AddThis code

Thursday, March 7, 2024

आणि लग्न करण्या ऐवजी ती पुण्यात शिक्षण करण्यासाठी आली..

महिला दिनी अश्या युवतींना वाचवण्याचा संकल्प तरी करूया का?आपल्यापैकी अनेकांना हे शक्य आहे
08 मार्च 2021

काही महिन्यांपूर्वी सोबत घडलेली सत्य घटना
विदर्भातील एक मैत्रीण वय वर्षे 22-23,  पदवी मध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली आणि पुढे शिकण्यासाठी तिने पुणे विद्यापीठात PG साठी apply केलं आणि entrance exam नंतर इथे नंबरही लागला.
पण घरच्यांचा विरोध होता की PG करून काय करणार, त्यापेक्षा लग्न कर. सुरवातीला तिने विरोध केला पण सततच्या दबावामुळे तिने ही त्यांना मुले पाहायला येतात तर येऊ द्या म्हणाली.
त्याच वेळी आमचे फोन सुरू होते. मी माझे मित्र विक्रम, मिनाज लाटकर आणि काहींची उदाहरणे देऊन त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलायला लावून तिला शिक्षणाचे महत्व आणि पुढचे चांगले भविष्य समजावून सांगितले आणि तीचे आम्ही पुणे विद्यापीठात admission केले.

पण अडचण इथे solve झाली नाही तिकडे तिला पहायला मुलगा आणि त्याच्या घरचे येऊन गेले, जवळच्याच गावातले होते.मुलाच्या घरी चांगली संपत्ती होती आणि मिळकत चांगली होती पण मुलगा तिला अनुरूप नव्हता तिला आवडला ही नव्हता.
पण घरच्यांचा सततचा दबाव होता, वडिलांची तब्येत पूर्वीपासून खराब होती म्हणजे डॉक्टरांनी वडिलांची जगण्याची काही महिन्यांचीच खात्री दिलेली होती. त्यात हीचा फोन हा कि वडील म्हणतात की त्यांची शेवटची इच्छा आहे कि माझे लग्न पाहण्याची तिची आई बहीण सगळेच नातेवाईक तेच सांगत होते कि करून टाक लग्न .
हेच सुरू असतांना मुलाच्या इथून होकार आला 
घरचे सगळे खुश झाले, तिने थोडा विरोध केला की मला शिकायचे आहे तर ते म्हणाले , तो म्हटला लग्नानंतर तर शिक पुढे नाहीतर राहूदे 
नंतर काही काळानंतर तिनेही होकार दिला कारण घरच्यांकडून सतत चे टोमणे टामने तिला सहन होत नव्हते
तिला फोनवर समजवायचा प्रयत्न केला की लग्न झाल की तू अडकून जाशील , आधी शिक्षण पूर्ण कर मग तू स्वतःच्या पायावर ऊभी राहिलीस आणि स्वतः सक्षम झालीस तर तुला स्वतःला हवा तसा जोडीदार निवडता येईल पण तिचे एकच म्हणणं मग मला घरचे असे म्हणतील तसे म्हणतील वगैरे आणि जाऊद्या मी एकदा निर्णय घेतला आहे लग्न करण्याचा तर घेतला 

भावनिक होऊ नको प्रॅक्टिकली विचार कर अजून काही लग्न झालेले नाहीये वगैरे बरेच सांगितले पण ती घरच्याच दबावात होती

परत कधीतरी तिचा मोबाईल जप्त होऊ शकतो वगैरे ही ती म्हणाली

आता आम्ही बाहेरचे म्हणून जास्तीत जास्त काय करू शकत होतो

ती माझ्या नात्यातील वगैरे ही नव्हती पण एकदम हतबल वाटू लागलं तिचा लग्न केल्यानंतर चा काल्पनिक चेहरा समोर आला आणि दुःख वाटले कि स्वतः चे मन मारून ही असे करत आहे
mean while तिच्याच जवळपासच्या गावातील एक मित्राचा मित्र आणि त्याची मैत्रीण ज्यांनी शिक्षणासाठी असेच काही केले होते त्यांच्याशी संपर्क झाला त्यांनीही समजावून सांगितले त्यांनी कुठेही तिचे नाव disclose न करता मदतीची आणि तिच्या घरच्यांना समजवण्याची ही तयारी दाखवली पण तिला ही खात्री होती की  पुढच्या शिक्षणाला घरचे नाहीच म्हणतील मग कोणीही येऊ देत. एका मोठ्या लेखिकेचा तिला फोन झाला पण त्यांना तिने आम्हाला सांगितलेल्या मुख्य गोष्टी न सांगता तिचे आई-वडील बरोबर आहेत व ती स्वखुशीने लग्नसाठी तयार वगैरे गोष्टी सांगितल्या.यात त्यांनी मलाच फोनवर सांगितले की तिची इच्छा नाही शिकण्याची तिला लग्न करायचे आहे तर करू द्या की इथे आम्हीच तोंडावर पडलो.
म्हणजे नेमकी काय परिस्थिती आहे ते तिने आम्हाला पूर्वीच सांगितले होते आणि पूर्वी याबद्दल फोनवर खूप रडली ही होती पण घरच्या दबावामुळे किंवा कश्या मुळे यांना फोनवर वेगळीच बोलली
 पण आता तिने स्वतःच नाही म्हटल्यावर आम्ही काहीच करू शकत नाही असे वाटले .
तोच तिच्या कॉलेज मधील एका शिक्षकांची आठवण झाली जे तिला मुलगी मानत होते .कसा-बसा त्यांचा संपर्क मिळवला आणि त्यांच्याशी याबद्दल बोललो. त्यांनाही त्या पटल्या त्यांनी तिला आणि तिच्या आईला समजावून सांगतो म्हणाले.
तिला त्यांनी समजावून सांगितले आणि इकडे तिच्या घरच्यांनी ही त्या मुलाच्या घरच्यांना नकार दिला. पण पुण्यात पाठवायला आजही तयार नाहीत 
तीचे शिक्षण सुरू झाले आता कोरोना मुळे live सुरू आहे पण पुढे ऑफलाईन जरी असले तरी इथे काही मित्र-मैत्रिणींनी तिच्या राहण्याची व्यवस्था करण्याची तयारी दाखवली आणि आता तिचे चांगले सुरू आहे.

तर यानिमित्ताने एवढेच सांगायचे होते कि भारतात अश्या लाखो मुली असतील ज्यांना अश्यामुळे स्वतःची पुढची स्वप्ने सोडून आई वडील म्हणतील तसे लग्नाच्या बोहल्यावर चढावे लागत असेल 
ज्यांची स्वतःची लग्नाची तशी इच्छा असेल त्यांच्याबद्दल आक्षेप नाही पण ज्यांना शिकायचे आहे स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे त्यांना प्रोत्साहन द्या, मदत करा , त्यांच्या घरच्यांना समजावून सांगा नसेल समजत तर त्या मुलींनी विद्रोह केला तरी चालेल , मी अश्या अनेक मुलींना ओळखतो ज्या विद्रोह करून घरातून बाहेर पडल्या आणि आज स्वतःच्या पायावर चांगल्या उभ्या आहेत जे घरचे त्यांना दोष देत ते आता कौतुक करत आहेत.काही ठिकाणी अजूनही घरचे सहमत नाही झाले पण या मुली स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रात  मोठे काम करत आहेत आणि आनंदी आहेत.
आपण सतत म्हणतो की "वर्गात टॉपर किंवा हुशार असणाऱ्या मुली गेल्या कुठे?" तर त्या इथे जातात त्यांच्या इच्छे विरुद्ध अनेकांची लग्न केली जातात आणि फक्त चूल आणि मूल एवढ्या पुरत्या मर्यादित ठेवले जाते.काहींना चार पैसे घरी यावेत किंवा तिने कुठेतरी busy रहावे म्हणून नोकरीची परवानगी दिली जाते पण घरात कुठलाही निर्णयात्मक अधिकार नसतो.तो निर्णयात्मक अधिकार पुरुषालाच असतो.

