AddThis code

Tuesday, March 22, 2022

जालना मधील जे इ एस महाविद्यालयातील अविस्मरणीय क्षण

23मार्च 2019
08फेब्रुवारी 2019 रोजी जालना येथील जे ई एस महाविद्यालयात युवांशी छान संवाद साधता आला, 3-4 दिवसीय शिबिरानिमित्त महाराष्ट्रभरातील वेगवेगळ्या कॉलेजेसमधून युवा वर्ग येथे आला होता.
मला आमच्या NSS कॅम्प ची आठवण झाली
आजचे युवाच उद्याचा देश घडवणार आहेत त्यामुळे त्यांच्यापर्यत हे प्रेमाचे, समतेचे, बंधुतेचे विचार पोहोचणे अधिक आवश्यक आहे असे मला वाटते.
यानिमित्त पुणे-जालना प्रवासात भुजंग बोबडे सरांची पहिली ग्रेट भेट झाली, ट्रक क्लीनर ते इतिहास संशोधक हा थरारक प्रवास जाणून घेता आला, एरवी फोन होत असतात पण हा मनुष्य एवढा मोठा असेल याची कल्पना नव्हती. जगातील गांधीजीबद्दल सगळ्यात मोठे असलेले गांधी रिसर्च फौंडेशन, जळगाव या संग्रहालयाचे ते मुख्य आहेत आणि वेगवेगळ्या सरकारी व इतर संघटनांमध्ये पदाधिकारी आहेत, त्यांची जगातील 8 भाषांमध्ये आत्तपर्यत अनेक पुस्तके आलेली आहेत, विशेष म्हणजे आत्ता आलेल्या एका शिल्पकलेवरील पुस्तकाची किंमत 30 हजार रुपये आणि त्याची पहिली आवृत्ती ही लगेच संपली.पण अगदी साधा गांधी प्रत्यक्षात जगणारा मनुष्य आहे हा, खादी कपडे तर घालतातच पण स्वतःचे केस ही स्वतःच कापतात..

