आज पहिल्यांदा रक्तदान केले.
बकरी ईद निमित्त सामान्यतः बकऱ्यांची कुर्बानी दिली जाते. बांधवांनी या प्रथेमध्ये बदल करत बकरी ईद निमित्त रक्तदान करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
मुस्लिम सत्यशोधक मंडळ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नोइंग गांधीजम ग्लोबल फ्रेंड्स आणि राष्ट्र सेवा दल यांच्या वतीने आज नाथ पै हॉल , साने गुरुजी स्मारक, पुणे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये ५० बाटल्या रक्त संकलित झाले.
धर्माने सांगितलेल्या मानवी मूल्यांमध्ये *“त्याग”* हे महत्वाचे मूल्य आहे. ईस्लाम धर्मात ही उच्च ध्येय सिध्द करण्यासाठी *“कुर्बानी”* किंवा सर्वस्वाचा त्याग करण्याची शिकवण आहे. या त्याग आणि बलिदानाचे प्रतीक म्हणून *'ईद-उल-अजहा' (बकरी ईद)* चा सण इस्लाम धर्मियांमध्ये साजरा केला जातो. या निमित्ताने बकरे अथवा इतर प्राण्यांची कुर्बानी देण्याची प्रथाही पाळली जाते.
आजच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता, सर्व धर्मियांनी धार्मिक सण हे अधिका अधिक समाजाभिमुख व मानवतावादी करणे हे धर्माचेच उन्नयन आहे. हाच विचार समोर ठेवून “बकरी ईद” निमित्त पशूची कुर्बानी देण्याच्या प्रथेमध्ये कालानुरूप बदल व्हावा व या प्रथेला पर्याय म्हणून *दि.२२ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट २०१८* *“राज्यव्यापी रक्तदान सप्ताह”* अभियान राबविले आहे.
‘बकरी ईद निमित्त पशूची कुर्बानी देण्याच्या प्रथेमध्ये कालानुरूप बदल करून मनुष्याला आवश्यक असणाऱ्या रक्ताचे दान केले पाहिजे. भविष्यात भारतातील प्रत्येक जिल्ह्यात असे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येईल.’, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
व्यसपीठावर प्रा मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रा. शमसुद्दीन तांबोळी, माजी न्यायाधीश शहापूरकर , अंनिस चे डॉ श्रीपाल ललवाणी, नोइंग गांधीजम ग्लोबल फ्रेंड्सचे संकेत मुनोत, जेष्ठ कायदेतज्ज्ञ प्रवीण मोतीवाला उपस्थित होते.
सर्व समविचारी मित्रांनी व संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हे शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले त्या सर्वांचे आभार
No comments:
Post a Comment