वाई येथील #चांगल्या_विचारांचे_स्नेहसंमेलन हा एक अभूतपूर्व अनुभव होता.
अपेक्षेच्या दुप्पट सदस्य सहभागी झाले होते
Knowing Gandhism Global Friends आणि चांगले विचार समूहाचे तिसरे स्नेहसंमेलन 30 एप्रिल 2017 रोजी वाई येथे कृष्णा नदीच्या काठी 'पद्मविभूषण तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी' यांचे वास्तव्याने पुनीत झालेल्या वाई येथील वाड्यावर (विश्वकोष संस्थेत) संपन्न झाले.महाराष्ट्रभरातून(नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई,नाशिक, पुणे, सातारा, .....)वेगवेगळ्या क्षेत्रातून , वेगवेगळ्या वयोगटाचे लोक येथे आले होते.(विद्यार्थी, शिक्षक, शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ, वैद्य समाजसेवक, शेतीतज्ञ, चित्रपट दिगदर्शक, माजी केंद्रीय मंत्री, आंबेडकर चळवळीतील सामजिक कार्यकर्ते, कम्युनिस्ट चळवळीतील जेष्ठ, माहिती अधिकार कार्यकर्ते, राजकीय प्रवक्ते, महिला सशक्तीकरण कार्यकर्ते,पत्रकार, साहित्यिक, तंत्रज्ञ असे अनेक लोक....)
सुगन काकांच्या ऊर्जादायी गीतापासून कार्यक्रमाला सुरवात झाली.प्रल्हाद मिस्त्री सरांनी समूहाचे उद्दिष्टे सांगून प्रस्तावना केली. परिचय सत्रात अनेकांना जवळून जाणून घेता आले.
म्हणजे ऋषिकेश पवार सारख्या 19 वर्षीय पत्रकारितेच्या तरुण विद्यार्थ्यापासून ते रझिया पटेल सारख्या तज्ञ लोकांना विविध बाजुंनी समजून घेता आले.उदा -संजय सोमवंशी पाटील म्हणाले
नथुरामचे भडक नाटक बघुन तेच खरे वाटून मी त्या नाटकाच्या ८० सीडी विकत घेवुन मित्रांना वाटणारा मी सत्याचे प्रयोग हे पुस्तक वाचल्यामुळे गांधीविचांराकडे वळालो!-असे स्वतःचे अनेक थरारक अनुभव अनेकांनी उलगडले.
दुपारी 'मुद्द्याच बोला' या साम टीव्हीवरील शो मध्ये अनेक नवीन प्रश्नांची उत्तरे मा. संजय आवटे सरांनी त्यांच्या अनोख्या शैलीत समूहातील अनेक सदस्यांकडून घेतली.(मला किंवा कोणत्याही सदस्याला याबाबत कोणतीही पूर्वकल्पना नव्हती हा सर्वांसाठीच एक मोठा धक्का होता)
त्यांनतर जेवण करतानाही खूप चांगले अनुभव आले.
टेबल खुर्च्याची सोय नव्हती जागाही अपुरी होती पण कोणी कुठलीही तक्रार न करता मिळेल तेथे बसून जेवण केले.
शिवाय गांधीविचारांना अमलात आणून स्वतःचे जेवणाचे ताट स्वतः घासून- धुऊन ठेवले. 2 वेळा केंद्रीय मंत्री राहिलेले आणि सलग 7 सत्र(35 वर्ष) खासदार राहिलेले विलास मुत्तेमवार असो वा साम टीव्हीचे मुख्य संपादक संजय आवटे सर, महाराष्ट्र राज्याचे माजी साखर संचालक साबळे सर, शेतीतज्ञ गोजमे सर, धरण बांधणीत महत्वाचे योगदान असणारे प्रल्हाद मिस्त्री सर, विज्ञान शिक्षक जगदीश काबरे सर, महाराष्ट्रभर दिवे लावणारे तंत्रज्ञ डॉ अरुण मानकर, banking क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणारे सुरेश जोशी आणि इतर सर्वच मान्यवर या सर्वांनी स्वतःची ताटे स्वतः घासून धुवून ठेवली.
