AddThis code

Saturday, June 1, 2019

मुस्लिम समाज सुधारणेतील एक मोठे नाव प्रा. डॉ.Shamsuddin Tamboli ग्रेट भेट

प्रा. डॉ. Shamsuddin Tamboli सर यांचा आज वाढदिवस
एक ऊर्जदायी आणि #मुस्लिम_समाज_सुधारणेतील एक मोठे नाव
माझा आणि सरांचा परिचय वाढला तो बकरी ईद च्या दिवशी रक्तदान घेण्याच्या सरांच्या उपक्रमामुळे ज्यात knowing Gandhism टीम ही आयोजनात सहभागी झाली होती. शिवाय हमीद दलवाईंचे पेज चालवंतांना सरांचे मोठे सहकार्य मिळाले, मुस्लिम समाजातील खूप कमी व्यक्ती आहेत ज्या हमीद दलवाई या समाज सुधाराकाच्या  विचारांना स्वीकारून पुढे  घेवून जाण्याचा धाडस करतात.पण तांबोळी सरांनी या कार्याला वाहून घेतले आहे.दलवाई यांचे कार्य ते पुढे नेत आहेत.
सरांचा अल्प परिचय
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव या छोट्याश्या गावी सरांचे बालपण गेले. इंग्रजी विषयाचे गृहपाठ करता येत नाही म्हणून शिक्षकाकडून मार खाणारा आणि सहावीत असतांनाच शाळा सोडून देणारा शमसु सध्या  मराठवाडा मिञ मंडळाचे कनिष्ठ वाणिज्य महाविद्यालय , डेक्कन ,पुणे येथे गेली ३० वर्ष इंग्रजी विषयाचे अघ्यापन करतात आणि सर सद्या या महाविद्यालयात उपप्राचार्य आहेत. सोबतच मुस्लीम सत्यशोधक मंडळ चे अध्यक्ष ही आहेत. राष्ट्र सेवादल , आखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभा , महात्मा फुले समता प्रतिष्ठान , महाराष्ट्र अंधश्रधा निर्मूलन समिती आणि अनेक समविचारी संघटनामध्ये सरांचा सहभाग असतो,  तसेच त्यांच्या समन्वयातून विविध उपक्रम राबवण्याचा प्रयत्न सर नेहमी करतात.
    प्रकाशित  पुस्तके-  हमीद दलवाई - क्रांतिकारी विचारवंत, प्रभावशाली शिक्षण तज्ज्ञ, आझाद कलाम, शहाबानो ते शबानाबानो ( मुस्लीम महिला अधिकार संघर्ष ), मुस्लीम समाज प्रबोधन व विकास, मुस्लीम समाज - व्यक्ति विचार व साहित्य,  समान नागरी कायदा - अपेक्षा व वास्तव,  महाराष्ट्राचा शैक्षणिक विकास - नवे दालन नव्या संधी अशी अनेक पुस्तके सरांनी लिहली आहेत तर वेगवेगळ्या व्यक्ती ,घटना , विशेष विषयांवरील विशेषांक तसेच दीपावली व अनियमित विशेषांकांचे संपादन तसेच विविध साप्ताहिके ,मासिके तसेच वर्तमानपत्रातून सर नियमीत लेखन करतात
दूरदर्शनच्या विविध वाहिन्यावर मुलाखती , चर्चा, वाद- प्रतिवाद कार्यक्रमात नियमीत सहभाग असतो.

मुस्लीम प्रबोधनाच्या कार्यात सरांचे नाव मोठे आहे. सरांनी यासाठी हमीद दलवाई स्टडी सर्कलची स्थापना केली सोबतच  स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करणे, समविचारी संघटनाच्या समन्वयातून विविध उपक्रम आणि कार्यक्रमाचे आयोजन करणे अशी वेगवेगळी कामे ते करत आहेत, २०११ पासून बकरी ईद निमित्त पुण्यात तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात रक्तदान अभियानाची सूरूवात करणे असो किंवा धर्मनिरपेक्षते एकात्म समाजासाठी आंतरजातीय व आंतरधर्मिय विवाहास प्रोत्साहन , मार्गदर्शन आणि सहकार्य करणे , भारतीय संविधान साक्षरता व सन्मान अभियान निमित्तानेे विविध माध्यमांतून कार्यक्रमांचे आयोजन असे खूप सारे काम ते करत आसतात.

डिसेंबर २०१७ दरम्यान मा.पंतप्रधान , केंद्रिय मंत्री व विविध राजकीय पक्षांना तोंडीएकतर्फी ,अन्यायी तलाक बंदीसाठी निवेदने व मसूदा देण्यासाठी प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांनी मुस्लिम महिलांचे प्रश्नांचे गांभिर्य समाज व शासन दरबारी मांडले आहेत.

सोबतच ग्रामीण विद्यार्थ्याच्या निवास , शैक्षणिक व अर्थिक अडचणी सोडवण्यासाठी विशेष सहकार्य ते करत असतात.

गांधी नेशनल मेमोरियल ट्रस्ट तर्फे दिला जाणारा *बा -बापू विधायक कार्यकर्ता पुरस्कार*, *भास्कर अवार्ड, भाई तांबे पुरस्कार*, *उत्कृष्ट साहित्य पुरस्कार* , कृष्णा साहित्य गौरव पुरस्कार, *साहस सन्मान*, *अहिंसा सन्मान*, महर्षि विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वर्धापनदिनी - *जगन्नाथ राठी  पुरस्कार*, *मराठवाडा साहित्य भूषण पुरस्कार*, *Hero of Pune Award* by Times group *Pune Mirror* , *महात्मा फुले पुरस्कार*, *समाज शिक्षक गौरव पुरस्कार* अश्या अनेक पुरस्कारांनी सरांना अत्तापर्यँत गौरवण्यात आले आहे

अजूनही खूप मोठा परिचय देता येईल तूर्तास एवढेच.

दलवाई यांना अपेक्षित असणारा समाज निर्माण करण्यासाठी आधुनिक शिक्षण घेणारे तरुण आणि मुस्लिम व्यक्तीगत कायद्याचे बळी ठरणाऱ्या महिलांची शसक्त फळी उभी करण्याचा प्रयत्न सर करीत असतात.

दलवाई यांची मुस्लिम सत्यशोधक चळवळ या वर्षी पन्नाशीकडे गेली आहे. सुवर्णजयंती साजरी करीत आहे. या मुस्लिम प्रबोधनाच्या चळवळीत सरांचे योगदान महत्वपूर्ण आहे.
सरांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
संकेत मुनोत
#प्रेरणादायी_व्यक्तिमत्वे

No comments:

Post a Comment