नंतर भेट झाली ती डॉ यशवंत सोनूने सरांची,ते अनेक वर्षापासून चिकाटी व जिद्दीने जालना इथे गांधी अध्यासन केंद्र चालवत आहेत. २००४ ते २०१९ या पंधरा वर्षाच्या कालखंडात 15 राज्यस्तरीय गांधी विचार अभ्यास शिबिराचे आयोजन त्यांनी केले आणि अजून बरेच मोठे कार्य करत आहेत.माझी न त्यांची ओळख व्हाट्सअप्प आणि फेसबुक वरचीच पण तिथे गेल्यावर सरांशी आपुलकीचे नाते तयार झाले.प्रा. डॉ महावीर सदावर्ते यांचे पण चांगले सहकार्य लाभले.
कॉलेज चे प्राचार्य काबरा सर यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारता आल्या त्यांनी महाविद्यालय कसे स्थपन झाले ते सांगितले.
भारताचे पहिले पंतप्रधान  पंडित जवाहरलाल नेहरू दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचारासाठी 1957 साली जालना शहरात आले असताना जालनेकरांनी त्यांच्या सन्मानार्थ रुपये  21,211 एवढा निधी उभा केला व त्यांना भेट दिला, पंडितजींनी हा गौरव निधी जालनेकरांना परत केला आणि या निधीतून शहरात एक उच्च शिक्षण घेण्यासाठी महाविद्यालय सुरू केले जावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यातून जालना एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली. आज कनिष्ठ महाविद्यालय एमसीवीसी बायोफोकल, वरिष्ठ महाविद्यालय कला, वाणिज्य व विज्ञान आणि पदवीत्तर महाविद्यालयांमध्ये भौतिक शास्त्र, वनस्पतिशास्त्र, रसायनशास्त्र ,एम .कॉम .,एम . ए. अर्थशास्त्र तसेच अनेक विषयात संशोधनाची सुविधा उपलब्ध आहे दरवर्षी जवळपास चार ते साडेचार हजार विद्यार्थी या महाविद्यालयात प्रवेश घेत असतात.
त्यांनतर तेथे असणारे पुरोगामी चळवळीतील मित्र आणि शिक्षक संजय लकडे या रुबाबदार व्यक्तिमत्वाशी सरांशी थोडी चर्चा करता आली.
निघतांना अमरावतीत धर्मेंद्रभाई शी अर्धा तासाची धावती भेट झाली, आसाम मधील ज्या ठिकाणी अशांतता आहे दंगलीं घडतात अश्या अनेक ठिकाणी धर्मेंद्र भाई  शांतता नांदवण्यासाठी कार्य करत आहेत, म्हणजे काही प्रांत तर असाही असतो कि जिथे पोलीस व इतर लोक ही जायला घाबरतात, अश्या ठिकाणी ही धर्मेंद्र भाई  जीवाची पर्वा न करता गांधीजी प्रमाणे निर्भीडपणे प्रवेश करतात आणि तेथे  गांधींविचारानी शांतता प्रस्थस्पित करतात.लघुउद्योगच्या माध्यमातून त्यांनी तेथे हजारो महिलांना रोजगार मिळवून दिला आहे.
दुपारी chemistry च्या प्रा. बाफना सरांसोबत गणेश भुवन मध्ये जाऊन प.पु. खद्दरधारी गणेशलालजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेता आले व तेथील शांत व प्रसन्न जागेचा अनुभव घेता आला, तेथील पदाधिकाऱ्यांना ही भेटता आले ज्यांनी तेथे छान स्वागत केले, दर महिन्याला हजारो लोक या ठिकाणी दर्शनाला येतात.
आपल्याला एक गोष्ट माहित नसेल कि गणेशलालजी महाराज ही खादीबद्दल खूप आग्रही होते स्वतः तर खादी घालतच पण ते जिथे जात तिथे त्यांच्या प्रवेशपूर्वी खादीचे दालन कि गाडी येत असे आणि बहुतेक दर्शनार्थी ही खादीतच असत. (असे सुगन बरंठ काकांनी सांगितल्याचे आठवते.)

राष्ट्रीय युवा संघटनचे मा. संयोजक मनोजभाऊ ठाकरे आणि रजर्नीताई पाटील यांच्याकडून ही प्रेरणादायी गीते ऐकता आली व वेगवेगळ्या गोष्टींवर संवाद साधता आला.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये तसेच शालेय विद्यार्थी आणि समाजातील नागरिक यांच्यामध्ये महात्मा गांधींचे सत्य आहे चे विचार पोहोचावे या उद्देशाने हे  महात्मा गांधी अध्ययन केंद्र कार्य करत आहे.

मला इथे बोलण्याची संधी मिळणे माझे मोठे भाग्यच म्हणावे लागेल 
आजपर्यंत येथे कुमार प्रशांतजी, डॉ. यशवंत सुमंत ,मेधाताई पाटकर, अमरनाथ भाई, दिल्ली येथील डॉ. सच्चिदानंद ,adv असीम सरोदे, विश्वंभर चौधरी ,लवनमजी विश्वजीत रॉय ,सोपान जोशी, डॉ. श्रीराम जाधव, शोभा शिरोडकर , रमेश ओझा, गंगाप्रसाद अग्रवाल, विजयअण्णा बोराडे,  अल्लाउद्दीन शेख, वसुधा सरदार, विजय दिवाण, अरुण ठाकूर, संजय मंगला गोपाळ, समीर शिपूरकर, नरेंद्र लांजेवार सुभाष शर्मा, प्रांजल दीक्षित ,किशोर बेडकीहाळ अर्जुन डांगळे हरिभाऊ ,प्रशांत नागोसे, मनोज ठाकरे, यामिनी गजपुरे , बाळासाहेब सरोदे , लक्ष्मण विवेकानंद विजय जावंधिया, , भूजंग बोबडे एड. राज कुलकर्णी संजय मंगला गोपाळ, प्रेरणा देसाई आदी अनेक मान्यवरांनी या शिबिरात मार्गदर्शन केले आहे.शिबिराचे वैशिष्ट्य हे सांगता येईल की दररोज सकाळी पाच ते रात्री दहा या मध्ये सर्वधर्म प्रार्थना, प्रकृती प्रार्थना सुबह का सच,  गीत ,वर्ग बौद्धिक स्वतः गटचर्चा ,खेळ ,चावडी असे अनेक उपक्रम होत असतात.

