AddThis code

Saturday, June 24, 2023

आजोबा आणि चिमुकला







राजगुरुनगर एस टी स्टँड वर पुणे जाण्यासाठी एक तास थांबलो पण एस टी महा मंडळाची लाल, पांढरी गाडी आणि शिवशाही अश्या ८ गाड्या गेल्या पण सगळ्या फूल . लोक उभे राहून जात होते शेवटी या गाडीत चढलो आणि उभे राहूनच प्रवास सुरू केला...
यात आजोबा एका सीटवर विनंती करून कसे तरी बाजूला बसलेले दिसले . इकडे हा चिमुकला आणि त्याची आई मागे उभे होते. हा चिमुकला बसमध्ये इकडे तिकडे करताना आजोबांना स्पर्श करतो. आजोबा त्याला बसायला जवळ घेऊ लागतात.
चिमुकल्याची आई म्हणते "अहो तुम्हालाच जागा नाही त्याला कुठे बसवणार? " त्या चिमुकल्याला सांगते की "त्यांना त्रास देऊ नको." आजोबा स्वतः एवढ्याश्या जागेत बसलेले असताना त्याला जवळ घेऊन बसतात . तो चिमुकला त्यांच्या काठीशी खेळतो , ती खालीही पाडतो. ते पुन्हा उचलतात पुन्हा खाली पाडतो. आई रागावते पण आजोबा आणि चिमुकला दोघे एकमेकांच्या कडे बघून हसतात आणि खेळतात..
मागे बसलेला एक प्रवासी उठतो आणि त्याच्या आईला ताई तुम्ही बसा म्हणतो. चिमुकल्याची आई ती जागा आजोबांना देते अणि उभी राहते.
पुढे जाऊन थोड्या वेळाने अजून काही प्रवासी उतरतात आणि सर्वांना जागा मिळते.
फोटोत आजोबा आणि चिमुकल्याच्या चेहऱ्यावरची smile बघा.....😊
तर असा मस्त प्रवास....
कुठे तरी वाचले होते एस टी चा प्रवास मनोरंजन हमखास...
ते प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले...
संकेत मुनोत
8668975178
(टिप - हे लिहल्यावर चिमुकल्याच्या आईला दाखवले , त्यांना ते आवडले मग त्यांच्या परवानगीनेच पोस्ट केले)
Comment, Share ,Follow and Subscribe.