तर #महिलादिन निमित्त फक्त तसे स्टेटस टाकून किंवा काही मेसेज फॉरवर्ड करून शुभेच्छा देऊ नका त्यासोबत छोट्याश्या कृती सुरू करा
आपल्या जवळपास परिचयात असे काही घडणार नाही याची आज महिला दिनानिमित्त जबाबदारी घ्या
तुम्ही प्रयत्न करूनही आपल्याला ते करणे शक्य होत नसेल तर आम्हाला कळवा आम्ही आमच्या परीने त्यासाठी पूर्ण प्रयत्न करू 
कारण एक महिला घडली तर ती किमान चार जणांना घडवू शकते

सोबत खालील काही गोष्टीही करूया

-स्त्री-पुरुष समानतेच्या दिशेने पाऊले उचलूया
-शिव्या देतांना कुठल्याही महिलेचा(समोरच्याची आई बहीण यांचा) उद्धार टाळूया
-आपली आई, बहीण, पत्नी, सहकारी किंवा कोणीही महिला त्यांचा आदर करण्यासोबत त्यांच्यापर्यत हे प्रबोधन पोहोचवायचा प्रयत्न करूया
-हा लेख वाचणार्यांची ही पत्नी , सून  किंवा बहीण किंवा इतर कोणीही जवळचे परिचयातील असेल ज्यांना शिकण्याची किंवा इतर काही करण्याची इच्छा असेल तर ते करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या

आपल्या सर्वांना च वाटते की सावित्रीबाई, कस्तुरबा सारख्या प्रेरणादायी महिला तयार व्हाव्या पण त्या कुठे शेजार च्या घरी तर त्या आपल्याच जवळपास तयार होतील यासाठी प्रयत्न करूया

सोबतचा फोटो प्रतिकात्मक

चूक भूल क्षमस्व
#yes_We_can
संकेत मुनोत 
8668975178
#Mission_Education
#Women_Empowerment Group

#internationalwomensday

Share

Thursday, February 29, 2024

आर्थिक नियोजन करताना 7 महत्वाच्या गोष्टी

आज 01 मार्च 2024
2023-2024 या आर्थिक वर्षांचा शेवटचा महिना
*येत्या 30 दिवसात खालील 7 गोष्टी नक्की करा*

1. आपण जो काय खर्च करतो त्याची *नोंद* ठेवा.  आपला खर्च आपल्या एकूण उत्पन्नाच्या 30% पेक्षा जास्त जाऊ देऊ नका.
2. *आरोग्य विमा* किमान 50 लाखचा काढून ठेवा.(तो काढणे शक्य नसेल तर अचानक कुठला मोठा आजार/ अपघात झाला तर त्यासाठी 50 लाख रु खर्चासाठी बाजूला काढून ठेवा). जगभरात maximum लोक दवाखान्याचा खर्च न झेपल्याने कर्जबाजारी होतात, जीव गमावतात, शिक्षण आणि इतर गोष्टी अर्धवट सोडतात.
 
3. *टर्म इन्शुरन्स -* आपल्याला वार्षिक उत्पन्नाच्या किमान 20-25 पट टर्म इन्शुरन्स काढून ठेवा.

4. *Guerenteed Return plan*
- एक अशी योजना घ्या की उद्या तुमचे पैसे असलेली बँक बुडाली, market खाली गेले, महामारी आली तरी ठरलेले रिटर्न्स देईलच-
-
एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. *आपण पैसा कमवतो म्हणजे बिया कमवतो त्यातील थोड्या खायच्या थोड्या खर्चायच्या आणि बाकी सर्व जमिनीत पेरायच्या. त्या जमिनीत पेरल्या म्हणजे इन्व्हेस्ट केल्या तर त्याच्या हजारो बिया आपल्याला नंतर मिळतील नाहीतर आहे तेवढ्याच राहतील आणि खराब होतील.*

*5.आहार आणि व्यायाम -*
सध्या मी अनेकांना आर्थिक नियोजन साठी भेटतो तर त्यात डायबेटिस चे प्रमाण वाढत चालले आहे. त्यासाठी खालील गोष्ट करा
साखर, मैदा, junk food यांचे  सेवन कमी करा किंवा बंद करा . दिवसातून किमान अर्धा ते एक तास व्यायाम करा. चालणे हा सुद्धा चांगला व्यायाम आहे.

*6.आनंदी रहा, मानसिक ताण कमी करा -*
आपण चालवत असलेल्या नाते टिकवूया चळवळ मध्ये आज जवळपास 74 हजार लोक झाले आहेत. त्यात मानसिक ताण वाढत असल्याचे अनेक ठिकाणी लक्षात आले. तर तो कमी करण्यासाठी थोडे ध्यान करा. विनोदी shows बघा, आपल्याबद्दल कोणी चुकीचे बोलत असेल तर दुर्लक्ष करा.अधिक ताण आल्यास समुपदेशकाची मदत घ्या. जवळच्या विश्वासू व्यक्तीकडे मन मोकळे करा. आनंदी रहा

*7. Health आणि Term इन्शुरन्स* काढल्यानंतर किमान छोटीशी एक *SIP* सुरु करा. मार्केट खाली वर होत असेल तर त्याकडे लक्ष देऊ नका. 

अधिक माहितीसाठी हक्काने कॉल किंवा मेसेज करा

आपलाच
©संकेत मुनोत
आर्थिक नियोजन तज्ञ आणि विमा सल्लगार
8668975178
प्रामाणिक सल्ला उत्तम सेवा

लेख आवडल्यास शेअर करा 

Saturday, January 20, 2024

Financial Planner संकेत मुनोत यांचे बालेवाडी, पुणे येथील IT कंपनी मध्ये Financial Planning संदर्भात मार्गदर्शन

बालेवाडी, पुणे येथील एका IT कंपनी मध्ये *Financial Planning* संदर्भात मार्गदर्शन सत्र घेण्याचे निमंत्रण मागच्या week मध्ये मिळाले.
 तेथील Founder Member Santosh Patil यांनी माझे सेशन झाल्यावर त्याबद्दल लिहले आहे. ते खालील प्रमाणे...

मागील आठवड्यात *सुप्रसिद्ध Financial Planner संकेत मुनोत*  यांचे  *आर्थिक नियोजन* या विषयावर मार्गदर्शनपर सत्र आम्ही आमच्या टीमसाठी आयोजित केले होते .संकेत मुनोत यांनी आमच्या टीमला यावेळी हसत खेळत आणि  सोप्प्या शब्दात याबद्दलच्या अनेक गोष्टी समजावून सांगितल्या..

*"आपण पैसे किती कमवावे?"*  ते आपल्या हातात नसते पण *"कमवलेल्या पैश्याचे नियोजन कसे करावे?"*  हे मात्र आपल्या हातात असते. आणि हे *#अर्थिक #नियोजन* व्यवस्थित असेल तर आपला *आहे तो #पैसा ही वाढत जातो शिवाय मध्ये काही मोठे काही #संकट आले तरी आपण त्याला सक्षमपणे तोंड देऊ शकतो.* 

*Health Insurance, Term Insurance, Gauranteed Return Plans, Pension Plans, Mutual Fund (SIP), child education plans यांचे गुंतवणूकीतील योग्य प्रमाण आणि त्यातील बारकावे उदाहरणासह खुपच उत्तम रीतीने त्यांनी मांडले. यासंदर्भात टीममधील विविध लोकांनी विचारलेल्या शंका-प्रश्नांचे देखील अतिशय छान निरसन केले. *संकेतच्या या सत्रातील महत्त्वाचा भाग सांगायचा झाला तर Financial Pyramid चा, ज्याचा पाया (Health/Term Insurance, Retirement planning) आपण सर्वात आधी भक्कम केला पाहिजे.*

या सेशन नंतर त्यांनी  'म. गांधीजी आणि गैरसमज' याबाबत सुद्धा चांगले मार्गदर्शन केले आणि टीम मधील प्रत्येक व्यक्तीकडून गांधीजींबद्दल एक-एक प्रश्न घेऊन त्या त्या प्रश्नाबद्दल गांधींनी केलेले काम आणि जागतिक महत्व उदाहरणसह पटवून दिले...

