AddThis code

Monday, December 30, 2019

31डिसेंबर च्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद


31डिसेंबर च्या कार्यक्रमाला  उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद
#एक_शाम_नये_साल_के_नाम मॉमइंडिया च्या सुश्मिता भंडारी , मोहन भंडारी आणि टीमने रंगलेली गाण्याची मैफल  सुंदर होती
विशेष म्हणजे नवीन वर्षाचे स्वागत दारू किंवा कोणत्याही अमली पदार्थाने न करता दुधाने करण्यात आली. केवळ 4-5 दिवसांपूर्वी ठरवलेल्या या कार्यक्रमाला एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणेे आश्चर्य होते पुढच्या वेळी अधिक प्रयत्न करू
संकेत मुनोत @ Pune, Maharashtra

Sunday, June 30, 2019

एक अवलिया व्यक्तिमत्व #विजय_विल्हेकर

काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये या अवलीयची चंद्रकांत वानखेडे सरांनी ओळख करून दिली आणि मग बराच वेळ गप्पा मारता आल्या या एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाला माझ्याबद्दल माहिती पण मला त्त्यांच्याबद्दल काही माहित नाही लाज वाटू लागली स्वतःच्या अज्ञानाची.
चित्रपटातला विजय दीनानाथ चौहान नावाचा महानायक सर्वांना माहीत असतो पण वास्तविक जगात समाजासाठी आपले आयुष्य वेचणारा विजय विल्हेकर कुणाला माहित आहे का?
आत्ताच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता तब्बल एक तास गप्पा झाल्या एवढा मोठा माणूस पण त्याचे माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावरही बारीक लक्ष आहे तुझे सगळे लेख वाचत असतो असे त्यांनी सांगितले.त्यांच्या संघर्षाबद्दल आणि जीवनप्रवासाबद्दल पूर्ण नाही पण थोडेसे जाणून घेता आले ते असे
त्त्यांचा अल्पपरीचय देण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्याशी झालेला संवाद आणि लोकसत्ता या वृत्तपत्रात आलेला लेख यातून खालील अल्पपरीचय देण्याचा प्रयत्न करत आहे
त्त्यांचे पुस्तक पाठयपुस्तक मंडळात CBSC साठी संदर्भ पुस्तक म्हणूनही वापरले जाते
जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनापासून तर अकोला व औरंगाबाद विद्यापीठाचे आंदोलन असो की, शेतकरी, शेतकरी संघटना यांची सुरू असलेली चळवळ असो विजय यशवंत विल्हेकर नावाचे हे कलंदर व्यक्तिमत्त्व आज साठीच्या उंबरठय़ावरही तसेच कार्यप्रवण आहे.
दर्यापुरात जन्मलेले विजूभाऊ तसे चांगल्या खात्यापित्या घरचे. वडील स्वातंत्र्य सैनिक, तीन भाऊ, असे भरलेले कुटुंब. वडिलांच्या स्वातंत्र्य चळवळीतील सहभागाचा प्रभाव व वारसा मुलांनीसुद्धा हिरिरीने उचललेला.. १२ एकराची शेती मुलांप्रमाणे सांभाळून समाजकार्य करणारे हे घर दर्यापूरच्या पंचक्रोशीत चांगलेच लोकप्रिय. विजूभाऊंचे बंधू अकोला येथे कृषी विद्यापीठ व्हावे, या आंदोलनातील सक्रीय पुढारी. तरुण वयातच आंदोलनात उतरलेल्या या बंधूंकडून प्रेरणा घेत विजूभाऊही भारावलेलेच होते.तर एक भाऊ वैद्यकीय विद्यापीठात डीन म्हणून अशाच वातावरणात शाळेत एकपाठी असलेले विजुभाऊ वैद्यकीय महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी ते अमरावतीत आले अन् संपूर्ण आयुष्याचीच दिशाच बदलून गेली. तो काळ होता जयप्रकाश नारायण नावाच्या वादळाचा.. जेपींचे आंदोलन असे संबोधन तरुणांच्या मुखावर होते. छात्र संघर्ष वाहिनीची माहिती विजूभाऊंना मिळाली अन् ते भारावून गेले.. त्यातच त्यांची भेट चंद्रकांत वानखेडे, देवेंद्र आंबेकर, कमल कारवा, अशा ध्येयवेडय़ा तरुणांशी झाली अन् पाहता पाहता विजूभाऊ या आंदोलनात सक्रीय झाले. जेपींची विचारसरणी खूप खोलवर रुजली व संपूर्ण जीवनालाच कलाटणी मिळाली. ते तत्वज्ञान जीवनाचे तत्वज्ञान झाले, असे विजूभाऊ आजही मानतात. जेंपीच्या प्रभावात संपूर्णपणे डुंबून गेलेले
विजूभाऊ त्याच दरम्यान औरंगाबाद येथील विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनात उतरले.त्या आंदोलनातील प्रक्षोभक भाषा अन् जेपींची खोलवर जाणारी शांत वैचारिक पेरणी, अशा विरोधाभासी प्रवाहाचे मंथन विजूभाऊंना अस्वस्थ करू लागले, मात्र त्याच वेळी एका बैठकीत प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी झोपलेल्या समाजाला जागे करण्यासाठी अशाच आक्रमक शैलीची गरज स्पष्ट केली अन् मग विजूभाऊंनी त्याही आंदोलनात उडी घेतली. काही काळ औरंगाबाद येथे व्यतित करून विजूभाऊ दर्यापूरला परतले.यादरम्यान आंबेडकरी साहित्याचाही खुप अभ्यास केला त्या चळवळीत होते
काळ होता शरद जोशींच्या उदयाचा. शेतकरी संघटनेची बांधणी झालेली नव्हती. त्यांची ओळख कांद्याचे आंदोलन करणार नेता, अशीच होती. एक ‘जोशी’ शेतकऱ्यांचा विचार मांडतो, याबाबतच प्रथम साशंकता होती, मात्र त्यांचे विचार वाचायला मिळाले  अन् हे ‘बेणं’ काही वेगळं आहे, हे लक्षात आल्याचे विजूभाऊ सांगतात. अशातच दर्यापुरातील कार्यकर्त्यांनी शरद जोशींची सभा ठेवली. हजारोंनी लोक आले. मंडप, शामियाना असा सभेचा मोठा तामझाम होता. जोशी बोलायला उभे राहिले. त्यांनी पहिलेच वाक्य म्हटले, हा तामझाम म्हणजे मृताच्या सोहळ्याला आपण जमलो आहोत, असे वाटते, असे म्हटले व त्याच वाक्याने शेतकऱ्यांसाठीची कळकळ विजूभाऊंना भावली. जोशींची मांडणी, त्यांचे तत्वज्ञान, देहबोली व साऱ्या प्रकाराने त्यांनी मनोमन शरद जोशींच्या नावाचा गंडा हाताला बांधला. अशा भारावलेल्या वातावरणात शेतकरी चळवळ फोफावू लागली. लहान मोठय़ा प्रश्नावर शेतकरी आक्रमक होऊ लागले व दर्यापूर परिसरातील शेतकऱ्यांचे नेतेपण आपोआप विजूभाऊंकडे आले. त्यामुळे पुढे शरद जोशींनी शेतकरी संघटनेची बांधणी अधिकृतपणे केली व या संघटनेचे पहिले तालुकाप्रमुख व अमरावती जिल्हा संघटक प्रमुख म्हणून विजूभाऊंच्या शिरावर जबाबदारी आली. छातीला ‘बिल्ला’लागला तो आजतागायत कायमच आहे.
संघटना आता वाढली पाहिजे म्हणून विजूभाऊंनी १९८२ मध्ये पहिली प्रचारयात्रा सायकलवरून काढली. ५ कार्यकर्त्यांच्या सहभागाने सुरू झालेली ही प्रचार यात्रा ‘बघता काय सामील व्हा’ असा गजर करीत तालुक्यात फिरू लागली. गावागावातून सायकली वाढत होत्या. कार्यकर्ते जुळत होते, पण संख्या मनासारखी होत नव्हती. यात्रेचा १२ वा दिवस होता. सायकल चालवून सर्वाच्याच हातापायाचे व कमरेचे हाल झाले होते. बाजूच्या शिवर गावात यात्रेचा मुक्काम होता, मात्र या गावात जाण्याचा मार्ग वावरातून होता अन् नांगरटी झाल्यामुळे या वावरातून सायकली उचलून न्याव्या लागल्या. इतके टोले घेऊनही लोकांना त्याची जाण नाही म्हणून यात्रेतील कार्यकर्त्यांना नैराश्य आले होते.
विजूभाऊंचा जीव ‘कावला’ होता. नको ती झंझट, असा विचार मनात तरळत असतानाच गावाची वेस आली अन् या वेशीवर स्वागताची जय्यत तयारी पाहून सारेच हरखले. या गावातील अरविंद माधवराव देशमुख या कार्यकर्त्यांने ही तयारी केली होती. लहानशा आजारपणामुळे या कार्यकर्त्यांला यात्रेत सहभागी होता आले नाही, मात्र त्याने यात्रा सुरू झाल्यापासून सुतकताई सुरू केली व १२ दिवसात कातलेल्या सुतांपासून तयार केलेला हार घालून सर्वाचे स्वागत केले. ही बाब समोर येताच यात्रेमागील लोकांची भावना या कार्यकर्त्यांना भावली अन् यात्रेचा जोम वाढला. ५ सायकलींवर सुरू झालेली ही यात्रा समारोपापर्यंत २०० सायकलींवर पोहोचली होती. हे पहिले यश होते. विजूभाऊ म्हणतात, ‘अरविंदबाप्पूने हार टाकून आमच्या मनातील पळपुटेपणाचा विचार हरविला.’ होय! ते खरेच ठरले. कारण पुढे प्रत्येक आंदोलन अन् विजय यशवंत विल्हेकर हे समीकरण रुजले.
