हा आमचा टीव्हीचा कप्पा आणि ही हिया #आज_जागतिक_पुस्तकदिन_त्यानिमित्त
जवळजवळ 8वर्षांपुर्वी आमचा टीव्ही खराब झाला होता त्यानंतर तो आम्ही तो शेजारी घरकाम करण्यासाठी येणार्या मावशींना देऊन टाकला व त्यानंतर म्हणता- म्हणता 8वर्षे कशी निघुन गेली समजलेच नाही
कोणी नातेवाईक मित्र घरी आले कि मजा येते
तुमच्या घरी टीव्ही नाही ????
" TV नाही म्हणजे तुम्ही जगता कसे ?"
"अरे काहीतरी मनोरंजन साधन नको का?"
"थु तुझ्या जिंदगीवर टीव्ही नाही "
वगैरे वगैरे अशा अनेक विक्षिप्त प्रतिक्रिया काही जण देऊन जात
एकदा तर हद्द झाली
आमच्या समोरच्या घरात काम करण्यासाठी येणार्या जयश्रीमावशीही म्हणाल्या कि माझ्या घरी 3टीव्ही आहेत
आमची कॉलनी तशी मध्यमवर्गीय कम ऊच्च भ्रु कॉलनी असल्यामुळे ईथे हॉलसोबत रुममध्येही बहुतेकांच्या ईथे टीव्ही आहेत
असो पण आमच्या घरीे टीव्हीचे नसणे खुप काही चांगले करुन गेले
सोसायटीतील लहान मुले दिवसभरआमच्या घरीच असत व त्यांच्याशी खेळताना दिवस कुठे जाई समजतही नसे
आता या फोटोतील हिया नावाची दीड वर्षाची चिमुकली सकाळी 6.00वा.च आमच्या घरी येते व सर्वांना ऊठवते , काही नवीन आणल कि दाखवते, घरातील प्रत्येकाची नक्कल करते माझे केस ओढते मोबाईल ओढुन घेऊन त्यावर गाणी लावते व डान्स करते , अक्षरओळख नसली तरी वडीलांशेजारी वर्तमानपत्र घेऊन वाचत बसते त
आणि आमच्या घरात प्रत्येकाच्या चेहर्यावर SMILE आणते , हसवते तीच्यासारखीच अनेक चिमुकली मुले आमच्या घरी असतात ती नव्हती तेव्हा प्रीत नावाचा चिमुकला येत असे
आमच्या घरी टीव्ही नसल्याचे अनंत फायदे मला सांगु शकतो त्यातील काही खालीलप्रमाणे
वाचनाची आवड अजुन वाढली
अनेक समज गैरसमज दुर झाले
जे लेखक, मोठ्या व्यक्ती ,समाजसेवक मी फक्त पुस्तकात वाचत होतो त्यांना प्रत्यक्षात भेटुही शकलो
मला शनिवार रविवार सुट्टी असायची
त्यातील महिन्यातील किमान सुट्टीचे 2 दिवस माणसातील देव शोधुन त्याची भक्ती करु शकलो नाहीतर यापूर्वी मी तसा नव्हतो (अनाथालय,वृध्दाश्रम , गरीब वस्ती)
आणि महिन्यातील सुट्टीचे 3 दिवस ग्रेट
अभय बंग, तुषार गांधी, संजय आवटे, अन्वर राजन, ऊर्मिलादीदी ,संजय सोनवणी, सदानंद मोरे, कुमार सप्तर्षी , डॉ अ़ ह़ साळुंखे , सुगन बरंत, संपतराव साबळे, जगदीश काबरे, करुणा गोखले, सुरेश खोपडे, राज कुलकर्णी, विश्वंभर चौधरी,ऊत्तम कांबळे , आणि अशा अनेक प्रेरणादायी लोकांना भेटुन त्यांच्यासोबत प्रत्यक्ष चर्चा करता आली आपले कार्य करता करता समाजालाही आपल्याकडुन कसे काही देता येईल हे शिकता आले.