*#समाजस्वास्थ्य मजबूत ठेवण्यासाठी गांधींविचारांची* तर *#स्वतःचे आणि #कुटुंबाचे अर्थिक स्वास्थ्य मजबूत ठेवण्यासाठी अर्थिक नियोजनाची* आवश्यकता कशी आहे? हे त्यांनी उदाहरणासाह प्रामाणिकतेने समजावून सांगितले. मी सर्वांना विनंती करतो कि संकेत मुनोत ( 8668975178) कडुन  आपले अर्थिक नियोजन करून घ्यावे. 
त्यांची गांधींविचारांच्याप्रमाणेच अर्थिक नियोजनावरची सेशन्स पण देशभर होऊन लोक आर्थिक सक्षम आणि साक्षर होवोत अशा शुभेच्छा यावेळी आम्ही त्यांना दिल्या.

संतोष पाटील

#financialliteracy #FinancialPlanning

Thursday, January 11, 2024

'आपल्याला माहित नसलेले विवेकानंद' - विवेकानंद केंद्र कन्याकुमारी , शाखा अंबरनाथ येथे संकेत मुनोत यांनी केलेले व्याख्यान

आज स्वामी विवेकानंद जयंती , राष्ट्रीय युवा दिवस
मागच्या वर्षी विवेकानंद केंद्र कन्याकुमारी , शाखा अंबरनाथ येथे विचार मांडण्यासाठी मला बोलवले होते तेव्हा मांडलेले काही विचार

मला समजलेले विवेकानंद

प्रथमतः आपण माझा परिचय करून देताना जे "विवेकानंदांच्या स्वप्नातला तरुण" असे वर्णन केले त्याबद्दल आपले खूप खूप आभार. पण मी स्वतः ला त्यायोग्य मानत नाही.
  आज #स्वामी_विवेकानंद जयंती  पण बहुतेक ठिकाणी स्वामी विवेकानंदाचे हे दुर्मिळ विचार सांगितलेच जात नाहीत . स्वामी विवेकानंदांचे हे विचार जर प्रत्येकाने वाचले आणि अमलात आणले तर भारतच काय जग सुंदर व्हायला अधिक मदत होईल..

विवेकानंदांचा देव करण्यापेक्षा माणूस म्हणून त्यांनी स्वतःचे ध्येय कसे साध्य केले ते पाहायला हवे "माणसाचा देव अथवा अवतार ज्या वेळेला केला जातो त्या वेळेला त्याच्या अभ्यासाची गरज संपते, अनुकरणाचीही गरज संपते. हा श्रद्धेने निर्माण होणारा फार मोठा पायगुंता आहे. तो टाळण्याचा आपण यथाशक्ती प्रयत्न केला पाहिजे." समाजात अद्वितीय काम करणार्‍या समाजपुरुषांना, संतांना, कलाकारांना आपल्याला आवडणार्‍या-पटणार्‍या-मानवणार्‍या विचारचौकटीतच बसवणं, हा आपला आवडता उद्योग आहे. त्यामुळे सामाजिक-धार्मिक-राजकीय क्षेत्रातल्या मंडळींना दैवत्वही चटकन प्राप्त होतं. या समाजदैवतांच्या नावे मग आपले विचारही काहीजण खपवतात. इतरांना नव्यानं विचार करण्याची गरज वाटत नाही.

स्वामी विवेकानंद बहुसंख्यांना माहीत आहेत, ते त्यांनी शिकागोच्या धर्मपरिषदेत केलेल्या भाषणामुळे. त्यांनी त्या सभेत समस्तांना बंधुभगिनी असं संबोधलं, हे आपण लहानपणापासून ऐकत असतो. त्यांच्या मठांना आपण भेटी देतो. गेलं वर्षभर तर त्यांच्या कार्याची महती सांगणारे अनेक लेख छापून आले, अनेक भाषणंही दिली गेली. मात्र या सार्‍या लेखाभाषणांमध्ये भर होता तो त्यांच्या शिकागोतल्या भाषणावर आणि त्यांनी केलेल्या 'हिंदू धर्माच्या उभारणी'वर.
#एवढेच_विवेकानंद माहित होते
पण स्वामी विवेकानंदाचे विज्ञानवादी,समाजवादी,चिकित्सक असे परखड विचार कुणी सांगितलेच नव्हते

आज विवेकानंदानां केवळ #एका_जातीचे_धर्माचे_पंथाचे_प्रतीक म्हणून पाहीले जात आहे.त्या पार्श्वभूमीवर विवेकानंदांचे विचार आणि त्यांच्या #स्वप्नातला_भारत कसा होता हे समजुन घेणे आवश्यक आहे. धर्माची व्याख्या करताना विवेकानंद म्हणतात, "#माणसाला_माणुस_बनवतो_तो_धर्म. त्यांनी #धर्मांधतेवर_कठोर_प्रहार_केले आहेत.'आपण एक धर्म स्वीकारला तर सारे धर्म स्वीकारावे लागतील आणि आपण एक धर्म नाकारला तर सारे धर्म नाकारावे लागतील.इतर धर्मीयांचा आदर करण्याची शिकवण देणाऱ्या विवेकानंदाचा वापर धार्मिक विद्वेष पसरवण्यासाठी आज केला जात आहे. ते म्हणतात,"जो धर्म अथवा ईश्वर विधवांचे अश्रू पुसत नाही किंवा अनाथ बालकांच्या मुखात अन्नाचा घास घालत नाही त्यावर माझा विश्वास नाही."#नव्या_देशाचे_स्वप्न पाहताना विवेकानंद म्हणतात की,"आपल्याला #नवा_देव_नवा_वेद_आणि_नवा_धर्म हवा आहे, कारण आपल्याला #नवा_भारत घडवायचा आहे. पुढं ते म्हणतात," #ज्या_ठिकाणी_वेद_नाही_कुराण_नाही_बायबल_नाही_अशा_ठिकाणी_आपल्याला_मानवजातीला_घेऊन_जायचे_आहे माञ, हे काम आपल्याला वेद, कुराण आणि बायबलचा आधार घेऊनच करावे लागेल"

विवेकानंदानी १८९० ते ९३ या काळात भारत उभा-आडवा पिंजुन काढला.लोकांचे प्रश्न जाणुन घेतले.लोकांची हलाखीची परीस्थिती पाहिल्यावर ते अस्वस्थपणे मिञांना पञ लिहून म्हणतात, "भारताचा उद्धार करायला हवा.शिक्षणाचा प्रचार करावयास हवा.सामाजिक अत्याचार नको.जिथं विषमता नसेल, जातीव्यवस्था नसेल.सर्वधमीय एकोप्याने राहतील, असा समाज निर्माण करण्यासाठी विवेकानंद तरुण-तरुणीनां आवाहन करतात.ते म्हणतात," आपण मरणार हे निश्चित आहे पण आपण चांगल्या उद्दिष्टांसाठी मरुया.आपली सर्व कामे आपण आत्मसमर्पणाच्या भावनेने करूया...आणखी एक गोष्ट लक्षात ठेवावयास हवी.माणसे तयार करणे हे कोणत्याही कार्याचे उद्दीष्ट हवे".

डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनीही 'शोध स्वामी विवेकानंदांचा' या अप्रतिम पुस्तकात विवेकानंदांच्या विचारधनाचा वेध घेतला आहे. खरे विवेकानंद कसे होते? विवेकानंद हे #समाजपरिवर्तनाच्या_चळवळीतले_अग्रदूत होते. त्यांनी आजन्म विचारधन वाटलं आणि समाजाचं रूप बदलण्यासाठी कृतीही केली. ते वैचारिक लढाया लढले. मतं बदलली, ती मान्य केली. नव्या मतांचा प्रसार केला. स्वामी विवेकानंदांची भाषणं, पत्रं, लेख, मुलाखती यांचा अभ्यास केला, तर असं लक्षात येतं, की त्यांच्या आयुष्याचं खरं ध्येय होतं भारताला उर्जितावस्था प्राप्त करून देणं हे. त्यांना भारतीय समाज सुखासमाधानानं नांदायला हवा होता. #इथली_गरिबी_अज्ञान_जातिव्यवस्थेमुळे_होणारे_तंट_दुबळ्यांवर_होणारा_अन्याय_कायमचे_दूर_व्हावेत, अशी त्यांची पराकोटीची इच्छा होती. हे काम सहजसाध्य नाही, याची त्यांना जाणीव होती. भारतीय समाजावर #धर्माचा_जातिव्यवस्थेचा_प्रचंड_पगडा_होता. हा पगडा दूर करून जनतेला त्यांचं भलं कशात आहे, याची जाणीव करून देणं हे महत्त्वाचं होतं, आणि अवघं एकूणचाळीस वर्षांचं आयुष्य लाभलेल्या स्वामी विवेकानंदांनी हे कार्य आयुष्यभर केलं. त्यांनी #संपूर्ण_भारत_पालथा_घातला त्यांनी इथल्या लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्या काळी निषिद्ध असलेलं समुद्रपर्यटन करून ते परदेशातही गेले. अवलोकनातून, मननचिंतनातून तयार झालेले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी धडपडत राहिले. त्यांच वकृत्व आणि अभ्यासामुळे ते जगभर वेगवेगळ्या देशात हिंडुनही मोदीसारखी मनकी बात सांगु शकले असते व देशप्रेमाच्या गप्पा मारु शकले असते पण त्यांनी तसे केले नाही

'#आजचा_हिंदू_धर्म_हा_धर्म_नव्हे_हा_आहे_सैतानाचा_बाजार!' असं ते उद्वेगानं म्हणाले असले, तरी जगभरातल्या बहुसंख्यांना जगण्यासाठी धर्म लागणार, हे त्यांना मान्य होतं. पण त्यांचा कल कायम धर्माचं खरं स्वरूप समजून घेण्यात आणि समजावून देण्याकडे राहिला. धर्मातल्या अनैतिक, अशास्त्रीय बाबींचं उच्चाटन करण्यासाठी विज्ञानाची कास धरणं आवश्यक आहे, हे त्यांना ठाऊक होतं आणि म्हणून ते कायम #विज्ञानवादाचे_पुरस्कर्ते राहिले. जपानहून अमेरिकेला जाताना बोटीवर भेटलेल्या जमशेदजी टाटांना त्यांनी विज्ञानाचा अभ्यास करणारी देशी संस्था उभारण्याचा सल्ला दिला, आणि त्यातून बंगळुरूची आज जगप्रसिद्ध असलेली '#आयआयएससी' ही संस्था उभी राहिली.

विवेकानंदांना '#माणूस_घडवणारा_धर्म' अभिप्रेत होता. '#आपण_सर्व_पुस्तके_जाळूया_आणि_स्वतः_विचारकरूया. मी जे बोलतो त्यावर #तुमच्यापैकी कोणी निव्वळ विश्वास ठेवला तर मला वाईट वाटेल. #स्वतः_विचार_करण्याची_शक्ती_तुमच्यात मी जागृत करू शकलो, तर मला आनंद होईल. मला स्त्रीपुरुषांशी बोलण्याची इच्छा आहे, मेंढरांशी नव्हे', असं सांगणार्‍या विवेकानंदांचे विचार अभ्यासले तर ते काळाच्या किती पुढे होते, हे लक्षात येतं. समाजवादी आणि साम्यवादी विचारसरणीही त्यांच्या विचारधनाचा भाग आहेत. '#मी_समाजवादी_आहे', असं त्या काळात ते म्हणाले. आंबेडकरांच्या कितीतरी आधी त्यांनी वर्गलढ्यावर भाष्य केलं. आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. देशात विज्ञानाचं शिक्षण देणारी विद्यापीठं उभी राहावीत म्हणून धडपडले. '#संन्याशानं_धर्माभ्यासापेक्षा_खेडोपाडी_जाऊन_आजारी_व्यक्तींची_सेवा_करावी', असं सांगत आपल्या शिष्यांना कॉलराग्रस्तांची शुषृशा करायला लावली. लोकांना हाताशी घेऊन गटारं साफ केली. सार्वजनिक आयुष्य जगताना व्यवहारात नीतिमत्ता जपली जावी, म्हणून प्रत्येक हिशेब चोख राहील, याची स्वतः काळजी घेतलीच, पण वेळोवेळी आपल्या शिष्यांना पत्रं लिहून ते याबाबत बजावत राहिले.

अनेक हिंदुत्ववादी संघटनांकडुन हा गैरसमज पसरवला जातो कि धर्मांतर हे तलवारीच्या जोरावर केले गेले विवेकानंदांनी त्याच काळात याला ऊत्तर दिलेले आहे
त्यांच्याच शब्दात ते असे

ईसाई और मुसलमान क्यों बनते हैं ? – स्वामी विवेकानन्द
    अगर हमारे देश में कोई नीच जाति में जन्म लेता है , तो वह हमेशा के लिए गया – बीता समझा जाता है , उसके लिए कोई आशा – भरोसा नहीं । ( पत्रावली भाग २ , पृ. ३१६ ) आइए , देखिए तो सही , त्रिवांकुर में जहाँ पुरोहितों के अत्याचार भारतवर्ष में सब से अधिक हैं , जहाँ एक एक अंगुल जमीन के मालिक ब्राह्मण हैं,वहाँ लगभग चौथाई जनसंख्या ईसाई हो गयी है ! ( पत्रावली भाग १ , पृ. ३८५ ) यह देखो न – हिंदुओं की सहानुभूति न पाकर मद्रास प्रांत में हजारों पेरिया ईसाई बने जा रहे हैं , पर ऐसा न समझना कि वे केवल पेट के लिए ईसाई बनते हैं । असल में हमारी सहानुभूति न पाने के कारण वे ईसाई बनते हैं । ( पत्रावली भाग ६ , पृ. २१५ तथा नया भारत गढ़ो पृ. १८)

    भारत के गरीबों में इतने मुसलमान क्यों हैं ? यह सब मिथ्या बकवाद है कि तलवार की धार पर उन्होंने धर्म बदला । जमींदारों और पुरोहितों से अपना पिंड छुड़ाने के लिए ही उन्होंने ऐसा किया , और फलत: आप देखेंगे कि बंगाल में जहाँ जमींदार अधिक हैं , वहाँ हिंदुओं से अधिक मुसलमान किसान हैं । ( पत्रावली भाग ३ , पृ. ३३०, नया भारत गढ़ो, पृ . १८ )

प्रत्येकाने आपापल्या मनात, आजच्या काळाच्या चौकटीत या महामानवांचे कोणते विचार, कोणती कृती बरोबर वाटते हे ठरवायचे असते. त्यांनी आज आपले विचार कसे मांडले असते, कोणती कृती सांगितली असती, कोणते मार्ग सुचवले असते, हे ठरवायला मदत हवी म्हणून, काळाच्या कोणत्या चौकटीत त्यांनी आपले विचार मांडले, त्यांचा पिंड कोणता होता, कोणत्या शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक आघातप्रत्याघातांत ते घडत होते, हे सारे समजावून घ्यावयास हवे. थोडक्यात काय, तर त्यांचे वस्तुनिष्ठ चरित्र आपणासमोर यायला हवे.'

विवेकानंदाचे हे विचार आठवण्याचे कारण म्हणजे त्यांनी ज्या नव्या समाजाचे, नव्या धर्माचे, नव्या भारताचे स्वप्न पाहिले होते, ता आज पुर्णपणे धुळीस मिळवले जात आहे. त्यांचे विचार कृतीत आणुन तरुण-तरुणींनी मोठ्या संख्येने सामाजिक कार्यात सहभागी झाले पाहीजे. चला तर मग विवेकानंदाच्या स्वप्नातील भारत आपण साकार करुया.

