AddThis code

Sunday, June 23, 2019

My father and me

परवा father's day  दिवस झाला अनेक जण वडिलांबद्दल भरभरून लिहित होते पण मला काही ऑफिसमुळे ते शक्य झालं नाही शिवाय एखाद्याच एकदम दैवतीकरण करण किंवा नुसतं गोड गोड बोलणं मला जमत ही नाही
काल पप्पांचा वाढदिवस झाला त्यानिमित्त पप्पा तुमचे हार्दिक अभिष्टचिंतन
फोटोत साधे भोळे दिसत असले तरी आतून प्रचंड कडक म्हणजे मी खूप मार खाल्लेला आहे त्यांचा अगदी दहावीपर्यँत
आमचे दोघांचे विचार प्रचंड भिन्न म्हणजे खूप सारे मतभेद आहेत पण आनंदाची गोष्ट म्हणजे मनभेद मात्र नाहीत
उदा-
-त्यांचा ज्योतिष वगैरे वर बराच अभ्यास म्हणजे अनेक नातेवाईक व परिचित लोक त्यांच्याकडे ज्योतिष वगैरे पहायला येत.
इकडे माझा नशीब-ज्योतिष या गोष्टींवर अविश्वास आणि विज्ञानावर अधिक विश्वास.
पण माझ्यामुळे हळू हळू त्यांनीही स्वतःत थोडे बदल केले , आता नाही पाहत ते तेवढं ज्योतिष वगैरे,  म्हणजे पूर्ण बंद केलं अस मी म्हणणार नाही कारण मला त्यांच्यावर माझे विचार लादायचे नाहीत, विचारांचा प्रवास नेहमी ह्रदयाकडून मेंदूकडे होत असतो आणि तो तसाच होईल मी माझे विचार कधीही त्यांच्यावर लादणार नाही
वृत्तपत्र रोज वाचत असले तरी घर आणि नोकरी सोडून इतर कशात त्यांना जास्त रस नाही.
या उलट मला कशा कशात रस आहे आपणास माहीतच आहे(टीप- घर आणि करिअर ची जबाबदारी पूर्ण करूनच मी या गोष्टीत लक्ष घालतो).
पैश्याच्या बाबतीत प्रचंड काटकसरी
याउलट मी थोडा उधळ्या(त्यांच्या नजरेत तरी) , जिथे लागेल तिथे बिनधास्त खर्च करणारा(त्यांनी तसे दिवस पाहिलेत त्यामुळे त्यांच तस असण स्वाभाविक आहे)
खाण्याच्या बाबतीत पण ते घरी सर्व भाज्या व जे ताटात असेल ते खातात, तर मी त्याच्या अगदी विरुद्ध, खाण्याच्या बाबतीत घरी माझे बरेच नखरे असायचे(कडा बोर्डिंगमध्ये 2 वर्षे राहून आल्यापासून ते नखरे ही अगदी कमी झाले आहेत)
अश्या खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या दोघांच्या अगदी विरुद्ध किंवा भिन्न आहेत
पण काही गोष्टी त्यांच्याकडून उपजत मिळाल्या त्या म्हणजे निर्व्यसनीपणा, प्रामाणिकपणा आणि चिकाटी
(चिकाटी- एकाच ठिकाणी 22 वर्षे नोकरीला शेवटी संगणक आल्यावर त्यांचे तेथील कामच बंद झाल्यवर दुसरीकडे जॉईन झाले, माझ्यात तेवढी चिकाटी नाही पण आजच्या काळात तुम्हाला नवीन काही शिकायचे असेल तर बदलण्याशिवाय पर्याय नसतो असेही मला वाटते)
त्यांना सामजिक,साहित्यिक किंवा इतर गोष्टीत तेव्हा ही रस नव्हता आजही नाही