८५ च्या दशकात शरद जोशींनी पुढाऱ्यांना गावबंदी आंदोलन पुकारले. तो काळ निवडणुकीच्या वाऱ्यांचा होता. दर्यापूरच्या सूतगिरणीची कोनशिला बसविण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण येणार होते. सर्व कार्यकर्त्यांनी गावबंदीची तयारी केली, मात्र रातोरात सर्वाना अटक करण्यात आली. फक्त दोघेच सुटले. विजूभाऊ व मधुकर गावंडे या दोघांनी गुपचूप एक झेंडा घेतला अन् हेलिपॅडवर गेले. शंकरराव हेलिकॉप्टरमधून उतरताच गर्दीतून उसळी मारत संघटनेच्या घोषणा देत दोघेही पुढे निघाले, मात्र खुद्द एस.पीं.नी धाव घेत यांना पकडले. हक्कासाठी भांडतो, कॉलर सोडा, असे एस.पीं.ना खडसावून सांगताच त्यांनी सोडले व सहकार्य करा, अशी विनंती केली. त्यानुसार मग निषेधाची घोषणा देत पोलीस स्टेशनमध्ये सभा रंगली, असा किस्सा आजही विजूभाऊ आवर्जून सांगतात.
दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांची पहिली कर्जमुक्ती झाली. त्यातूनच मग कापूस आंदोलनाची मुहूर्तमेढ रोवली गेली. शहीद बाबू गेनू यांच्या स्मृती दिवसापासून या आंदोलनाची सुरुवात झाली.
जळतो रे कापूस। कापसाला वाचवा।।
रूम्हण्याचा हिसका। दिल्लीला दाखवा।।
अशा घोषणांनी सारा कापूस प्रश्न पेटला होता. विजूभाऊंनी सारा अमरावती जिल्हा पिंजून काढला. शेतकऱ्यांमधील असंतोष पेटविला. दर्यापुरात निघालेल्या रॅलीत तब्बल ८९ ट्रॅक्टर्स सहभागी झाले होते, हा आतापर्यंतचा विक्रम होता.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असे लढताना विजूभाऊंचा सच्चा कार्यकर्ता, असा लौकिक वाढत होता. त्यातच स्वतंत्र भारत पक्ष नावाने शेतकरी संघटना राजकारणात उतरली. दर्यापूर मतदारसंघात पोटनिवडणूक लागली होती. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसोबतच शेतकरी आत्महत्या हा अतिशय चिंतेचा प्रश्न निर्माण झाला होता. आता आंदोलनापेक्षा या प्रश्नावर संवेदनशीलतेने काम झाले पाहिजे म्हणून विजूभाऊंनी अशा कामात झोकून दिले. अशातच स्वतंत्र भारत पक्षाने विजूभाऊंना मैदानात उतरविले. निवडणुकीची इच्छा नव्हती, पण नेत्याचा आदेश होता. स्वत: शरद जोशी प्रचाराला येणार होते. विजूभाऊंची बांधीलकी पक्की होती. त्यांनी शेतकरी आत्महत्या झालेल्या कुटुंबाच्या घरून आपल्या प्रचाराला प्रारंभ केला. जय-पराजय हा प्रश्नच नव्हता. या निमित्ताने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे प्रश्न लोकशाहीच्या मोठय़ा व्यासपीठावर मांडता येतील, याचे समाधान त्यांना अधिक असल्याने मते मागण्यापेक्षा शेतकरी तत्वज्ञानच ते अधिक सांगत. शरद जोशींच्या सभेला झालेली गर्दी ही आतापर्यंतचा उच्चांक होता, पण सभेची गर्दी मतात परार्तित होत नाही, हे सत्य कळूनही पोटनिवडणुकीनंतरही त्यांनी दुसऱ्यांदा निवडणूक लढवली तेव्हाही विजूभाऊंच्या बाबतीत खरे ठरले. राजकारणात गुंतून राहण्यापेक्षा त्यांनी संघटनेचा विचार वाढविला. दररोज किमान हजारभर पत्रे ते लिहीत. यासोबतच त्यांच्या विविध कवितांनी समाजमन ढवळून निघत असे. विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न त्यांनी लावून धरला. तो थेट राष्ट्रपतीपर्यंत पोहोचविला. कुठलाही सणवार त्यांनी अशा कुटुंबाविना साजरा केला नाही. आत्महत्या झालेल्या कुटुंबातील महिला भगिनींना एकत्र करून स्वत:च्या घरी अक्षयतृतीया केली, असे अनेक उदाहरणे आहेत. कुणालाही नमस्कार करण्यासोबतच त्याला आलिंगन देण्याची त्यांची पद्धतही समोरच्यासाठी जादूच्या झप्पीपेक्षा निश्चितच कमी नसते.
अजब लग्नाची गजब कहाणी
लग्नच करायचे नाही. समाजकार्याला वाहून घ्यायचे, हा ध्यास विजूभाऊंचा होता, पण वडिलांनी आग्रह केला. लग्न कर. समाजकार्यात आम्ही बाधा आणणार नाही, असा शब्द दिला अन् यवतमाळच्या दुर्गे परिवारातील सिंधूसोबत विजूभाऊंचा विवाह ठरला. देणे-घेणे हा प्रकारच नव्हता, पण सासऱ्यांनी विचारले, किती माणसे येतील, जेवणाचा अंदाज ठरवता येईल तेव्हा विजूभाऊ म्हणाले, आमचे पाहुणे ‘शिदोरी’ घेऊन येतील. त्यांना सवय आहे. तुमच्याच पाहुण्यांचे बघा. शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते नेहमीप्रमाणे शिदोरी घेऊन गेले होते. मारुतीच्या पारावरून नवरदेव निघणार म्हणून घोडा आला होता, पण विजूभाऊंनी एका मित्राच्या गाडीवर मंडप गाठला. मंडप मस्तपैकी सजला होता तो शेतकरी संघटनेच्या घोषणा फलकांनी. मंडपात सारेच वऱ्हाडी ‘बिल्लेवाले’. लग्नांचे मंत्र सुरू झाले अन् तिकडे घोषणांनी मंडप निनादू लागला. सावधान! झाले की एक घोषणा, असा सारा प्रकार लग्नात होता. सकाळी नवरी घेऊन दर्यापूरला परत येत असतानाच कृषी विद्यापीठ आंदोलन ज्याच्या खांद्यावर बसून अनुभवले ते प्रभाकर तराळ यांचे निधन झाल्याची वार्ता विजूभाऊंना समजताच ते तडक त्यांच्या घरी गेले अन् सर्व विधी संपल्यावर परतले. या वल्लीचा संसार वादळाप्रमाणे सांभाळायचा आहे, याची जाणीव सिंधूताईंना पहिल्याच दिवशी झाली ती आजपर्यंत उत्तमपणे सांभाळली आहे.(2)
आज फोनवर ते म्हणाले
राजा राम हो या रावण , प्रजा को सीता की तरह सजा भूगतनी पडती है अगर राजा राम हो तो वनवास जाना पडता है और रावण हो तो उसका हरण हो जाता है
अजून काही गाणीही यावेळी त्यांच्या शैलीत ऐकता आली जसे कि 'देदी हमे आझादी बिना खड्ग बिना ढाल साबरमती के संत तुने कर दिया कमाल'
मागे समाजात विष पसरवणार्ऱ्या पोंक्षेच्या नाटकालाही ते गेले होते त्या नाटकात एक क्षण असा येतो जेव्हा नाटकाचा नायक खोटे नाटे सांगून प्रेक्षकांमध्ये राष्ट्रपित्याबद्दल चीड निर्माण होईल असे विषारी वातावरण निर्माण करतो आणि एक डायलॉग म्हणतो नेमकी त्यापूर्वीच विजू भाऊनी 'महात्मा गांधी की जय' अशी घोषणा दिली यांनंतर नाटकाचा नायक त्याचा डायलॉगच विसरून गेला आणि पुढचे नाटक पूर्ण विस्कटले पण यांनंतर विजुभाऊंना रात्रभर झोप आली नाही तो कलाकार खोटे जरी बोलत असला तरी शेवटी त्याची ही कला आहे आपण स्वतः कलाकार असताना असे करणे गांधीविचाराशी तेवढे सुसंगत नाही असे समजून त्यांनी रचनात्मक रीतीने गांधीविचार पोहोचवण्याचा संकल्प केला.2 वर्षांपूर्वी त्यांनी अमरावतीत 500 मुलांना गांधी वेष घालून पूर्ण गावातून प्रभात फेरी काढली वेगवेगळ्या शाळेत जाऊन गांधींजीबद्दल माहिती सांगू लागले.
सामजिक क्षेत्रासोबतच , अभिनय आणि गायन या कौशल्यातही ते बाप आहेत त्याबद्दल लवकरच मांडण्याचा प्रयत्न करेन
असो लिहताना काही चुकले असल्यास क्षमस्व
संकेत मुनोत
संदर्भ-
1.त्यांच्याशी फोनवर झालेला संवाद
2.राजेश पाटील यांचा लोकसत्ता मधील लेख
3.आम्ही सारे समूहातून मिळालेली माहिती
#अवलियाव्यक्तीमत्व
02 जुलै 2017 रोजी लिहलेला लेख