#राष्ट्रीय_युवक_दिवस
#विवेकवादी_विज्ञानवादी_विवेकानंद

संकेत मुनोत

8668975178

Monday, December 18, 2023

17 डिसेंबर 2017 च्या गांधी प्रश्नमंजुषेत मिळालेली काही उल्लेखनीय उत्तरे:


अप्रतिम वाचण्यासारखे आणि अनुकरण्यासारखे असे 

काही काही अनुभव वाचतांना तर माझ्या डोळ्यात पाणी आले *'गांधीजींच्या तत्वांचा मी माझ्या प्रत्यक्ष आयुष्यात केलेला उपयोग* 
*How I used Gandhian Principles in my life*

_Experiences_
"मी शाळेत अध्यापनाचे काम करतो. शाळेत शिकवत असताना अनेक मार्गाने आपल्याला ञासाला सामोरे जावेलागते. माझ्या बाबतीत पण तसेच घडले.. आमचे मुख्याध्यापक शाळेत काम नीट करत नसत, वेळेवर येत नसत. मग मी आणि सहकारी मिञांनी त्यांच्याशी उशिरा का येत असे भांडत बसण्यापेक्षा असहकार तत्त्व अवलंबले. त्यांच्याशी काहीच बोलायचो नाहीत. आपले काम करून सरळ वर्गावर जायचे. त्यांच्या लक्षात त्यांची चूक आली. तिथून पुढे ते मिळून मिसळून राहू लागले. त्यामुळे शाळेत छान वातावरण निर्माण झाले. "
-Mayur Dumane

"मी सुरुवातीच्या जीवनात ,तरुणपणी शिक्षक म्हणून नोकरीला होतो. तसेच बोर्डिंग सुपरिटेंडेंट म्हणूनही काम पहात होतो. एकदा गावात जत्रेनिमित्त 'तमाशा ' आलेला होता. बोर्डिंगची मुले अभ्यास सोडून विनापरवानगी गुपचूपपणे तमाशाला गेलीत. हे जेंव्हा मला कळले तेंव्हा मला खूपच राग आला. मुलांनी बेशिस्त वर्तन केले म्हणून जेवण बंद ची शिक्षा करायचे ठरवले. मुले परतलीत. मी शिक्षा सांगितली . मुले हिरमुसली. कोणी काही बोलले नाही. निमूटपणे अभ्यासाला बसली. त्यातील काही मोठी मुले नेहमीप्रमाणे माझ्यासाठी जेवणाचे ताट घेऊन आले. मी शांतपणे नाकारले.मुले जेवणार नाहीत तर मी कसा जेवणार ? मी ही कडक वागलो होतोच. पण उघडपणे काहीच बोललो नाही.रात्र गेली.मुले स्वतःहून जवळ आलीत.म्हणालीत ," चूक झाली." मुले शिस्त पाळू लागली ,अभ्यास करु लागली .त्यांचे माझे सूर जुळले."
- Prabhakar Nikum

"ही बँकींग क्षेत्रातील एक घटना आहे. माझ्या दुकानातील खाते एका राष्ट्रीयीकृत बँकेत होते. एक चेक जमा होण्यासाठी विनाकारण वेळ लागत होता. वारंवार हेलपाटे घालूनही यश येत नव्हते. शेवटी मी हेडअॉफीस ला पत्रव्यवहार केला आणि ही दिरंगाई कळविली. तुरंत याची नोंद घेऊन कार्यवाही करण्यात आली. मात्र त्यांनी मला अजून एक व्यक्तीगत कंप्लेंट सदर अॉफीसर वर करण्यासाठी सांगितले. मी तो पत्रव्यवहार त्याच अॉफीसर ला दाखवत विनंती केली की आपण रास्तपणे कामे केली तर कुणालाही काहीही त्रास होणार नाही. उलटपक्षी तुमच्या बद्दल लोकांना आदर वाटेल. तो मनुष्य खजील होऊन अस्वस्थ झाला. काही वर्षांनी त्याच व्यक्तीने निवृत्ती समारंभात (सेंडअॉफ) वेळी ही घटना त्याच्या आयुष्यात कलाटणी देणार्‍या घटनांपैकी एक असल्याचे सांगितले व हा एक मोठा टरनिंग पॉईंट असल्याचा उल्लेख केला. समोरच्या माणसात नैतिकता जागृत केली की तो एक उत्तम मनुष्य होतो ही महात्मांची शिकवण प्रत्यक्षात आली. "
- Sandeep Pitaliya

"मला माझे मित्र माझ्या शारीरिक व्यंगावर हसत असत पण मी त्याच्यावर किधीही प्रतिसाद दिला नाही त्यामुळे त्यानाच त्यावर वाईट वाटले व ते मला चिडविणे थांबले व मी समाजातील इतर लोकांसाठी मदत करू लागलो."
-Prithviraj Chava

"महात्मा गांधींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा पुरस्कार केला, स्वतःही याच तत्त्वांनुसार जगले आणि इतरांनीही तसे करावे असे सुचवले.आजच्या या युगात गांधीजींच्या विचारांची पुन्हा नितांत गरज आहे. आपल्या भारताला सुजलाम सुफलाम आणि जागतिक महासत्ता बनवण्यासाठी एकच मार्ग आहे तो म्हणजे गांधीजींचे विचार. माझी शाळा तशी दुर्गम. जायला नीट पक्का रस्ताही नाही. निसर्गरम्य अश्या घनदाट जंगलातून नेहमी प्रवास करावा लागतो. असेच एक दिवस शाळेत पोहोचतो न पोहोचतो तोच पाहतो तर काय गावात 10-12 लोक गोळा झाले होते आणि कुणाचा तरी रडन्याचा आवाज येत होता, सहजच माझे पाय त्या दिशेने वळले माणसांची ती सहज प्रव्रुत्ति आहे मना. आणि पाहतो तर काय एका 10-12 वर्षाच्या मुलाला जो की बाहेर गावी शिकत होता त्याला एक मुलगा मारत होता आणि बाकीन्चे बघे मज्जा घेत होते. मी दोघांना थांबवले आणि कारण विचारलं तर कारणही तीतकस मोठ नव्हत. आणि समजावून सांगितल दोघेही समजले. आज आपण पाहतो की अगदी किरकोळ कारणांसाठी लोक हानामारी वर येतात आणि नको ती संकटे आपल्यावर ओढावुन घेतात. जर आपण गांधीजींनी सांगितल्या प्रमाणे सत्य अहिंसेच्या मार्गाने वागलोत तर आपला देश सुजलाम सुफलाम नक्कीच होईल."
-Jitendra Sahala

"आमचे शेजारी आमच्या जाण्या - येण्याच्या रस्त्यावर बरेच वेळा पाणी सोडणे, कचरा फेकणे अशा स्वरूपाच्या अडचणी निर्माण करून आपली मानसिकता बिघडवून मुद्दाम भांडण करण्यासाठी परिस्थिती निर्माण करावयाचे परंतु आम्ही सर्व कुटुंबीय तरीही त्यांच्याशी सलोख्याने वागायचो.एकदा त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती आजारी पडली.त्यांना रक्ताची आवश्यकता होती. मी रक्तदान करून त्यांना मदत केली. त्यांना आश्चर्य वाटले. त्या प्रसंगानंतर त्यांच्या वागण्यात बदल झाला. "
-Ananda Sakate

