मी नेहमी वाग्न्याचा प्रयत्न करतो जेव्हा मी सत्यवर असतो तेव्हा गांधीजींप्रमाने काशालाही घाबरत नही आपल्या माताची सख्ती करत नाही दुसर्याच्या मताचा सन्मान करतो पण मी गांधींप्रमाने हट्टी नाही सर्व धर्मांचा आदर करतो मी आस्तिक आहे ईश्वरच अस्तित्व मान्य करतो"
-Aslam Shah
"लौकिक जीवनातील यश किंवा अपयशाकडे निर्विकार दृष्टीने पाहतो. इतरांच्या धर्म व कर्मकांडासंबंधीच्या विचारांकडे उदार दृष्टिकोन बाळगतो. स्वतःच्या सुख दुःखा प्रमाणे इतरांचेही सुख दुःख महत्त्वाचे मानतो. स्थानिक वस्तू निर्मिती व वस्तू विनिमयाचा प्राधान्य देतो. शेतीमधील सेंद्रिय प्रयोग व खादीला महत्त्व देऊन वापरण्याचा प्रयत्न करतो. व्यवहारात यांत्रिकीकरणाला फारसे महत्व देत नाही. राष्ट्र म्हणजे भौगोलिक सीमा मानत नाही. त्या ऐवजी लोक त्यांचे सहजीवन त्यांचे प्रश्न महत्त्वाचे मानतो. भौतिक गरजा कमी करण्याचा प्रयत्न करतो. "
-Pramod Munghate
"गांधीजी समजून घेत असताना मी कोणत्याही धर्माचा द्वेष करणे सोडून दिले.माझ्या स्वभावात रागीटपणा होता.गांधी वाचत गेलो आणि त्यांच्या आयुष्यातील काही प्रसंगी खरे तर त्यांना प्रचंड राग आला पाहिजे.परंतु त्यांनी अगदी हसण्यावर नेले.नथुराम गोडसे ने चप्पल भेट म्हणून दिल्या.तो प्रसंग मला मुळापासून हादरून गेला.अतिशय प्रतिकूल परीस्थितीमध्ये विचलित न होता त्याला धैर्याने सामोरे जाण्याची शक्ती मला गांधीं कडून मिळते.अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करत असताना महात्मा गांधी यांच्या विचाराने काम करत गेलो.माझी व माझ्या पत्नीचे मिळून मासिक वेतन एक लाख पंधरा हजार आहे.परंतु गांधींच्या प्रभावामुळे आयुष्यातील गरजा मर्यादित ठेऊन अनेक सामाजिक संस्था ,संघटना यांना तसेच माझे विद्यार्थी यांना आर्थिक मदत करत असतो."
-Surendrakumar Ghadge
"1.सर्वप्रथम गांधीजींनी जे जे प्रयोग केले ते का व कोणत्या प्रसंगी केले ते समजून घेतले व त्याचा अंतिम उद्देश Welfare of All सर्वोदय होता हे समजून घेतले त्यामुळे माझ्या सर्व लिखाणाचा आणि व्यख्यानांचा अतींम सार हा सर्वोदय हाच राहिला. याचा खूप मोठा उपयोग मला तरुण वर्गाचा भरभरून प्रतिसाद मिळण्यात झाला.
2.स्वतःच्या हाताने तयार केलेले खादीचे कपडे परिधान करण्यात जो स्वाभिमान मिळतो व जो आनंद मिळतो तो मला गांधीजींच्या खादीच्या स्वदेशी मंत्रामुळे मिळाला.
3.स्वतःच्या गरजा कमी करून त्यात आनंदी जीवन जगण्याचा मार्ग गांधी विचारातूनच मिळाला."
- Bhujang Bobade
#GandhiForever
तुम्हाला ही असे अनुभव येतच असतील पुढच्यावेळी तुम्ही पण सहभागी व्हा किंवा इथे कंमेन्ट मध्ये add करा
संकेत मुनोत
गणेश भंडारीComment, Share ,Follow and Subscribe.