मागच्या तीन वर्षापासून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या योजना बंद झाले असल्याकारणाने हे केंद्र संस्थेच्या मदतीवर सुरू आहे .यावर्षी शासन स्तरावर गांधी 150 निमित्ताने अनेक उपक्रम घेतले जात असताना या केंद्राच्या अनुदान बंद होणे हे दुःखद आहे. सरकारला याप्रति जाब विचारायला हवा कि बाहेर प्रत्येक देशात जाऊन सोयीसाठी गांधींचे नाव घेता आणि स्वतःच्या देशात गांधींविचारांच्या प्रसाराला थांबवता असे दुटप्पी धोरण का घेता?
जालना मधील हा अनुभव ऊर्जदायी आणि अविस्मरणीय होता
या सगळ्यांकडे पाहून सहज एक गीत आठवले

मन सुद्ध तुझं गोष्ट हाये पृथिविमोलाची
तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची… पर्वा बी कुनाची

लिहताना काही चुकले असल्यास कुणाचे नाव राहिले असल्यास क्षमस्व

संकेत मुनोत
8087446346

Monday, March 21, 2022

गांधी समजून घेताना- अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका मध्ये प्रकाशित लेख- सकेत मुनोत

अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे कार्य करतांना ते गावोगावी वाढवण्यासाठी गांधीजींची प्रेरणा मिळाली असे डॉ. दाभोळकर म्हणत. 
 गांधींनी स्वतःला सुधारक वगैरे कधी म्हटले नाही पण तसे न म्हणताही धर्माचा मौलिक अर्थ सांगत त्यातील लोकांना सहिष्णू, चरित्रवान बनण्यास प्रवृत्त केले.

जागतिक प्रभाव-

2.गांधीजी -जात आणि धर्म

3. *स्वातंत्र्य फक्त गांधींमुळे मिळालं का?*

4. *ब्रिटिशांचे जगातील साम्राज्य कमी करण्यात गांधीजीचा वाटा-*

*5.शाहीदे आजम भगतसिंग यांची फाशी आणि म. गांधी-*

6.*गांधीजी खूप अध्यात्मिक वा धार्मिक होते असा काही कट्टर नास्तिक मंडळींचा आरोप असतो*

7.गांधीहत्येनंतर ब्राम्हणांची हत्या झाली का?-*

*8.गांधी हत्या नेमकी कशामुळे

9.परिवर्तन

10.पर्यावरण

11.स्त्रियांचे सक्षमीकरण

Friday, March 18, 2022

उच्चशिक्षण होऊनही वेगळा मार्ग निवडणार्या शेतकरी अपूर्वाताई संचेती

नाव ऐकून होतो, सामाजिक ठिकाणी एक दोनदा भेट ही झाली होती , अनेकदा चर्चेत त्यांचे उदाहरण ही द्यायचो की कश्या त्या दोन उच्चशिक्षित बहिणी प्रेरणादायी कार्य करत आहेत पण जायचा योग काही लवकर येत नव्हता.काल तो आला
काही दिवसांपूर्वी यांच्या मुलासाठी चांगली पॉलिसी सुचवण्यासंदर्भात अपूर्वाताईंचा फोन आला त्याबद्दलची सर्व माहिती फोनवर देऊन पॉलिसी काढण्यासाठी त्यांच्या घरी गेलो आणि सगळं बघून थक्क झालो.
मुख्य पुण्यापासून 17 किमी अंतरावर सणसवाडी या गावात 2 एकर पडीक जमिनीवर अदिती आणि अपूर्वा संचेती या बहिणींनी 2008 पासून अतिशय कष्टाने नंदनवन फुलवले आहे. गांधीजी जे स्वावलंबी जगा आणि खेड्याकडे चला या गोष्टी त्या प्रत्यक्षात जगत आहेत.वडील CA, आजोबा डॉक्टर पण तरीही त्यांनी हा चौकटीबाहेरचा मार्ग स्वीकारला
 त्यांच्या आई कल्पना संचेती(लोढा) या गांधी विनोबा चळवळीतल्या त्यांच्या प्रेरणेतून त्यांना हा अनोखा मार्ग निवडला असावा.

