AddThis code

Thursday, August 30, 2018

नाव बदललेल्या पोस्ट्स

नाव बदललेल्या पोस्ट्स
आपलाच लेख आपल्याला कुणा तरी दुसर्याकडून आला तर वेगळाच  आनंद होतो, कधी कधी मेसेज च्या शेवटी आपले नाव काढून दुसऱ्या कुणाचे नाव टाकलेले पाहिले तर थोडेसे वाटते कि बाबा याने असे का केले असावे? पण त्यापेक्षा आंनद या गोष्टीचा अधिक होतो कि  आपल्याला त्यातून जो संदेश पोहोचवायचा आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचतोय ना? आणि यासाठीच तर आपण तो लिहीला होता त्यामुळे त्याचा आंनद त्यापेक्षा मोठा असतो.
आत्तापर्यँत गांधींविचार , मला मोदी का आवडतात?ट्रॅफिक पोलिसांच्या व्यथा, पर्यावरण सारख्या अनेक लेखांचे असे अनुभव आले कि हे लेख अजूनही कुणाच्या ना कुणाच्या नावाने फिरत आहेत ज्याचा आंनद च होतो.
पण काल जेव्हा 'आरोग्य विमा आवश्यक कि अनावश्यक" ही पोस्ट लिहली ती ही अनेक विमा एजंट नी स्वतःचे नाव टाकून ठिकठिकाणी फॉरवर्ड केली.
  तर सांगायचे एवढेच होते कि माझ्या कुठल्याही पोस्टला कुठलेही कॉपी राईट्स नाहीत तुम्ही जी वाटेल ती पोस्ट बिनधास्त फॉरवर्ड करू शकता तुमच्या नावाने पोस्ट करू शकता. कारण माझी तळमळ एकच असते कि ते सत्य किंवा तो संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचवून शक्य तेवढे समाज प्रबोधन करणे.
शेवटी मीही निमित्तमात्र आहे
तुकोबांनी म्हटलेच आहे ना ..

फोडिलें भांडार धन्याचा हा माल । मी तंव हामाल भारवाही ॥

संकेत मुनोत

No comments:

Post a Comment