जेष्ठ #गांधीवादी श्री वसंतरावजी बोंबटकर


संत आचार्य विनोबा भावे के शिष्य, जयप्रकाश नारायण के संपूर्ण क्रांति आंदोलन के योद्धा,भूदान, ग्रामदान ,गोभक्त, कृषि विज्ञान के शोधकर्ता, जैविक सजीव खेती के ऋषि,नैडेप कंपोस्ट खाद,झटपट खाद के समर्पित प्रचारक,लेखक,चिंतक, सर्वोदय समाज के संयोजक श्री वसंतरावजी बोंबटकर इनका 31मई 2022 को देहांत हो गया| उनकी अंत्ययात्रा आज 01जून 2022 को उनके वर्धा के घर से निकलेगी। सुबह 10 बजे मोक्षधाम , वर्धा यहा पे होगा|
अभी दिसंबर 2021 में ही उन्हे पहली बार मिला था और करीबन 1-2 घंटे बातचीत हुई | उनका ममता वाला स्पर्श और आशीर्वाद आज भी याद है| वे कैसे इन विचारो के तरफ मुड़े और उन्होंने क्या-क्या किया? ये जानना बहुत ही प्रेरणादाई अनुभव था| उनके जमाई तथा मुझपे सदा स्नेह बरसाने वाले खेतीतज्ञ मनोहर खके काका Manohar Khake ने मुझे उनसे मुझे मिलवाया| वह बीमार होने के कारण बेड से उठ नही सकते थे फिर भी उन्होंने मैं जो कार्य रहा हु उसे जाना और सही मार्ग पे चल रहे हो कहकर शुभकामनाएं भी दी|
दोस्तो पैसे तो कोई भी कमा लेता है पर सच्चाई के राहपे चलके लोगोके आंसु पोंछकर ,गलत बातों के विरुद्ध भूमिका लेना, संघर्ष करना और रचनात्मक काम करना बड़ा मुश्किल होता है पर राष्ट्रपिता महात्मा गांधी ऐसे थे कि उन्होंने लोगो को वह राह दिखाई और दुनिया में बड़ा बदलाव लाया
उनकी यांद में बापुका ये गीत याद आता है
जब जब तेरा बिगुल बजा जवान चल पड़े|मजदूर चल पड़े थे और किसान चल पड़े| हिंदू और मुसलमान,सिख, पठान चल पड़े|कदमों में तेरी कोटी कोटी प्राण चल पड़े|फूलों की सेज छोड़कर दौड़े जवाहरलाल|साबरमती के संत तूने कर दिया कमाल ।
सरदार पटेल S.Vallabhbhai Patel जो अपनी बैरिस्टर की प्रैक्टिस में बहुत अच्छा पैसा कमा कर ऐशोराम की जिंदगी जी रहे थे वो हो या नेहरू, Dr. Rajendraprasad , Lal Bahadur Shastriji और देश के लाखो लोग हो वो बापू की प्रेरणा से इस संघर्ष और रचनात्मक कार्य की राह पर चल पड़े और उस वजह से देश भी आजाद हुआ और 75 वर्ष से ज्यादा साल एकजुट भी रहा
वसंतरावजी ने खेती विषय पे अनेक पुस्तिकाएं लिखी | ठाकुरदास बंग की पहला जीवन चरित्र उन्होंने लिखा| और कई किताबे लिखी, अनुवादित की
तो ऐसे वसंतराव जी बोंबटकर जी को मेरे भाव भरा अभिवादन
यहां मैं आपको वचन देता हु की आप जिस तरह #सत्य और #प्यार की राह पर चलते रहे उसी राह पे हम आगे बढ़ते रहेंगे
जय जगत
संकेत मुनोत
Jaihind People's Movement
Comment, Share ,Follow and Subscribe.

ज्यांचे धडे शाळेच्या पाठ्यपुस्तकात वाचले त्या दिग्गजांनी गाजवलेल्या वसंत व्याख्यानमालेच्या व्यासपीठावर बोलण्याची संधी



ज्यांचे धडे शाळेच्या पाठ्यपुस्तकात वाचले त्या दिग्गजांनी गाजवलेल्या वसंत व्याख्यानमालेच्या व्यासपीठावर बोलण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट होती
आत्तापर्यंत *डॉ. ॲनी बेझंट,कर्मवीर भाऊराव पाटील,प्रबोधनकार ठाकरे, एस.एम. जोशी, कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे, हमीद दलवाई, डॉ. बाबा आढाव, पन्नालाल सुराणा, मृणाल गोरे, नानासाहेब गोरे, विठ्ठलराव गाडगीळ, डॉ. नरेंद्र दाभोळकर,डॉ. अनिल अवचट, रँग्लर परांजपे, बॅरिस्टर नरिमन, जमनादास मेहता, भालाकार भोपटकर, ग.प्र.प्रधान, गोदावरी परुळेकर, वि.स. पागे, कुमार सप्तर्षी, सिंधुताई सपकाळ आणि अश्या अनेक मान्यवरांनी या व्याख्यानमालेत आपले विचार मांडले
त्या वाई च्या वसंत व्याख्यानमालेत मी 'अमृत महोत्सवी स्वातंत्र्य जपायचे कसे?' या विषयावर मी माझे विचार मांडले
गांधी , बोस , भगतसिंग आणि त्यांच्या अनुयायांनी खूप कष्टांनी बलिदान देऊन, लाठ्या झेलून स्वातंत्र्य मिळवले. 500 पेक्षा जास्त संस्थानात विभागलेला हा देश गांधी, पटेल आणि नेहरू यांनी एकत्र केला.
पण सध्या देशात जात, धर्म, पंथ , वर्ग यावरून द्वेष पेटवला जात असून त्यातून देश आता पुन्हा तुटण्याच्या मार्गावर आहे. त्यावेळी "हे स्वातंत्र्य जपायचे कसे, समाजात प्रेम आणि सुसंवाद वाढवायचा कसा?" त्यावर मी विचार मांडले.
प्रेम ❤️ ही जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे ती जेव्हा आपण बाहेर वाटतो तेव्हा आपले हृदय पण प्रेमळ होऊन जाते..
महावीर, बुध्द, कबीर, तुकाराम, फुले, आंबेडकर यांचे प्रेम वाढवण्यासंदर्भात विचार ही या अनुषंगाने मांडले
आर्याबागकर मित्र डॉ. शंतनु अभ्यंकर आणि मा. लक्ष्मीकांत रांजणे यांच्या मुळे मला ही संधी मिळाली त्यांचे खूप आभार..
तर प्रेम वाटत राहूया...❤️❤️
(हे व्याख्यान मागच्या वर्षी झाले पण घरातील इतर कामांच्या व्यापात त्याबद्दल लिहू-लिहू म्हणत वर्ष निघून गेले अणि विसरून गेलो. आज गुगल फोटो मेमरीत फोटो सापडला आणि लिहून काढले...)
संकेत मुनोत
Comment, Share ,Follow and Subscribe.