वरील लोकांशी आजही माझा नियमित संपर्क असतो वेगवेगळ्या धर्माच्या धर्मगुरुंना भेटुन चर्चा करुन तो तो धर्म समजुन घेता आला. अशा अनेक गोष्टी साध्य करता आला
सोबतच टीव्ही नसल्यामुळे with family चित्रपट बघायला जाणे होऊ लागले पीके, प्रकाश बाबा आमटे , मिल्खा सिंग सारखे प्रेरणादायी चित्रपट सोबतच ईतर पाहणे झाले , ट्रेकिंग, आऊटिंग व अनेक गोष्टी
मित्रांच्या सहकार्याने समाजातील तळागाळातील लोकांसाठी कार्य करण्यासाठी काही सामाजिक संघटनामध्ये खारीचा का होईना वाटा ऊचलु शकलो
अजुनही बर्याच गोष्टी या टीव्हीच्या नसल्यामुळे आणि मुख्यत: पुस्तकांच्या असण्यामुळे साध्य करता आल्या
पुस्तकासारखा जीवलग मित्र मिळाला
शिवचरित्र वाचताना कधी रायगडवर,
आऊनस्टाईन,न्युटन ,
एडिसन वाचताना त्यांच्या प्रयोगशाळेत जात असे (कल्पनेत) , बिल गेटस ,
स्टीव्ह जॉब्सच्या , कार्व्हर, हेन्री फोर्ड,
मंडेला, मलाला , दलाई लामा , महात्मा फुले , डॉ. आंबेडकर, साने गुरुजी, बुध्द , महावीर, विवेकानंद, शहिदेआजम भगतसिंह , सुभाषचंद्र बोस ,
कार्ल मार्क्स ,संत तुकाराम , मार्टिन ल्युथर किंग, क्रांतीसिंह नाना पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील, ओबामा, सँम पित्रोदा , अँजेलिना जोली , ग्वेरा ,
#पुस्तके_निवडतांनाही_थोडी_काळजी_घ्यायला_हवी असे वाटते
लहानपणी मला भडक व ज्वलंत पुस्तके खुप आवडत म्हणजे ती लगेच ऊपलब्धही असत, नथुराम ,सावरकर, हिटलर व तत्सम लोकांची द्वेषपुर्ण पुस्तके हातात पडली होती जी एकदम भारी वाटत पण सर्व बाजु वाचल्यानंतर व अभ्यासानंतर ती #अतिरंजित_व_खोटी आहेत हे समजले.
आज भडकनार्याची गरज नाही तर पेटणार्याची गरज आहे.
भडकण्याने अन्न जळते किंवा करपते तरी ,
परंतु पेटण्याने ते शिजते.
भडकनारे निखळनार्या तार्या प्रमाणे चमकतात आणि खाक होतात पेटणारे चंद्रा प्रमाणे सतत प्रकाश देत निखळुन न जाता अचल राहतात. तुम्ही ठरवा तुम्हला भडकायचे की पेटायचे ?
माझ्या मनात अनेक गैरसमज मनात होते तेही जसजसे वाचन वाढले तसतसे दुर झाले अजुनही अभ्यास चालु आहे
सगळ्यात महत्वाचे म्हणजे
पुस्तक वाचताना किंवा कुणाबद्दलही मत बनवतांना अनेकांतवादाच्या दृष्टीने पहायला हवे
#अनेकांतवाद-अंत म्हणजे शेवट . एकान्त म्हणजे एकच शेवट . अनेकांतवाद म्हणजे अनेक शेवट . म्हणजेच कुठल्याही गोष्टीबाबत एकाच बाजूचे मत न बनविणे . यासाठी हत्ती आणि सात आंधळ्यांची कथा उदाहरण म्हणुन फिट्ट बसते. सात आंधळे हत्तीजवळ जातात. त्यांनी हत्ती आधी कधीच पाहिलेला नाही . हत्तीच्या शेपटीला हात लावून एका आंधळा म्हणतो हत्ती दोरिसारखा आहे . हत्तीच्या पायाला हात लावणारा ओरडतो - हत्ती झाडासारखा आहे . हस्तिदंताला स्पर्श करणारा आंधळा पुटपुटतो - हत्ती भाल्यासारखा टोकदार आहे. सगळ्या आंधळ्यांचे मत वेगवेगळे बनते .