समाधान स्थली -
मध्यस्थ दर्शन यामध्ये समाधानाची परिभाषा दिली आहे. समाधान म्हणजे 'हर क्यो और कैसे का उत्तर'. त्यावरून ह्या जागेचे नाव समाधान स्थळी असं ठेवलं आहे.
दोघी उत्तम शिकलेल्या आहेत अपूर्वाने फर्ग्युसन कॉलेजमध्ये तत्त्वज्ञानात पदवी घेतली तर अदितीने शाश्वत विकासाची संसाधने (सस्टेनेबल डेव्हलपमेंट) या विषयात MSC केले आहे. मनात आणलं असतं तर लौकिकदृष्ट्या यशस्वी करिअर सहज शक्य होतं पण ते सर्व टाळून त्यांनी हा मार्ग स्वीकारला.
त्यांच्या या जागेच नाव आहे 'समाधान स्थली'

जातानाचा रस्ता बराच अवघड होता , त्यांनी अनेक वर्षे हे सगळे उभारताना पुण्यातून updown कसे केले असेल काय माहीत?

काल अपूर्वा ताई पेक्षा जास्त गप्पा झाल्या त्या त्यांच्या आई कल्पनाताई संचेती यांच्याशी त्यांनी त्यांच्या एकंदरीत प्रवासाबद्दल सांगितलं.कल्पनाताई यांचे वडील डॉक्टर तर पती CA होते, त्यांनी स्वतः (LLB) वकिलीचे शिक्षण घेतले पण वकिली न करता अक्षरनंदन शाळेत शिक्षिका झाल्या. 
दहावी झाल्यावर तिनं जाणीवपूर्वक ब्रेक घेतला आणि शिक्षण क्षेत्रात चाकोरीबाहेरचे प्रयोग करणा-या काही शैक्षणिक प्रकल्पांमध्ये ती राहिली. परत येतानाच तिनं निर्णय घेतला, की अदितीसोबत शेतावर राबायचं, आपलं अन्न आपणच पिकवायचं. अदितीनं तर एमएस्सी केल्यावर जो प्रवास केला, त्यातून आपल्याला जीवनशैलीत बदल करणं अनिवार्य आहे, याची खूणगाठ बांधूनच. त्यातूनच त्यांचं हे शेतावरचं घर आकाराला आलं.
‘आम्ही हे करू शकलो, कारण घरच्या मंडळींचा आणि मित्रमैत्रिणींचा पूर्ण पाठिंबा होता. सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती करायची, असे ठरल्यावर बाबांनी ही जमीन घेऊन दिली. त्यानंतर खरी परीक्षा सुरू झाली,’ असं अदिती म्हणाली. सुरुवातीला तर रेताड, खडकाळ असा परिसर होता.मातीसुद्धा धुपून किंवा खणून नेली होती. त्यामुळे खुरट्या गवताखेरीज या जमिनीत काहीच नव्हतं. ‘पण घेतलेल्या शिक्षणानं, मित्रमैत्रिणींच्या पाठिंब्यानं आणि आमच्या जिद्दीनं काम सुरू केलं. भल्या पहाटे शहरातल्या आमच्या घरातून निघायचो आणि दिवसभर जमिनीशी झटापट करून रात्री परतायचो. अशी दोन वर्षे गेली आणि मग आमच्या मेहनतीला जमीन जरा प्रतिसाद देऊ लागली. शिवाय दोन पावसाळेही गेले. या जमिनीत आधीपासूनच शेततळं होतं. त्यात जरा पाणी साठल्यावर आम्ही काही भाज्या लावण्याचा निर्णय घेतला. मात्र, या जमिनीत कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत वा आधुनिक यंत्रे वापरायची नाहीत, हा निर्णय पक्का होता.’
