अन्नपूर्णा परिवार च्या वार्षिक स्नेह मेळाव्यात तेथील हजारो महिलांशी संवाद साधण्याची संधी मिळाली.
तिला संधी मिळाली तर ती त्या संधीचे सोने करते...हे यांच्याकडे बघून समजते.
या माझ्या समोर बसलेल्या पुण्यातील वेगवेगळ्या slum वस्तीतील 3000 उद्योजक महिला आहेत ज्यांनी उद्योग , व्यवसाय करून स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे. कोणी भाजीची गाडी, रिक्षाचालक, फळांची गाडी असे व्यवसाय या महिला करत आहेत.
'सामाजिक सलोखा आणि संविधान हक्क या विषयावर मी त्यांच्याशी संवाद साधला. पूर्वी अन्नपूर्णा परिवार च्या एका कार्यक्रमात बोललो तेवढे चांगले बोलता आले नाही पण यानिमित्त त्यांचे अधिकार , गांधीजींचे स्त्री सबलीकरण तील योगदान आणि आज भूमिका घेण्याची गरज या विषयावर बोललो.
माझ्या व्याख्यानापूर्वी एक ट्रॉफी आणि सन्मानपत्र असा प्रतीकात्मक पुरस्कार देऊन माझा गौरव करण्यात आला हे माझ्यासाठी अनपेक्षित होते.
यावेळी मी सर्वांना पंचसुत्री ची शपथ ही दिली.
यावेळी मी तेथील महिलांना हेही सांगितले की काही समाजकंटक लोक तुमच्या मुलांना धर्माच्या नावाने भडकवतील दंगली करण्यासाठी , तोडफोड करण्यासाठी त्यांना फितवतील स्वतः च्या मुलाला परदेशात पाठवून तुमच्या मुलांना भडकवतील त्यापासून सावध रहा आणि मुलांना त्यांचे शिक्षण, करीअर, आरोग्य, घर या गोष्टींच्या कडे लक्ष द्यायला लावा.
अन्नपूर्णा परिवार मला खूप प्रेरणादायी वाटतो. डॉ. मेधाताई पुरव सामंत जवळपास 11 वर्षे बँकेत नोकरी करत होत्या तेव्हा त्यांच्या लक्षात आले की slum area तील गरीब लोकांना वीणा तारण कर्ज मिळत नाही आणि बँकेतील किचकट प्रोसेस मुळे तेही तिकडे येत नाहीत आणि सावकार पिळवणूक करतो. त्यांनी 11 वर्षे करत असलेली नोकरी सोडली आणि पुण्यात 8/10 च्या छोट्याश्या ऑफिस मध्ये अन्नपूर्णा परिवार सुरू केला ज्यात सुरुवातीला झोपडपट्टीतील 9 महिलांना 1000 प्रत्येकी असे 9 हजार कर्ज दिले आणि 25 रु रोज प्रमाणे 50 दिवसात परत घेतले यातून सुरुवात झालेला हा अन्नपूर्णा परिवार आज 200 कोटीचा टर्न ओव्हर करणारा परिवार बनला आहे.
चौकटी बाहेर जाऊन काम करणारी माणसे लोकांना वेडी वाटतात त्यांचे भविष्य सुरक्षित वाटत नाही पण याच वेड्या माणसांनी आत्तापर्यंत इतिहास घडवला आहे हे पण आपण लक्षात घ्यायला हवे.
अन्नपूर्णा परिवार चे विश्वस्त कॉ. सुरेश धोपेश्र्वरकर, वृषाली मगदूम, चित्रा खिंवसरा, अंजली पाटील , सुभाष वारे आणि विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. तम्मना इनामदार यांचे मुस्लिम समाजातील समज गैरसमज दूर करणारे मुसलमान हे पुस्तक ही यावेळी प्रकाशित झाले.
(28 जानेवारी 2023 रोजी हा कार्यक्रम झाला पण इतर गडबडीत याबद्दल लिहणे राहून गेले होते आज लिहून काढले. )
संकेत मुनोत
8668975178Comment, Share ,Follow and Subscribe.