उन्हाळ्यातही गारवा अनुभवायचा असेल तर वाई बेस्ट












उन्हाळ्यातही गारवा अनुभवायचा असेल तर वाई बेस्ट आहे.
तिथे माझे व्याख्यान ऐकायला सन्मित्र कृष्णा काजळे चे मित्र भावेश इंगळे आले होते जे आता माझेही मित्र आहेत. व्याख्यानाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी मला वाई मधील प्रेक्षणीय स्थळे दाखवली..
कृष्णा नदीच्या काठावर दक्षिण काशी म्हणून वाई हे विख्यात धार्मिक क्षेत्र आहे. कृष्णा नदीवर अनेक घाट व प्राचीन मंदिरे आहेत. सरदार रास्ते यांनी वर्ष 1672 मध्ये एकाच दगडातून घडविलेली ढोल्या गणपतीची भव्य मूर्ती, सिध्देश्वर मंदिर, त्यातील सिध्दनाथची संजीवन समाधी, गंगा रामेश्वर, काशी विश्वनाथ, लक्ष्मी नारायण अशी अनेक मंदिरे आहेत.
मराठी विश्वकोशाचे प्रकाशन वाई येथूनच होते.
गणपती आळीच्या घाटावर कृष्णा तीरी ढोल्या गणपती हे वाईतील सर्वात मोठे व भव्य मंदिर पेशव्यांचे सरदार गणपतराव भिकाजी रास्ते यांनी बांधले. गाभाऱ्यात गणपतीची पाषाणाची 6 फूट उंच व लांबी 7 फूट अशी बैठी मूर्ती आहे. मंदिराच्या भव्य सभागृहाला तीन्ही बाजूंनी कमानी आहेत.
कृष्णा नदी काठी असलेले मेणवली गावात पेशवाईतील एक मुत्सद्दी व राजकारणी नाना फडणवीस यांचा गढीचा वाडा आहे. कृष्णा नदीच्या काठावरील केदार घाट व मंदिर प्रेक्षणिय आहेत.
सिंगम या चित्रपटाचे शूटिंग इथेच झाले...
इथून जवळच महाबळेश्वर, पांचगणी आणि अनेक गोष्टी आहेत...
Comment, Share ,Follow and Subscribe.

एवढे क्रूर आणि हिंसक का बनत चाललेत लोक?