Sunday, June 23, 2019

My father and me

परवा father's day  दिवस झाला अनेक जण वडिलांबद्दल भरभरून लिहित होते पण मला काही ऑफिसमुळे ते शक्य झालं नाही शिवाय एखाद्याच एकदम दैवतीकरण करण किंवा नुसतं गोड गोड बोलणं मला जमत ही नाही
काल पप्पांचा वाढदिवस झाला त्यानिमित्त पप्पा तुमचे हार्दिक अभिष्टचिंतन
फोटोत साधे भोळे दिसत असले तरी आतून प्रचंड कडक म्हणजे मी खूप मार खाल्लेला आहे त्यांचा अगदी दहावीपर्यँत
आमचे दोघांचे विचार प्रचंड भिन्न म्हणजे खूप सारे मतभेद आहेत पण आनंदाची गोष्ट म्हणजे मनभेद मात्र नाहीत
उदा-
-त्यांचा ज्योतिष वगैरे वर बराच अभ्यास म्हणजे अनेक नातेवाईक व परिचित लोक त्यांच्याकडे ज्योतिष वगैरे पहायला येत.
इकडे माझा नशीब-ज्योतिष या गोष्टींवर अविश्वास आणि विज्ञानावर अधिक विश्वास.
पण माझ्यामुळे हळू हळू त्यांनीही स्वतःत थोडे बदल केले , आता नाही पाहत ते तेवढं ज्योतिष वगैरे,  म्हणजे पूर्ण बंद केलं अस मी म्हणणार नाही कारण मला त्यांच्यावर माझे विचार लादायचे नाहीत, विचारांचा प्रवास नेहमी ह्रदयाकडून मेंदूकडे होत असतो आणि तो तसाच होईल मी माझे विचार कधीही त्यांच्यावर लादणार नाही
वृत्तपत्र रोज वाचत असले तरी घर आणि नोकरी सोडून इतर कशात त्यांना जास्त रस नाही.
या उलट मला कशा कशात रस आहे आपणास माहीतच आहे(टीप- घर आणि करिअर ची जबाबदारी पूर्ण करूनच मी या गोष्टीत लक्ष घालतो).
पैश्याच्या बाबतीत प्रचंड काटकसरी
याउलट मी थोडा उधळ्या(त्यांच्या नजरेत तरी) , जिथे लागेल तिथे बिनधास्त खर्च करणारा(त्यांनी तसे दिवस पाहिलेत त्यामुळे त्यांच तस असण स्वाभाविक आहे)
खाण्याच्या बाबतीत पण ते घरी सर्व भाज्या व जे ताटात असेल ते खातात, तर मी त्याच्या अगदी विरुद्ध, खाण्याच्या बाबतीत घरी माझे बरेच नखरे असायचे(कडा बोर्डिंगमध्ये 2 वर्षे राहून आल्यापासून ते नखरे ही अगदी कमी झाले आहेत)
अश्या खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या दोघांच्या अगदी विरुद्ध किंवा भिन्न आहेत
पण काही गोष्टी त्यांच्याकडून उपजत मिळाल्या त्या म्हणजे निर्व्यसनीपणा, प्रामाणिकपणा आणि चिकाटी
(चिकाटी- एकाच ठिकाणी 22 वर्षे नोकरीला शेवटी संगणक आल्यावर त्यांचे तेथील कामच बंद झाल्यवर दुसरीकडे जॉईन झाले, माझ्यात तेवढी चिकाटी नाही पण आजच्या काळात तुम्हाला नवीन काही शिकायचे असेल तर बदलण्याशिवाय पर्याय नसतो असेही मला वाटते)
त्यांना सामजिक,साहित्यिक किंवा इतर गोष्टीत तेव्हा ही रस नव्हता आजही नाही
म्हणजे ते मला त्यावरून नेहमी बोलतात - कि काय उगाच लेख लिहायचा, काय मिळत त्यातून, कोण त्या IAS निधी चौधरी तुला काय घेणं त्यांचं, कशाला त्यांच्याशी बोलतोस, लोकांना गोळा करतोस , गांधीला काय कळतं होत का?, 'आपण भल आपलं घर भल'  अश्या अनेक पद्धतीने ते मला आजही बोलतात..
पण तुषार गांधी सर किंवा काही मान्यवर घरी आले तेव्हा किंवा माझ्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळेस संजय आवटे सरांनी जेव्हा त्यांना माझ्याबद्दल सांगितलं तेव्हा ते जाम खुश झाल्याचेही पाहिले,
मागे कुणीतरी परिचित माझ्याबद्दल कुचाळक्या(चहाड्या) करत होते कि काय ते तुमचं पोरगं पुणे विद्यापीठात अन कुठे कुठे व्याख्यानाला जात, अन कशाला ते सामजिक कार्य करायचं न लोकांना एकत्र आणायचं न  इतर गोष्टी करायच्या त्यापेक्षा तोच वेळ विमा पॉलिसी काढून पैसे कमवायला लावायचा,  तेव्हा पप्पा म्हणाले होते कि "कुटुंब आणि करिअर सांभाळून च करतोय ना तो ते, तुमच्यासारखा तर नाही याच्या त्याच्या उचापत्या करत फिरत? आणि कुणाला ही नाही बोलवत अस पुणे विद्यापीठ व्याख्यानाला,  काहीतरी असलं म्हणूनच बोलवलं असलं ना विद्यापीठाने.."ते हे बोललेलं मला आईकडून कळाल, पण ऐकल्यावर बर वाटलं
असो जवळपास 60 वर्षापूर्वी करंजी जवळ एका छोट्याश्या खेड्यात त्यांचा जन्म झाला
7 वी पर्यँत त्या खेड्यातच शिक्षण करून पुढच्या शिक्षणासाठी अहमदनगर येथे एका परिचितांकडे ते राहिले आणि थोडे शिक्षण करून त्यांचे कुटुंबच 35 वर्षापूर्वी पुण्याकडे स्थायिक झाले, सुरुवातीचा काही काळ अत्यंत हलाखीचा म्हणजे 1991-1994 दरम्यान घरी काहीच समान भांडी वगैरे नव्हते आई वडील दोघांनी अतोनात कष्ट करून हळूहळू घर व्यवस्थित केले, एका दुकानी पूर्ण वेळ काम करून घरी 2-3 जणांची कामे ते आणत(दिवानजी), म्हणजे काही वर्ष फक्त 4-5 तास झोपून त्यांनी काम केलं,  पण जस कॉम्प्युटर आला तसा त्यांच्यासारख्या अनेकांची काम संगणक काही क्षणात करू लागला आणि त्यांना दुसरीकडे जॉईन व्हावे लागले,  स्वतःच्या प्रामाणिकपणाच्या जोरावर ते अजूनही तिथे टिकून आहेत. माझ्या शिक्षणासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले.
असो गिफ्ट वगैरे काय देणार मी पप्पा तुम्हाला तुम्हाला गिफ्ट देण्याएवढा मोठा मी कधीच होऊ शकणार नाही, पण एवढ नक्की सांगतो कि तुमचे जे निर्व्यसनीपणा, चिकाटी आणि प्रामाणिकपणा हे गुण आहेत ते शेवटपर्यँत स्वतःत कायम ठेवेन कधी कुणाला फसवणार नाही एवढेच वचन देतो
पप्पा तुम्हीही रोज सकाळी/संध्याकाळी काही वेळ फिरायला जाऊन थोडा शारीरिक आणि मानसिक व्यायाम करून स्वतःचे आरोग्य अधिक चांगले करा ही विनंती
फोटो 3 वर्षापूर्वीचा..

Monday, June 17, 2019

साम टीव्ही वरील चर्चेत युवा अभ्यासक म्हणून वारी आणि संत विचार याबद्दल मांडलेले मुद्दे

आजच्या #साम_टीव्ही वरील चर्चेत तरुण अभ्यासक म्हणून सहभागी झालो असलो तरी आजचा अनुभव थोडासा वेगळा होता.
04 जुलै 2017
तरी तेथे सांगितलेले आणि तेव्हा विसरलेले काही मुद्दे येथे थोडक्यात मांडत आहे.

वारीचा अनुभव अविस्मरणीय होता.

‘यारे यारे लहान थोर! याती भलते नारी नर

जात, वर्ग, धर्म , लिंग , वय या कुठल्याही प्रकारचा भेदभाव वारीत दिसत नाही आणि दिसते ती फक्त समता ही आम्हा तरुणांसाठी सर्वात सकारात्मक बाब वाटते.
म्हणजे एक मोठे कीर्तनकाराच्या जेव्हा एक मनुष्य पाया पडला त्याचे झाल्यावर तो कीर्तनकार ही पुन्हा त्याच्या पाया पडला.मालक असो वा नोकर, राजा असो वा रंक किंवा इतर कोणीही तो वारीत फक्त माउली म्हणून सहभागी होतो ही अजून एक सकारात्मक बाब

जैन धर्मात ज्याला 5 अनुव्रते, बौद्ध धर्मात ज्याला पंचशील, ख्रिश्चन धर्मातील 10 कमांडमेंटस पैकी 5 अश्याच प्रकारे वारकरी पंथात सत्य, अहिंसा , अस्तेय, अपरिग्रह, बंधुता या पाच तत्वांचे वारीत पालन केले जाते

आपण निरीक्षण केले तर एक गोष्ट लक्ष्य येईल प्रत्येक देवतेच्या हाती शस्त्र असते तर विठ्ठलाच्या हातात कोणतेही शस्त्र नसते जे अहिंसेचे प्रतीक आहे आणि प्रत्येक वारकरी अहिंसेचा पुजारी.
शिवाय वारीमध्ये सहभागी होणारे वेगवेगळ्या धर्माचे अनुयायी आणि प्रभाव जो भारतीय संविधानाशी सुसंगत आहे.

मागच्या वर्षी वारी जाण्याच्या वेळेसच ईद आली तर लोणंद सारख्या अनेक गावातून मुस्लिम समाजाने शाकाहारी ईद साजरी केली.मुस्लिम, जैन आणि अनेक धर्माचे लोक यात सहभागी असतात.आजही अनेक मुस्लिम कीर्तनकार याबाबत खूप छान कार्य करतात.

कोणत्याही धर्मचा, जातीचा, व्यक्तीचा द्वेष् न करण्याबद्दल तुकोबांचा हा अभंग
कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दु:ख जीव भोग पावे.

अंधश्रद्धा-कर्मकांड आणि देव आणि भक्त यांच्यामध्ये असणारा मध्यस्थ पुरोहित वर्ग नाकारत कर्मयोगाची शिकवण वारीत दिली जाते

हरी मुखे म्हणा हरीमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी
म्हणजे कर्मकांडे सांगून आणि सामन्य जनतेचे शोषण करून स्वतःचे पोट भरणाऱ्या पुरोहितशाही विरुद्ध बंड उभारून देवाच्या नामजपाने कोणत्याही मध्यस्थशिवाय देवाशी थेट संपर्क करण्याबद्दल हा अभंग सांगतो

साधू ओळखण्यासाठी तुकोबा म्हणतात
ऐसे कैसे झाले भोंदु, कर्म करोनी म्हणती साधु, अंगा लावूनिया राख, डोळे झाकुनी करिती पाप, दावुनी वैराग्याची कळा, भोगी विषयाचा सोहळा, तुका म्हणे सांगो किती, जळो तयाची संगती.

. जे का रंजले गांजले, त्यासि म्हणे जो आपुले, तोचि साधु ओळखावा, देव तेथेची जाणावा

असो वारकरी वारीच्या दिवसात जे हे समतेचे नियम पाळतात ते त्यांनी आणि आपण प्रत्यक्ष रोजच्या जीवनात ही अनुसरले तर समाजात खूप सकारात्मक बाबी घडतील.

आजच्या धावपळीच्या दिवसात तरुणांना एवढया दिवस सहभागी होणे अवघड आहे पण तरीही एखादा दिवस तरी वारी अवश्य अनुभवावी आणि समजा  तेही शक्य नसेल तर निदान संतसाहित्याचा अभ्यास तरी करावा ही विंनंती आहे

जश्या अनेक सकारात्मक बाबी आहेत तश्या काही नकारात्मक बाबीही आहेत ज्ञानदेवांना ज्यांनी वाळीत टाकले किंवा तुकोबांची ज्यांनी गाथा बुडवली असे काही गट आता या वारीत घुसण्याचा आणि त्यामध्ये स्वतःचे वर्चस्व स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहेत यावर्षीचा त्यांचा हा प्रयत्न वारकर्यांनी हाणून पाडला पण त्या शस्त्रधारी भडक लोकांचे प्रयत्न अजूनही सुरु आहेत.

चांगल्या गोष्टीला सुरवातीला कसोशीने विरोध करायचा, कुजबुज करायची पण एवढे करूनही समोरची रेष छोटी झाली नाही तर मग ती रेष आपलीच आहे असे म्हणून गोड गोड बोलून त्या रेषेचे(पंथाचे) स्वामित्व स्वतःकडे घ्यायचे हे प्रकार आहेत.यांच्यापासून वेळीच सावध व्हायला हवे.

असो पुढच्या वर्षी आपणही आमच्यासोबत वारीत सहभागी व्हाल आणि आपण सर्व मिळून हा समतेचा, संतविचारांचा वारसा समर्थपणे पुढे नेऊन स्वतःला आणि भोवतालच्या समाजाला अधिक निर्मळ, उत्तम, उदात्त आणि उन्नत करूया ही आशा करतो.