प्रत्यक्षात हत्ती हा दोरी , खांब , भाला इत्यादी सर्वासारखा असतो आणि कुणासारखाच तंतोतंत नसतो . सत्याकडे पाहण्याचे अनेक मार्ग असतात. एकाचवेळी ते सर्व योग्य आणि अयोग्यही असतात . एकाचवेळी निश्चित आणि अनिश्चितहि असतात.सत्याचे मानवी आकलन विभिन्न असते. सत्याचे मानवी आकलन अपुर्ण असते. त्यामुळे स्वत:च्या मताबद्दल कट्टरता किंवा दुसर्याच्या मताचा द्वेष चुक आहे. अनेकांतवाद कट्टर पणाचा मुडदा अहिंसक मार्गांनी पाडतो ! अहिंसेचा जन्म असा मनात आहे . प्रथम तो माझ्या मनात होणार आहे त्यानंतर तुझ्या मनात होणार आहे . तो ज्ञानातून होणार आहे. हे स्पष्ट दिसणारे वैद्न्यानिक सत्य स्वीकारायला पुरुषार्थ लागतो . शौर्य लागते . स्वत:च्या डोळ्यावरची झापडे काढणे हे येरागबाळ्याचे काम नाही
जसे गैरसमज गांधीजीबद्दल तसेच विवेकानंद, शिवाजी महाराज व ईतर अनेक व्यक्तिमत्वांबद्दल व ईतर अनेक दैनदिन गोष्टींबद्दल होते पण सर्व बाजुंनी वाचायची व अनुभवातुन समजण्याची सवय बाजुंनी सवय लागल्यामुळे खुप फायदा होतो
असो अजुन बरेच नवीन वाचायचे आहे वाचलेले कृतीत आणायचे आहे सध्या मोबाईल, फेसबुक , whatsapp यांच्यामुळे सध्या वाचन खुप कमी झाले आहे पण लवकरच हे थांबवुन वाचन पुन्हा चालु करणार आहे
(वरील लेख 6महिन्यांपूर्वी लिहला
आधुनिकतेची कास धरणेही महत्वाचे आहे माझे अनेक मित्र मैत्रिण व ओळखीचे लोक यांचे टीव्हीवर सतत कार्यक्रम असतात सोबतच ठराविक मर्यादा ठेवल्या तर टीव्हीचेही तेवढे तोटे नाहीत झाला तर फायदाच होईल त्यामुळे 4 महिन्यांपुर्वी घरी टीव्ही आणलाय मनोरंजनात्मक कार्यक्रमासोबत ज्ञानवर्धक कार्यक्रम जसे कि डिस्कव्हरी, ग्रेट भेट, रविशकुमार प्राईमटाईम , आवाज महाराष्ट्राचा व सोबत काही विनोदी कार्यक्रम पहायला आवडते.)
आपल्याला फोटोतील कोणतेही पुस्तक पाहिजे असल्यास अवश्य घेऊन जा सोबतच शेजारच्या कप्पयातही एवढीच पुस्तके आहेत
पण फक्त परत आणुन द्या कारण काही मित्र मैत्रिण 2दिवसात पुस्तक परत आणुन देतो म्हणुन घेऊन गेलेत ते अजुन परत आलेच नाहीत
शेवटी एक कवि व सामाजिक कार्यकर्त्याने (दत्ता हलसगीकर) केलेले आवाहन आठवते मीही आपणास तेच करु ईच्छितो
ज्यांची बाग फुलून आली
त्यांनी दोन फुले द्यावीत
ज्यांचे सूर जुळून आले
त्यांनी दोन गाणी द्यावीत
ज्यांच्या अंगणात झुकले ढग
त्यांनी ओंजळपाणी द्यावे
आपले श्रीमंत हृदय त्यांनी
रिते करुन भरुन घ्यावे
आभाळाएवढी ज्यांची उंची
त्यांनी थोडे खाली यावे
मातीत ज्यांचे जन्म मळले
त्यांना थोडे उचलून घ्यावे
संकेत मुनोत
Please do Comment, Share ,Follow and Subscribe