मुंबईत मनोज साने (56) याने आपली प्रेयसी सरस्वती वैद्य (32) हिच्या चरित्रावर संशय घेऊन तिचा खून केला. मग तिच्या शरीराचे तुकडे करून तो मिक्सर मध्ये बारीक करून कुकर मध्ये शिजवायचा आणि कुत्र्यांना खाण्यास द्यायचा. मला तर हे वाचताना आणि ऐकताना ही कसे तरी वाटते पण त्याने हे प्रत्यक्षात केले आहे.
काही धर्मांध लोक हे ठराविक एका धर्माच्या माथी मारायचा प्रयत्न करतात पण सगळी उदाहरणे बघितली तर यात धर्म, जात, पंथ , वर्ग, लिंग यांचा काही संबंध नाही.
मनात द्वेषपूर्ण आणि हिंसक विचार वाढत आहेत त्याला कारण
म्हणजे वातावरण . सतत हिंसेच्या आवश्यकतेवर भाषण करणारे नेते, त्याच प्रकार चे भडक चित्रपट, व्हॉट्सॲप साहित्य, लेख... ई
हे कमी करायचे तर आपसात प्रेम आणि संवाद कसा वाढेल. राग अहिंसक पद्धतीने कसा व्यक्त करता येईल इ. बद्दल चित्रपट, नाटक, व्याख्यान, निबंध स्पर्धा, सोशल मीडिया वरील साहित्य आणि वेगवेगळ्या मार्गाने प्रबोधन कसे होईल याचे प्रयत्न करायला हवेत.
संकेत मुनोत
Comment, Share ,Follow and Subscribe.

अन्नपूर्णा मासिकाच्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेले माझे भाषण.. धर्म, धार्मिकता आणि धर्मांधता