आपलाच
संकेत मुनोत

कार्यक्रमाची लिंक
https://youtu.be/it-WV0OD_ls


विवाह नाते निवडतांना आणि फुलवंतांना

सध्या नातेसंबंधातील गोडवा वाढण्यासाठी आणि दुरावा कमी होण्यासाठी 'नाते टिकवूया' पेज आणि सामजिक चळवळ चालवत आहे त्यातून वेगवेगळ्या दाम्पत्यांच्या आलेल्या अनुभवातून काही विचार मांडत आहे.
जोडीदार निवडीचा कार्यक्रम, जोडीदाराची निवड व त्याचे निकष, विवाह पद्धति, नात्यातील दुराव्याचे वाढते प्रमाण कसे कमी करावे आणि नात्यातील गोडवा कसा वाढवावा या संदर्भातील काही विचार मांडत आहे पहा पटतात का?
जोडीदार निवडीचा कार्यक्रम साधा करण्याची गरज-
आपल्या इथे साधारणतः मुलीच्या घरचे किंवा मुलाच्या घरचे पाहण्यास येणार म्हटले कि खूप सारा थाट माट केला जातो, सुका मेवा, फळे, जेवण, मिठाई, नमकीन, कोल्ड्रिंक पासून प्रत्येक गोष्ट यात ठेवावी लागते.मग जोडीदार निवडीपेक्षा घरच्यांची त्याबद्दल च धावपळ जास्त उडते.त्यापेक्षा आपण ज्या मराठा समाजासोबत राहतोय त्यांचे पोहे ,चहा एवढं ठेवून ही जोडीदार निवडीचा कार्यक्रम करता येतो.शिवाय मुला मुलींना एकमेकांना जाणून घ्यायला जास्त वेळ द्यायला हवा.
लग्न कुठल्या प्रकारचे-
लग्न हा क्षण एका नवीन आयुष्याची सुरवात असल्याने तो आंनद आपल्या आप्तजणांना आणि मित्रांना बोलवून द्विगुणित करावा अशी प्रत्येकाची इच्छा असते त्यामुळे रजिस्टर लग्न बहुतेक जण करत नाहीत, पण जे आप्तजनांना बोलावून करायचे लग्न आहे तेही अगदी सध्या पद्धतीने करता येणे शक्य आहे आणि तेही हजारो लोकांना बोलवून जेवण इ देऊन ही कमी खर्चात होऊ शकते शिवाय त्यातून एक सामजिक संदेश ही जातो.माझ्या अनेक मित्रांनी याप्रकारचे लग्न केले आहे. गांधीविवाह किंवा सत्यशोधक लग्न ही त्या प्रकारची आदर्श लग्न आहेत.हाच खर्च पालकांनी आपल्या पाल्यांना चांगले संस्कार, शिक्षण देण्यास त्यांना त्यांच्या पायावर उभे करून देण्यास खर्च करायला हवा.शिवाय अश्या साध्या लग्नात नातेवाईकांचा मानपान , रुसवे फुगवे या गोष्टीही टाळल्या जातात ज्यामुळे लग्नाच्या वेळी याला हे केले, त्याला हे केले नाही यामुळे होणारे रुसवे फुगवे व त्यातून होणारा मानसिक त्रास ही टाळला जातो जो 70% लग्नात असतोच असतो.माझा मित्र सचिन आशा सुभाष याने जवळपास हजार लोकांना बोलवून सत्यशोधक पद्धतीचे लग्न केले ज्यात या सर्वांचे जेवण,मंडप, व इतर सर्व मिळून खर्च जवळपास लाख रु. च्या आत आला शिवाय लग्नात भेटवस्तू ऐवजी त्याने पुस्तके स्वीकारली ज्यातून त्या दोघांच्या ही गावात त्यांनी एक चांगले वाचनालय सुरु केले, अशी अनेक उदाहरणे आहेत.
लग्नाबद्दल मानसिक तयारी-
फक्त वय झालय म्हणून टाकूया उरकुन अस म्हणण्यापेक्षा खरच आपला मुलगा वा मुलगी ती जबाबदारी पेलू शकतील अशी त्यांची क्षमता झाली आहे का? ते पहावे.
कुठलेही लग्न म्हटले कि तडजोड ही करावीच लागते पण 'मी कसलीही तडजोड करणार नाही आहे तसाच किंवा तशीच राहणार' म्हटले तर लग्न झाल्यानंतर सर्व गोष्टी अवघड होऊन बसतात.कारण दोन भिन्न वातावरणात वाढलेल्या व्यक्ती म्हटल्या कि त्यांचे स्वतंत्र अस्तित्व असणारच अश्या वेळी दोघांना ही एकमेकंसाठी काही सकारात्मक तडजोडी कराव्या लागतील त्याची तयारी असायला हवी.हुंड्याला स्पष्ट नकार द्यायला हवा.शिवाय नाते टिकवायचे म्हटले तर अहंकार कमी करायला हवा, मी आहे तसाच किंवा तशीच राहणार कधीच झुकणार नाही असे चालत नाही
नाते सांभाळायचे म्हटले तर ते टिकवण्यासाठी त्यात थोडी झुकण्याची सोबतच त्याग, समर्पण, प्रेम या गोष्टींचीही गरज असते.
जोडीदार निवडतांना-
आपल्या इथे पत्रिका जुळवण्याकडे अधिक लक्ष दिले जाते त्याऐवजी विचार कुंडली जुळते का त्याकडे अधिक लक्ष द्यायला हवे.
बाह्य सौंदर्य जसे कि रंग , उंची, बांधा यापेक्षा आंतरिक गुण जसे कि स्वभाव, वैचारिक बैठक यांच्याकडे अधिक लक्ष द्यावे.
एकमेकांचे छंद,आवडी-निवडी, सवयी जाणून घ्यायला हव्यात.आणि समोरच्या च्या या गोष्टींचा आपल्याला त्रास तर होणार नाही ना हे पाहायला हवे.
अवास्तव अपेक्षा टाळायला हव्यात.
स्वप्ने, भविष्याबद्दलचे विचार यात ही थोडे साम्य असायला हवे.
त्यामुळे ओळख झाल्यापासून ते लग्न यामध्ये किमान 2 महिने ते वर्ष एवढे अंतर तरी असावे जो वेळ एकमेकांना समजून घेण्यासाठी देता येईल शिवाय जर नाहीच जुळले विचार तर तेव्हा तेथेच थांबताही येते, घटस्फोटापेक्षा ते कधीही चांगले.
100% सगळ्या दृष्टीने परिपूर्ण असे कोणीच नसते त्यामुळे अपूर्णतेत ही आपल्याला आवश्यक असलेले गुण आहेत का ते पाहता यायला हवे.
आर्थिक जबाबदारी इ गोष्टी जोडीदार पाहताना स्पष्ट पाहायला हव्यात उगाच वय होत चाललंय म्हणून इच्छा नसतांना एखाद्या आपल्या अपेक्षेपेक्षा कमी आर्थिक परिस्थिती असलेल्या व्यक्तीशी लग्न करणे आणि लग्नानंतर अधिक आर्थिक क्षमतेच कुणी दिसलं कि आहे त्या नात्याला तोडणे असे प्रकार ही घडतात तेच सौंदर्य, शिक्षण इ. गोष्टी पूर्वीच पाहायला हव्यात उगाच सुरवातीला नाते जोडायचे आणि नाही पटले किंवा दुसरे कुणी अजून चांगले दिसले कि आहे ते तोडणे चुकीचे आहे.
व्यसन - आपल्या समाजात ही व्यसनांचे प्रमाण हळूहळू वाढत चालले आहे त्यामुळे त्याबद्दल चौकशी करायला हवी आणि व्यसनी जोडीदाराला स्पष्ट नकार देता यायला हवा.
वैचारिक पातळी आणि सामजिक भान- आपला जोडीदार सामजिक , कला, राजकीय किंवा साहित्यिक क्षेत्रात असेल तर त्याच्या गोष्टींचा आपल्याला त्रास तर होत नाही ना, आपण त्या गोष्टीत साथ नाही देऊ शकलो तर किमान प्रोत्साहन तर देऊ शकू ना हे पहायला हवे
शिवाय त्याच्या किंवा तिच्या लेखनाचे, साहित्याचे, कलेचे अर्थ किंवा उद्देश आपल्याला समजत आहेत ना? जर ते समजत नसतील तर त्या गोष्टीतून वेगळे काही अर्थ निघून गैरसमज होण्याची शक्यता असते
उदा माझी एक मैत्रीण पुरोगामी, वैज्ञानिक आणि आधुनिक विचारांची तर तिच्या नवर्याचे आई-वडील प्रचंड धार्मिक, ज्योतिषशास्त्र वगैरे मानणारे त्यामुळे ही जे काही लेख त्या अंधश्रद्धावर किंवा कशावर ही लिहित तर ते आमच्यवरच आहेत असे त्यांना वाटे आणि त्यातून गैरसमज वाढत जात खरतर ती बऱ्याच वर्षापासून लिहित होती हे त्यांना समजायला हवे होते पण वैचारिक आणि बौद्धिक अंतर असल्यावर अर्थाचा अनर्थ होतो तो असा.
जोडीदाराची संगत -
कुठल्याही व्यक्तीची ओळख त्याच्या संगतीवरून होते.त्याच्यासोबत असणारा मित्र परिवार कुठल्या दर्जाचा आहे त्यावरून ही त्याचा किंवा तिचा स्वभाव लक्षात येतो.कारण जश्या व्यक्ती असतात तसे लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात.
लग्न झाल्यावर-
एकमेकांशी खुला संवाद- मेसेज किंवा फोनवरून बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष फेस टू फेस बोलणे कधीही चांगले, कारण प्रत्यक्ष बोलण्यात आवाजाला चढ उतार असतो चेहऱ्यावर हावभाव असतात ज्या गोष्टी मेसेज किंवा फोन वर शक्य होत नाहीत आणि गैरसमज वाढण्याची शक्यता असते
एकमेकांची छेड काढणे- लग्नानंतरचे नाते healthy ठेवायचे असेल तर थोडी विनोदबुद्धी असायला हवी आणि एकमेकांची छेड काढणे , चिडवणे यातून प्रेम वाढते.
मतभेद झाल्यास दोघांत सोडवणे- दोन भिन्न व्यक्ती म्हटल्यावर मतभेद हे होणारच पण ते झाले तरी मनभेद होता कामा नये ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी , झालेले भांडण तिसऱ्या कुणाला सांगितले जाते तेव्हा दुरावा वाढण्यात च अधिक मदत होते
  सामान्यतः मनुष्य एखाद्याशी झालेल्या वादाबद्दल सांगतांना स्वतःच्या चुका नकळतपणे लपवत असतो किंवा कमी करून सांगत असतो यामुळे ज्याच्यासोबत आपण ही गोष्ट शेयर करतोय ती व्यक्ती तेवढेच ऐकून त्या-त्या दृष्टीने आपले मत बनवते आणि समजा ती गोष्ट त्या व्यक्तीने अजून काहींना सांगितली तर ५ जणांचे ५ सल्ले यातून वाद विकोपाला जातो.
समजूतदार पणा- ही सर्वात महत्वाची बाब आहे , छोट्या-छोट्या गोष्टी पकडून न ठेवता एकमेकांना समजून घेऊन पुढे जायला हवे.समोरचा व्यक्ती माणूस आहे आणि तो चुकू शकतो आणि आपणही चुकू शकतो ही गोष्ट मान्य करायला हवी.
कौतुक आणि टीका-
