आदरणीय अटलजी,
सादर प्रणाम, तुम्ही अश्या वेळी गेलात जेव्हा तुमची सर्वाधिक गरज आहे. तुमच्या सारखा कवी,वक्ता ,एक जननायक, पत्रकार, विरोधकांचा ही सन्मान करणारा संवेदनशील आणि मुत्सद्दी राजकारणी, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असणारा सच्चा माणूस आज हवा आहे.
आज बहुतेक जण देश टिकवण्याऐवजी द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत , तो जाती-जातीतील असो वा धर्मा -धर्मातील असो वा गायीवरुन असो , कुणी काय खावे यावरून लोकांना मारण्याचा असो वा कुणाला देशद्रोही ठरवून पाकिस्तानात जा म्हणण्याचा असो. तुम्ही एवढ्यांदा पंतप्रधान असताना असे कधीच का घडले नाही बरे ?
अश्यावेळी तुम्ही लोकसभेत सादर केलेल्या या कवितेची सर्वाधिक आठवण येते
सरकारें आएंगी, सरकारें जाएंगी, पार्टियां बनेंगी, बिगड़ेंगी, लेकिन देश का लोकतंत्र जिंदा रहना चाहिए। भारत का लोकतंत्र अमर रहना चाहिए
आज जेव्हा काही जण स्वतःच्या कर्तृत्वहीनतेचे श्रेय दुसऱ्यावर ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत जसे कि सत्ताधारी म्हणतात 60 वर्ष हे हे झालं नाही . मग आम्ही काय करणार आम्हला अजून थोडा वेळ द्या वगैरे, या उलट तुम्ही म्हणाला होतात कि..
" पिछले साठ सालोंमें हमारे देशने बहुत तरक्की की है! पिछली सरकारोंने कुछ काम नही किया ऐसा कहना इस देश के पुरूषार्थ पर प्रश्नचिन्ह लगाना है!"
मला आठवतय नेहरू हयात असतांना तुम्ही त्यांच्या भारत चीन धोरणावर प्रचंड टीका केली पण त्यांचे निधन झाल्यावर तुमच्याएवढं नेहरूंचे चांगलं वर्णन दुसऱ्या कुणीही केलं नसेल आणि तुमची सत्ता आल्यावर जेव्हा नेहरूंचा फोटो काढून टाकण्याचे कृत्य कुणी तरी केले तेव्हा तुम्ही तो फोटो पुन्हा तेथे लावण्यास सांगितला . संघाच्या मुशीतून आले असले तरी आपण संघाच्या हिंदुत्वाच्या मुद्द्याला कधी राजकारणातले मुख्य स्थान दिले नाही पक्ष स्थापन करतानाही त्यात 'गांधीवादी समाजवाद' हे आमचे मुख्य तत्व असल्याचे सांगून राजकारणात नेहरूंचे तत्त्व अंगिकारले आणि नेहरुंनी ही तुम्हाला ते हयात असतानाच ओळखले असावे म्हणूनच तुम्ही विरोधक असतांना ही तुमची ओळख भावी पंतप्रधान म्हणून करून दिलीच शिवाय निवडणुकीची सभा तुमच्या मतदारसंघात घेण्याऐवजी शेजारच्या मतदारसंघात घेऊन ''जनसंघात ही काही चांगले लोक आहेत आणि ते निवडून आले पाहिजेत'' असे सांगून तुमचे वेळोवळी कौतूकही केले
तुमची ही खालील श्रद्धांजली जेवढी नेहरूंवर लागू होते तेवढीच आपल्यावर ही
अध्यक्ष महोदय,
एक सपना था जो अधूरा रह गया, एक गीत था जो गूँगा हो गया, एक लौ थी जो अनन्त में विलीन हो गई। सपना था एक ऐसे संसार का जो भय और भूख से रहित होगा, गीत था एक ऐसे महाकाव्य का जिसमें गीता की गूँज और गुलाब की गंध थी। लौ थी एक ऐसे दीपक की जो रात भर जलता रहा, हर अँधेरे से लड़ता रहा और हमें रास्ता दिखाकर, एक प्रभात में निर्वाण को प्राप्त हो गया।
मृत्यु ध्रुव है, शरीर नश्वर है। कल कंचन की जिस काया को हम चंदन की चिता पर चढ़ा कर आए, उसका नाश निश्चित था। लेकिन क्या यह ज़रूरी था कि मौत इतनी चोरी छिपे आती? जब संगी-साथी सोए पड़े थे, जब पहरेदार बेखबर थे, हमारे जीवन की एक अमूल्य निधि लुट गई। भारत माता आज शोकमग्ना है – उसका सबसे लाड़ला राजकुमार खो गया। मानवता आज खिन्नमना है – उसका पुजारी सो गया। शांति आज अशांत है – उसका रक्षक चला गया। दलितों का सहारा छूट गया। जन जन की आँख का तारा टूट गया। यवनिका पात हो गया। विश्व के रंगमंच का प्रमुख अभिनेता अपना अंतिम अभिनय दिखाकर अन्तर्ध्यान हो गया।
आज जेव्हा लोकशाही आणि स्वातंत्र्य धोक्यात आहे तेव्हा तुमचे 'सत्ता' कवितेतील हे शब्द आठवतात
मासूम बच्चो
बूढी औरतो
जवान मर्द
की लाशों के ढेर पर चढ़ कर
जो सत्ता के सिंहासन तक पहुंचना चाहते है.
उनसे मेरा एक सवाल है
क्या मरने वालो के साथ
उनका कोई रिश्ता न था ?
न सही धर्म का नाता
क्या धरती का भी सम्बन्ध नहीं था ?
आगमे जले बच्चे
वासना की शिकार औरते
राख में बदले घर
न सभ्यता का प्रमाणपत्र है ,
न देश भक्ति का तमगा
वे यदि घोषणा पत्र है तो पशुता का
प्रमाण है ,पतित अवस्था का
ऐसे कपूतो से
मॉ का निपूती रहना ही अच्छा था
निर्दोष रक्त से सनी राजगद्दी
श्मशान की धुल से भी गिरी है
सत्ता की अनियंत्रित भूख
रक्त पिपासा से भी बुरी है
पाँच हजार साल की संस्कृति
गर्व करे या रोये ?
स्वार्थ की दौड़ में
कही आजादी फिर से न खोये। ………
कही आजादी फिर से न खोये। ………
तुमचे कथित वारसदार याच्या अगदी विरूद्ध वागत आहेत!! त्यांना ही तुमचे खरे विचार समजो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
आणि जीवनात आपली ही कविता अंगिकारत आहे
हार नहीं मानूंगा, रार नई ठानूंगा,
काल के कपाल पे लिखता मिटाता हूं,
गीत नया गाता हूं.
जय जवान, जय किसान, जय विज्ञान
आपलाच
संकेत मुनोत
#अटलबिहारी_वाजपेयी
No comments:
Post a Comment