AddThis code

Thursday, August 30, 2018

द्वेषपूर्ण भडक भाषण देऊन समाजात फूट पाडणारे, राजकारण करणारेे संत नसतात

द्वेषपूर्ण भडक भाषण देऊन समाजात फूट पाडणारे, राजकारण करणारेे #संत नसतात
पण आजकाल असल्या भडक लोकांनाच जास्त भाव दिला जातोय,अपवाद वगळता प्रत्येक समाजात असली द्वेषपूर्ण भडक मंडळी आली आहेत आणि राजकीय लोकांकडून या लोकांना जास्त भाव मिळत असल्यामुळे कट्टर अंधभक्तांसोबतच कट्टरताही वाढत चालली आहे

साधुची लक्षणे संत तुकारांमनी सांगितली आहेत ती अशी

जे का रंजले गांजले । त्यासि म्हणे जो आपले ।। १।।

तोची साधू ओळखावा ।। देव तेथे चि जाणावा ।।धृ.।।

#मृदू_सबाह_नवनीत । तैसे सज्जनाचे चित्त ।। २।।

ज्यासि अंपगिता नाही । त्यासि घरी जो हृदयी ।। ३।।

दया करणे जे पुत्रासी । ते चि दासा आणि दासी ।। ४।।

तुका म्हणे सांगू किती । तो चि भगवंताची मूर्ती ।। ५।।

संत कबिरांनीही म्हटले आहे
पोथी पढ़ि पढ़ि जग मुआ, पंडित भया न कोय,
ढाई आखर प्रेम का, पढ़े सो पंडित होय।

साधु ऐसा चाहिए, जैसा सूप सुभाय,
सार-सार को गहि रहै, थोथा देई उड़ाय।

वरील सर्व गुण नाही पण याच्या जवळपास आचरण करणारी संत मंडळी प्रत्येक समाजात आजही बऱ्याच प्रमाणात आहेत  भडक विचारांच्या लोकांना media, राजकीय लोक व इतर ठिकाणाहून ही जास्त प्रोत्साहन मिळत असल्यामुळे ह चांगले लोक दुर्लक्षित राहतात पण अजूनही बहुतेक ठिकाणी अश्या कट्टर द्वेषपूर्ण भाषण करणाऱ्यांना लोकांनी स्वीकारलेले नाहीये पण या कट्टर व्यक्तींचा त्या दृष्टीने प्रवास सुरु आहे आणि पूर्ण समाजाचे नेतृत्व जर असल्या भडक लोकांकडे गेले तर त्या त्या समाजची कट्टरतेकडे वाटचाल होइल जे देशासाठी विघातक आहे

त्यामुळे यातील चांगल्या संतांना जोडण्याचा प्रयत्न सुरु आहे काहींना भेटलो अनेकांची भेट बाकी आहे पण प्रयत्न सुरु आहेत आपल्यालाही असे काही संत माहित असतील तर नक्की कळवावे आमची टीम त्त्यांची भेट घेईल

No comments:

Post a Comment