"एकदा असच मी रस्त्याने चालत असताना मी तो रस्ता ओलांडत होतो . आणि मागून दोन तरुण पल्सर या गाडीवरून वेगात आले होते मी मी हात करत करत रास्ता ओलांडत होतो करण तिथं सिग्नलची सोय नव्हतीच आणि त्या तरुणांना गाडीचा वेग कमी करावा लागला त्यांनी मला अरेरावी करून खूप घाण आणि खालच्या पातळीची शिवी दिली पण मला काहीच वाटलं नाही उलट मला त्यांची कीव आली. मीच उलट त्यांना स्पस्ट आणि मोठ्या आवाजात मी म्हणालो ' भावा मला मनापासून माफ कर ' ही शिवी बरिच दिवसातून ऐकली मला आमच्या लहानपणी ची अक्तहवन झाली आणि उलट माझ्या आठवणींना तू उजाळा दिला .असा मी त्याला तोल लावला होता . त्या मित्राची त्यावेळेसची प्रतिमा पाहण्यासारखी आणि पडलेली आणि अपराधी वाटत होती. "
- Ajay Nemane

_Good_ _Words_

"स्वावलंबन हे तत्व मी महात्मा गांधीजींच्या जीवनातून शिकलो माझी जी काही वैयक्तिक काम आहेत ती स्वतः करण्याचा माझा प्रयत्न राहिला आहे कोणत्याही कामाला कमी समजायचं नाही म्हणजे श्रमप्रतिष्ठा हे तत्व मी गांधीजींकडून शिकलो फरशी पुसणे झाडू मारणे स्वछतागृह धुणे यांसारखी कामे करायला मला कसलीही लाज वाटत नाही. सगळयात महत्वाची गोष्ट मी गांधीजी कडून शिकलो ती म्हणजे मी जसे बोलतो तसे आचरण करतो माझ्या उक्ती आणि कृतीत कसलाही फरक नाही. आपण मांडलेल्या विचारांवर ठाम असणं हे मी गांधीजींकडून शिकलो "
- Mayur Dumane

"I am trying to follow social rules. 
cleanliness on roads & public places. 
No casteism at my work place or anywhere. 
Always try to practice Brotherhood & equality. 
I always try to have equality for everybody. 
I always insist on freedom of expression for everyone. 
I always like to fight against social injustice."
- Rajendra Inamdar

"गांधीजी हे या युगातील भारतीयांना लाभलेलं एक निस्सीम रत्न आहे. मी व्यक्ति पूजक नाही तरी सुद्धा गाँधीनी आचरणात आणलेले विचार आधी केले मग लोकांनी स्वतः अंगिकारले हे मानाला खुप भावत आले आहे, गांधीजीसारखं अभ्यासु, स्वछ, सुंदर आणि निर्भय जगणे, सतत मानवतेचा परिभाष्या स्वातन्त्र्य उद्घृत करणारं जगमान्य व्यक्तिमत्व असे आपले महात्मा गांधीजी त्यांच्या हा जगमान्य प्रभाव, माझ्या सारख्या भारतियाल नक्कीच प्रेरणादायी ठरत आल्या आहेत. मला अभिमान आहे की मी गाँधीजींच्या देशात जन्माला आलो. मला खात्री आहे की गाँधीजीचे विचार तरुणाना अधिक स्वावलंबी, राष्ट्रभिमानी व नीतिमान आणि गतिशील बनवतील"
-Arun Yawalikar

"Gandhi was one of those few individuals I came across, who are fearless and polite at the same time. Earlier I used to be arrogant while fighting anyone. And the fight used to lead to hatred. When I started controlling my anger but kept fighting with politeness instead of the option not to fight, I found my opponent is becoming my friend and he joins me in our fight together against the evil things. Evil things in me as well as him and in the society too. Sometimes I used to be coward  and glorified my silence as my politeness. Gandhi taught me how to be politely fearless. And fight to finish the badness in the people not to finish bad people."
- Vikas Shashwate

"मी सत्याची बाजू उचलून धरतो. मी माझे जीवन नैतिकतेने व्यतीत करण्याचा प्रयत्न करतो. मी माझा परिसर स्वच्छ ठेवतो. मी नेहमी कमजोर माणसाचा मागे उभा राहतो. मी नेहमी न्यायाची बाजू उचलून धरतो. मी नेहमी गोष्टीची सामाजिक सलोखा ठेवतो. मी माझा गरजा नियंत्रित ठेवतो. मी सादगीने जगतो."
-Parag Tamhankar

"अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे पण अहिंसक पद्धतीने पाठपुरावा करून हे तत्व कायम पाळत आलोय. विविध अडचणींमध्ये मी कायम ध्यान आणि माझी सद्सद्विवेक बुद्धी यावर भरवसा ठेऊन मार्ग काढत आलोय. रागावर नियंत्रण ठेवणे ही सर्वात कठीण गोष्ट करायला शिकलो ती गांधीजींच्या विचारसरणीचा माझ्यावर असलेल्या प्रभावामुळेच. बाकी साधी राहणी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. कुणाला न दुखावण्याचा कसोशीने प्रयास असतोच. महात्म्याला स्मरून इतकेच बोलेन की या मार्गावरून कधीही स्वतःला ढळलेले बघू शकणार नाही. धन्यवाद."
- Sudhan Kulkarni

"गांधीजींच्या तत्वांचा - सत्य , अहिंसा , सर्वधर्मसमभाव व स्वच्छता यांचा मी माझ्या जीवनात प्रत्यक्ष उपयोग करण्याचा नेहमीच प्रयत्न करतो. मला स्वच्छता ही अतिशय महत्वाची वाटते त्यानुसार मी नेहमी माझं घर, परीसर, मी ज्या ठिकाणी वावरतो ते ठिकाण नेहमी स्वच्छ ठेवतो . माझ्या पर्यावरणाची काळजी घेतो व वाढदिवसाला झाडे लावतो. मित्रांमधील भांडण शांततेत सोडवतो. स्त्रीपुरूष समानता व श्रमप्रतिष्ठा या तत्वांद्वारे स्त्रियांशी आदराने वागतो व कोणतेही काम कमी मानत नाही . प्रत्येक काम मन लावून करण्याचा प्रयत्न करतो. दैनंदिन कामात निर्माण होणार्या कचर्यातून खत, टिकाउ वस्तु तयार करतो. प्रत्येक वस्तूचा पुरेपूर वापर करतो जेणेकरून पैशाचा, नैसर्गिक संसाधनांचा अपव्यय होणार नाही."
-Vikram Rathod

"I am not practicing religious person but I respect all the religions (Sarva Dharma Samantva) unless religions are not following divisive way and untouchability (Sparshbhavana). In my personal life, I am happened to be a vegetarian (Non-Violence) but I do not enforce anyone to practice my beliefs and principles. I always stand by truth even if it is against me (Satya). I believe that all humans are equal irrespective of their religion, cast, color, gender, culture, state and country. In day to day life, whether I am working for Tribals, raising voice for human rights, fighting for Dalit issues or having my opinion on Feminism, I found Gandhi as a relevant and ideal person."
-Rohan Mutha

"Hate the Sin but not the siner. जेव्हा जेव्हा मला कुठल्याही व्यक्तीचा राग येतो तेव्हा तेव्हा या वाक्याचा मी नेहमी विचार करतो. त्यामुळे माझे मन शांत होऊन त्या व्यक्ती बद्दल माझ्या मनात कुठलेही​ वाईट विचार येत नाही. मी शिक्षक असल्यामुळे मला गांधीजी चे शिक्षणाबद्दल चे विचार नेहमीच मार्गदर्शन करीत असतात."
- Umesh Bhoyar

"गांधीजींचे महत्वाचे तत्व म्हणजे सत्य।या तत्वा नुसार मी नेहमी वाग्न्याचा प्रयत्न करतो जेव्हा मी सत्यवर असतो तेव्हा गांधीजींप्रमाने काशालाही घाबरत नही आपल्या माताची सख्ती करत नाही दुसर्याच्या मताचा सन्मान करतो पण मी गांधींप्रमाने हट्टी नाही सर्व धर्मांचा आदर करतो मी आस्तिक आहे ईश्वरच अस्तित्व मान्य करतो"
-Aslam Shah