कौतुक चार चौघात करायला हवे तर चुका या एकट्यात त्याही थोड्या वेगळ्या शब्दात सांगायला हव्यात पण बऱ्याच ठिकाणी नेमके याच्या उलटे घडते.
पालकांचा संसारात अति हस्तक्षेप-
आपला मुलगा वा मुलगी किती वाजता उठतो, काय खातो, कुणाला किती पैसे देतो त्यापासून ते रुम मधल्या गोष्टीपर्यँत काही ठिकाणी पालकांचे लक्ष असते. आणि अशी प्रत्येक गोष्ट पाल्याकडून फक्त जाणून च घेतली जात नाही तर त्याच्यावर नाहक सल्ले ही दिले जातात कि हे असे असे असायला हवे शिवाय त्या सगळ्याच बाबतीत संसारात लुडबुड ही केली जाते.फोनवरून पालकांना सर्व रिपोर्टींग करणे हे याचे मोठे कारण आहे.
नाते टिकवूया चळवळीत आत्ताच जॉईन झालेल्या व कौटुंबिक समुपदेशक आणि सल्लागार म्हणून दीर्घ अनुभव असलेल्या छाया सावरकर यांनी सांगितले कि त्यांनी जेवढ्या केसेस हाताळल्या त्यात घटस्फोटासाठी सार्वधिक आढळलेले कारण हे मुलीच्या आईचा तिच्या संसारात अतिहस्तक्षेप हे आहे.आपल्या मुलीला जर मारहाण होत असेल, हुंड्याची मागणी होत असेल, तिच्या जीवाला धोका असेल अश्या वेळी हस्तक्षेप करून जाब विचारायला च हवा पण इतर प्रत्येक गोष्टीत  माहेरहुन लक्ष घालणे चुकीचे आहे.
शिवाय मुलाच्या पालकांनी ही सुनेकडून अवास्तव अपेक्षा, तिच्याकडून माहेरहुन काही आणण्याची मागणी, मारहाण इ. गोष्टी टाळायला हव्यात.
Mould for each other-
जगात made for each other अस कोणीच नसत पण तुम्हाला थोडं mould for each other व्हावेच लागेल
सकारात्मक बदल करण्याची  तयारी- मी बिलकुल बदलणार नाही जे बदलायचं ते समोरच्यानेच हा दृष्टिकोन ही घातकच
.तुलना- सतत दुसर्याशी  तुलना करु नये
काही मुली आपले भाऊ, मामा, काका इ. कडे बघून आपल्या नवर्याची त्यांच्याशी तुलना करतात तर काही मुले आपली बहीण, आई, आत्या इ बघून बायकोशी तुलना करतात व जोडीदाराने असे त्यांच्यासारखे व्हायला हवे अशी अपेक्षा ठेवतात ज्या चुकीच्या आहेत.
स्वतःचे मत बनवण्याची क्षमता- मुलगा असो वा मुलगी जर तो किंवा ती प्रत्येक गोष्ट दुसऱ्याच्या मतावरून ठरवत असेल तर वैचारीक परिपक्वतेअभावी गैरसमज च होण्याची अधिक शक्यता असते.
14.काही गोष्टी सिक्रेट्स ठेवण्याची गरज - नवरा बायकोतील काही गोष्टी या सीक्रेटस म्हणजे गुप्तच असायला हव्यात पण जर एखादा जोडीदार दुसऱ्या कुणाला या गुप्त गोष्टी सांगत असतील तर ज्या व्यक्तीला ते सांगितले जाते त्यातून वाद वाढण्याची किंवा उलटा अर्थ निघण्याची अधिक शक्यता असते.
15.धरसोड प्रवृत्ती नको-
धरसोड व्यक्तींना थोड्या दिवस एखादी व्यक्ती आवडते पण बाहेरहून कुणी फूस दिली कि अरे किंवा अग तुला यापेक्षा जास्त चांगला जोडीदार भेटला असता असे म्हटले आणि पालकांचा ही जर याला दुजोरा मिळाला तर अश्या व्यक्ती असणाऱ्या जोडीदारात सतत चुका शोधू लागतात, तू मला बोलायला पॉईंट देतोस/देतेस असे म्हणून समोरच्यात चुका शोधल्या जातात किंवा नसणाऱ्या चुका भासवल्या जातात ज्यामुळे दुसरा जोडीदार त्रस्त होतो, मग एक जण जोडायचा प्रयत्न करतो तर दुसरा तोडण्याचा प्रयत्न करतो , एक जण खोटे नाटे आरोप करत राहतो व दुसरा प्रत्येक गोष्ट सिद्ध करून दाखवू लागतो.
जोडणाऱ्याला जोडायचे असल्यामुळे तो किंवा ती कसेही करून नाते कसे चांगले होईल यासाठी प्रयत्न करतात समोरच्याच्या चुका दाखवण्याऐवजी स्वतःत सकारात्मक बदल करायची , सुधारण्याची ते तयारी दाखवतात आणि हवालदिल होतात तर तोडणाऱ्याला याची काही फिकीरच नसते त्यामुळे ते मिळेल तिथे खरे-खोटे आरोप करत आणि बदनामी करत जोडणाऱ्याचे मानसिक खच्चीकरण करत राहतात, तिसऱ्या व्यक्तींला सर्व बाजू माहित नसतात त्यामुळे तोडणाऱ्याच्या आरोपांकडे च अधिक लक्ष जाते पण यात जोडण्याचा प्रयत्न करणारा माणूस खचून जातो त्यामुळे धरसोड प्रवृत्ती टाळायला हवी.
16.एकमेकांना स्पेस देणे-
दोघांच्याही काही आवडी-निवडी असतीलच व त्या गोष्टी करण्यास एकमेकांना थोडी स्पेसही द्यायला हवी, उदा एखादी मुलगी चांगली चित्रकार आहे पण लग्न झाले कि तिला त्याबद्दल काहीच करू न देणे हे तिच्या कलागुणांना थांबवण्यासारखे आहे, तिच्या कलागुणांना वाव दिला तर ती आनंदी राहीलच शिवाय त्याचा फायदा ही होईल.शिवाय अश्या स्पेस चा गैरफायदा ही घेता कामा नये म्हणजे आपली पहिली प्राथमिकता कुटूंब ही असायला हवी.
एकमेकांशी विचारांचे टोकाचे मतभेद असतांना ही  ते कायम ठेवून नात्यात मनभेद न ठेवता एकदम सुखी संसार केल्याची अनेक उदाहरणे मला माहित आहेत, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ नरेंद्र दाभोळकर स्वतः अंधश्रद्धा मानत नसले तरी पत्नीच्या इच्छे खातर नऊ वर्ष रोज पत्नीच्या श्रद्धास्थळ असलेल्या मंदिरात ते त्यांना सोडत.महात्मा गांधीनी आश्रमात चहा कॉफी वर्ज्य ठेवली होती ते स्वतः चहा कॉफी घेत नसत त्याला दारू सारखे पेय मानत पण जेव्हा एकदा कस्तुरबांना कॉफी पिण्याची खूप इच्छा झाली तर गांधीजींनी स्वतः त्यांना ती आणून दिली आणि अग्रहाने प्यायला ही लावली.
काही दिवसांपूर्वी अभिनेते श्रीराम लागू यांची मनमोकळ्या गप्पा मारण्याचा योग आला, ते पूर्णतः नास्तिक आणि बुद्धिवादी चळवळीला समर्पित आहेत, मागे 'देवाला रिटायर करा' या त्यांच्या वक्तव्यावर बरीच टीका झाली.त्यांच्याशी गप्पा झाल्यावर त्यांच्या पत्नी दिपाताई यांच्याशी बोललो कि तुम्ही पण याच विचारांच्या का वगैरे त्या हो म्हटल्या पण माझी थोडी श्रद्धा आहे मी गणपती बसवते तेव्हा तो त्याला विरोध करत नाही 'मला फक्त प्रसाद देत जा' अस श्रीराम जी म्हणत असल्याचे त्यांनी सांगितले.
आपली प्रेयसी हितार्थी पारख(गुजरात,) हिला कँसर असल्याचे कळूनही प्रवीण पाटील(सांगली) याने तिच्याशी लग्न केले आणि 5 वर्ष तिच्यासोबत पहाडासारखा उभा राहून तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, अशीच कहाणी प्रथमेश आणि सोनालीची, दोघे चांगले मित्र होते सोनालीच्या शिक्षणासाठी प्रथमेश ने आपल्या आईचे दागिने विकले होते पण दरम्यान काही वर्षांत प्रथमेशला कॅन्सर झाल्याचं तिला कळलं. त्याची अवस्था अतिशय बिकट झाली होती. अवघ्या 20 व्या वर्षी कॅन्सर. प्रथमेश पूर्णपणे खचून गेला होता.  तणावाखाली असलेल्या मित्राला प्रेमाची सावली द्यावी, या भावनेतून सोनालीने प्रथमेशशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.  सोनाली म्हणते, “ 25 जून 2018 रोजी आम्ही विवाहबद्ध झालो. या दिवसापासून प्रथमेशला या सगळ्या अडचणीतून बाहेर काढण्याचा मी दृढ निश्चय केला होता. माझ्या आईवडिलांनी नेहमी मला दुसऱ्यांना मदत करण्याचे संस्कार दिल्याने मी हा निर्णय घेऊ शकले."
आजही, प्रथमेशवर उपचार सुरू असून एका कार्यालयात तो अकाऊंट विभागात नोकरी करतो आहे. तर, सोनाली नगरपरिषदेत आरोग्यसेविका म्हणून काम करत आहे आणि त्याची तब्येत पहिल्यापेक्षा खूप सुधारल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
एकीकडे स्वार्थापायी काही नाती तुटताना ही उदाहरणे नाती कशी टिकवावी आणि फुलवावी याबद्दल प्रेरणादायी आहेत तर चला नाती अधिक सुंदर बनवूया
त्यावरूनच अश्या काही केसेस हाताळताना सहज सुचलेली कविता
मानलं तर लग्न  आहे खूप सुंदर #बात
जीवन जगायला मिळतो एक हक्काचा #हात
ज्यांच्यासोबत शेयर करू शकू प्रत्येक #बात
सुख दुःखात मिळते एकमेकांची #साथ
समजून घेऊ एकमेकांना #थोडे
एकत्र मिळवून सोडू आयुष्याचे प्रत्येक #कोडे
करावे एकमेकांवर भरपूर #प्रेम
तिसऱ्या कुणाला मध्ये लावू देऊ नये #नेम 
येतात यात समस्या #कश्यामुळे
तिसर्या कुणाच्या अति #हस्तक्षेपामुळे
जेव्हा दुसऱ्या कुणाला कळते घरातील प्रत्येक #बात
तेव्हा सुरु होतो त्या घराचा #घात
अर्धवट ऐकून मग दिले जातात अनेक #सल्ले
गैरसमजाचे गाठले जातात लांब-लांब #पल्ले
एका शब्दाचे लावून अनेक #अर्थ
केले जाते दाम्पत्य जीवन #व्यर्थ
मान्य नसते कुणी made for each other
पण व्हा कि थोडे Mould for each other
बघ मग कसा संसार होईल #छान
एक बनेल जानू तर दुसरा बनेल #जान
वेगवेगळ्या ठिकाणी वाढल्यावर भिन्न स्वभाव #असणारच
वेगवेगळ्या प्रकृती सारखे कुणी #नसणारच
वेगळेपणातील अनुभवून #सुख 
चल करूया हास्यमय #मुख..  
संकेत मुनोत
नाते टिकवूया चळवळ
8087446346