या दोघींनी मग फक्त शेणखतावर काम सुरू केलं. चर खणले, दगडांचे ताल बांधले. त्यामुळे पावसाचं पाणी वाहून न जाता मुरायला लागलं आणि तळ्यातही साठलं. दोन एकर जमिनीवरच्या एका भागात छोटं मातीचं घर बांधायचा निर्णय घेतला. शेतावर काम करायचं तर शेतावरच राहायला पाहिजे, हेही त्यांना उमगलं होतं. ‘मग कामाला लागलो आणि कॉब पद्धतीनं (गाळा बनवून त्यावर मातीचे गोळे मारून भिंत तयार करणे) घराची उभारणी केली. कौलारू छप्पर केलं. तीन खोल्या तयार केल्या. पहिली चार वर्षं वीज नव्हती. तेव्हा सूर्यप्रकाशावर काम चालवलं.
अंधार पडला की, सगळे व्यवहार बंद. नंतर सौरदिवे वापरायचो. नुकतीच वीज आली आहे; पण घरात रात्री उजेडापुरतीच ती वापरतो. कुठल्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरत नाही.’
शेतातली सर्व कामं या दोघी स्वत:च करतात. अगदी घर बांधण्यापासून नांगरणी, खुरपणी, लावणी, पेरणी, कापणी, तोडणी सगळं. यंत्र न वापरता परंपरागत पद्धतीनं. ‘कधी कधी आमचे कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणीही मदतीला येतात.
लग्नासाठी जोडीदार शोधतांना ही अडचण आली.जैन धर्मात जन्म झालेला असला आणि जैन धर्म अहिंसा, अपरिग्रह अश्या अनेक गोष्टी सांगत असला तरी प्रत्यक्ष जीवनात ते अवलंबणारे खूप कमी लोक. सध्या तर या समाजात ही कट्टरता खूप वाढत चालली आहे असे आई म्हणाल्या (आणि या जैन धर्माने जगाला अनेकांतवादाचा संदेश दिला असला तरी आता यातील अनेक जण आता एकांतवादी अंधभक्तीकडे वळाले आहेत विशेष म्हणजे अशी अंधभक्ती करणाऱ्यांना त्याची लाज वाटत नाही तर अभिमान वाटतो)
 दोघींनी आंतरजातीय , आंतरधर्मीय समजून उमजून लग्न केली आहेत.
अपूर्वताईचा जोडीदार सौरभ राऊत, अकोला यांच्याशी ही भेट झाली ते स्वतः  सॉफ्टवेअर इंजिनिअर पण ते सुद्धा हेच करतात.

 या मुलींच्या वेगळ्या विचारांना घरच्या मंडळींनी मनापासून साथ दिली. आवश्यक तेव्हा मदतीचा हात पुढे केला, पण सारखा आधार देऊन सावरलं नाही. ‘आम्ही धडपडलो, ठेचा खाल्ल्या, चुकलो. पण शिकत गेलो आणि सावरलोही. आता पाच वर्षांच्या परिश्रमांना हिरवे अंकुर फुटलेत. आम्ही निवडलेली वाट योग्य आहे, याचं आश्वासन मिळतंय.’