"लौकिक जीवनातील यश किंवा अपयशाकडे निर्विकार दृष्टीने पाहतो. इतरांच्या धर्म व कर्मकांडासंबंधीच्या विचारांकडे उदार दृष्टिकोन बाळगतो. स्वतःच्या सुख दुःखा प्रमाणे इतरांचेही सुख दुःख महत्त्वाचे मानतो. स्थानिक वस्तू निर्मिती व वस्तू विनिमयाचा प्राधान्य देतो. शेतीमधील सेंद्रिय प्रयोग व खादीला महत्त्व देऊन वापरण्याचा प्रयत्न करतो. व्यवहारात यांत्रिकीकरणाला फारसे महत्व देत नाही. राष्ट्र म्हणजे भौगोलिक सीमा मानत नाही. त्या ऐवजी लोक त्यांचे सहजीवन त्यांचे प्रश्न महत्त्वाचे मानतो. भौतिक गरजा कमी करण्याचा प्रयत्न करतो. "
-Pramod Munghate

"गांधीजी समजून घेत असताना मी कोणत्याही धर्माचा द्वेष करणे सोडून दिले.माझ्या स्वभावात रागीटपणा होता.गांधी वाचत गेलो आणि त्यांच्या आयुष्यातील काही प्रसंगी खरे तर त्यांना प्रचंड राग आला पाहिजे.परंतु त्यांनी अगदी हसण्यावर नेले.नथुराम गोडसे ने चप्पल भेट म्हणून दिल्या.तो प्रसंग मला मुळापासून हादरून गेला.अतिशय प्रतिकूल परीस्थितीमध्ये विचलित न होता त्याला धैर्याने सामोरे जाण्याची शक्ती मला गांधीं कडून मिळते.अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करत असताना महात्मा गांधी यांच्या विचाराने काम करत गेलो.माझी व माझ्या पत्नीचे मिळून मासिक वेतन एक लाख पंधरा हजार आहे.परंतु गांधींच्या प्रभावामुळे आयुष्यातील गरजा मर्यादित ठेऊन अनेक सामाजिक संस्था ,संघटना यांना तसेच माझे विद्यार्थी यांना आर्थिक मदत करत असतो."
-Surendrakumar Ghadge

"1.सर्वप्रथम गांधीजींनी जे जे प्रयोग केले ते का व कोणत्या प्रसंगी केले ते समजून घेतले व त्याचा अंतिम उद्देश Welfare of All सर्वोदय होता हे समजून घेतले त्यामुळे माझ्या सर्व लिखाणाचा आणि व्यख्यानांचा अतींम सार हा सर्वोदय हाच राहिला. याचा खूप मोठा उपयोग मला तरुण वर्गाचा भरभरून प्रतिसाद मिळण्यात झाला. 
2.स्वतःच्या हाताने तयार केलेले खादीचे कपडे परिधान करण्यात जो स्वाभिमान मिळतो व जो आनंद मिळतो तो मला गांधीजींच्या खादीच्या स्वदेशी मंत्रामुळे मिळाला.
3.स्वतःच्या गरजा कमी करून त्यात आनंदी जीवन जगण्याचा मार्ग गांधी विचारातूनच मिळाला."
- Bhujang Bobade
#GandhiForever

तुम्हाला ही असे अनुभव येतच असतील पुढच्यावेळी तुम्ही पण सहभागी व्हा किंवा इथे कंमेन्ट मध्ये add करा 

संकेत मुनोत
गणेश भंडारी
Comment, Share ,Follow and Subscribe.

Saturday, December 16, 2023

ग्रेट भेट विथ उपेंद्र टण्णू सर


अनेक वर्षांपासून ओळखत होतो पण  काल अधिक परिचय घेता आला .सर चळवळीत काम करणाऱ्या विविध लोकांच्या बद्दल  फेसबुकवर नियमित लिहीत असतात.
 आपल्या जवळपास विविध प्रेरणादायी लोक असतात पण आपण त्यांच्याबद्दल माहिती प्रसारित न केल्याने भिडे सारखे विकृत लोक सामान्य लोकांसाठी आदर्श बनतात. कारण त्यांच्या बद्दल 90 बैठका, 100 जोर, PHD in automatic science इ सारखे अतिरंजीत  खोटे लेख नियमित  फॉरवर्ड होत असतात तर चवळीतील लोक एकमेकांवर टीका करतात पण चांगले लिहीत नाहीत  .
तर उपेंद्र सरांच्या बद्दल जाणून घेऊया 
 उपेंद्र सरांचे आई वडील राष्ट्र सेवा दलाच्या विचारांचे कार्यकर्ते होते. त्यामुळे लहानपणापासूनच ते त्याच्याशी जोडले गेले आणि शिबिरातून घडत गेले.सरांचे वडील यांनी बीए शिक्षण घेतले आणि शिक्षक झाले. त्यानंतर वकिलीचे शिक्षण घेऊन वकील झाले आणि काही वर्ष वकिली करून न्यायाधीशाची परीक्षा देऊन न्यायाधीश झाले. सरांच्या आई सुरुवातीला  शिक्षिका होत्या पण पती न्यायाधीश झाल्यावर दर काही वर्षांनी बदली होत असल्याने त्यांनी शिक्षिकेची नोकरी सोडली. 

1984 साली राष्ट्र सेवा दलाने छात्र भारती ही विद्यार्थी संघटना सुरू केली. त्यात उपेंद्र सर सक्रिय सहभागी झाले आणि महाराष्ट्राचा संघटक म्हणूनही त्यांनी काम केले.
 
बीएससीची परीक्षा दिल्यावर  त्यांनी वडील आणि भावाच्या इच्छेनुसार सहज म्हणून मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह च्या नोकरीसाठी मुलाखत दिली. ज्यात  त्यांचे सिलेक्शन झाले  आणि तीन वर्ष त्यांनी  मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कार्य केले.

1989 मध्ये राष्ट्रसेवा दलाच्या क्षीरसागर कुटुंबातील पुष्पाशी त्यांनी ठरवून आंतरजातीय विवाह केला. त्यांची विवाहाची कथा सुद्धा प्रेरणादायी आहे. छात्र भारतीचे  कार्यकर्ते पंढरपूरला गेले तेव्हा पुष्पाताईंचे वडील सेवा दलाचे कार्यकर्ते असल्याने त्यांच्या घरी उतरले होते. त्यानंतर टीम पुढच्या गावी गेल्यावर पुष्पा ताईंनी "हा मुलगा कोण होता?"  त्याची चौकशी केली आणि  त्यांच्या घरातून यदुनाथ थत्तेजींना याबाबत विचारणा झाली. त्यानंतर संजय पवार हे पन्नालाल सुराणा यांच्याशी बोलले आणि सुराणा यांनी  उपेंद्र सरांच्या विवाहाबद्दल पत्र क्षीरसागर  कुटुंबासाठी लिहिले. हे लग्न घडविण्यात पुष्पाताईंचा भाऊ व उपेंद्र सरांचा मित्र सुनील क्षीरसागर यांचा मोठा वाटा होता.
त्यानंतर पुण्यात साने गुरुजी स्मारक येथे त्यांचे नोंदणी पद्धतीने लग्न झाले. लग्नानंतर कुटुंबाच्या अर्थार्जनाची संपूर्ण जबाबदारी पुष्पाताईंनी घेतली, ज्या त्या आजही सार्थपणे निभवत आहेत. 