Saturday, June 15, 2019

टीव्ही विना आठ वर्षे (2007 ते 2015), वाचनाचे फायदे

हा आमचा टीव्हीचा कप्पा आणि ही हिया #आज_जागतिक_पुस्तकदिन_त्यानिमित्त

जवळजवळ 8वर्षांपुर्वी आमचा टीव्ही खराब  झाला होता त्यानंतर तो आम्ही तो शेजारी घरकाम करण्यासाठी येणार्या मावशींना देऊन टाकला व त्यानंतर म्हणता- म्हणता 8वर्षे कशी निघुन गेली समजलेच नाही
कोणी नातेवाईक मित्र घरी आले कि मजा येते
तुमच्या घरी टीव्ही नाही ????
" TV नाही म्हणजे तुम्ही जगता कसे ?"
"अरे काहीतरी मनोरंजन साधन नको का?"

"थु तुझ्या जिंदगीवर  टीव्ही नाही "

वगैरे वगैरे अशा अनेक विक्षिप्त  प्रतिक्रिया काही जण देऊन जात

एकदा तर हद्द झाली
आमच्या समोरच्या घरात काम करण्यासाठी येणार्या जयश्रीमावशीही म्हणाल्या कि माझ्या घरी 3टीव्ही आहेत

 आमची कॉलनी तशी मध्यमवर्गीय कम ऊच्च भ्रु कॉलनी असल्यामुळे  ईथे हॉलसोबत रुममध्येही बहुतेकांच्या ईथे टीव्ही आहेत
असो पण आमच्या घरीे टीव्हीचे नसणे खुप काही चांगले करुन गेले
सोसायटीतील लहान मुले दिवसभरआमच्या घरीच असत व त्यांच्याशी खेळताना दिवस कुठे जाई समजतही नसे
आता या फोटोतील हिया नावाची दीड वर्षाची चिमुकली सकाळी 6.00वा.च आमच्या घरी येते व सर्वांना ऊठवते , काही नवीन आणल कि दाखवते, घरातील प्रत्येकाची नक्कल करते माझे केस ओढते मोबाईल ओढुन घेऊन त्यावर गाणी लावते व डान्स करते , अक्षरओळख नसली  तरी वडीलांशेजारी वर्तमानपत्र घेऊन वाचत बसते त
आणि आमच्या घरात प्रत्येकाच्या चेहर्यावर SMILE आणते , हसवते तीच्यासारखीच अनेक चिमुकली मुले आमच्या घरी असतात ती नव्हती तेव्हा प्रीत नावाचा चिमुकला येत असे

आमच्या घरी टीव्ही नसल्याचे अनंत फायदे मला सांगु शकतो त्यातील काही खालीलप्रमाणे
वाचनाची आवड अजुन वाढली
अनेक समज गैरसमज दुर झाले
जे लेखक, मोठ्या व्यक्ती ,समाजसेवक मी फक्त पुस्तकात वाचत होतो त्यांना प्रत्यक्षात भेटुही शकलो
मला शनिवार रविवार सुट्टी असायची
त्यातील महिन्यातील किमान सुट्टीचे 2 दिवस माणसातील देव शोधुन त्याची भक्ती करु शकलो नाहीतर यापूर्वी मी तसा नव्हतो (अनाथालय,वृध्दाश्रम , गरीब वस्ती)
आणि महिन्यातील  सुट्टीचे 3 दिवस ग्रेट
अभय बंग, तुषार गांधी, संजय आवटे, अन्वर राजन, ऊर्मिलादीदी ,संजय सोनवणी, सदानंद मोरे, कुमार सप्तर्षी , डॉ अ़ ह़ साळुंखे , सुगन बरंत,  संपतराव साबळे, जगदीश काबरे, करुणा गोखले, सुरेश खोपडे, राज कुलकर्णी, विश्वंभर चौधरी,ऊत्तम कांबळे , आणि अशा अनेक प्रेरणादायी लोकांना भेटुन त्यांच्यासोबत प्रत्यक्ष चर्चा करता आली आपले कार्य करता करता समाजालाही आपल्याकडुन कसे काही देता येईल हे शिकता आले.

वरील लोकांशी आजही माझा नियमित संपर्क असतो वेगवेगळ्या धर्माच्या धर्मगुरुंना भेटुन चर्चा करुन तो तो धर्म समजुन घेता आला. अशा अनेक गोष्टी साध्य करता आला
सोबतच टीव्ही नसल्यामुळे with family चित्रपट बघायला जाणे होऊ लागले पीके, प्रकाश बाबा आमटे , मिल्खा सिंग सारखे प्रेरणादायी चित्रपट सोबतच ईतर पाहणे झाले , ट्रेकिंग, आऊटिंग व अनेक गोष्टी

मित्रांच्या सहकार्याने समाजातील तळागाळातील लोकांसाठी कार्य करण्यासाठी  काही सामाजिक संघटनामध्ये खारीचा का होईना वाटा ऊचलु शकलो

अजुनही बर्याच गोष्टी या टीव्हीच्या नसल्यामुळे आणि मुख्यत: पुस्तकांच्या असण्यामुळे साध्य करता आल्या
पुस्तकासारखा जीवलग मित्र मिळाला
शिवचरित्र वाचताना कधी रायगडवर,
आऊनस्टाईन,न्युटन ,
एडिसन वाचताना त्यांच्या  प्रयोगशाळेत जात असे (कल्पनेत) , बिल गेटस ,
स्टीव्ह जॉब्सच्या , कार्व्हर, हेन्री फोर्ड,
मंडेला, मलाला , दलाई लामा , महात्मा फुले , डॉ. आंबेडकर, साने गुरुजी, बुध्द , महावीर, विवेकानंद, शहिदेआजम भगतसिंह  , सुभाषचंद्र बोस ,
कार्ल मार्क्स ,संत तुकाराम , मार्टिन ल्युथर किंग, क्रांतीसिंह नाना पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील, ओबामा, सँम पित्रोदा , अँजेलिना जोली , ग्वेरा ,
#पुस्तके_निवडतांनाही_थोडी_काळजी_घ्यायला_हवी असे वाटते
लहानपणी मला भडक व ज्वलंत पुस्तके खुप आवडत म्हणजे ती लगेच ऊपलब्धही असत, नथुराम ,सावरकर, हिटलर  व तत्सम  लोकांची द्वेषपुर्ण पुस्तके हातात पडली होती जी एकदम भारी वाटत पण सर्व बाजु  वाचल्यानंतर व अभ्यासानंतर ती #अतिरंजित_व_खोटी आहेत हे समजले.
आज भडकनार्याची गरज नाही तर पेटणार्याची गरज आहे.
भडकण्याने अन्न जळते किंवा करपते तरी ,
परंतु पेटण्याने ते शिजते.
भडकनारे निखळनार्या तार्या प्रमाणे चमकतात आणि खाक होतात पेटणारे चंद्रा प्रमाणे सतत प्रकाश देत निखळुन न जाता अचल राहतात. तुम्ही ठरवा तुम्हला भडकायचे की पेटायचे ?

माझ्या मनात अनेक गैरसमज मनात होते तेही जसजसे वाचन वाढले तसतसे दुर झाले अजुनही अभ्यास चालु आहे

सगळ्यात महत्वाचे म्हणजे
पुस्तक वाचताना किंवा कुणाबद्दलही मत बनवतांना अनेकांतवादाच्या दृष्टीने पहायला हवे
#अनेकांतवाद-अंत म्हणजे शेवट . एकान्त म्हणजे एकच शेवट . अनेकांतवाद म्हणजे अनेक शेवट . म्हणजेच कुठल्याही गोष्टीबाबत एकाच  बाजूचे मत न बनविणे .    यासाठी हत्ती आणि सात आंधळ्यांची कथा उदाहरण म्हणुन फिट्ट बसते. सात आंधळे हत्तीजवळ जातात. त्यांनी हत्ती आधी  कधीच पाहिलेला नाही .  हत्तीच्या  शेपटीला हात लावून एका आंधळा म्हणतो हत्ती दोरिसारखा आहे . हत्तीच्या  पायाला हात लावणारा ओरडतो - हत्ती झाडासारखा आहे . हस्तिदंताला स्पर्श करणारा आंधळा पुटपुटतो -  हत्ती भाल्यासारखा टोकदार आहे. सगळ्या आंधळ्यांचे मत वेगवेगळे बनते .
प्रत्यक्षात हत्ती हा दोरी , खांब , भाला इत्यादी सर्वासारखा असतो आणि कुणासारखाच तंतोतंत नसतो . सत्याकडे पाहण्याचे अनेक मार्ग असतात. एकाचवेळी ते सर्व योग्य आणि अयोग्यही असतात . एकाचवेळी निश्चित आणि  अनिश्चितहि असतात.सत्याचे मानवी आकलन विभिन्न असते. सत्याचे मानवी आकलन अपुर्ण असते.   त्यामुळे स्वत:च्या मताबद्दल कट्टरता किंवा दुसर्याच्या मताचा द्वेष चुक  आहे.    अनेकांतवाद कट्टर पणाचा  मुडदा अहिंसक मार्गांनी  पाडतो !    अहिंसेचा जन्म असा मनात आहे .  प्रथम तो माझ्या मनात होणार आहे त्यानंतर तुझ्या मनात होणार आहे . तो ज्ञानातून होणार आहे.  हे स्पष्ट दिसणारे  वैद्न्यानिक सत्य स्वीकारायला पुरुषार्थ लागतो . शौर्य लागते . स्वत:च्या डोळ्यावरची झापडे काढणे हे येरागबाळ्याचे काम नाही

जसे गैरसमज गांधीजीबद्दल तसेच विवेकानंद, शिवाजी महाराज व ईतर अनेक व्यक्तिमत्वांबद्दल व ईतर अनेक दैनदिन गोष्टींबद्दल होते पण सर्व बाजुंनी वाचायची व अनुभवातुन समजण्याची सवय बाजुंनी सवय लागल्यामुळे खुप फायदा होतो
असो अजुन बरेच नवीन वाचायचे आहे वाचलेले कृतीत आणायचे आहे सध्या मोबाईल, फेसबुक , whatsapp यांच्यामुळे सध्या वाचन खुप कमी झाले आहे पण लवकरच हे थांबवुन वाचन पुन्हा चालु करणार आहे
(वरील लेख 6महिन्यांपूर्वी लिहला
आधुनिकतेची कास धरणेही महत्वाचे आहे माझे अनेक मित्र मैत्रिण व ओळखीचे लोक यांचे टीव्हीवर सतत कार्यक्रम असतात  सोबतच ठराविक मर्यादा ठेवल्या तर टीव्हीचेही तेवढे तोटे नाहीत झाला तर फायदाच होईल त्यामुळे 4 महिन्यांपुर्वी घरी टीव्ही आणलाय मनोरंजनात्मक कार्यक्रमासोबत ज्ञानवर्धक कार्यक्रम जसे कि डिस्कव्हरी, ग्रेट भेट, रविशकुमार प्राईमटाईम , आवाज महाराष्ट्राचा व सोबत काही विनोदी कार्यक्रम पहायला आवडते.)
आपल्याला फोटोतील कोणतेही पुस्तक पाहिजे असल्यास अवश्य घेऊन जा सोबतच शेजारच्या कप्पयातही एवढीच पुस्तके आहेत
पण फक्त परत आणुन द्या कारण काही मित्र मैत्रिण 2दिवसात पुस्तक परत आणुन देतो म्हणुन घेऊन गेलेत ते अजुन परत आलेच नाहीत
शेवटी एक कवि व सामाजिक कार्यकर्त्याने (दत्ता हलसगीकर) केलेले आवाहन आठवते मीही आपणास तेच करु ईच्छितो

ज्यांची बाग फुलून आली
त्यांनी दोन फुले द्यावीत
ज्यांचे सूर जुळून आले
त्यांनी दोन गाणी द्यावीत
ज्यांच्या अंगणात झुकले ढग
त्यांनी ओंजळपाणी द्यावे
आपले श्रीमंत हृदय त्यांनी
रिते करुन भरुन घ्यावे
आभाळाएवढी ज्यांची उंची
त्यांनी थोडे खाली यावे
मातीत ज्यांचे जन्म मळले
त्यांना थोडे उचलून घ्यावे

संकेत मुनोत
Please do Comment, Share ,Follow and Subscribe

जातीपायी माणूस एवढा का तापतो? द्वेष आणि तिरस्काराने स्वतःची लेकरच कापतो?😢

वाई येथील चांगल्या विचारांचे स्नेहसंमेलन- एक अभूतपूर्व अनुभव

वाई येथील #चांगल्या_विचारांचे_स्नेहसंमेलन हा एक अभूतपूर्व अनुभव होता.
अपेक्षेच्या दुप्पट सदस्य सहभागी झाले होते
Knowing Gandhism Global Friends आणि चांगले विचार समूहाचे तिसरे स्नेहसंमेलन 30 एप्रिल 2017 रोजी वाई येथे कृष्णा नदीच्या काठी 'पद्मविभूषण तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी' यांचे वास्तव्याने पुनीत झालेल्या वाई येथील वाड्यावर (विश्वकोष संस्थेत) संपन्न झाले.महाराष्ट्रभरातून(नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई,नाशिक, पुणे, सातारा, .....)वेगवेगळ्या क्षेत्रातून , वेगवेगळ्या वयोगटाचे लोक येथे आले होते.(विद्यार्थी, शिक्षक, शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ, वैद्य समाजसेवक, शेतीतज्ञ, चित्रपट दिगदर्शक, माजी केंद्रीय मंत्री, आंबेडकर चळवळीतील सामजिक कार्यकर्ते, कम्युनिस्ट चळवळीतील जेष्ठ, माहिती अधिकार कार्यकर्ते, राजकीय प्रवक्ते, महिला सशक्तीकरण कार्यकर्ते,पत्रकार, साहित्यिक, तंत्रज्ञ असे अनेक लोक....)