दुसऱ्या सत्रात साम टीव्हीचे मुख्य संपादक संजय आवटे सरांनी'गांधी,आंबेडकर, नेहरू आणि आयडिया ऑफ इंडिया' याविषयी अप्रतिम बीजभाषण केलले. त्यात त्यांनी गांधीविचार आजच्या परिप्रेक्षात मांडणे किती महत्वाचे आहे, आपण मुख्य प्रवाहात आहोत, परंपरेची स्पेस गांधीजींनी कशी वापरली हे सविस्तर व अत्यंत प्रभावीपणे विषद केले. त्यांनतर संजय सोनवणी सरांनी संघाचा धर्म कोणता? हिंदू कि वैदिक?- "संघ आणि धर्म" या विषयावरील व्याख्यानात संघ वैदिक धर्माची पाठराखण करत हिंदुंची दिशाभूल करत आहे यावर बोलत वैदिक धर्म आणि हिंदू धर्म यातील फरक समजावून सांगितला. संघाचा वैदिकवाद असून हिंदू धर्माशी त्याचा काहीही संबंध नसल्याचेही विषद केले.शास्त्रज्ञ आणि महाराष्ट्राचे माजी साखर संचालक आणि शास्त्रज्ञ संपतराव साबळे यांनीही यावर प्रकाश टाकला.युवा साहित्यिक श्रीरंजन आवटे आणि अजय मक्तेदार यांनी सोशल मीडिया बाबत विस्तृत विवेचन दिले. दोन्ही सत्रांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला त्यावर चर्चा ही खूप रंगली. यांनंतर जगदीश सरांनी समूहाचा उद्देश, समूहाचा 2016-2017चा वार्षिक कृती कार्यक्रमाचा अहवाल, पुढे आपण काय करायचे आहे याबाबत मार्गदर्शन केले अनेकांनी यात सूचना add केल्या. समूहातील प्रत्येक व्यक्तीने आपापल्या परिसरातील समस्या , सामजिक प्रश्न जाणून घेऊन त्यावर कार्य करावे ज्याला समुह पूर्ण सहकार्य करेल , सोबतच लेखन , वाचन, वकृत्व कौशल्य कसे अंगीकृत करावे याबाबत मार्गदर्शन केले आणि कार्यक्रम संपला.
कार्यक्रमात येणाऱ्या प्रत्येकाला एक पुस्तक संच (विजय दिवाण यांनी लिहलेले विनोबांचे चरित्र, भगतसिंग, विवेकानंद, आदींची स्वलिखित छोट्या पुस्तिका) समूहातर्फे भेट म्हणून देण्यात आला.(अचानक सदस्यसंख्या दुप्पट झाल्याने हा पुस्तक संच काही जणांना भेटला नाही त्यांनी संपर्क करावा त्यांना पोस्टान विनोबांचे पुस्तक पाठवले जाईल)
सातारा येथील गानकोकिळा समता आणि सन्मित्र अजय यांच्या विभागात त्याच दिवशी दुसरा एक कार्यक्रम असूनही ते तो कार्यक्रम पूर्ण करून दुपारी तेथे आले आणि गांधीजींचे एक सुंदर शिल्प त्यांनी भेट म्हणून दिले.
कार्यक्रमाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तेथे कुणाचाही सत्कार झाला नाही वा कार्यक्रमाला कुणीही अध्यक्ष नव्हते. सर्व लोक अभ्यासक किंवा सदस्य म्हणून सहभागी झाले होते.
सोबतच आम्ही तेथे एक दिवस आधी गेल्याने आम्हाला तेथे रमेश ओझा, प्रदीप खेलुरकर रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ, सुगन बरंठ यांच्यासारख्या बुद्धिवंतांशी तर रात्री माणिक कुरणे, आंनद भुसे, अजय मक्तेदार, विजय जाधव या फेसबुक मित्रांशी संवाद साधण्याची पहिल्यांदाच संधी मिळाली.
कार्यक्रमादरम्यान कुणाचेही मन दुखावले असेल, नियोजनात कुठे कमी जास्त झाले असेल तर समूहाच्या वतीने माफी असावी सोबतच पुढच्या वेळी ते परत न होण्याची आणि आणखी सुधारणा करण्याचा आपण प्रयत्न करू
संमेलन घेण्यास सर्वांचेच सहाय्य लागले पण तरीही विजय दिवाण, प्रल्हाद मिस्त्री, उमेश ठाकूर, गणेश चोंधे, विवेक सिद्ध, प्रदीप खेलूरकर, माणिक शेडगे जगदीश काबरे, निलेश शिंगे, दयानंद सी बी, सुगन बरंठ यांचा यात सिंहाचा वाटा होता
सर्वांचेच खूप खूप आभार
शेवटी एवढेच म्हणेन कि जो बदल तुम्हाला जगात घडवायचा आहे त्या बदलाची सुरवात स्वतःपासून करा
होय खरंय आपण एकदम जग किंवा देश बदलू शकत नाही पण जगाचा एक कोपरा तर बदलू शकतो तशी सुरवात करूया
आवाज दो हम एक है
साम टीव्ही वरील या कार्यक्रमाची लिंक-
भाग २- https://www.youtube.com/watch?v=_Iq_7La6Apo
भाग १ - https://www.youtube.com/watch?v=1iLcWSNcedg
समूहाची फेसबुक लिंक-
https://www.facebook.com/groups/mahatmagandhibest/
Whatsapp समूहासाठी संपर्क-
प्रल्हाद मिस्त्री-9420914987
गणेश चोंधे-9763715001
तर मग भेटूया परत
आपल्याला स्नेह संमेलन कसे वाटले याची प्रतिक्रिया अवश्य द्यावी
आपलाच
संकेत मुनोत
No comments:
Post a Comment