1993 मध्ये लातूर उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या प्रलयंकारी भूकंपानंतर मदत कार्यात सहभागी होण्यासाठी छात्र भारतीच्या सहकाऱ्यांसह किल्लारी येथे गेले. त्याच दरम्यान  मानवलोक संस्थेच्या डॉ. द्वारकादासजी लोहिया यांनी उमरगा तालुक्यातील सालेगाव येथे कायमस्वरूपी भूकंप पुनर्वसनासाठी उपकेंद्र सुरू केले. त्यांनी उपेंद्र सरांना "यासाठी निदान 5 वर्षे देणार का?" असे विचारले? ज्याला होकार दिल्यावर लोहियांनी त्यांना उपकेंद्राच्या प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली. या कामात पुष्पाताईंनी सुद्धा मोठा सहभाग घेतला.
 शेतकरी केंद्रस्थानी मानून त्यांच्यासाठी उसनवार खत बियाणे, विहिरींच्या गाळ काढणे, नवीन सामुदायिक विहिरी खोदणे, पाणलोट क्षेत्र विकास  त्याचसोबत  महिलांचे संघटन, आरोग्य असे अनेक उपक्रम  त्यात होते. पाच वर्षानंतर लोहियांनी संस्थेच्या विकेंद्रीकरणाची संकल्पना मांडली. ज्याला प्रतिसाद देत उपेंद्र सरांनी छात्र भारतीच्या साथींसह  1999 साली विकास भारती पुणे ही संस्था काळनिबाळा येथे सुरू केली. याच दरम्यान पुष्पाताई कलदेव निबाळा येथे शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होत्या. उपेंद्र सर आणि पुष्पाताई दोघेही येथे बचत गट, आरोग्य, शेतीपूरक व्यवसाय प्रशिक्षण त्यात रेशीम उद्योग, आळंबी उत्पादन अशा विविध  विषयांवर काम  केले.
 पुढे 2008 मध्ये मुलीच्या शिक्षणासाठी सोलापूर येथे शिफ्ट झाले. पुष्पाताई सोलापूर वरून काळनिंबाळ येथे शाळेसाठी ये जा करत होत्या.
 यानंतर सोलापूर येथून एक वर्ष साप्ताहिक प्रजापत्राचे कार्यकारी संपादक म्हणून कार्य केले आणि त्यानंतर राष्ट्रसेवा दलाच्या कामात पुन्हा सक्रिय झाले. 
मुलीची १० वी झाल्यावर तिने पुढील शिक्षण पुणे येथे घ्यायची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार तिच्यासह उपेंद्र सर पुण्यास शिफ्ट झाले.
 दरम्यान राष्ट्रसेवा दलाचे महामंत्री म्हणून त्यांनी दोन वर्षे काम केले.
 2021 पासून उपेंद्र सर एस एम जोशी सोशालिस्ट फाउंडेशन मध्ये सहसचिव म्हणून कार्य करत आहेत.
 "जीवनसाथी पुष्पाची आश्वासक व समर्थ साथ असल्यामुळेच मी सातत्याने काम करू शकतो" असे उपेंद्र सर सांगतात. विशेष म्हणजे सरांची मुलगी सानिया ही पण आता इंजिनियर म्हणून स्वतःच्या पायावर उभी आहे. तिचे नावही  सानिया पुष्पा उपेंद्र असे असून तिने आडनाव लावलेले नाही. मागच्याच वर्षी पासपोर्ट घेताना पोलिसांनी तिला "असे कसे नाव? आणि  आडनाव कुठे आह?" हे विचारले  तेव्हा तिने पोलिसांना चांगल्या प्रकारे समजावून सांगितले की आडनाव लावणे हे कसे पुरुषसत्ताक व्यवस्थेचे लक्षण आहे ज्याला पोलिस सुद्धा सहमत झाले.
 एखादी व्यक्ती गेली की आपण त्या व्यक्तीबद्दल भरभरून लिहितो आणि हळहळ व्यक्त करतो. पण जिवंतपणीच त्या व्यक्तींचे काम जाणून घेऊन  त्यातून प्रेरणा घेणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे या गोष्टी व्हायला हव्यात  म्हणून हा लेख प्रपंच.
(विशेष म्हणजे आर्थिक नियोजन करण्याच्या निमित्ताने आमची भेट झाली. ज्यात आर्थिक नियोजना बद्दल अनेक गोष्टी सरांनी माझ्या कडून समजून घेतल्या पण आर्थिक नियोजन सल्लागार सोबत मी एक सामाजिक कार्यकर्ताही असल्याने मला हे लिहणे ही महत्वाचे वाटले..)

 संकेत मुनोत
 16 डिसेंबर 2023

Comment, Share ,Follow and Subscribe.

हिंगणघाट मधील गांधींविचारी मंडळींची जाम येथे भेट


चंद्रपूरला असतानाच अभिजित सरांचा फोन आला की जाम या गावी भेटूया 

 हिंगणघाटहुन जाम या गावी हे सर्व भेटण्यास आले होते , अशोका हॉटेल, जाम येथे गप्पा एवढ्या रंगल्या की ते सर्वोदय आश्रम वर्धा पर्यत सोडण्यास आले आणि पुन्हा आश्रमात बसूनही बराच वेळ खूप छान विचारमंथन झाले
अभिजित डाखोरे सरांशी पूर्वी बऱ्याचदा फोनवर बोलणे व्हायचे पण प्रत्यक्ष भेट पहिलीच होती 
डावीकडून राजकुमार झोटिंग( सामजिक कार्यकर्ते),श्रीकृष्ण बोढे( प्राध्यापक, अर्थशास्त्र), अभिजित डाखोरे( प्राध्यापक), संकेत मुनोत, डॉ. शिवचरण ठाकूर( सर्वोदयी, नयी तालीम), रमेश झाडे( अध्यक्ष,  वर्धा जिल्हा सर्वोदय)

त्यातील काहींचा अल्प परिचय पाहूया

राजकुमार झोटिंग यांच्या मुलाचा अवघ्या 18व्या वर्षी मृत्यू झाला तेव्हा त्यांनी स्वतः  अश्या बिकट मानसिक अवस्थेत असतानाही त्याचे अवयवदान केले, त्यानंतर त्याच्या प्रित्यर्थ ambulance ही दिली आणि मोठे सामजिक कार्य त्यांच्याकडून सुरू आहे.

अभिजित डाखोरे यांनी 10 वीत असताना लोकमत मध्ये  'बापू हमे माफ करना'  लेख लिहला, जो खूप गाजला. सुरेश द्वादशीवार पासून अनेक जणांना वाटले कि कोणी तरी जेष्ठ विचारवंत असावा पण 10 वी तला विद्यार्थी पाहून ते थक्क झाले होते,  त्यांनी खूप छान कविता ऐकवल्या

रमेश झाडे हे शेतकरी पण वाचनामुळे गांधींविचारांकडे वळाले त्यांनतर पांढरे गुरुजींच्या एका व्याख्यानात ते एवढे प्रभावित झाले की त्यांनी तेव्हापासून इतर वस्त्रांचा त्याग करून फक्त खादीच घालण्याचा संकल्प केला जो आजवर सुरू आहे त्यांनी गांधी विनोबांच्या अनेक भावपूर्ण गोष्टी सांगितल्या.जसे की तुरुंगात गांधी पटेल नेहरू आणि इतर सर्वांना च खूप त्रास दिला जायचा पण त्यांनी त्याचे रसभरीत वर्णन केले नाही उलट तुरुंगाला मंदिर म्हटले...ज्यामुळे कैदी एवढे झाले कि इंग्रजांना तुरुंग कमी पडू लागले.
सृष्टीकडे सगळ्यांची गरज भागवण्याएव्हढे आहे पण एकाचा हव्यास भागवण्याएव्हढे नाही हे गांधीजींचे वाक्य सांगून गांधीविचार आजही कसे अनुकरणीय आहेत हे झाडे काकांनी पटवून दिले..
डॉ शिवचरण ठाकूर, श्रेकृष्ण बोढे यांच्याबद्दल पुन्हा कधी तरी लिहतो

तर पहा गांधी हयात नसतानाही विचारांनी कसे अनेक ठिकाणी जिवंत आहेत आणि तो विविध क्षेत्रात सकारात्मक बदल घडवत आहेत

देशातील वाढता द्वेष कमी करण्यासाठी या सर्व लोकांना जोडत या विचारांचा प्रसार अधिक वाढवण्याची गरज आहे

संकेत मुनोत 
16-12-2021

Comment, Share ,Follow and Subscribe.