सुगन काकांच्या ऊर्जादायी गीतापासून कार्यक्रमाला सुरवात झाली.प्रल्हाद मिस्त्री सरांनी समूहाचे उद्दिष्टे सांगून प्रस्तावना केली. परिचय सत्रात अनेकांना जवळून जाणून घेता आले.
म्हणजे ऋषिकेश पवार सारख्या 19 वर्षीय पत्रकारितेच्या तरुण विद्यार्थ्यापासून ते रझिया पटेल सारख्या तज्ञ लोकांना विविध बाजुंनी समजून घेता आले.उदा -संजय सोमवंशी पाटील म्हणाले
नथुरामचे भडक नाटक बघुन तेच खरे वाटून मी त्या नाटकाच्या ८० सीडी विकत घेवुन मित्रांना वाटणारा मी सत्याचे प्रयोग हे पुस्तक वाचल्यामुळे गांधीविचांराकडे वळालो!-असे स्वतःचे अनेक थरारक अनुभव अनेकांनी उलगडले.

दुपारी 'मुद्द्याच बोला' या साम टीव्हीवरील शो मध्ये अनेक नवीन प्रश्नांची उत्तरे मा. संजय आवटे सरांनी त्यांच्या अनोख्या शैलीत समूहातील अनेक सदस्यांकडून घेतली.(मला किंवा कोणत्याही सदस्याला याबाबत कोणतीही पूर्वकल्पना नव्हती हा सर्वांसाठीच एक मोठा धक्का होता)

त्यांनतर जेवण करतानाही खूप चांगले अनुभव आले.
टेबल खुर्च्याची सोय नव्हती जागाही अपुरी होती पण कोणी कुठलीही तक्रार न करता मिळेल तेथे  बसून जेवण केले.
शिवाय गांधीविचारांना अमलात आणून स्वतःचे जेवणाचे ताट स्वतः घासून- धुऊन ठेवले. 2 वेळा केंद्रीय मंत्री  राहिलेले आणि सलग 7 सत्र(35 वर्ष) खासदार राहिलेले विलास मुत्तेमवार असो वा साम टीव्हीचे मुख्य संपादक संजय आवटे सर, महाराष्ट्र राज्याचे माजी साखर संचालक साबळे सर, शेतीतज्ञ गोजमे सर, धरण बांधणीत महत्वाचे योगदान असणारे प्रल्हाद मिस्त्री सर, विज्ञान शिक्षक जगदीश काबरे सर, महाराष्ट्रभर दिवे लावणारे तंत्रज्ञ डॉ अरुण मानकर, banking क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणारे सुरेश जोशी  आणि इतर सर्वच मान्यवर या सर्वांनी स्वतःची ताटे स्वतः घासून धुवून ठेवली.

दुसऱ्या सत्रात साम टीव्हीचे मुख्य संपादक  संजय आवटे सरांनी'गांधी,आंबेडकर, नेहरू आणि आयडिया ऑफ इंडिया' याविषयी अप्रतिम बीजभाषण केलले. त्यात त्यांनी गांधीविचार आजच्या परिप्रेक्षात मांडणे किती महत्वाचे आहे, आपण मुख्य प्रवाहात आहोत, परंपरेची स्पेस गांधीजींनी कशी वापरली हे सविस्तर व अत्यंत प्रभावीपणे विषद केले. त्यांनतर  संजय सोनवणी सरांनी संघाचा धर्म कोणता? हिंदू कि वैदिक?- "संघ आणि धर्म" या विषयावरील व्याख्यानात संघ वैदिक धर्माची पाठराखण करत हिंदुंची दिशाभूल करत आहे यावर बोलत वैदिक धर्म आणि हिंदू धर्म यातील फरक समजावून सांगितला. संघाचा वैदिकवाद असून हिंदू धर्माशी त्याचा काहीही संबंध नसल्याचेही विषद केले.शास्त्रज्ञ आणि महाराष्ट्राचे माजी साखर संचालक आणि शास्त्रज्ञ संपतराव साबळे यांनीही यावर प्रकाश टाकला.युवा साहित्यिक श्रीरंजन आवटे आणि अजय मक्तेदार यांनी सोशल मीडिया बाबत विस्तृत विवेचन दिले. दोन्ही सत्रांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला त्यावर चर्चा ही खूप रंगली. यांनंतर जगदीश सरांनी समूहाचा उद्देश, समूहाचा 2016-2017चा वार्षिक कृती कार्यक्रमाचा अहवाल, पुढे आपण काय करायचे आहे याबाबत मार्गदर्शन केले अनेकांनी यात सूचना add केल्या. समूहातील प्रत्येक व्यक्तीने आपापल्या परिसरातील समस्या , सामजिक प्रश्न जाणून घेऊन त्यावर कार्य करावे ज्याला समुह पूर्ण सहकार्य करेल , सोबतच लेखन , वाचन, वकृत्व कौशल्य कसे अंगीकृत करावे याबाबत मार्गदर्शन केले आणि कार्यक्रम संपला.

कार्यक्रमात येणाऱ्या प्रत्येकाला एक पुस्तक संच  (विजय दिवाण यांनी लिहलेले विनोबांचे चरित्र, भगतसिंग, विवेकानंद, आदींची स्वलिखित छोट्या पुस्तिका) समूहातर्फे भेट म्हणून देण्यात आला.(अचानक सदस्यसंख्या दुप्पट झाल्याने हा पुस्तक संच काही जणांना भेटला नाही त्यांनी संपर्क करावा त्यांना पोस्टान विनोबांचे पुस्तक पाठवले जाईल)
सातारा येथील गानकोकिळा समता आणि सन्मित्र अजय यांच्या विभागात त्याच दिवशी दुसरा एक कार्यक्रम असूनही ते तो कार्यक्रम पूर्ण करून दुपारी तेथे आले आणि गांधीजींचे एक सुंदर शिल्प त्यांनी भेट म्हणून दिले.
कार्यक्रमाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तेथे कुणाचाही सत्कार झाला नाही वा कार्यक्रमाला कुणीही अध्यक्ष नव्हते. सर्व लोक अभ्यासक किंवा सदस्य म्हणून सहभागी झाले होते.
सोबतच आम्ही तेथे एक दिवस आधी गेल्याने आम्हाला तेथे रमेश ओझा, प्रदीप खेलुरकर रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ, सुगन बरंठ यांच्यासारख्या बुद्धिवंतांशी तर रात्री माणिक कुरणे, आंनद भुसे, अजय मक्तेदार, विजय जाधव या फेसबुक मित्रांशी संवाद साधण्याची पहिल्यांदाच संधी मिळाली.
कार्यक्रमादरम्यान कुणाचेही मन दुखावले असेल, नियोजनात कुठे कमी जास्त झाले असेल तर समूहाच्या वतीने माफी असावी सोबतच पुढच्या वेळी ते परत न होण्याची आणि आणखी सुधारणा करण्याचा आपण प्रयत्न करू
संमेलन घेण्यास सर्वांचेच सहाय्य लागले पण तरीही विजय दिवाण, प्रल्हाद मिस्त्री, उमेश ठाकूर, गणेश चोंधे, विवेक सिद्ध, प्रदीप खेलूरकर, माणिक शेडगे जगदीश काबरे, निलेश शिंगे, दयानंद सी बी, सुगन बरंठ यांचा यात सिंहाचा वाटा होता
सर्वांचेच खूप खूप आभार

शेवटी एवढेच म्हणेन कि जो बदल तुम्हाला जगात घडवायचा आहे त्या बदलाची सुरवात स्वतःपासून करा
होय खरंय आपण एकदम जग किंवा देश बदलू शकत नाही पण जगाचा एक कोपरा तर बदलू शकतो तशी सुरवात करूया
आवाज दो हम एक है

साम टीव्ही वरील या कार्यक्रमाची लिंक-
भाग २-  https://www.youtube.com/watch?v=_Iq_7La6Apo
भाग १ - https://www.youtube.com/watch?v=1iLcWSNcedg

समूहाची फेसबुक लिंक-
https://www.facebook.com/groups/mahatmagandhibest/

Whatsapp समूहासाठी संपर्क-
प्रल्हाद मिस्त्री-9420914987
गणेश चोंधे-9763715001

तर मग भेटूया परत
आपल्याला स्नेह संमेलन  कसे वाटले याची प्रतिक्रिया अवश्य द्यावी
आपलाच
संकेत मुनोत

आर्थिक व्यवहारात लोक अस का करत असावेत?

आर्थिक व्यवहारात लोक अस का करत असावेत?
म्हणजे आसपास अनेकदा ऐकू येते कि हा माझे एवढे एवढे हजार किंवा एवढे एवढे लाख ₹ घेऊन निघून गेला किंवा देतच नाहीए किंवा बाहेर मस्त मजेत फिरतोय पण पैसे देण्याच्या वेळी कारणे सांगतोय.
आत्मप्रौढी नाही पण कुणाकडून 100 रु घेतलेले ही सहन होत नाहीत परत कधी देतो असे होते, एक वेळ कमी खाईन किंवा काम जास्त करेन पण ते पैसे परत केल्याशिवाय राहणार नाही अशी मनाची अवस्था होते.
आसपास वावरणारे असे लोक पाहिलेच होते पण सामजिक क्षेत्रात ही असे अनेक लोक असल्याचे पाहिले. म्हणजे तसा वैयक्तीक अनुभव काही आला नाही पण अनेकांकडून ऐकले कि ही-ही व्यक्ती आर्थिक बाबतीत अशी-अशी आहे म्हणून त्यापासून सावध रहा इ. 
विश्वास खूप महत्वाची गोष्ट असते, मला तर अणेक लोक असे भेटले कि फक्त आवाहन करण्यास अवकाश कि आपण हे हे कार्य करणार आहोत किंवा अशी अशी याच्यासाठी पैश्याची गरज आहे कि लगेच ट्रान्सफर ही करतात पण अश्या लोकांच्या विश्वासाला धक्का पोहोचू नये हा सतत अट्टाहास असतोच, ती मोठी जबाबदारी असते.
म्हणजे सामजिक क्षेत्रात पडल्यावर मला माहित पडले कि अणेक कामे लोकवर्गणीतुनच करावी लागतात पण ती करतांना ही दडपण येत, उलट मी काही दानकर्त्यानाच अहो एवढे कशाला देताय? असे ही म्हटलेलो आहे म्हणजे माझे तसे बोलणे चुकीचे होते हे नंतर काही जेष्ठांनी क्षात आणून दिले कारण ते दानकर्ते काही वैयक्तिक रक्कम देत नव्हते त्यामुळे अश्या वेळी कमी द्या वगैरे म्हणू नये, पण हे करतांना सुद्धा प्रत्येक पै न पै चा हिशोब ठेवायला हवा असे वाटते म्हणजे माझा तरी तोच प्रयत्न राहील ते वैयक्तिक जीवन असो वा सामजिक..
आपले काय मत..?