म्हणजे ते मला त्यावरून नेहमी बोलतात - कि काय उगाच लेख लिहायचा, काय मिळत त्यातून, कोण त्या IAS निधी चौधरी तुला काय घेणं त्यांचं, कशाला त्यांच्याशी बोलतोस, लोकांना गोळा करतोस , गांधीला काय कळतं होत का?, 'आपण भल आपलं घर भल'  अश्या अनेक पद्धतीने ते मला आजही बोलतात..
पण तुषार गांधी सर किंवा काही मान्यवर घरी आले तेव्हा किंवा माझ्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळेस संजय आवटे सरांनी जेव्हा त्यांना माझ्याबद्दल सांगितलं तेव्हा ते जाम खुश झाल्याचेही पाहिले,
मागे कुणीतरी परिचित माझ्याबद्दल कुचाळक्या(चहाड्या) करत होते कि काय ते तुमचं पोरगं पुणे विद्यापीठात अन कुठे कुठे व्याख्यानाला जात, अन कशाला ते सामजिक कार्य करायचं न लोकांना एकत्र आणायचं न  इतर गोष्टी करायच्या त्यापेक्षा तोच वेळ विमा पॉलिसी काढून पैसे कमवायला लावायचा,  तेव्हा पप्पा म्हणाले होते कि "कुटुंब आणि करिअर सांभाळून च करतोय ना तो ते, तुमच्यासारखा तर नाही याच्या त्याच्या उचापत्या करत फिरत? आणि कुणाला ही नाही बोलवत अस पुणे विद्यापीठ व्याख्यानाला,  काहीतरी असलं म्हणूनच बोलवलं असलं ना विद्यापीठाने.."ते हे बोललेलं मला आईकडून कळाल, पण ऐकल्यावर बर वाटलं
असो जवळपास 60 वर्षापूर्वी करंजी जवळ एका छोट्याश्या खेड्यात त्यांचा जन्म झाला
7 वी पर्यँत त्या खेड्यातच शिक्षण करून पुढच्या शिक्षणासाठी अहमदनगर येथे एका परिचितांकडे ते राहिले आणि थोडे शिक्षण करून त्यांचे कुटुंबच 35 वर्षापूर्वी पुण्याकडे स्थायिक झाले, सुरुवातीचा काही काळ अत्यंत हलाखीचा म्हणजे 1991-1994 दरम्यान घरी काहीच समान भांडी वगैरे नव्हते आई वडील दोघांनी अतोनात कष्ट करून हळूहळू घर व्यवस्थित केले, एका दुकानी पूर्ण वेळ काम करून घरी 2-3 जणांची कामे ते आणत(दिवानजी), म्हणजे काही वर्ष फक्त 4-5 तास झोपून त्यांनी काम केलं,  पण जस कॉम्प्युटर आला तसा त्यांच्यासारख्या अनेकांची काम संगणक काही क्षणात करू लागला आणि त्यांना दुसरीकडे जॉईन व्हावे लागले,  स्वतःच्या प्रामाणिकपणाच्या जोरावर ते अजूनही तिथे टिकून आहेत. माझ्या शिक्षणासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले.
असो गिफ्ट वगैरे काय देणार मी पप्पा तुम्हाला तुम्हाला गिफ्ट देण्याएवढा मोठा मी कधीच होऊ शकणार नाही, पण एवढ नक्की सांगतो कि तुमचे जे निर्व्यसनीपणा, चिकाटी आणि प्रामाणिकपणा हे गुण आहेत ते शेवटपर्यँत स्वतःत कायम ठेवेन कधी कुणाला फसवणार नाही एवढेच वचन देतो
पप्पा तुम्हीही रोज सकाळी/संध्याकाळी काही वेळ फिरायला जाऊन थोडा शारीरिक आणि मानसिक व्यायाम करून स्वतःचे आरोग्य अधिक चांगले करा ही विनंती
फोटो 3 वर्षापूर्वीचा..

No comments:

Post a Comment