आरोग्यविमा - आवश्यक कि अनावश्यक ?
आजच्या धावपळीच्या युगात आरोग्याचे प्रश्न दिवसेंदिवस वाढतच आहेत. ,वाढते प्रदूषण , प्रक्रिया केलेले अन्नधान्य, बदललेली आहारशैली, कसरतीचा अभाव , मानसिक ताण, व्यसने अशी अनेक कारणे याला आहेत.कधी कधी काही आजार अचानक उद्भवतात.
त्यासाठी रोज एक तास तरी व्यायाम करायलाच हवा तो शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचा. मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचें कारण असे उगिच का म्हटल आहे.
ही मुख्य कारणे असली तरी काही आजार किंवा अपघात सांगून होत नाहीत जसे आपण आसपास पाहतो कि एवढी चांगली व्यक्ती जिला तंबाखूचे किंवा कोणतेही व्यसन नाही त्याला cancer किंवा इतर काही आजार उद्भवतात आणि असे काही झाले तर पूर्ण कुटुंब त्या व्यक्तीच्या चिंतेत बुडते. आजारपणाचे दुख तर असतेच शिवाय आर्थिक अडचणींचा ही सामना करावा लागतो. अश्यावेळी त्या व्यक्तीला आपली सर्वाधिक गरज असते पण आर्थिक अडचण असेल तर आपण ते कसे जमा करता येतील या विवंचनेत गुंतून जातो आपली सगळी जमा केलेली बचत काढणे किंवा टी नसेल तर परिचित मित्र आदींना आर्थिक सहाय्यातेसाठी विंनती करणे
आणि ते शक्य नाही झाले तर सध्यात साधा दवाखाना पाहणे किंवा तसेच आजारपण काढणे. आणि अश्यावेळेस आठवतो तो मेडिक्लेम विमा सल्लागार. पण वेळ गेलेली असते.त्यामुळे पूर्वीच एखाद्या चांगल्या कंपनीची मेडिक्लेम पोलिसी काढायला हवी. रक्कम वर्षाला थोडीच भरावी लागते पण लाखोंचा खर्च cover होतो.
आपण आपल्या स्वतःसाठी किंवा आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी आरोग्य वीमा घेऊ शकतो. उदा.-पुण्यात राहणाऱ्या ०-३५ वयोगटाच्या कुटुंबाला Star Health ची रु ५ लाख ची (FHO) आरोग्य विमा पोलिसी काढण्यासाठी वर्षाला जवळपास फक्त रु. १० हजार लागतात.पण या दहा ह्जारांमुळे त्या कुटुंबाचा लाखोंचा खर्च वाचतो आणि बहुतेक चंगल्या हॉस्पिटल्स मध्ये हे कॅशलेस हॉस्पिटलायझेशन ( म्हणजे एकही पैसा ना भरता भरती आणि उपचार ) होते.सर्वात आधी गुंतवणूक ही आपल्या आरोग्यावर करा. आणि हो मेडिक्लेम काढताना त्यातील अटी वगैरे ही जाणून घ्या. कोणतेही आजारपण लपवून ठेऊ नका शिवाय जाहिरातीला भुलून जाऊन किंवा कुणी नातेवाईक किंवा मित्र आहे म्हणून आठव किमत कमी आहे म्हणून अंधपणे policy काढू नका. आपल्या पॉलिसीत कोणत्या गोष्टी कव्हर केल्या आहेत आणि कोणत्या नाहीत हेही जाणून घ्या.
आपल्या आयुष्यात कोणताही अडथळा न येता आपले आयुष्य सुरळीत राहो हा सकारात्मक दृष्टिकोन असतो पण दुरदृष्टी ठेऊन केलेल्या या नियोजनामुळे आपण भविष्यातील नकारात्मक शक्यतांना काही प्रमाणात मात करु शकतो. म्हणूनच आपला व आपल्या कुटुंबियांचा वीमा करुनच घ्यावा.
काहीजण कारणे देतात
१.मी कधी जास्त आजारीच पडलो नाही -
उत्तर - आजारपण किंवा अपघात सांगून येत नाही.
२. माझ्या ऑफिसने काढलाय आमचा मेडिक्लेम -
उत्तर - रक्कम किती आहे बहुतेक ठिकाणी २-३ लाखाच्या वर cover नसतो शिवाय जेव्हा तुम्ही एका ठिकाणी राजीनामा देऊन दुसरीकडे पाहायला जाता त्या दरम्यान आजारी पडलात तर काय?त्यामुळे पर्सनल policy ही हवीच.
सर सलामत तो पगड़ी पचास
आपलाच
©संकेत मुनोत
आरोग्य विमा सल्लागार
8087446346, 8446259159
No comments:
Post a Comment