काही गायी बैल मांजर कुत्रे आणि असे अनेक जण त्यांच्या कुटुंबात आहेत. मी जेव्हा तेथे गेलो तेव्हा अपूर्वाताई थालीपीठ शेकत होत्या तर त्यांच्या आई त्यांना पीठ मळून देत होत्या.हे करता-करता माझा गांधीविचारांकडचा जीवनप्रवास त्यांनी समजून घेतला आणि नंतर त्यांच्या वरील सगळ्या गोष्टींबद्दल सांगितले.
 (मला यानिमित्ताने गांधीजींना भेटायला गेलेल्या पटेल, राजेंद्रप्रसाद, नेहरू, शास्त्री आणि विनोबा सारख्या काही लोकांची  आठवण झाली. यातील अनेकांना वाटे कि गांधी स्वातंत्र्यलढ्याचे नेते म्हणजे सतत इंग्रजांशी भांडत असणार, मोठ-मोठी भाषण त्यांच्याविरुद्ध देत असणार पण प्रत्यक्षात गांधींना भेटल्यावर ते  अवाक झाले की हा माणूस तर घरी भाजी चिरतोय, शौचालय साफ करतोय आणि बरेच काही करतोय. त्यातील एकाने एका ठिकाणी लिहलय की गांधीजी जर आम्हाला आयुष्यात भेटले नसते तर पटेल फक्त बॅरिस्टर पटेल, नेहरू फक्त बॅरिस्टर नेहरू विनोबा एखादे योगी असे फक्त आपापल्या क्षेत्रात मोठे झाले असते त्यात नाव ही झाले असते , चांगला पैसा ही त्यांनी कमावला असता पण गांधी भेटले आणि त्यांच्या आयुष्याचा कायापलट झाला ज्यामुळे पटेलांचे सरदार पटेल झाले, विनोबांचे आचार्य विनोबा भावे झाले, नेहरूंचे पंडित नेहरू आणि यादी न संपणारी आहे. पण आज त्यांनाच गांधींच्या विरुद्ध उभे करण्याचा घाट काही समाजकंटकांच्याकडून घातला जात आहे)

कल्पनाताई स्वतः विनोबांना ही भेटलेल्या आहेत आणि गांधीविचारांमुळे त्यांनी थोडासा वेगळा मार्ग निवडला. गांधीविचार हे त्यांच्या आयुष्यातील एक स्टेशन होते पण त्यापुढे जाऊन अपूर्वा ताईने दर्शन नावाचे एक शिबीर केले त्यातून पुढे त्यांना अशी एक वाट मिळाली असे त्या म्हणाल्या
त्यांनी काही मित्र मैत्रिणीच्या मदतीने बांधलेले घर त्यांनी दाखवले त्यानंतर आता लॉरी बेकर च्या शैली वर पुढचे घर बांधले जात आहे.

या लॉरी बेकरची पण कहाणी अनोखी आहे. .अनिल अवचट सरांनी त्याबद्दल लिहले आहे
हा 25 वर्षाचा सैनिक.स्वातंत्र्यपूर्व काळात लढाईवरून चीनहुन घरी इंग्लंडला परत चालला होता तेव्हा त्याची बोट काही दिवस मुंबई त थांबली, त्यानं पेपरमध्ये गांधींविषयी खूप वाचलं होतं. ‘हा कोण माणूस, बघूनतरी जाऊ या’ असं म्हणून गांधीजींना भेटायला गेला.गांधीजींनी त्याला विचारलं, ‘इंग्लंडला जाऊन काय करणार?’ ‘ मी आर्किर्टेक्ट आहे. तो व्यवसाय करीन. आलिशान घरे बांधेन’ गांधीजी म्हणाले, ‘मी खरा आर्किर्टेक्ट कोणाला म्हणतो, माहीत आहे? जो 25 मैलाच्या परिघातून बांधकाम साहित्य मिळवुन पर्यावरणपूरक अशी घरे बनवतो तो .’ लॉरी बेकर चक्रावलाच. तो इंग्लंडला गेला. प्रॉपर्टी विकून भारतात परतआला. केरळमध्ये स्थायिक झाला आणि गांधीजींच्या व्याख्येप्रमाणे त्याने हवेशीर, सुंदर घरं बांधली. त्याला ‘ब्रिक मॅन ऑफ इंडिया’ असं संबोधतात.आणि जगभरात या लॉरी बेकर शैलीतून घरे बांधली जातात.