अन्नपूर्णा संस्थेचे काम पाहून मला खूप आनंद झाला. मुख्य आनंद या गोष्टीचा कि गांधीजींच्या प्रत्त्येक आंदोलनात आणि रचनात्मक कामात दिसायची तशी महिलांची मोठी संख्या इथे दिसते आहे.शिवाय अन्नपूर्णा ही संस्था ही रचनात्मक कामाचे आदर्श उदाहरण आहे.
आजचा विषय मला दिला तो म्हणजे धर्म, धार्मिकता, धर्मांधता आणि गांधीविचार माणसाला माणसाशी जोडतो तो धर्म तर माणसापासून माणसाला तोडते ती धर्मांधता .
आज धर्मांध लोकांचा आवाज मोठा झाल्याने सगळीकडे धर्माची चुकीची प्रतिमा उभी राहिली आहे. आज बहुतेक धर्मामध्ये त्या धर्माचे चांगले तत्वज्ञान सोडून कर्मकांड जास्त वाढले आहे.कर्मकांड हे धर्मच्या १०% च असायला हवे पण आज कर्मकांड ९०% आणि १० % तत्वज्ञान असे सुरु आहे.यासोबतच आज moral values पेक्षा identification values ला जास्त महत्व दिले जाते . टिकली , कुंकू, टिळा , टोपी यांच्या सारख्या identification values वर जास्त भर दिला जात आहे तर धर्मात असलेले बंधुभाव , प्रेम सारख्या moral values ला महत्व दिले जाते नाही .आपल्या देशात अनेक महामानव आणि सुधारक झाले ज्यांनी सत्य आणि परखड विचार मांडले पण बहुसंख्यांक लोकांचा पाठिंबा न मिळाल्याने त्यांचे विचार मोठ्या प्रमाणात अमलात येऊ शकले नाही . पण महात्मा गांधींना जनतेचा मोठा पाठिंबा मिळाल्याने ते मोठा बदल घडवू शकले. म्हणजे महात्मा गांधींच्या मागे जेवढे हिंदू, मुस्लिम आणि अन्य धार्मिक लोक होते त्याच्या १० % सुद्धा त्या काळात स्वतःला धर्मरक्षक म्हणवणाऱ्या हिंदू महासभा , राष्ट्रीय स्वयंसेवक संघ , मुस्लिम लीग सारख्या धर्मांध संघटनांच्या मागे नव्हते. विशेष म्हणजे महात्मा गांधींना आदर्श मानणारे त्यांच्या विचारांवर चालणारे अनेक मोठे साधू , धर्मगुरू वगैरे तेव्हा मोठ्या प्रमाणात होते जे त्यांच्या अनुयायांना पण उदारमतवादी निर्भय भूमिका घ्यायला सांगत. आचार्य विनोबा भावे मौलाना आझाद , स्वामी रामानंद तीर्थ , राष्ट्रसंत गाडगे बाबा , जैन साध्वी उज्वलकवरजी, राष्ट्रसंत गाडगे बाबा अशी असंख्य नावे आपणास यासंदर्भात दिसतील.
पण आज याच्या उलटे घडत आहे बहुतेक धर्मामध्ये मूर्ख संकुचित लोकांनी स्वतःला त्या धर्माचा साधू म्हणवत द्वेष पसरवणे सुरु केल्याने त्या धर्माचे , समाजाचे आणि देशाचे मोठे नुकसान होत आहे. कालीचरण , सूर्यसागर आणि वेगवेगळ्या धर्मातील अश्याच प्रकारचे ढोंगी साधू साध्वी धमाच्या नावावर समाजात फूट पाडत आहेत. पण याला उत्तर म्हणजे ते चुकीचे म्हणजे धर्मच चुकीचा आणि ते पाळणारे सगळे लोक मूर्ख असा काढता कामा नये .उलट धर्मची उदारमतवादी बाजू समोर आणणे अश्यावेळी जास्त महत्वाचे आहे.
महात्मा गांधींमुळे धर्मात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्या आणि लोक बदलले. राजकारण , समाजकारण, धर्मकारण यामध्ये पूर्वी फक्त उच्चभ्रू आणि उच्चवर्णीयांचे वर्चस्व होते.गांधींनी ते बदलून सर्व जाती जमातींना यात नेतृत्व दिले विशेष म्हणजे जे उच्चवर्णीय होते तेही मोठ्या प्रमाणात गांधीजींच्या सोबत होते आणि स्वतःचे अधिकार सोडून ते ज्या कामाला ही दर्जाचे काम तेव्हा म्हटले जाई असे गांधींमुळे करु लागले यामुळे गोडसे सारखे काही ठराविक लोक भडकले ज्यांना त्यांचे जातिय वर्चस्व कायम ठेवायचे होते आणि त्यांनी गांधींच्या हत्येचे प्रयत्न सुरु केले. २५ जून १९३४ मध्ये पुणे येथे गांधींवर पहिला हल्ला झाला जेव्हा त्यांच्या कारवर बॉम्ब फेकण्यात आला पण नेमकी गांधीजी मागच्या गाडीत बसलेले असल्याने पुढे बसलेला ब्रिटिश अधिकारी जखमी झाला . त्यानंतर १९४२,१९४४ मध्ये दहशतवादी गोडसेने त्यांच्यावर ४ हल्ले केले या ५ ही हल्ल्याच्या वेळेस फाळणी , ५५ कोटी वगैरे काहीही प्रश्न नव्हते तर हल्ल्याचे एकमेव कारण होते ते गांधींनी चालवलेल्या धर्मसुधारणा आणि त्यांना मिळणारा मोठा जन प्रतिसादआता कोण कोणते बदल घडले ते पाहू. पहिला बदल म्हणजे महिला- या काळात महिला वर्गावर घुंगट, पडदा आणि अनेक परंपरा लादून त्यांना चूल आणि मूल एवढ्यापुरतेच मर्यादित ठेवले जायचे. गांधींनी त्यांना निर्भयपणे रस्त्यावर उतरून आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यायला लावला शिवाय चरख्यातून हजारो महिलांना रोजगारही दिला .