AddThis code

Monday, June 17, 2019

साम टीव्ही वरील चर्चेत युवा अभ्यासक म्हणून वारी आणि संत विचार याबद्दल मांडलेले मुद्दे

आजच्या #साम_टीव्ही वरील चर्चेत तरुण अभ्यासक म्हणून सहभागी झालो असलो तरी आजचा अनुभव थोडासा वेगळा होता.
04 जुलै 2017
तरी तेथे सांगितलेले आणि तेव्हा विसरलेले काही मुद्दे येथे थोडक्यात मांडत आहे.

वारीचा अनुभव अविस्मरणीय होता.

‘यारे यारे लहान थोर! याती भलते नारी नर

जात, वर्ग, धर्म , लिंग , वय या कुठल्याही प्रकारचा भेदभाव वारीत दिसत नाही आणि दिसते ती फक्त समता ही आम्हा तरुणांसाठी सर्वात सकारात्मक बाब वाटते.
म्हणजे एक मोठे कीर्तनकाराच्या जेव्हा एक मनुष्य पाया पडला त्याचे झाल्यावर तो कीर्तनकार ही पुन्हा त्याच्या पाया पडला.मालक असो वा नोकर, राजा असो वा रंक किंवा इतर कोणीही तो वारीत फक्त माउली म्हणून सहभागी होतो ही अजून एक सकारात्मक बाब

जैन धर्मात ज्याला 5 अनुव्रते, बौद्ध धर्मात ज्याला पंचशील, ख्रिश्चन धर्मातील 10 कमांडमेंटस पैकी 5 अश्याच प्रकारे वारकरी पंथात सत्य, अहिंसा , अस्तेय, अपरिग्रह, बंधुता या पाच तत्वांचे वारीत पालन केले जाते

आपण निरीक्षण केले तर एक गोष्ट लक्ष्य येईल प्रत्येक देवतेच्या हाती शस्त्र असते तर विठ्ठलाच्या हातात कोणतेही शस्त्र नसते जे अहिंसेचे प्रतीक आहे आणि प्रत्येक वारकरी अहिंसेचा पुजारी.
शिवाय वारीमध्ये सहभागी होणारे वेगवेगळ्या धर्माचे अनुयायी आणि प्रभाव जो भारतीय संविधानाशी सुसंगत आहे.

मागच्या वर्षी वारी जाण्याच्या वेळेसच ईद आली तर लोणंद सारख्या अनेक गावातून मुस्लिम समाजाने शाकाहारी ईद साजरी केली.मुस्लिम, जैन आणि अनेक धर्माचे लोक यात सहभागी असतात.आजही अनेक मुस्लिम कीर्तनकार याबाबत खूप छान कार्य करतात.

कोणत्याही धर्मचा, जातीचा, व्यक्तीचा द्वेष् न करण्याबद्दल तुकोबांचा हा अभंग
कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दु:ख जीव भोग पावे.

अंधश्रद्धा-कर्मकांड आणि देव आणि भक्त यांच्यामध्ये असणारा मध्यस्थ पुरोहित वर्ग नाकारत कर्मयोगाची शिकवण वारीत दिली जाते

हरी मुखे म्हणा हरीमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी
म्हणजे कर्मकांडे सांगून आणि सामन्य जनतेचे शोषण करून स्वतःचे पोट भरणाऱ्या पुरोहितशाही विरुद्ध बंड उभारून देवाच्या नामजपाने कोणत्याही मध्यस्थशिवाय देवाशी थेट संपर्क करण्याबद्दल हा अभंग सांगतो

साधू ओळखण्यासाठी तुकोबा म्हणतात
ऐसे कैसे झाले भोंदु, कर्म करोनी म्हणती साधु, अंगा लावूनिया राख, डोळे झाकुनी करिती पाप, दावुनी वैराग्याची कळा, भोगी विषयाचा सोहळा, तुका म्हणे सांगो किती, जळो तयाची संगती.

. जे का रंजले गांजले, त्यासि म्हणे जो आपुले, तोचि साधु ओळखावा, देव तेथेची जाणावा

असो वारकरी वारीच्या दिवसात जे हे समतेचे नियम पाळतात ते त्यांनी आणि आपण प्रत्यक्ष रोजच्या जीवनात ही अनुसरले तर समाजात खूप सकारात्मक बाबी घडतील.

आजच्या धावपळीच्या दिवसात तरुणांना एवढया दिवस सहभागी होणे अवघड आहे पण तरीही एखादा दिवस तरी वारी अवश्य अनुभवावी आणि समजा  तेही शक्य नसेल तर निदान संतसाहित्याचा अभ्यास तरी करावा ही विंनंती आहे

जश्या अनेक सकारात्मक बाबी आहेत तश्या काही नकारात्मक बाबीही आहेत ज्ञानदेवांना ज्यांनी वाळीत टाकले किंवा तुकोबांची ज्यांनी गाथा बुडवली असे काही गट आता या वारीत घुसण्याचा आणि त्यामध्ये स्वतःचे वर्चस्व स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहेत यावर्षीचा त्यांचा हा प्रयत्न वारकर्यांनी हाणून पाडला पण त्या शस्त्रधारी भडक लोकांचे प्रयत्न अजूनही सुरु आहेत.

चांगल्या गोष्टीला सुरवातीला कसोशीने विरोध करायचा, कुजबुज करायची पण एवढे करूनही समोरची रेष छोटी झाली नाही तर मग ती रेष आपलीच आहे असे म्हणून गोड गोड बोलून त्या रेषेचे(पंथाचे) स्वामित्व स्वतःकडे घ्यायचे हे प्रकार आहेत.यांच्यापासून वेळीच सावध व्हायला हवे.

असो पुढच्या वर्षी आपणही आमच्यासोबत वारीत सहभागी व्हाल आणि आपण सर्व मिळून हा समतेचा, संतविचारांचा वारसा समर्थपणे पुढे नेऊन स्वतःला आणि भोवतालच्या समाजाला अधिक निर्मळ, उत्तम, उदात्त आणि उन्नत करूया ही आशा करतो.

आपलाच
संकेत मुनोत

कार्यक्रमाची लिंक
https://youtu.be/it-WV0OD_ls


No comments:

Post a Comment