असो तर आज स्वतःच्या गरजा कमी करून स्वावलंबीपणे जगणाऱ्या लोकांशी भेट झाली आणि समाधान काय आहे ते समजले . त्यांच्या चेहऱ्यावर मी जगापेक्षा वेगळे करतोय याबद्दल ना कुठला अभिमान होता ना जग सगळं पैश्यामागे, स्पर्धेत धावत असताना आम्ही हे वेगळं करतोय म्हणून कसला खेद होता

मागे समतादीदी मूळे माझ्या घरी गुजरात चे धीरेनभाई आणि स्मिता बेहन सोनी यांची मुले येऊन गेली ते पण असेच गांधीवादी.दोघांनी IIT मधून इंजिनेअरिंग केले नंतर मोठी नोकरी लागली असती ते सोडून A to Z वस्तू चे repairing शॉप सुरू केले नंतर ते सोडून त्यांनी गुजरात मध्ये जागा घेतली आणि तेथे शेती सुरू केली त्यांच्या शेतात जे पिकवतात तेच खातात बाहेरुन फक्त गूळ आणि मीठ या गोष्टी घेतात कपडे पण स्वतःचे स्वतः शिवतात (खादी).त्यांच्या स्वतःच्या मुलांना त्यांनी शाळेत कधी घातलेच नाही. त्याला इंजिनिअरिंग शिकायचे असेल तर प्रत्यक्ष बांधकाम करणाऱ्याकडे पाठवले, अजून काही शिकायचे असेल तर त्या त्या व्यक्तीकडे पाठवले आणि त्यांच्याकडून शिकून घेतले. कल्पनाताई संचेती यांना या 2 मुली तर आहेतच पण सोबत अजून 2 मुली आणि एक मुलगा त्यांनी  दत्तक घेतला. त्यातील एका मुली सोबत भार्गव सोनी चे लग्न झाले.

...अपूर्वताईंचे  वडील  सी ए आणि अपूर्वताईंचा स्वतःच्या संपर्कातही अनेक आर्थिक सल्लागार होतेच..तरी त्यांनी मला फोन करून सेवा करण्याची आणि आर्थिक नियोजन करण्याबद्दल संधी देणे हे माझ्यासाठी मोठे भाग्य. ते पण अश्या वेळी ताईंनी बोलवले ज्यावेळी मी नुकतीच माझी 7 वर्षांपासून करत असलेली clinical research documentatiom क्षेत्रातील नोकरी सोडून दुसऱ्या क्षेत्रात प्रवेश केला तेव्हा...

आपण ही एकदा इथे अवश्य भेट द्या, यात काही भाग दिव्य मराठीमधील 7 वर्षे जुन्या लेखातील ही आहे

याबद्दल त्यांची मुलाखत ही  youtube channel वर लवकरच टाकणार आहे (https://youtube.com/c/SanketMunotInspiring)

#yeswecan
#अवलीयव्यक्तिमत्वे
संकेत मुनोत
8668975178
19 मार्च 2021

Tuesday, March 15, 2022

मुंबईतील जिल्हा न्यायाधीशांची international men's day च्या लेखाला पत्र लिहून प्रतिक्रिया


वाचकांच्या प्रातिक्रिया लिहण्यास आणि काम करण्यास प्रोत्साहन देतात. त्यातही असे अनुभवी वाचक मिळाले तर जबाबदारी अधिक वाढते.❤️

♥️*न्या.आर आर गांधी, जिल्हा न्यायाधीश, मुंबई* यांनी  जैन जागृती मासिकात  माझा *International men's day* बद्दल चा लेख  वाचला आणि संपादक संजय चोरडिया सरांना *स्वहस्ताक्षरात*  पोस्टाने पत्र पाठवून प्रतिक्रिया दिली...त्यातील शब्द महत्वाचे आहेत.