याबद्दलचा सुरुवातीचा प्रसंग प्रेरणादायी आहे . गांधीजींची बिहार मध्ये सभा होती तेव्हा तिथे सम प्रमाणात महिला असतील तरच मी येईल असे गांधी म्हणाले आणि विशेष म्हणजे तिथे ते घडले पुढे आपल्या देशात महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला तो याचीच परिणीती होती. आपल्या पूर्वीही स्वातंत्र्य मिळालेल्या आणि लोकशाही आलेल्या अनेक देशांना मतदानाचा अधिकार नव्हता त्यासाठी त्यांना मोठा लढा द्यावा लागला.
गांधीजींनी केलेल्या लोक चळवळीमुळे तो आपल्याला स्वातंत्र्यासोबतच मिळाला. आता धर्म आणि जातीत कसे बदल घडले ते पाहू. साधे पगडीचे उदाहरण घ्या . ज्याची जेवढ्या जास्त पिळाची पगडी तेवढी त्याची जात मोठी आणि त्यावरून त्याला येता जाता नमस्कार केला जाई. महात्मा गांधींनी सगळ्यांना सामान खादी टोपी देऊन ही जात ओळखण्याची पद्धतच मिटवली. हरिजन सहभोजन उपक्रम सुरु केले . हजारो मंदिरे ज्यात आपल्याच लोकांना अस्पृश्य समजून प्रवेश नाकारला जात असे ती गांधीजींच्या आंदोलनामुळे खुली झाली . जिथे उंबरा ओलांडण्याची परवानगी नव्हती पाणी बाहेर वरतून दिले जायचे तिथे गांधींनी सांगितल्यामुळे भारतभर लोक त्यांना घरात घेऊन सोबत जेवू लागले, मी फक्त आंतरजातीय विवाहातच उपस्थित राहणार या त्यांच्या विचारामुळे हजारो आंतरजातीय विवाह लागले . गांधीजींनी स्वतःच्या मुलाचाही वाई येथे आंतरजातीय विवाह लावला होता तेव्हा ही पुण्यातील सनातनी चिडले होते आणि त्यांनी या गांधीचा काही तरी बंदोबस्त केला पाहिजे असे म्हटले होते .
पण हे सगळे करताना हे लक्षात घ्यावे लागेल कि गांधीजींनि हे बदल हळूहळू हृदयपरिवर्तनातून केले होते. आपल्यापैकी बरेच लोक जेव्हा धर्मावर टोकाची टीका करतात तेव्हा त्या धार्मिक व्यक्ती ही आपल्यापासून दूर जातात. गांधीजी आणि इतरांमध्ये फरक हा कि . इतर लोक ५ पाऊले पुढे जाऊन मागच्या माणसाला फरफटत त्यांच्या सोबत नेण्याचा प्रयत्न करतात ज्यामुळे ती माणसे हात सोडून दुसऱ्या दिशेने जातात तेच गांधीजी त्या लोकांना सोबत घेऊन एक एक पाऊल टाकतात त्यामुळे जास्त लोक त्यात सहभागी होतात. गांधीजींनी जी धार्मिक स्पेस घेतली होती ती आज आपण गमावली आहे त्यामुळे आज राम गांधीजींचा नसून तो अडवाणींचा राम बनला आहे.
आपल्या देशाचे हिंदू राष्ट्र झाले तर फक्त मुस्लिम आणि ख्रिश्चन यांना दुय्यम स्थान नाही मिळणार तर जैन, बौद्ध , शीख आणि सामान्य हिंदूंची आणि महिलांची अवस्था बिकट होईल . कारण द्वेष करणार्यांना काही तरी लक्ष्य लागते आज ते मुस्लिमाचा द्वेष करतात उद्या ते संपल्यावर ख्रिश्चन मग जैन , बौद्ध , सामान्य हिंदू आणि महिलांचा क्रमांक लागेल यापासून वाचायचे असेल तर भारताचे हिंदुराष्ट्र , मुस्लिम राष्ट्र किंवा अन्य कुठल्याही धर्मचे राष्ट्र न बनता हा महात्मा गांधींनी घडवलेले सर्वांचे राष्ट्र कसे अबाधित राहील यासाठी आग्रही राहायला हवे.आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात तर याची खूप गरज आहे कारण आज जाती , धर्म , वर्ग आणि अनेक भेदांच्या मध्ये देश तोडला जायचा प्रयत्न होत आहे.
तर चला आपापसात प्रेम आणि संवाद वाढवूया , बदलाची सुरुवात स्वतःपासून करूया
संकेत मुनोत 8668975178
email - changalevichar1@gmail.com

