AddThis code

Saturday, June 15, 2019

आर्थिक व्यवहारात लोक अस का करत असावेत?

आर्थिक व्यवहारात लोक अस का करत असावेत?
म्हणजे आसपास अनेकदा ऐकू येते कि हा माझे एवढे एवढे हजार किंवा एवढे एवढे लाख ₹ घेऊन निघून गेला किंवा देतच नाहीए किंवा बाहेर मस्त मजेत फिरतोय पण पैसे देण्याच्या वेळी कारणे सांगतोय.
आत्मप्रौढी नाही पण कुणाकडून 100 रु घेतलेले ही सहन होत नाहीत परत कधी देतो असे होते, एक वेळ कमी खाईन किंवा काम जास्त करेन पण ते पैसे परत केल्याशिवाय राहणार नाही अशी मनाची अवस्था होते.
आसपास वावरणारे असे लोक पाहिलेच होते पण सामजिक क्षेत्रात ही असे अनेक लोक असल्याचे पाहिले. म्हणजे तसा वैयक्तीक अनुभव काही आला नाही पण अनेकांकडून ऐकले कि ही-ही व्यक्ती आर्थिक बाबतीत अशी-अशी आहे म्हणून त्यापासून सावध रहा इ. 
विश्वास खूप महत्वाची गोष्ट असते, मला तर अणेक लोक असे भेटले कि फक्त आवाहन करण्यास अवकाश कि आपण हे हे कार्य करणार आहोत किंवा अशी अशी याच्यासाठी पैश्याची गरज आहे कि लगेच ट्रान्सफर ही करतात पण अश्या लोकांच्या विश्वासाला धक्का पोहोचू नये हा सतत अट्टाहास असतोच, ती मोठी जबाबदारी असते.
म्हणजे सामजिक क्षेत्रात पडल्यावर मला माहित पडले कि अणेक कामे लोकवर्गणीतुनच करावी लागतात पण ती करतांना ही दडपण येत, उलट मी काही दानकर्त्यानाच अहो एवढे कशाला देताय? असे ही म्हटलेलो आहे म्हणजे माझे तसे बोलणे चुकीचे होते हे नंतर काही जेष्ठांनी क्षात आणून दिले कारण ते दानकर्ते काही वैयक्तिक रक्कम देत नव्हते त्यामुळे अश्या वेळी कमी द्या वगैरे म्हणू नये, पण हे करतांना सुद्धा प्रत्येक पै न पै चा हिशोब ठेवायला हवा असे वाटते म्हणजे माझा तरी तोच प्रयत्न राहील ते वैयक्तिक जीवन असो वा सामजिक..
आपले काय मत..?

No comments:

Post a Comment