त्वचेचा रंग किती महत्वाचा ?

मला तर तो इतका महत्वाचा वाटत नाही पण आसपास अनेक जण त्याबद्दल चर्चा करतांना पाहतो, जोडीदार निवडतांना तर बहुतेक जण इतर गोष्टींसोबतच असा रंग निवडून करतात
दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी हीचे याबाबतचे विचारांची प्रगल्भता याबाबत कौतुकास्पद आहे
चित्रपटांतही कमीत कमी मेकअप करणारी अभिनेत्री म्हणून साई पल्लवी म्हणते ‘मी स्वत: सौंदर्य प्रसाधनांना पाठीशी घालत नाही. तुम्ही स्वत:विषयी, त्वचेच्या रंगाविषयी आत्मविश्वास बाळगलाच पाहिजे’, या उलट एका ठिकाणी नवऱ्याचा सावळा रंग आवडला नाही म्हणून त्याला जिवंत जाळण्यात आले त्या नवर्याला ती रोज टोमणे देत होती पण त्याचे तिच्यावर जीवापाड प्रेम असल्यामुळे तो सहन करत होता आणि शेवटी स्फोट झाला.
कधी येणार विचारांची प्रगल्भता?
एक गोष्ट लक्षात घ्या इंग्रजांनी जगभर राज्य केले त्यामुळे राज्यकर्त्याचा रंग हा सौंदर्याचा रंग म्हटला जाऊ लागला तोच जगभर आफ्रिकेमधील किंवा कोठीत कृष्णवर्णीय लोकांनी राज्य केले असते तर तो काळा रंग सौंदर्याचे प्रतीक म्हणून ओळखला गेला असता
त्वचेचा रंग कसाही असला तरी चालतो पण माणसं रंग बदलणारी नसावीत
संकेत मुनोत

Please do Comment, Share ,Follow and Subscribe

छोट्या कपड्यामुळे नव्हे तुमच्या विकृत मानसिकतेमुळे होतात बलात्कार

परवा दिल्लीमधील एक महिला म्हणाली कि स्कर्ट किंवा छोटे कपडे घातल्यामुळे बलात्कार होतो, पुरुषाने म्हटलेले वेगळे पण स्रीनेच स्त्री बद्दल अस बोलणं?हो पण नंतर अनेक महिलांनी तिच्याकडे जाऊन तिला जाब वगैरे विचारला आणि पुढे बरच काही झालं
पण मला वाटत आपण मानसिकता बदलायला हवी, अनेक ठिकाणी तर असे कपडे घालणेच allowed नसते अश्या ठिकाणी ही बलात्कार होतातच ना? कधी 8 वर्षाच्या असिफावर होतो तर कधी 70 वर्षाच्या म्हातारीवर ही
या सर्वानीच काय लहान कपडे घातले होते का?
या पुरुषांची महिलेकडे एक उपभोगाची वस्तू म्हणून बघण्याची दृष्टी जेव्हा बदलेल तेव्हाच हे शक्य आहे. आणि खंत या गोष्टीची वाटते कि महिलांची सुद्धा अशी विचारसरणी आहे
संकेत

आई

मी आज जे काही आहे त्यात या माऊलीचे मोलाचे योगदान मोठे आहे.
मला आठवतय मी 3-4 वर्षाचा असतांना आमच्या घरी काहीच नव्हते , आई शेजारून पोळपाट आणून पोळ्या लाटत असे एक- एक भांडे हळू-हळू घरी येत गेले, मी 10 वीत असतांना पप्पांची नोकरी गेली होती, नवीन नोकरी लागण्यास अवकाश होता तेव्हा एवढया दिवस गृहिणी असणाऱ्या आईने स्वतः नोकरी जॉईन केली, सकाळी घरातील सगळे कार्य करून ती नोकरीला जात असे.पुन्हा काही महिन्यानंतर वडील एका ठिकाणी नोकरी लागल्यावर आईने नोकरी सोडली पण घरातील सगळे कार्य सांभाळून सोबत फॉल पिको आणि अनेक गोष्टी ती करते, फॉल घरी बसवत असली तरी पिको करण्यासाठी फक्त 50 पैश्यासाठी लांब लांब चालत जात असे.मला वाचनाची गोडी आईमुळेच लागली.

एक सर्वात मोठी गोष्ट आईकडून शिकायला मिळाली ती म्हणजे कोणी आपल्याशी कसेही वागले तर आपण त्यांच्याशी चांगलेच वागायचे(याउलट इतर लोक म्हणत कि जशास तसे वागावे), म्हणजे अनेकदा असे होई कि समजा कधी कुणाशी भांडण झाले आणि मी घरी तक्रार घेऊन आलो कि आई त्याने मला मारलं किंवा हे चुकीचं केलं मी आता त्याच्याशी बोलणार नाही मी पण अस अस करेन, मारेन..etc म्हणत असे तर ती मलाच ओरडत आणि ठणकावून सांगत कि तू चांगलंच वगायच, मला तेव्हा आईचा प्रचंड राग यायचा पण आज सामजिक चळवळीत पडल्यावर किंवा गांधींविचारांचा अभ्यास करू लागल्यावर तेच नव्याने शिकायला मिळतंय.
नातेववाईकांमध्ये सुद्धा प्रत्येकाशी आई प्रेमाने वागते म्हणजे कधी कधी असे होते कि वादातून काही जण एकमेकांशी बोलतच नाहीत ना एकमेकांच्या घरी जातात पण आईशी हे सर्वच चांगलं बोलतात, काही प्रसंग असेही पाहिले कि जिथे चुकी आईची नसते पण समोरचा गैरसमज करून घेऊन रागात खूप काही बोलून जातो पण आई अश्यांना ही समजावून सांगते शिवाय अनेकदा स्वतःची चुकी नसतांना स्वतः झुकुन क्षमा मागते, कोणाशीही नाते न तोडायची सगळ्यांशी विनम्रतेने वागायची तिची ही सवय नकळत मला थोडी का होईना लागली, टीव्ही चर्चा किंवा लेखांमध्ये सत्यासाठी भांडत असलो किंवा ठाम भूमिका घेत असलो तरी वैयक्तिक जीवनात मी भांडण टाळतो आणि जर झालेच तर चुका स्वतःवर घेऊन नाते अधीक बळकट करू शकतो ते त्यामुळेच, पाहुणचार बद्दल बोलायचे तर आमचं घर पुण्यात मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे बहुतेक सासर व माहेर ची मंडळी आमच्या घरी च येतात तर आई कधीच कुणालाच उपाशी पोटी जाऊ देत नाही (पुणेकर झालेली असूनही😉).आणि विशेष म्हणजे सर्वांना समान वागणूक म्हणजे हा नातेवाईक श्रीमंत आहे किंवा याच्याकडे हे काम आहे म्हणून याला वेगळा पाहुणचार आणि गरीब आहे किंवा याच्याकडे आपले काही काम नाही म्हणून याला वेगळा पाहुणचार अश्या गोष्टी नाहीत सगळ्यांशी समान वागते.

पण मला तिचे दैवतीकरण ही करायचे नाही, जश्या उणीवा माझ्यात व आपणा सर्वात आहेत तश्या काही तिच्यात ही आहेत व त्या मी तिला वेळोवेळी सांगतो ही (जस कि टीव्ही वर त्या बोरिंग कौटुंबिक मालिका पाहून भावनिक होणे), शिवाय प्रत्येक गोष्ट आई म्हणेल तसेच करणे तिच्या शब्दाबाहेर न जाणे मला पटत नाही, होय मोठया वृक्षाची सावली आवश्यकच आहे पण जर स्वतःला घडवायचे असेल तर थोड बाहेर पडायलाच हव आणि स्वतः ऊन-पाऊस-सावली- वादळ यांच्याशी सामना करायला हवा.
कधी कधी कोणी खूप वाईट वागले, कमी लेखले तर आई तेव्हा म्हणते संकेत तुला सांगितलं ना चांगले पैसे कमव कार बंगला घे मग बघ कस वागतात ते,  तर तुला एवढंच सांगतो आई कि मी नोकरी व्यवसाय आपल्या सर्वांची स्वप्न पूर्ण करू शकेल व जबाबदाऱ्या व्यवस्थित हाताळू शकेल यासाठीच करत आहे. माझ्यामुळे तुम्हाला किंवा कुठल्याही कुटुंब सदस्याला अन्न-वस्त्र-निवारा-आरोग्य-शिक्षण व इतर गोष्टीत कुठलीही कमी पडू देणार नाही एवढ अर्थार्जन मी नक्कीच करेन आणि कुठलीही जबाबदारी झटकणार नाही पण यासोबतच माझी काही सामजिक बांधिलकी ही आहे तीही जपेन , तुला आठवतय ना मी आयोजित केलेल्या एका सामजिक कार्यक्रमात शारदा बापट तुला म्हणाल्या होत्या ना कि तुम्ही मुलाला छान संस्कार दिलेत तेव्हा तुझ्या डोळ्यात आलेलं पाणी अजूनही आठवतय मला आणि असे बरेच प्रसंग आहेत ना आई.शेवटी एवढंच म्हणेन कि कधीही कुणाला आईवरुन शिवी देणार नाही प्रत्येक महिलेचा तुझ्याप्रमाणेच आदर करेन आणि कधीही तुझी मान खाली जाईल असे अप्रामाणिक चुकीचे काम करणार नाही
संकेत मुनोत

Please do Comment, Share ,Follow and Subscribe

लोक कमी लेखातील लेखू द्या पण ही सवय लावाच

आपण स्वतःला एक महत्वाची सवय लावून घेतली पाहीजे, ती म्हणजे प्रश्न विचारण्याची सवय! आपल्याला एखादी गोष्ट माहीत नसेल तर प्रामाणिकपणे कबुल करणे आणि ती माहीती करून घेण्यासाठी ज्या व्यक्तीला माहीती आहे त्या व्यक्तीला प्रश्न विचारणे, किवा योग्य त्या पुस्तकातून संदर्भ शोधणे, यात कमीपणा वा लाज वाटण्यासारखे काहीच नाही. आपण जर प्रश्न विचारल्यावर इतरांना जरी आपण मुर्ख आहोत असे वाटले तरी जो पर्यंत उत्तर मिळत नाही तो पर्यंत आपण प्रश्न विचारण्याचे थांबवायचे नाही. कारण या जिज्ञासू वृत्तीमुळेच आपल्या प्रगतीच्या वाटा रुंद होऊ लागतात, आणि आपला प्रगल्भ आयुष्याकडे प्रवास सुरू लागतो. ✍️JK