आपली साथ आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहू द्या..😊✌️

शिक्षकों के सामने व्याख्यान करते वक्त पहले तो डर लगा था

जिनके सामने व्याख्यान देना है वे सारे विद्यार्थी नही बल्कि सारे प्रोफेसर है वे भी सीनियर कोलेज  के ये सुनकर शुरुआत में थोड़ा डर लगा था, कि इनके सामने मैं क्या बोलूंगा क्योंकि शिक्षकों से अबतक ज्ञान लेने की आदत है उनके सामने बोलना माने सूरज को रोशनी देना..

पर मंच पे जाने के बाद सोचा कि अगर इन्हें ये सारी बाते पता चले तो इनसे सिखनेवाले हजारो छात्रों तक ये उजाला पहुंच सकता है क्योंकि एक शिक्षक हजारो छात्रों को दिशा देते है, जिससे कई पीढ़िया बदल सकती है।
 ये सोचकर फिर जब बोलना शुरू हुआ तो करीबन 1.5-2 घंटे तक बढ़िया संवाद रहा|
उन्होंने ढेर सारे सवाल पूछे जिसके जवाब देते वक्त समाजमे फैले हुए बहुत सारे मिथको को स्पष्ट कर पाया|

सवालोमे बढ़ती हिंसक घटनाए, गांधी आंबेडकर, भगतसिंह, पटेल, नेहरू, कस्तूरबा, आजके वर्तमान की इस अवस्था में प्यार, अहिंसा और भाईचारे से कैसे रहना चाहिए ऐसे बहुत सारे सवाल थे|

ऐसा प्रबोधन हर जगह होना चाहिए जिससे आगे की पीढ़ी तक हम अच्छे विचार और आदर्श पहुंचा कर उन्हें हम कट्टरता से बचा पाएंगे|

आदरणीय विधायक डॉ. सुधीरजी तांबे और सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कॉलेज के प्राध्यापक प्रबोधिनी ने गांधी अध्ययन केंद्र ने यह आयोजित किया उनके पूरे  दिल से आभार|

स्पीच के बाद प्राचार्य जी के घर ये 3 बच्चे मिले और उनकी smile देखकर खुशी छा गयी|

आखिर में दुष्यंतकुमार के शब्द कहूंगा

हो गई है पीर पर्वत-सी पिघलनी चाहिए,
इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए

सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं,
सारी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए।

मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही,
हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए।

संकेत मुनोत 
Knowing Gandhism Global Friends 
Jaihind people's Movement
8668975178

पेमगिरी गावातील लहान विद्यार्थ्याचा प्रश्न- गांधीजींकडन अमेरिकेत अन ठिकठिकाणी लोकासनी प्रेरणा घेतली पण गांधीजींनी हे चांगले विचार नेमकी कोणाकडन घेतले?😊

#Valentine day च्या दिवशी पेमगिरी गावातील मारुती मंदिरात विद्यार्थ्यांशी हसत-खेळत #प्रेम आणि #गांधी यावर संवाद झाला माझ्या व्याख्यानानंतर एका चिमुकल्या विद्यार्थ्यांने प्रश्न विचारला♥️🌹
 "सर जगभर गांधींकडून वेगवेगळ्या लोकांनी प्रेरणा घेऊन चांगले काम केले पण त्या गांधीजींना कोणी एवढे चांगले विचार दिले जे ते सगळीकडे देऊ शकले?
मला त्याला काय उत्तर द्यावे  ते लगेच सुचत नव्हते पण त्याने जो प्रश्न विचारला त्यामुळे भारी वाटले , अशी प्रश्न विचारणारी पिढी तयार झाली पाहिजे...

आजच कोणी तरी पाठवलेली कविता यानिमित्त आठवली..

मेरे बच्चे
तुम इतना #प्रेम करना 
कि एक #नफ़रत से भरते समाज में
तुम्हारा बस होना भरही #विद्रोह लगे।। 

#valentinewithGandhi #love