Comment, Share ,Follow and Subscribe.

सुप्रिया व अनिस यांचा प्रेरणादायी आंतरधर्मीय विवाह



सध्या ज्या प्रकारे जाती धर्म यात द्वेष वाढवला जात आहे त्या वातावरणात असा आंतरजातीय आंतरधर्मीय अश्या प्रकारचे तेही Arranged Marriege होणे ही प्रेरणादायी बाब आहे.
काही दिवसांच्या पूर्वी प्रतिभाताई गवळी यांच्या कडून त्यांच्या मुलगी सुप्रिया च्या या लग्नाबाबत निमंत्रण मिळाले.
हे लग्न सत्यशोधक पद्धती ने झाले. ही विवाह पद्धत नवरी मुलीला मानसन्मान देणारी विवाह पद्धत आहे.
वैदिक लग्नात विवाह लावणारा व्यक्ती ब्राह्मणच असावा आणि तोही पुरुषच असावा अट अशी बहुतेक ठिकाणी असते, त्याला कारण म्हणजे ब्राम्हण कुळात जन्म झाला म्हणून तो पवित्र आणि श्रेष्ठ आणि इतर कनिष्ठ असे मानले जाते. महात्मा फुले यांनी याला नकार दिला आणि सत्यशोधक लग्नाची सुरुवात केली. ज्यात विवाह लावणारा व्यक्ती कुठल्याही जातीचा आणि लिंगाचा असू शकतो.
याच प्रकार ची पद्धत गांधी विवाहात पण आहे ज्यात ब्राम्हण नसतो आणि कर्मवीर भाऊराव पाटील आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांनी अशी अनेक गांधी पद्धतीची लग्ने लावली. स्त्री पुरुष समानता हा मुख्य धागा या लग्नांच्या मध्ये असतो. म्हणजे ज्या शपथ या मध्ये दिल्या जातात त्या समतेबद्दल असतात. कन्यादान वगैरे विधी नसतो कारण दान करायला मुलगी काही वस्तू नाही.
या विवाह पद्धतीच्या मंगल अष्टका महात्मा फुलेंनी लिहलेल्या मराठीमध्ये आणि सर्वांना समजतील अश्या आहेत.
आपल्या कडील बहुतेक लग्नांच्या मध्ये लोकांचा खूप मान पान ठेवावा लागतो आणि एवढे करूनही कोणी ना कोणी रुसतेच...ज्याचे टेन्शन मुलीच्या आणि मुलाच्या आई वडीलांना असते पण इथे तो प्रकार नसल्यामुळे रुसवा फुगवा नसतो.
बाकी लग्न हा 2 कुटुंब एकत्र येण्याचा आनंदोत्सव असतो , enjoyment असते ती इथेही असते. गाणी आणि इतर सर्व गोष्टी पण असतात. मी स्वतः चे लग्न करताना असे काही किंवा ते नाही पटले तर जैन लग्न सुचवून पाहणार. ती जी कोणी असेल तिला आवडले तर ठीक आहे नाही पटले तर ते ज्या पद्धतीने करतील त्यात एन्जॉय करणार...
महामानवांच्या प्रतिमा स्टेज वर ठेऊन त्यांना अभिवादन करून सुप्रिया व अनिस यांनी एकमेकांशी सत्य वर्तन करण्याची शप्पथ घेतली. ही शपथ पण त्यांना तेथील 2 महिलांनी दिली. धान्याच्या अक्षदा ऐवजी फुलांच्या अक्षदाचा वापर केला होता.
दोघांना सहजीवनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा
संकेत मुनोत
Comment, Share ,Follow and Subscribe.